आमची हनुमान जयंती

दुपारी दोन ची वेळ असेल, उन्हाळ्याचे दिवस, आणि  यवतमाळचा विदर्भात ला उन्हाळा. तरी पण घरात बसून रहाणे कधीच नसायचे. अगदी लहानपणापासून मला समोरच्या शामबाबुच्या गॅरेज मधे बसून टाइम पास करायला आवडायचं. तिथेच मी आधी कार रिपेअर्स बद्दल बरंच शिकलो. आम्हा मित्र मंडळींचा फड तिथेच जमायचा. साधारणतः वय असेल १२-१३ वर्ष. गॅरेज च्या शेजारीच एक चिंचेचं झाडं होतं.

एकाएकी झाडावरुन एक माकड खाली असलेल्या इलेक्ट्रिक च्या ओव्हर हेड वायर्स वर पडलं. आम्ही सगळे जण आवाज  कसला आला म्हणून धावत बघायला गेलो. एकाने गॅरेज मधून पाणी आणले आणि त्या माकडाच्या तोंडावर घातले, पण दोन तिन आचके देउन ते शांत झालं.

आम्ही सगळे जण आवाक झालो. समोर कुठल्याही प्राण्याला मरतांना पहिल्यांदाच पाहिले होते. वेगळंच काहीतरी वाटत होतं. दिवस होता हनुमान जयंती चा. दर वर्षी हनुमान जयंती आली की हा प्रसंग आठवतोच. तर, काय करायचं? आम्ही सगळे एकमेकांकडे बघू लागलो. दिलप्या म्हणाला ह्याला जमिनीत खड्डा करुन गाडून टाकू . दफन करणे वगैरे शब्द आमच्या डीक्शनरित त्या काळी नव्हते. शाम्या लगेच उठला आणि घरी पळाला. त्याची शेती होती, त्या मुळे कुदळ, फावडॆ, घमेले(लोखंडी टोपली) वगैरे सगळं सामान त्याच्या घरी नेहेमीच असायचंच.

जागा शोधण सुरु झालं.. शेवटी एक जागा निश्चित केली आणि तिथे खड्डा करणे सुरु केले, ५ फुट खोल खणल्यावर  त्यात त्या माकडाला दफन करणार एवढ्यात  कोणाच्या तरी लक्षात आलं  की स्ट्रे कुत्री त्याला ्खणून काढतील .म्हणून त्यावर टाकायला म्हणून दगडी चिरे आणले ( शेजारच्याच नाल्याचा काढून) .! एकदाचा हा दफन  विधी पार पाडला. आम्ही परत आता पुढे काय? असा मिलियन डॉलर प्रश्न डोक्यात घॊळवत विचार करित बसलो होतो.

हे सगळं झालं आणि मग ठरलं की तिथे एक मंदिर उभं करायचं शेजारी सुरु असलेल्या बांधकामाच्या सामानातुन काही विटा आणि सिमेंट रेतीचं मिक्सचर आणलं आणि हातानेच थापून तिन भिंती उभ्या केल्या. वर छतासाठी एक लोखंडी पत्रा घेतला आणि एक घमेलं त्यावर उलटं घालुन त्यावर सिमेंट थापले. आणि अगदी क्रूड पद्धतिने एकदाचं मंदिर उभं केलं.हे सगळं करण्यात सिमेंट योग्य पद्धतिने न हाताळल्यामुळे आमचे हात संपुर्ण सोलून निघालेले होते. पण घरी काही बोलायची सोय नव्हती , कारण कशाला तडफडायला गेला होतास.. म्हणून माझीच पुजा बांधल्या गेली असती.

आत्ता पर्यंत ह्या माकडाच्या मृत्युची खबर सगळी कडे पोहोचली होती. बरीच मोठी माणसं , म्हणण्यापेक्षा मोठी मुलं पण आली होती.काय झालं? कसं झालं? ह्यावर सगळी माहिती सांगायला आम्ही हिरारीने पुढे पुढे करित होतो. आज हनुमान जयंती, आणि माकड म्हणजे प्रत्यक्ष हनुमानाचे वंशज, म्हणून त्याची पुजा करायची असे ठरले.कोणाच्या ते आठवत नाही पण कुठल्यातरी मोठ्या मुलाच्या ( हल्ली तो एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर आहे पिडब्लुडी मधे म्हणुन नांव लिहित नाही) डोक्यात आलं की आज रात्री आपण सगळे मिळून एकत्र प्रसाद करु या! तर होता होता  शेवटी भंडारा करण्याचे निश्चित झाले…

भंडारा म्हणजे सगळ्यांच्या साठी एकत्र स्वयंपाक करुन मारुतिला नैवेद्य दाखवायचा. त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे कणीक, कांदे , बटाटे आणि प्रत्येकी काही पैसे गोळा केले  . आम्ही लहान मुलं कणीक गोळा करायला निघालो.. हातामधे एक मोठा अल्युमिनियम चा डबा घेउन तो सायकलला लावला जायचा.

आता पर्यंत प्रत्येक घरी माहिती झालेलं होतं की काय झालं ते. सगळ्यांनी तिथे एकदा तरी चक्कर मारलेली होतीच. त्यामुळे पुढचं काम सोपं झालं. प्रत्येकाला जास्त काही सांगावं लागलं नाही.प्रत्येक घरची कणीक त्या डब्यात रिकामी केली जायची. असं करता करता प्रत्येकाच्या घरी जाउन कणीक , कांदे, बटाटे आणले .

स्वयंपाक करण्याचे काम वाड्यातल्या मुलीच करायच्या.तेल आणि इतर साहित्य कोणाच्या तरी घरुन आणुन बटाटयाची भाजी आणि पुऱ्या तळल्या . कोणी तरी घरुन रव्याचा भाजुन शिरा करुन आणला होता..

रात्री हनुमानाची आरती.. सत्राणे उड्डाणे हुंकार वदुनी.. झाली. जितकं काही येत होतं तेवढं सगळं.. म्हणजे भीमरूपी वगैरे म्हणून झालं. सगळे जण हिरिरीने म्हणत होते सगळे श्लोक वगैरे.  जेवायला येतांना प्रत्येकाने घरुन ताट आणि पेला आणणे जरुरी असायचे. अशा तर्हेने हा हनुमान जयंतीचा कार्यक्रम पुर्ण झाला. त्या नंतर दर वर्षी आम्ही हा सहभोजनाचा कार्यक्रम करायचो.

रिसेंटली दिलप्याशी परवाच फोन वर बोललो, तर म्हणाला की अजुन ही पुढची पिढी हा कार्यक्रम करते आहे. पिढी दर पिढी हा वारसा पुढे गेलाय. आता जवळपास ३५ वर्ष झाली असतील त्या गोष्टीला …

अजुन ही हनुमान जयंती म्हंटलं की ते दिवस आठवतात.आणि आपण काय मिस करतोय ते आठवतं..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव, सण. Bookmark the permalink.

3 Responses to आमची हनुमान जयंती

 1. anjali joshi says:

  chan ata amhala hanuman jayantila kirtanala bolva

  • अंजली
   अहो ही गोष्ट आहे आजपासुन जवळपास ३५-४० वर्षापुर्वीची 🙂 गेले ते दिवस.. आजकालच्या मुलांना इतक्या नविन करमणूकीची साधनं आहेत, की अशा करमणुकीची त्यांना गरजच नाही.मुख्य कल्प्रिट आहे टीव्ही.. 🙂

 2. Vikramaditya says:

  कधी माकडांच्या हातचा मार खाल्ला आहे ??? >:

  मी दोनदा……. माझे घर शेतावर आहे,प्रत्येक उन्हाळ्याच्या दिवसात वानरसेना हजर !!!! ऎकदा माकडांना हुसकवाण्यासाठि आम्हि मुले गेलो आणि जास्त शायनिंग मारण्याच्या नादात हुप्याच्या हातात सापडलो……..मग धुलाइच धुलाइ……….

  ज्याने माकडांच्या हातचा मार खाल्ला आहे तो आयुश्श्यात कोणत्याच माराला घाबरणार नाहि…………..अनुभवाचे बोल आहेत………..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s