या चित्रपटाचा रिव्ह्य़ु इतक्या ठिकाणी आलेला आहे की सगळी कडे गुडी गुडी लिहिल्या गेलंय. तरी पण माझ्या दृष्टीतून हा चित्रपट कसा वाटला? ह्याचा उहापोह केलाय इथे.
आजच मी शिवाजी भोसले बोलतोय हा पहायला गेलो होतो. ह्या चित्रपटाबद्दल आधीच इतकं काही वाचलं होतं त्यामुळे अपेक्षा पण खूप होत्या. आमच्या घरी मराठी सिनेमाला जायचं म्हंटलं की माझ्या मुली अजिबात तयार नसतात. अपेक्षेप्रमाणे मोठी मुलगी आली नाहिच. आणि धाकटी पण माझे चांगला चित्रपट आहे म्हणून अशुअर केल्या नंतरच, अगदी मोठ्या रेझिस्टन्सनेच तयार झाली.मोठी मुलगी आता या वर्षी पासून इंजिनिअरिंग कॉलेज ला जाणार, म्हणून कदाचित तिला हल्ली आई बाबांच्या बरोबर बाहेर जाण्यापेक्षा मैत्रिणींच्या बरोबरच सिनेमा पहाणं जास्त रुचत असावं.
मला वाटतं खूप दिवसांच्या नंतर मल्टीप्लेक्स मधे मराठी चित्रपट लागला, आणि तो पण प्राइम टाइम मधे. ह्यामागचे कारण प्रोड्युसर्स आणि मल्टीप्लेक्सचे मालक ह्यांच्या दरम्यान असलेला वाद आहे का? की महेश मांजरेकरांचा ’वट’? काहिही असो.. पण हा सिनेमा मल्टीप्लेक्स मधे पहातांना बरं वाटलं. अर्थात टॅक्स फ्री तिकिट पण ११८ रुपये आहे .
सध्या मुंबईला उन्हाळा आहे. फोन करुन तिकिटं बुक केली होती गोरेगांव हब मधे. हल्ली ही एक चांगली सोय झालेली आहे.पुर्वीसारखा सिनेमा पहायला जायचं म्हणजे एकतर थिएटरवर जाउन तिकिटं काढून आणायची किंवा ब्लॅक ने घ्यायची. ’ती’ ब्लॅक वाली माणसं हळू आवाजात दस का पचास म्हणत फिरणारी टपोरी पोरं पण आजकाल इतिहास जमा झाली आहेत. माझ्या मुलींना ब्लॅक म्हणजे काय हे अजुन माहिती नाही.. काळाचा महिमा दुसरं काय.. थिएटरला पोहोचलो आणि काउंटरवर जाउन नंबर सांगून तिकिटं घेतली.
दुपारी एक चा शो होता. सकाळी हेवी ब्रेकफास्ट झालेला होता. तर एकदाचे थिएटरमधे पोहोचलो. आधी बरेच रिव्ह्युज वाचले होते ते खालील प्रमाणे आहेत. निरनिराळ्या कम्युनिटीच्या वर हा मोस्ट डिस्कस्ड टॉपिक होता. ह्या सिनेमाचं परीक्षण इतक्या ठिकाणी वाचलं आहे की आता जे काही लिहीन, ते पण पुर्व ग्रह दूषित नसावे अशी इच्छा आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट म्हंटल्यावर जरा जास्तच अपेक्षा होत्या. एक चित्रपट म्हणून हा चित्रपट तुम्हाला ३ तास खुर्ची ला खिळवुन ठेवण्यासाठी पुरेसा आहे. प्रत्येक फ्रेम बघतांना जाणवते की महेश मांजरेकरांनी पुर्ण अभ्यास करुनच हा चित्रपट काढलेला आहे. अर्थात बरेच वेळेस हा चित्रपट पहाताना तद्दन दुय्यम दर्जाचा एक मसाला चित्रपट पहातो आहे असेही वाटते. महेश मांजरेकर शिवाजी महाराजांच्या वेशात थोडा जास्तच म्हातारा वाटतो.
माझी मुलगी म्हणाली की बाबा, शिवाजी महाराजांनी जेंव्हा अफझल खानाला मारले तेंव्हा ते ६० वर्षाचे नव्हते. महेश मांजरेकरांच्या चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्या पण मोजता येतात. तसेच महाराजांचा आत्मा हा घोड्य़ावर बसुन प्रवास करतो असे फिल्मी प्रसंग अगदी बी ग्रेड सिनेमामधे शोभून दिसतात.
शिवाजी महाराजांना घोड्य़ावर बसलेले दाखवले आहे . त्यांचा जेंव्हा वरचा अर्धा भाग दाखवतात तेंव्हा ते ठीक दिसतात ,पण जेंव्हा साइड शॉट घेतला आहे तेंव्हा ते महाराजांचे बारिक मांड्या -पाय अगदी (लुकडे पाय)अगदी नजरेला बोचतात. महेश मांजरेकरांच्या चेहेऱ्यावरचा अल्कोहलिक लुक पण बरेचदा जाणवतो.एखादा चांगला तरुण अभिनेता ह्या भुमिकेत जास्त रुचला असता. पण महेश मांजरेकरांना पडद्यावर स्वतः वावरण्याचा मोह आवरला नाही.
सुरुवातीला ज्या पद्धतिने दिनकर मारुती भोसले चा प्रत्येक परप्रांतीय अपमान करतांना दाखवलेला आहे ते पण अगदी टिपिकल हिंदी फिल्मी वाटते. बॅंकेमधला मॅनेजर ज्या पद्धतिने त्याला घाटी वगैरे म्हणून अपमान करतो, तो प्रसंग ??? बॅंकांमधे युनियन्स वगैरे असतात ह्याचा विसर पडलेला दिसतो मांजरेकरांना.. की फक्त चित्रपटाचा टेंपो बिल्ड अप करायचा म्हणून असं अती कल्पना रंजन करण्यात आलं असावं असं वाटतं.
त्या फिल्मी डायरेक्टरला भोसडल्या नंतरचा प्रसंग काय किंवा त्या दुकानदाराने अपमान करण्याचा प्रसंग काय जरा अतिरंजित वाटतात. थोडंफार खरे वाटणारे प्रसंग घेतले असते तर चित्रपट पहायला जास्त मजा आली असती.कधी कधी असंही वाटतं की, पहिल्या अर्ध्या भागामधे असे अतिरंजित प्रसंग म्हणजे मराठी माणसाच्या अपमानाचे प्रसंग भरले नसते तर दुसरा भाग इतका अपिलिंग झाला नसता हे ही तितकेच खरे.
प्रत्येक वेळेस सिनेमा पहायला गेलं की मग मल्टीप्लेक्स मधे पॉप कॉर्न्स ४० रुपये, पेप्सी ४० रुपय अशा किमती कां असतात? हा प्रश्न तर नेहेमीच सतावत असतो. सुरक्षेच्या नावाखाली तुमच्या हातातली पाण्याची बाटली पण फेकून द्यायला लावतात, म्हणजे त्यांच्या कडली पाण्याची बाटली तुम्ही विकत घ्यालंच….त्या दिनकर भोसले सारखं माझं पण रक्त उसळलं होतं.. पण आठवलं हे आयुष्य आहे सिनेमा नाही… 🙂
दिनकर भोसले, ज्या पध्दतिने चांदोरकर कॉलेजमधे मुलाला ऍडमिशन मिळण्यासाठी प्रयत्न करतांना दाखवला आहे, तो प्रसंग – म्हणजे पहिली भेट एकदम मस्त दाखवली आहे. पण नंतर मोबाइल फोनने संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रसंग अगदी बाळबोध वाटतो.ह्याच शॉट मधे डी वाय पाटील मधे डोनेशन घेत नाही असंही हा दिनकर सांगुन जातो.. 🙂 (?)
पहिला भाग म्हणजे हळू हळू तुमच्या मनामधे रागाची लेव्हल वाढली पाहिजेच आणि तुमचे रक्त उसळलेच पाहिजे अशा पद्धतिने शुट केलेला आहे. तुम्ही मराठी आहात, तुमच्या समोर एका मराठी माणसाला सतत मान खाली घालायला लागते , तेंव्हा तुमच्या मनात रागाची लेव्हल अगदी अत्युच्च पातळीवर नेण्याचे काम वर निर्देशित प्रसंग करतात.
तो एक बी एम सी मधला प्रसंग, की ज्या मधे दिनकर भोसले त्या बीएमसी ऑफिस मधे जाउन लेक्चर देतो अन त्या साहेबाचे मन परिवर्तन करतो, हा प्रसंग रिअल लाइफ मधे अगदी अशक्य कोटीतला आहे पण रिल लाइफ मधे खपून जातो.
उस्मान पारकर च्या मुलाच्या कीडनॅपिंगचा प्रसंग आणि नंतर ताबडतोब उस्मान पारकर चे मन परिवर्तन होणे एकदम बालिश आणि न पटण्यासारखे वाटते. इतकं सोपं असतं जिवन तर काय मजा आली असती नाही कां?
महाराजांचा आत्मा घोड्य़ावर बसुन दिनकर भोसलेच्या मुलाला वाचवायला येतो, त्या प्रसंगा मधे अगदी शेवटचा धक्का बाइकला लागे पर्यंत तिथे पोहोचत ना हित .जर तो महाराजांचा आत्मा असेल तर त्याला प्रतापगडावरुन यायला घॊडयाची गरज काय? आत्म्याला घोड्यावर बसून कां यावे लागते असे प्रश्न मनात निर्माण होऊ न देता हा चित्रपट पहा. आवडेल तुम्हाला…!!!बरेचदा साइड शॉट मधे घोडा जरा महाराजांपेक्षा जास्तंच धिप्पाड वाटतो.
मकरंद अनसापुरेचे डायलॉग्ज फारच मनाला पटणारे आहेत. का रे शिवाजी महाराजांचा तो धडा इतिहासात आहे कां? की वगळला का इतिहासातून? हलकेच कोपरखळी मारुन जातात आणि आपसुक हसू पसरतं.. तसेच केसात गजरा अन गांवभर नजरा हा डायलॉग हास्याची खसखस पिकवतो आणि मल्टीप्लेक्स मधे पण टाळ्या घेउन गेला.
हे इतकं जरी असलं तरीही चित्रपट पहातांना काहीच कमतरता जाणवत नाही. तुम्ही अगदी मेस्मराइझ होऊन चित्रपटगृहात बसलेले असता. कुठेही हा चित्रपट कंटाळवाणा होत नाही. वर उल्लेखलेल्या सगळ्या त्रुटी असल्या तरीही बऱ्याच पॉझिटीव्ह गोष्टी पण आहेत की ज्या मुळे सिनेमा पहातांना मस्त वाटतो. जसे महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन, सगळ्यांचेच अभिनय, सिनेमात नसलेली लावणी किंवा प्रेम गीतं .. 🙂
म्हणून माझं एक सजेशन.. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा.. आणि तो पण सिनेमा हॉल मधे जाउन.. सिडी वर नाही.. फार कमी चांगले मराठी चित्रपट येतात, त्या पैकी एक म्हणून हा नेहेमीच लक्षात राहील ..
अर्थात हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट नाही हे लक्षात घ्या आणि मग पाहिला तर या चित्रपटात काही वावगं वाटणार नाही हे बाकी १०० टक्के खरं!
थोडक्यात काय ?? तर तर्क वगैरे गुंडाळून ठेवा ,जस तुम्ही मुन्नाभाई बघतांना गुंडाळून ठेवला होता तसाच..आणि डॉक्टर मांजरेकरांनी पुर्ण अभ्यास करुन (!) बनवलेला हा चित्रपट नक्की पहा!!
एखादा चांगला तरुण अभिनेता ह्या भुमिकेमधे जास्त रुचला असता. – मला अतूल कुलकर्णी आवडला असता त्या भूमिकेमध्ये … 🙂
“डॉक्टर मांजरेकरांनी पुर्ण स्टडी करुन बनवलेला हा चित्रपट” हे मात्र नाही पटत बाबा … मोजके असे ऐतिहासिक सीन सुद्धा चुकले आहेत …
बाळ संभाजीराजे पेटाऱ्यामधून नाही सटकले (शिवाजीराजे सुद्धा नाही सटकले हा भाग अलहिदा … )
I have not seen this movie. But in the advertisement of this movie,they say’me maharashtri ahe’, sounds irritating. Why not’me marathi ahe’?
Is that because Dr.Manjreksr is scared of antimarathi centiments?
Mi Shivaji raje Bhosale Ya Film Var Tika Karnya Evji Tya Film Madhe Kai Sandesh Dila Aahe Hey Important Aahe………. Mala Tar Ya Film Madhe Kahi Chukiche Nahi Vatle. Mala Hi Film Khoop Aavdala. Teva Mala Pan Kuthe Samajale ki Aaplya Sarkhi Mansa Maharashtra Cha Abhiman Karat Nahi Mhanun Aapla Maharashtra Aaj Saglyat Mage Aahe. Mala Mi “MI
MAHARASHTRI” Asalyacha Abhiman Aahe & Tyapeksha Jasta ” MI MARATHI AAHE” Yacha Mala “GARVA ” Aahe.
बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !
Aditi
Thanks for the comment..
एक दुरुस्ती —
वर उल्लेखलेल्या सगळ्या त्रुटी असल्या तरिही बऱ्याच पॉझिटीव्ह गोष्टी पण आहेत की ज्या मुळे सिनेमा पहातांना मस्त वाटतो. जसे महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन, सगळ्यांचेच अभिनय, सिनेमात नसलेली लावणी किंवा प्रेम गीतं .. —
दिग्दर्शक महेश नसून संतोष मांजरेकर आहेत.
आनंद,
मला पण तो एक सिनेमा म्हणुन नक्कीच आवडला.. छान आहे.
khup khup sundar chitrapat ahe
mala chitrapat khup khup avadala
Thanks for the comments.
Look thia film tell me
chan
भुषण
धन्यवाद… !