इन्फोसिस च्या पिंक स्लिप्स-२१०० लोकांना

infy
१९८१ साली केवळ २५० डॉलर्स च्या इनव्हेस्टमेंटवर सात लोकांनी सुरु केलेली ही कंपनी   आज १४ बिलियन्स डॉलर्स चं कॅपिटल जमा करुन बसली आहे.भारतामधे ई सॉप्स च्या ऑप्शन्स खाली एम्प्लॉइज ला शेअर्स ऑफर करणारी ही भारतातिल पहिली कंपनी. तसे, पैसा फंड कंपनी आहे म्हणा , पण ती फार जुनी सक्सेस स्टॊरी आहे.इतकी एम्प्लॉईज फ्रेंडली कंपनी जेंव्हा परमनंट एम्प्लॉइज ला पिंक स्लिप इशु करते तेंव्हा खरंच आश्चर्य वाटते.पगार खुप वाढवुन दिल्या मुळे वॉटम लाइन वर ( म्हणजे प्रॉफिटॅब्लिटीवर ) पडणारा स्ट्रेस कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय  असावा हा.

इन्फोसिस ने काल २१०० लोकांना पिंक स्लिप्स दिल्या आहेत. बरं पिंक स्लिप्स ज्यांना मिळाल्या आहेत ते सगळे परमनंट एम्प्लॉइज होते. कंपनिने ट्रेनिज न काढता  परमनंट एम्प्लॉइज काढण्याचे कारण काय असावे- हा विचार केला तर  मला असं वाटतं परमनंट एम्प्लॉइज चा पगार हा मध्यंतरी खुपच जास्त वाढवुन दिलेला होता. ही जुनी माणसं जे आणि जितकं काम करायची, तेवढंच आणि त्याच क्वॉलिटीचं काम ही नविन मंडळी पण कमी पैशामधे करु शकतात ही गोष्ट लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेतलेला दिसतो.

ह्या कंपनिने अगदी अबाधित राज्य केलंय स्टॉक मार्केट वर. माझ्या कडे ह्या कंपनिचे काही शेअर्स होते, आणि दर एक वर्षाआड बोनस शेअर्स डिक्लिअर केले होते. आम्ही पण वाहत्या गंगेमधे हात धुवुन घ्यायचे म्हणुन, शेअर एक्स बोनस असला की विकुन टाकायचो आणि कम बोनस झाला की परत घ्यायचो. हा शेअर मी एके काळी २९५० रु ला विकला आहे. 🙂 ह्या शेअरने चांगला पैसा मिळवुन दिलेला आहे मला एके काळी, त्यामुळे या कंपनिवर जरा जास्तंच प्रेम.

पण आता हा शेअर मात्र १२०० -१३०० च्या रेंज मधे खेळतोय.रोजचं शेअर मार्केट फॉलो करण्याचे दिवस संपले आहेत. आपला पोर्ट फोलियो लाल झालेला पाहुन आणि दहा चे दोन झालेले पाहुन उगिच हार्ट अटॅक यायची भिती वाटते, त्या मुळे डीमॅट अकाउंटला लॉग इनच करत नाही.. ह्या शेअरचं ऍनॅलिसिस करतांना नेहेमी शेअर मार्केटचे पंडीत लोक हेच सांगायचे की हा शेअर कुठल्याही प्राइसला विकत घ्यायला हरकत नाही. पण मध्यंतरीच्या काळात जेंव्हा डॉलर विक झाला होता तेंव्हा मात्र प्रॉफिटॅब्लिटी कमी होऊन शेअर चे भाव २००० पर्यंत उतरले होते. तेंव्हा पण मला असंच वाटलं होतं की हा शेअर लवकरच पिक अप करेल पण तसे होणे नव्हते, आणि आमचे पैसे अडकले..

पण…. आता मात्र चित्र बदललंय , डॉलर टू रुपी कन्व्हर्शन रेट हा  पुन्हा वाढतोय.ह्या कंपनिज ला पैसा मिळतोय डॉलर मधे आणि खर्च रुपयांत करायचा.  म्हणजे तसं म्हंट्लं तर आय टी कंपनिज चं प्रॉफिट वाढायला हवं नाही कां? तरी पण आय टी कंपनिज का ओरडा करताहेत हेच मला कळत नाही. जरी नविन काही ऑर्डर्स आल्या असतिल किंवा न्सतैलही,  तरी पण आजुन तरी जुन्या असलेल्या ऑर्डर वर अजुन दोन वर्ष कंपन्या  चालतिल असे मार्केटचे पंडित सांगायचे. प्रत्येक आय टी कंपनीचा शेअर अगदी कवडी मोलाने विकत मिळतोय. कंपन्यांचे प्रॉफिट वाढायला हवे.पण तसं काही दिसत नाही. हे असं कां???? ह्या प्रश्नाचे उत्तर मला कधिच कळलेले नाही.

ओबामांच्या लेटेस्ट घोषणेमुळे आउट सोअर्सिंग वर परिणाम झालाय.तसेच , सत्यम मुळे भारतिय कंपन्यांच्या रेप्युटेशन ला नाही म्हंट्लं तरी धक्का बसलाच आहे. या कंपन्यांच्या मुळे भारतिय कंपन्यांची एक साख होती ती आता गेलेली आहे. सत्यम, इन्फी, पटनी इत्यादी कंपन्याचे शेअर्स नॅसडॅक वर पण लिस्टेड आहेतच. ग्लोबल मेल्ट डाउन मधे जेंव्हा अमेरिकन शेअर बाजार कोसळला, तेंव्हा  ह्याच कंपन्यांच्या स्टॉकला पहिला धक्का बसला होता..

अमेरिकेत हायर ऍंड फायर पॉलिसी खुपच कॉमन आहे. पण भारतामधे आपण ह्या गोष्टी साठी अजुन सरावलेलॊ नाही. लोकांनी पगाराच्या बेसिस वर मोठ्ठी कर्ज काढुन फ्लॅट्स, कार्स घेतल्या होत्या. कार घेतांना पण मोठ्ठ्य़ा कार्स घेण्याकडे कल जास्त होता. ह्या सगळ्य़ा गोष्टींचा परिणाम म्हणजे आता  त्यांचे इन्स्टॉलमेंट्स भरणे इत्यादी गोष्टी जड जाइल.हाच प्रॉब्लेम पुर्वी विप्रो च्या लोकांनी पण फेस केलाय.

गेल्या काही वर्षात, आयटी च्या वाढलेल्या पगारांमुळे इंडस्ट्रियल ग्रोथला पण हातभार लागला होताच.ह्या लोकांचा पगार खुपच जास्त असल्यामुळे परचेसिंग पॉवर वाढलेली होती. हे लोकं कितिही पैसे देउन स्पेसिफिक एरियामधे घरं विकत घेत होती. डिमांड जास्त.. अव्हेलेबीलिटी कमी…. भाव वाढतंच होते. कन्स्ट्रक्शन कंपनिज नी अव्वाच्या सव्वा प्रॉफिट्स बुक केले होते. जो फ्लॅट १००० रु स्क्वेअर फुट च्या भावाने मिळायचा तोच आता ४००० च्या वर पोहोचला होता. बिल्डर्स कडे पैशांचा ओघ वाढल्यामुळे त्यांची पण इन्व्हेस्टमेंट पॉवर वाढुन, नविन मशिनरई खरेदी करणे त्यांनी सुरु केले होते. जनरेटर्स, पंपस हे पण लागतातच प्रत्येक बिल्डींगमधे.. त्यामुळे ईंजिनिअरींग इंडस्ट्रिजला पण हात भार लागायचा या आय टी कंपन्यांमुळे.

नॉन आय टी च्या लोकांना कायम आयटी मधे काम करणाऱ्या लोकांच्या नावाने शिमगा करण्याची सवय असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की आय टी मधिल बुम मुळेच इन्डायरेक्टली ,इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल्स, आणि ह्यांच्या ऍन्सिलरी युनिट्सचे पण टर्न ओव्हर आणि मार्जिन्स वाढल्या. तसेच स्टिल, सिमेंट, अल्युमिनियम इत्यादी इंडस्ट्रिज ची पण ग्रोथ झाली.

एकाचे दुःख म्हणजे दुसऱ्याचे सुख.. आता नविन बुकिंग्ज जवळपास बंदच झालेले आहे. मुंबई आणी पुण्यामधे जागांचे भाव खाली येत आहेत. बिल्डर्स सर्वसामान्यांना परवडणार असे फ्लॅट्स बांधायला घेताहेत. म्हणजे आता बिल्डर्सकडे काहिही किमती ला फ्लॅट्स विकत घेणारे  नवश्रीमंत संपले हाच अर्थ निघतो.

इन्फोसिस च्या टॉप ब्रास चे ब्लॉग्ज इथे बघा..

(आय टी मधलं जॉब रेसेशन हा पुर्वी लिहिलेला लेख इथे आहे.)

आयटी कंपन्यांच्यामधे एक भेड चाल आहे. एका कंपनिने कॉस्ट कटिंग करण्यासाठी एखादा निर्णय घेतला, की इतर कंपन्या पण तोच निर्णय घेतातच. लेट्स सी..काय काय पहावं लागेल अजुन तें……..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged . Bookmark the permalink.

9 Responses to इन्फोसिस च्या पिंक स्लिप्स-२१०० लोकांना

 1. विनय says:

  IT कंपन्या दर वर्षी काही लोकं कमी करतात. ही कुठल्याही पदाची असू शकतात. त्यासाठी त्यांचे निकष ठरलेले असतात. पण गेल्या काही वर्षांमधे स्किल्लड लेबरचा तुटवडा असल्याने, हे निकष तंतोतंत पाळले जात नव्हते. पण आता मंदीच्या काळी हे निकष काटेकोर पणे पाळले जात आहेत. नॉन-परफॉमर्सना काढून टाकण्याचे प्रमाण त्यामुळे ठळक पणे दिसू लागले आहेत. IT कंपनीतून कर्मचारी काढणे ही गोष्ट नवीन नाही. फक्त मंदीच्या काळात हे प्रखर पणे दिसून येते एवढेच.

  • विनय
   नॉन परफॉर्मर्स कमी करणे हे समजू शकतो. पण आजच्या काळात ज्यांना कमी करण्यात आलं आहे त्यांना त्याच लेव्हलच्या नौकऱ्या मिळणे सहज शक्य नाही. कारण एका कंपनितुन कमी केलेल्या माणसाला दुसऱ्या कंपनित त्याच लेव्हलचं काम मिळणं कठिण जातं. जर हातात एक जॉब असेल तर दुसरा जास्त चांगला जॉब सहज मिळु शकतो. पण एकदा तुम्ही जॉबलेस झालात की मग मात्र प्रॉबलेम्स होतात.

   मला एका गोष्टीचं अजुन आश्चर्य वाटतं, की गेले दोन तिन वर्षं स्टार पर्फॉरमर असलेला माणुस एकदम या वर्षी नॉन परफॉर्मर कसा काय होऊ शकतो??

 2. Vikrant says:

  Hi Mahendra,
  Today i visited your blog first time. (Courtesy – free time because of recession in IT &/or stalling of our project :-))
  Read through all your posts on my fav subject “Sa Re Ga Ma”. I wanted to post comment your blog on 6th April on “Aajcha Awaj” but couldn’t do so. How to post comment? If i click on comment, it takes me to soem search page and I cant publish anything there.
  What are the ways to comment on your blog?
  BTW, since i liked all your blogs, i m adding it to “Blogs I read” section of my blog !!!!!!

 3. Vikrant
  Thanks for your comments.. Now that you have managed to post the comment, its not necessary to explain… 🙂
  In fact i can not sing, but i am just crazy for the listening the music. I have never missed the episodes of Saregamapa.
  Every day there is some news, on which you have your own views, which are not covered in any news paper , just to express my self, i have started this blog. I just jot down whatever comes to my mind.. Onec again..Thanks for the comments.
  I have also seen your blog, but it seems you are not updating daily.. The posts are of good taste..Try to update frequently if possible,

 4. अनिकेत says:

  अगदी खरं आहे, पिंक स्लिप ही सुध्दा एक वाहती गंगाच आहे आम्हा आय.टी मध्ये. एकाने काढले आहे, चला आपणही काही लोक कमी करुयात, आजकालचा ट्रेंडच आहे, कोणी काही बोलणार नाही. रिसेशन्स च्या नावाखाली नविन लोकांना पगारवाढही मिळत नाहीये. जे आधीपासुन लोक आहेत ते ही या फायनांसीयल इयर मध्ये पगार वाढ बद्दल काही बोलत नाहीयेत. पगार वाढ जाउदेत, आहे ती नोकरी आहे त्या पगारावर टिकली तरी खुप झाले असाच सुर आहे बघा सगळीकडे

 5. तुमच्या एका शंकेच निरसन मी काही प्रमाणात करू शकतो असे मला वाटते.
  डॉलरचा भाव आता चांगलाच वधारलेला असला तरी आयटी कम्पन्याना तेवढा जास्त नफ़ा होवू शकला नाही कारण ह्या कंपन्या कमी जास्त प्रमाणात इंटर नॅशनल मार्केट मध्ये डोलर शोर्ट करून Hedging करतात,जेणेकरून डॉलरची किम्मत जरी कमी झाली तरी नफयावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही कारण इंटर नॅशनल मार्केट मधली त्यांची डॉलर शोर्ट केलेली कोंत्राक्ट्स नाफ्यामाधिल कमी भरून काढतात. पण आता डॉलर चांगलाच वाढल्याने कंपन्यांच्या एकूण नफ्यात जरी वाढ झालेली असली तरी त्यांची डॉलर शोर्ट केलेली कोंत्राक्ट्स M2M तोटा देतात आणी निव्वळ नफ़ा हवा तसा वाढत नाही.कंपनीने किती प्रमाणात Hedging केल आहे हाही याबाबत एक महत्वाचा घटक आहे.

  • धन्यवाद देवेन्द्र..
   पण आता मला शॉर्ट आणी हेजिंग बद्दल वाचावे लागेल… बेसिकली मला काहिच माहिती नाही ह्या दोन्ही प्रकारांच्याबद्दल!

 6. sandeep says:

  मला असे वाटते की या मुळे लोक IT मधे यायला घाबरतिल आणि Real Talent हे त्याच फ़िल्ड मधे काम करतिल. म्हणजे मला असे वाटते की एखाद Mechanical engineer ने जर IT सोडुन त्याच्याच field मधे काम केले तर तो जास्त चांगला perform करू शकतो.त्याचे knowledge जे त्याने ४ वर्षात कमावले आहे ते वाया जानार नाही. अमिर चा ३ इडियट मधला Dialog आठवला. “पहले engineering किया,फ़िर बदमे MBA करके bank में नोकरी कर रहा है। अगर bank में ही जाना था तो engineering क्यों कि ? “

  • संदिप
   आयटी मधे जायला घाबरायचे कारण तसे तरी काही दिसत नाहि. कारण आता जेंव्हा पुन्हा एकॉनॉमी फ्लरिश होते आहे तेंव्हा आयटीला नक्कीच चांगले दिवस आहे..
   माझी धाकटी बहीण बिई इलेक्ट्रॉनिक्स + एमबीए फिनान्स आहे. सध्या फक्त आकडेमोड करते, इंजिनिअरींगचं काहीच काम करीत नाही. आपलीएज्युकेशन सिस्टीमच अशी आहे काय करणार?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s