श्रीलंका वॉर ऑन फायनल स्टेज..

तामिळ लिडर करुणानिधी यांनी एका पब्लिक मिटींग मधे ऍड्रेस करतांना असं म्हंटलं की जर एल टी टी ई ने हे वॉर श्रीलंकन आर्मी बरोबर हरले तर,  ” जसे सिकंदरने पोरस ला वागवले   तसे श्रीलंकन आर्मी ने प्रभाकरनला वागवावे “. 🙂 विथ रिस्पेक्ट!!  (व्हाय??फॉर टेररायझींग देअर सिटीझन्स…???   काय बोलावं , कुणाशी बोलावं हेच कळत नाही या  माणसाला)आता हा माणुस अशी विधानं करतो म्हणजे  हा  ठार वेडा झालाय कां अशी शंका येते. माझी तर अगदी भर चौकात उभे करुन फटके मारायची इच्छा होते अशा लोकांना. टेररिस्ट सपोर्टर्स!!..

पण हा काही येडा नाही. येडा बनून पेढा खातो हा माणुस….आजपर्यंत जवळपास १७ तामिळ लोकांनी त्या श्रीलंकेतिल टायगर्सच्या सपोर्ट मधे तामिळनाडू मधे आत्मदहन केलेले आहे.हे सगळं पाहिल्या नंतर तामिळ नेत्यांना   असं वाटंत असेल की   , ह्या इशूला सपोर्ट केला तर नक्कीच  जास्त मतं मिळतील.. अर्थात हा विचार पण काही संपुर्ण खोटा नाही.. कदाचित त्यांना मतं पण मिळतील पण ! ऍट द कॉस्ट ऑफ  रिपोर्टींग टेररीझम? ? स्वार्थापेक्षा लोकांच्या भावनांशी खेळणारी जमात आहे नेत्यांची, खरी चुक जनतेचीही आहे, की ती अशा नेत्यांना  ओळखत नाही.

ह्याच सोबत करुणानिधी असंही म्हणतात ( म्हणतो लिहायची इच्छा होते आहे, पण केवळ वयाने मोठा आहे म्हणून मान देऊन  लिहितोय) की ह्या विषयात हात घालण्याचे अधिकार स्टेट ला नाही, त्यामुळे केंद्र सरकारच त्यांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेउ शकते.सोनिया गांधींना टेलिग्राम पण पाठवला आहे असंही ते म्हणाले..( म्हणजे काय, तर आमची इच्छा आहे श्रीलंकेत सपोर्ट करायची पण केंद्र नाही म्हणतं. आम्ही काय करणार म्हणून पुन्हा काखा झटकायला मोकळे..)

बरं हेच काय कमी होतं कां, हा वायकॊ नावाचा जयललिता चा पिट्टू असंही म्हणतो, की जर प्रभाकरन च्या केसाला जरी धक्का लागला, तरी, इथे म्हणजे तामिळ नाडू मधे रक्ताचे पाट वाहतील… (कोणाच्या रक्ताचे ते त्या माणसाने सांगितले नाही..)पण हे विधान म्हणजे भारताच्या  कायद्याला आणि संविधानाची अपमान नाही का? हो .. आहे पण केवळ निवडणुका आहेत नां.. म्हणून…. !!!.हा वायकॊ म्हणतो, प्रभाकरन हा तामिळांच्या हदयात रहातो.त्यामुळे त्याला काही जरी झाले तरी तामिळनाडु मधे ब्लड बाथ होइल. ( ही सरळ सरळ धमकी आहे , ह्या माणसाला रा सु का कायद्याखाली अटक व्हायला पाहिजे….)

हे असं स्टेटमेंट केलं की पोलीस अटक करत्तील आणि मग आपल्याला सिंपथी व्होट्स मिळतील असा कॅलक्युलेटीव्ह अंदाज होता वायकोचा.पण करुणानिधी त्याचा बाप निघाला, त्याने ह्या वायको ला काहीही केले नाही… आणि त्याची ही खेळी फेल गेली.

भारतासारख्या टेररिझमने होरपळलेल्या देशाच्या एका राज्याच्या मुख्य मंत्र्याने  श्रीलंकेतल्या टेरारिस्ट लोकांचे फ्रिडम फाय़टर म्हणून समर्थन करणे शंभर टक्के अयोग्य आहे.

काही गोष्टी फार महत्वाच्या वाटतात..जसे… प्रभाकरनने युनो मधे लिंक्स प्रस्थापित केलेल्या आहेत. तसेच इंग्लंड मधला तामिळ इलम मार्च स्पेक्टॅक्युलर होता. जवळपास इंग्लंड मधले  संपुर्ण तामिळ लोकसंख्येच्या दोन तृतियांश तामिळ लोकं  ह्या मार्च मधे  सहभागी झाले होते.जे तामिळ लोकं  इंग्लंडला मायग्रेट झालेले आहेत ते नक्कीच सुशिक्षित आहेत (किंवा असावेत), तरी पण त्यांनी ह्या टेररिझमला फुल्ल हार्टेड  सपोर्ट केला – का ते कळत नाही.

जगातील कुठल्याही तामिळ माणसाच्या दृष्टीने हा ’इलम’ म्हणजे प्रतिष्ठेचा किंवा रिस्पेक्ट चा प्रश्न झालेला आहे. प्रभाकरनने या प्रश्नाला ग्लोबलाइझ करण्याचे काम बरोबर केले आहे.

t1आर्मीने शेवटच्या कनेक्टेड पुडीकुरीयप्पू रोड  वर  कब्जा मिळवला आहे.ह्याच रस्त्यावरून तामिळ टायगर्सला मदत पोहोचवली जात होती.

एक मोठा रेबल्स चा ग्रुप हा फक्त एक कि.मी.च्या परिघात चारही बाजुने वेढला गेला आहे. ह्या ग्रुप मधे प्रभाकरनचा मुलगा चार्ल्स अन्थोनी पण आहे .पाच्पुलमडाई व्हिलेज पण सिक्युअर केलंय मिलिट्रीचे.

आता श्रीलंकन आर्मीने तामिळ टायगर्स ला चारही बाजुने वेढले आहे. म्हणून ,प्रभाकरन म्हणतो, की वेस्टर्न कंट्री नी जर मध्यस्थी केली तर तो  रेस्क्यु मिशन ला परवानगी देण्यास तयार आहे. श्रीलंकन आर्मीच्या ४८ तासाची मुदत पण पुरेशी होईल असे वाटते. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या टायगर्सला आता काबु करणे सहज शक्य होईल असं एका साइटवर म्हंटलं आहे.

श्री लंका आर्मी वर अमेरिकेने दबाव आणला आहे की त्यांनी कमीतकमी दोन आठवडे सिझ फायर करावे. पण श्रीलंकन सरकारने केवळ ४८ तासाची मुदत दिलेली आहे त्या सेफ झोन मधुन सिव्हिलियन  लोकांना बाहेर जाण्यासाठी.याच लोकांच्या मधे टायगर्स पण लपून बसलेले आहेत.प्रभाकरनचा मुलगा पण जखमी झालाय.

गेल्या कांही दिवसात एल टी टि ई चे बरेच सिनियर लिडर्स श्रीलंकन आर्मी कडुन  मारल्या गेले आहेत.गेल्या २४ तासामधे १०० पेक्षा जास्त तामिळ टायगर्स, आणि ७२ तासामधे ५८३ टायगर्स मारले गेले आहेत .जेंव्हा हे युध्द अगदी शेवटच्या टप्प्यामधे आहे तेंव्हा जर श्रीलंकेला जागतिक दबावामुळे सैन्य मागे घ्यावं लागलं तर पुन्हा टायगर्स ला कोंडीत पकडणे अवघड होईल.

माझ्या मते कुठल्याही भारतीयाने किंवा भारतीय नेत्याने जगामधल्या टेररिस्ट प्रवृत्तीच्या लोकांना सपोर्ट करु नये, ते जरी भारतीय वंशाचे टेररिस्ट असले तरीही…!कुठल्याही टेररिस्टांना ठेवलेच पाहिजे असे माझे मत आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s