सत्यम & टेक महिंद्रा चं लग्न…….

satyकधीचं वाट पहात होतो की शेवटी सत्यम कोणाच्या नावाचं कुंकु लावते ते. तसंही एल ऍंड टी गुडघ्याला बाशींग बांधूनच तयार होतं, पण नशीब काढलं टेक महिंद्राने. तब्बल २२ टक्के जास्त कोट करुन सत्यम चा ताबा मिळवलाय टेक महिंद्रा ने. तसंही एल ऍंड टी आयटी मधे लॉसच करते आहे.

—-’पण नशिब काढलं हो पोरिनं. कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभतोय’ एवढंच ऐकणं बाकी होतं कालच्या बातम्यांमधे. सगळे चॅनल्स हाच इशू खूप डिस्कस करित होते. l

ह्या सगळ्या प्रकरणामध्ये क्लायंटस चं ह्या कंपनी वरचा ट्रस्ट नक्कीच शॅटर्ड झालेला आहे. टेक महिंद्रा च्या इंटर्व्हेन्शन मुळे थोडा फार इमेज बिल्डिंग ला फायदा होईल. तसंही शेअर प्राइस ५८ रुपये खुपच चांगली प्राइस आहे ह्या शेअर साठी.

कधी कधी हे स्टॉक मार्केट मला कन्फ्युज करते. टेक महिंद्राने सत्यम टेक ओव्हर केली म्हणजेच विथ लायब्लिटीज.. आणि अशा परिस्थितीत  टेक महिंद्रा चा शेअर कमी व्हायचा तो चक्क १२ टक्के बाउंस झाला, न्युज आउट झाल्याबरोबर.२०० मिलियन्सची लायब्लिटी आणि ही इन्व्हेस्टमेंट जरी कन्सिडर केली तरीही, बाय इअर एंड,  टेक महिंद्राची बॉटमलाइनला रेड करुनच ही डील शांत होइल. माझ्या मते कमीत कमी २ -३ वर्ष तरी लागतीलच प्रॉफिट मधे यायला. तसाही ब्रिटीश टेलिकॉम हा एकच मेजर क्लायंट घेउन सुरु असलेल्या टेक महिंद्राला ६०० नविन क्लायंट्स- ते पण वेगवेगळ्या फिल्ड मधले म्हणजे ही डिल एकदम सोने पे सुहागा!

टेक महिंद्रा २८८९ करोड रुपये इन्व्हेस्ट करुन सत्यम टेक ओव्हर करित आहे..टेक महिंद्रा सत्यम ही कंपनी वेगळी कंपनी म्हणूनच चालवणार आहे असे म्हणतात. टेक महिंद्रा १९०० कोटी रुपये देउन शेअर्स अक्वायर करणार , तसेच, जो पर्यंत ५१ ट्क्के शेअर्स टेक महिंद्राकडे जमा होत नाहित तो पर्यंत एस यु व्ही म्हणुन सत्यम ऑपरेट करेल. ही झाली ऑपरेटींग इंट्रिकसी..

सत्यम मधे सध्या ५०००० एम्प्लॉईज आणि ६०० क्लायंट्स आहेत.  तेंव्हा या डिल कडे सगळ्यांचेच डोळे लागले होते. कॉग्निझंट पण ह्या रेस मधे होती पण शेवटी जीत महिंद्राचीच झाली.

केवळ हाच एक मुद्दा जरा  कठीणच वाटतोय. एकॉनॉमी ची तशी पण  वाट लागलेली आहेच. मागल्या वर्षीपर्यंत आय आय एम मधे ज्या प्रकारे सॅलरिज ऑफर होत होत्या, त्यांच्या कंपॅरिझन मधे या वर्षी ऑफर झालेली ऍव्हरेज सॅलरी ६ लाख आहे. जर आय आय एम मधे इतका परिणाम झाला असेल तर मागल्या वर्षी आय आय एम कॅम्पस  इंटर्व्ह्यु मधुन ४०- ५० लाखाच्या सॅलरिवर घेतलेल्य आय आय एम च्या लोकांना   पण आता जरा कठिणच दिवस आलेले दिसताहेत.

इन्फोसिस ने दाखवुन दिलेल्या वाटेवर आता इतर कंपन्याही चालतिलच. तसंही सत्यम मधल्या बऱ्याच लोकांनी ऑलरेडी सत्यम सोडून दुसऱ्या कंपन्या जॉइन केल्या आहेत.लोकांनाही एक अंदाज होताच की कंपनीचं आता काही खरं नाही, तेंव्हा वुई मस्ट ऑप्ट फॉर द अव्हेलेबल ऑप्शन्स. अगदी १-२ वर्षंवाली मंडळी किंवा खूप जास्त एक्स्पिरियन्स असलेली मंडळी सत्यम सोडून गेलेली आहे. जे कोणी शिल्लक आहेत, त्यांनी पण ट्राय केला असेलच , पण निगोशिएशन पुर्ण न झाल्यामुळे सत्यममधेच थांबले असतील.

आता पुढे काय होईल?? एम्प्लॉइज च्या नोकरयांचं काय होईल? ते काही  असो.. सत्यम चे एम्लॉइज आता जरा सुखाने श्वास घेऊ  शकतील असे नाही… कारण  इथे पण लवकरच पिक स्लिप्ड एम्प्लॉइज ची लाइन लागण्याचे चान्सेस आहेतच.

मार्केटींग जरी कॉमन केलं तर सत्यम मधले काही मार्केटींगची टीम डिझॉल्व्ह करता येइल . महिंद्रा ची मार्केटिंग टीम सत्यमचं पण मार्केटींग करु शकेल.  ऍक्च्युअल  कामं करणारे लोकं जे कोणि आहेत त्यांना मात्र घाबरण्याचं काही कारण नाही.अकाउंटींग  , एच आर, सपोर्ट फंक्शन्स, मार्केटींग , ह्या फंक्शन्स  साठी वेगवेगळा स्टाफ मेंटेन करायची गरज टेक महिंद्राला भासणार नाही.सो, पुन्हा पिंक स्लिप्ड एम्प्लॉइज ची रांग लागेल.

सिनियर मॅनेजमेंटचे कांही एक्झीक्युटीव्हज मात्र नक्कीच बाहेर जातील.त्याच बरोबर बेंचर्स ची एक पुर्ण बॅच बाहेर जाण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही कंपन्या मिळून कॉमन बेंचर्स ठेवले जातिल. आजकाल इतकी मॅनपॉवर ऍव्हेलेबल आहे, की बेंचर्स ठेवण्याचा कन्सेप्ट पण हळू हळू बंद होईल असे वाटते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , , . Bookmark the permalink.

4 Responses to सत्यम & टेक महिंद्रा चं लग्न…….

 1. महिन्द्रची खरी परीक्षा आता आहे. आणी त्याना पुढे काही कठोर पाऊले उचालावीच लागतील.आणी त्यात पिंक स्लिप आल्याच.तस् खर पिक्चर मागील काही वर्षाच्या अकाउंटस रिसट्रक्टचरिंग नंतर आणी यु स बेस्ड ‘युपैड’ कंपनीच्या लियाबिलीटिस क्लेम नंतर कळेलच.६०० क्लायंट्स आणी ४८००० स्किल्ल्ड एम्प्लोयी तसेच सध्याच्या किमातिनुसार ४००० करोड़ रुपये किमतीची जमीन महिंद्राना मिळणार.
  सगळ व्यवस्थित पार पडल तर टेक महिंद्रा+सत्यम इन्फी ,विप्रो आणी टीसीएस या टॉप थ्री आय टी कम्प्न्याना चांगलीच स्पर्धा देइल.जरी महिंद्रा यानी काही लोकाना पिंक स्लिप दिल्या तरी जवळ जवळ ४०००० पेक्षा जास्त कुटुंब जी गेले तीन महीने तनावग्रस्त होती त्याना नक्कीच काल सुखाची जोप लागली असेल. आपल्या सरकारने हे अतिशय डेलिकेट प्रकरण योग्यरितिने हातळल्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे कारण याआधी जगभरात घडलेल्या अश्या स्केम मध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या (डॉट कोम ,एनरोन) नामशेष झाल्या त्याचा इतिहास आपल्याला माहित आहेच.
  असो महिन्द्राना पुढे चांगली कामगिरी करून भारताच्या कोरपोरेट जगताला लागलेला काळीमा पूसण्यासाठी खुप खुप शुभेच्छा …!!!

  • ४००० कोटी ची जमिन जी आंध्रा सरकारने दिलेली होती तिचंपण भवितव्य तसं प्रश्नातितच आहे..
   चंद्राबाबूचे पोलिटीकल अपोनंट आता ह्या केस मधे पण किक बॅक्सचा इशु रेक अप करतिलच!
   माझा अंदाज म्हणजे , कमित कमी ५०००+ लोकांना जावे लागेल..!
   लेट्स वेट ऍंड वॉच!
   प्रतिक्रियेबद्दल आभार.

 2. Aparna says:

  आजकाल आधी पेपरमधल्या बातम्या वाचाव्यात की त्यावरील महेन्द्रकाकांची प्रतिक्रिया याचा विचार करते….:)

  • 🙂 धन्यवाद.. हा ब्लॉग केवळ ह्याच कामासाठी सुरु केलाय, की मनातली सगळी भडास काढुन टाकायची म्हणुन.. काय वाट्टेल ते लिहायचं… 🙂

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s