फोर्ट ग्वालियर

ब्लॉग लिहितानाच एक पक्कं केलेलं होतं की काही झालं तरीही प्रवासवर्णन लिहायचं नाही. मला स्वतःला   प्रवासवर्णन वाचण्यात फारशी मजा येत नाही. कारण काय? तर प्रवास वर्णनात लोकं अगदी आज सकाळी किती वाजता निघालो,काय खाल्लं, कुठे जेवलो, किती जेवलो, आणि किती वाजता परत आलो, असे निरर्थक डिटेल्स देतात, की जे वाचायला कंटाळवाणे होतात.

हे प्रवास वर्णन नाही, फक्त मला आवडलेल्या  एका किल्ल्याची थोडक्यात माहिती आहे. काही दिवसापूर्वी मी ग्वालियरला गेलो होतो. कित्तेक वर्ष ग्वालियरला जाणं होतंय पण तिथला किल्ला पहाण्याचा योग याच वेळेस आला. थोडा रिकामा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून किल्ला पहायला गेलो होतो.

ह्या किल्ल्याचे बांधकाम इ.स. १४८० ते ११५०८ मधे राजा मानसिंह तोमर ह्या हिंदु राजाने केले होते. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज इव्हन ५०० वर्षांच्या नंतर पण ह्या किल्ल्याची परिस्थिती उत्कृष्ट आहे.

कुठेही भिंती खचल्या नाहीत., किंवा इतर काही डॅमेजेस झाले नाहीत.आजही हा किल्ला अतिशय उत्कृष्ट अवस्थेत आहे. हेच जर आपण शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिले तर एकही दालन व्यवस्थित अवस्थेत सापडत नाही.

पूर्वीच्या काळी म्हणजे ५०० वर्षांपूर्वी रंगवण्यासाठी वापरात आलेले व्हेजिटेबल कलर्स आणि दगडांवर केलेले निळे मीना काम आजही बऱ्याच ठिकाणी सुस्थितीत आहे.

ह्या किल्ल्याची एक  खास विशेषता म्हणजे ह्या किल्ल्याचे चार मजली बांधकाम आहे. त्यापैकी दोन मजले जमिनीखाली आहेत. ह्या जमिनी खालच्या मजल्यावर राणी वास होता असे म्हणतात. सगळ्यात खालच्या मजल्यावर पाळणाघर, आणि राण्यांना जलक्रीडा करण्यासाठी म्हणून केसर कुंड आणि एक फाशी घर पण आहे. ह्या किल्ल्याची उंची ३०० फुट आहे. तळघरामधे ्नैसर्गीक प्रकाशाची व्यवस्था आरसे वापरुन केलेली आहे. कुठल्याही प्रकारचे आर्टीफिशिअल लाइटींग न करता सगळीकडे व्यवस्थित प्रकाश असतो.

भर उन्हाळ्यात पण इथे या तळ घरामधे अगदी थंड आणि शांत वाटतं.तळघरातून  वर बोलता यावं म्हणून दोन पोकळ पाइप लाइन रन करण्यात आलेली आहेत भिंतीतून! ह्या दोन पाइप पैकी एक पाइप बोलण्यासाठी आणि दुसरा ऐकण्यासाठी वापरात यायचा.

राजाच्या बेडरुमच्या भोवती चारही बाजुने नर्तकी पायात घुंगरं बांधून राजाला उठवायला म्हणून सकाळी नाच करायच्या, असं तो गाइड सांगत होता. अर्थात गाइडच कितपत खरं आणि कितपत खोटं हे काही लक्षात येत नाही. तरीही अशा ठिकाणी गाइड असला की जास्त मजा येते.

बाहेरून सजवण्यासाठी मोर, सिंह, हत्ती बदक इत्यादींच्या आकृत्या कोरण्यात आलेल्या आहे. त्या काळच्या जाळ्या सुद्धा अजुन व्यवस्थित आहे.सद्यस्थितीचा पहाता, हा किल्ला कमीत कमी अजुन ५०० वर्ष असाच उभा राहील असे वाटते.

१६व्या शतकामधे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. पण त्यांनी हा किल्ला डॅमेज न करता जेल म्हणून उपयोगात आणला.किल्ल्याच्याच परिसरात दोन मंदिरं पण आहेत. त्या पैकी एक सास बहु का मंदिर आणि दुसरं तेली का मंदिर ही दोन्ही मंदिरं अगदी सुस्थितीत आहेत आणि मेंटेनन्स पण सुंदर ठेवलं आहे. १६ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात गेल्या मुळे सगळ्या मंदिरातील मुर्त्या मात्र  चोरीला गेलेल्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापैकी एकही किल्ला अजुन बऱ्या अवस्थेत नाही ह्याचं वाइट वाटतं..त्या किल्ल्याचे कांही फोटो पिकासावर लोड केले आहेत.

Or you can even see here the same in You Tube..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , . Bookmark the permalink.

3 Responses to फोर्ट ग्वालियर

  1. Vinay says:

    ग्वालियरचा किल्ला शाबूत राहिला कारण सिंधीयांनी इंग्रजांची सोबत दिली. नाहीतर तो सुद्धा नष्ट झाला असता. शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांना इंग्रजांनीच नष्ट केले आहे. त्याचे कारण असे की महाराष्ट्रातले अनेक राजे इंग्रज विरोधक होते. त्या सगळ्यांना हरवल्यावर, त्यांना गडाचा आसरा मिळू नये, म्हणून ते गड उडवून देण्यात आले.

    राजपुताना मधले अनेक किल्ले-महाल सुद्धा ह्याच कारणामुळे अजूनही सुस्थितीत आहेत.

  2. Amol says:

    Vinay barobar bolala. Mahendra saheb aata tari tumhi vait vatun ghevu naka.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s