ब्लॉग सर्च

वर्ड प्रेस मधे तुमचा ब्लॉग शोधण्यासाठी कुठले की वर्ड्स वापरले गेले ते येतं. मी खूप उत्सुकतेने हे शब्द चेक करत असतो. हा सर्च क्रायटेरिया रिडर्स च्या मानसिक स्थिती, आवडीच्या बद्दल बरंच काही सांगून जातो.

नॉर्मली आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन किंवा प्रथमेश , कार्तिकी ह्यांच्या पैकी एका बद्दल तरी सर्च क्वेरी रोज असतेच. त्यावरुन हेच लक्षात येतं की अजूनही त्यांची म्हणजे लिल चॅम्प्सची मराठी मनावरची  जादू किंवा पकड कमी झालेली नाही. हल्ली झी ने सारेगमप लिल चॅम्प्स ची गाणी नेट वरुन ( झी च्या वेब साईट वरुन) काढून टाकली आहेत. त्यांच्या बद्दल पण रोज क्वेरी असते.पण त्या पुर्वीच मी सगळी डाउन लोड करुन घेतली होती.. त्यामुळे माझ्याकडे सगळी आहेत. काही लोकं म्हणताहेत की ४ शेअर्ड वर अपलोड करा म्हणून पण एकंदर ८०० एम बी चा डाटा अपलोड करणे कंटाळवाणे  होतय..

झी ने स्वतः त्यांचा अल्बम काढला आहे , जर नेट वर गाणी ठेवली तर अल्बम कोण घेइल विकत? केवळ ह्याच कारणासाठी मला वाटतं की आजचा आवाजची गाणी पण नेट वर टाकलेली नाहीत.

नविन सारेगमप आता सुरु झालंय, पण फक्त एक दोनदाच फक्त ह्रुषिकेश बद्दल क्वेरी होती.तसेच एकदा पुष्कर लेले बद्दल पण इंटरेस्ट क्रिएट झालेला दिसला. लोकांना नवीन सारेगमप मधे , जरी सगळे प्रतिथयश सिंगर्स आहेत आणि सुरेशजी आणि हृदयनाथ मंगेशकरांसारखे ज्ञानी परीक्षक आहेत तरीही फारसं अट्रॅक्शन क्रिएट झालेलं दिसत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त सारेगमप हा पण नेहेमीच्याच सर्च मधे असतो.

स्त्री, स्त्री पुरुष संबंध,व्हर्जिनिटी, संभोग हे शब्द पण रोजच्या  सर्च मधे असतातच,त्याच बरोबर सुहाग रात ह्या विषयावर सर्च करणाऱ्यांचे प्रमाणही खुप  जास्त आहे . माझ्या एका लेखामधे हा शब्द वापरला गेल्यामुळे त्या लेखाचे वाचन बऱ्याच लोकांनी केलेले आहे.मला वाटतं भारतामधे ह्या गोष्टींवर टॅबो असल्यामुळे जरा जास्तच इंटरेस्ट आहे लोकांना  ह्या गोष्टी मधे.सेक्स हा तर जगभरातील आवडीचा विषय आहे.असं गुगल चा सर्व्हे म्हणतो.अर्थात सेक्स वर सर्च करणारे जास्तीत जास्त टिन एजर्स असावेत असे वाटते.

इंटरकोर्स ,एड्स आणि बलात्कार ह्या विषयाचा सर्च करणारे रोज कमीतकमी ऍव्हरेज ३ ते ५लोकं तरी असतात.  आणि हा सर्च क्रायटेरिया मला डिस्टर्ब करुन जातो.. कां बरं एखाद्याला बलात्काराबद्दल वाचावंसं वाटत असेल बरं? ज्या कोणी एड्स बद्दल सर्च केलाय, त्याने कधी वेश्यागमन केले असेल कां? गिल्टी कॉन्शस म्हणून तो आता नेटवर काही सापडतं कां म्हणून शोधतोय का? अशा प्रश्नांनी माझं मन हैराण होतं.या विषयावर समाज प्रबोधन अतिशय आवश्यक आहे. लोकांना जर काही माहिती मिळाली नाही तर मग मात्र जे काही तुटपुंजे किंवा अर्धवट ज्ञान त्यांना मिळतं त्यावरुन स्वतःची मतं फॉर्म करतात. सेक्स एज्युकेशनची आता भारतामधे खरंच गरज आहे असे वाटते.

खेळ , माझी बायको, बातम्या हे पण सर्च केले जातात. माझी बायकॊ, आणि बातम्या हे जेंव्हा लोकं सर्च मधे टाकतात , तेंव्हा त्यांना कुठलं बरं उत्तर अपेक्षित असेल ते??

शिवाजी राजे, शिवाजी, किंवा मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हे सर्च आयटम्स रिसेंटली दिसुन आले. ( गेल्या १०-१५ दिवसापासुन) .आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनिल गावस्करचं नांव पण आलंय गेल्या ४-५ दिवसांपासुन.तालिबान, पाकिस्तान, रेसेशन, अमेरिका हे पण नेहेमीचेच सर्च टॉपिक्स आहेत, अगदी एव्हर ग्रिन…

एक दिवस तर गणपती हा सर्च मधे सापडला, सोबत साईबाबा पण होते.. एकदा बाटा चप्पल .. ( इथे इंटरनेट वर बाटा चप्पल कशाला बरं शोधत असतील लोकं ? ) पण सर्च केलेली होती. कुठल्यातरी एखाद्या पोस्ट मधे हे वर्ड आले असतील …….
हे सगळं इथे का पोस्ट करतोय?? सहज.. माणसाची मानसिकता कशी असते हे पाहून मला गम्मत वाटली , म्हंटलं, तुमच्याबरोबर पण शेअर करु या ही गंमत..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

17 Responses to ब्लॉग सर्च

 1. abhijit says:

  महेंद्र,
  धोनी, हरभजन व पद्मश्रीवर लिहा.

  • पद्मश्री ची खिरापत वाटुन झालेली आहेच ना… धोनी पेक्षा पद्म्श्री हेलन वर लिहायला मला जास्त अपिल होतिल.. पद्मश्री अक्षय कुमार हजारो लोकांसमोर आपल्या पॅंटची बटनं बायको कडून काढुन घेणारा.. पण एक इंटरेस्टींग क्रायटेरिया आहे. ह्या विषयावर पिएचडी करता येउ शकेल इतक्य़ाआ ‘कॉंट्रोव्हर्सिज आहेत.

 2. santhosh says:

  अच्छी ब्लॉग हे / और लेखनी बी बाड़िया हे / पड़कर बहुत खुश हुवा / मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे…? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लणगौगे टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला.. ” क्विलपॅड “. आप भी ‘ क्विलपॅड ‘ http://www.quillpad.in यूज़ करते हे क्या…?

  • संतोषजी
   नहीं. मै बरहा.कॉम साइटसे ऑफ लाइन टाइपिंग के लिये बरहा ७ डाउनलोड किया है. बहुत ही युझर फ्रेडली है. जरुर ट्राय किजिये.प्रतिक्रिया के लिये आभार..

 3. Sonal says:

  kharach..’majhi bayko’ internetwar kashala search karel kon? aani kai shodhayach asel tyatun? this one was really funny.

  • धन्यवाद नचिकेत , सोनल
   खरंच कठीण आहे लोकांचं… मला वाटतं प्रत्येकालाच हा अनुभव येत असेल. फक्त मी शब्दांकीत केलंय.. झालं..

 4. Nachiket says:

  जबरदस्त इंटरेस्टिंग विषय घेतलात..

  महेन्द्रजी.. मीही असाच shock व्हायचो..काय सांगू तुम्हाला..

  हे पहा सर्चमधे आलेले शब्द:

  “बालमजूर” (हे ठीक आहे..)

  “काळ खूप पळतो” (म्हणजे काय सर्च करायचं असावं??)

  “बलात्कारी दवाई” (म्हणजे काय कोण जाणे?!)

  हडळ (हा शब्द दर दोन दिवसांनी येतो..बाप रे..!!)

  • नचिकेत
   हडळ माझ्याकडे अजुन तरी आलेला नाही. कदाचित तुमच्या कुठल्यातरी पोस्ट मधे हा शब्द आलेला असेल म्हणुन सर्च मधे दाखवतो..

 5. sahajach says:

  नेहेमीप्रमाणे विषय वेगळा तरिही अतिशय common….
  पोस्ट मस्त..खरच मी पण नेहेमी बघते सर्च कसा केला गेला तो..गंमत म्हणजे मी स्वत: गुगल ला एकदोनवेळा तेच सेर्च topic टाकुन बघितले…माझ्या blog व्यतिरिक्त आणखी काय options येतात ते पहायला..

 6. Vikrant says:

  Hi,
  How to carry out the search you are talking about? Is this facility available on blogspot??

  • I dont think this is available in Blog spot. In Word press, you can come to know, what are the key words people used to reach your blog. It always facinate me to read how people know about myblog.. so check it up

 7. Nitin Sawant says:

  majhya blog war jastit jasta lok “Marathi keyboard” ya keyword warunach yetat. Aajun jasta visitors sathi mala jastit jasta unique keywords shodhun tyawar articles post karayala pahijet.

 8. sonalw says:

  kas shodhtaat lok kaay search karun aale he? malapan saanga na konitari.

  • click on Dashboard, then blog stats, then you will find the search engine trems as under:-
   Search Engine Terms

   These are terms people used to find your blog.
   Today
   Search Views
   सारेगमप 1 More stats
   झी टीव्ही 1 More stats
   मनोरंजन 1 More stats
   मराठी कविता 1 More stats
   शिवाजी 1 More stats
   Yesterday
   Search Views
   सारेगमप song 4 More stats
   पुरुष स्त्री 2 More stats
   शिवाजी 2 More stats
   http://www.zeemarathi.com little champs 2 More stats
   एड्स 2 More stats
   हात 2 More stats
   saregamapa little champs arya ambekar 1 More stats
   arya ambekar from sa re ga ma pa 1 More stats
   बिहार 1 More stats
   अंतर्वस्त्र 1

 9. Ashwini wale says:

  he tar sahi ch aahe ki me jeva ke particular bolg shodhat hote teva me tya blog owner lihile ki me ase ase search kele etc mhanje word press ne maza search path already tya blogger la sangit la hota tar …………….

  chan lekh i think u r the one marathi blogger who started marathi blogging when there were only few marathi blogers ……… keep it up

  why don’t u publishes ur wrinting in paper though internet is there every where there are many readers who don’t know how to access internet but they are awaiting for new marathi sahitya …….

  • @अश्विनी,
   आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या बद्दल आभार. तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रियेमुळेच नविन काहितरी खरडायचा मुड येतो.
   मी ब्लॉगिंग सुरु केलंय.. जानेवारी १८ २००९ पासुन, म्हणजे आज साधारण ३ महिने झालेत. पण रोज काहितरी पोस्ट असतंच माझं..किती दिवस उत्साह टिकतो ते बघायचं झालं..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s