इंडीयन्स ऍंड डॉग्ज नॉट अलाउड..??

पूर्वी जेंव्हा भारतामधे इंग्रज राज्य करित होते तेंव्हा अशा पाट्य़ा सर्रास पहायला मिळायच्या. आणि भारतियांना पण त्याचं काहीच वाटत नसायचं… अर्थात काही भारतीय वगळता………! कालापासून जो गदारोळ सुरु आहे रश लिंबॉग च्या नावाने. त्याने केलेल्या कॉमेंट्स वरुन भारतीयांमध्ये खूपच उथलपुथल माजली आहे.हे पोस्ट म्हणजे एक स्वैर भाषांतर आहे रेडिफ च्या साईटवर आलेल्या पोस्ट  मधल्या काही पोस्टचे .

१० एप्रिल २००९… तो दिवस , रेडीओ वर प्रोग्राम सुरु होता.विषय होता.. अमेरिकन जॉब्ज चे आउटसोअर्सिंग! बरेच जॉब्ज जे आहेत ( कॉल सेंटर , सॉफ्ट वेअर , इत्यादी)  भारतामधे आउट सोअर्स करण्यात आले आहेत. कारण .. बरेचदा डिस्कस झालंय.. हा लिंबॉग आता त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळुन अमेरिकन लोकांच्या भावनांना हात घालतोय.

हा माणुस स्वतःला रिपब्लिकन पार्टीचा स्पोक्सपर्सन समजतो.ह्याची आफ्रिकन अमेरिकन्स ( निगर म्हणायचं नाही त्यांना) बद्दलची मतं, होमोसेक्सुअल्स , आणि विकलांग लोकांच्यावर केलेले रिमार्कस  पण प्रसीध्द आहेत.नेहेमीच काहीतरी वादग्रस्त विधाने करण्याची याची सवय आहे.

तर १० एप्रिल ला काय झालं? ह्या माणसाने रेडीओ वर कॉमेंट पास केली की.. जॉब्ज आउटसोअर्स करण्यात आले आहेत एकॉनॉमिक रिझन साठी.. आणि ते आता परत येणार नाहित अमेरिकेत.तो एका कॉलरशी बोलतांना म्हणतो, तुम्ही जर बसून रहाणार असाल की जॉब्ज जे आता स्लमडॉग्ज भारतामधे करताहेत ते येतील आता परत आपल्याकडे असे वाटत असेल की ते जॉब्ज कॅन्सल होऊन येतील , स्लम डॉग्ज ला नोकरीवरुन काढून तुम्हाला कामावर ठेवतिल — इट इज नॉट गोइंग टू हॅपन. एकॉनॉमी अशा प्रकारे चालत नसते..त्याच्या ह्या स्टेटमेंट मधे स्लमडॉग हा शब्द वगळला तर चुकिचे काहिच नाही.

यावर पुढे काही लिहिण्यापूर्वी … एका सोशल साईटवर काही लोकं आयटी वाले म्हणताहेत की ही कॉमेंट दुर्लक्षित करावी. बरोबर आहे.. स्वाभिमान विकून खाल्ल्यावर दुसरं काय करता येणार आहे? काही लोकं म्हणताहेत की ही कॉमेंट आय टी च्या लोकांवर नाही…म्हणून आनंदी होताहेत… पण …?? ही कॉमेंट भारतावर आहे हे विसरुन जातात.भारतावर कॉमेंट आहे नां?? मग ठिक आहे.. आमच्यावर म्हणजे आय़ टी मधे काम करणाऱ्यांवर  नाही नां? मग झालं तर! काहींचं असंही म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे नां की आपण स्लम डॉग नाही म्हणुन , मग कशाला लक्ष द्यायचं लिंबॉग कडे?

हीच मंडळी अमेरिकेत राहुन कांही दिवसापुर्वी राज ठाकरेंना ह्याच सोशल साइटवर सपोर्ट करित होती. अरे.. भारतामधे केवळ दुसऱ्या स्टेटचा आहे म्हणुन त्याचे शिरकाण करण्याची भाषा बोलणारे लोकं आ्णि तिथे लिंबॉग सारखे लोकं ह्यात काहीच फरक नाही.. सगळे शेवटी एकाच माळेचे मणी.

ऑन साईट कामं संपलीत आणि परत या म्हणून सांगितलं तर काही मंडळी तिथेच राहण्यासाठी अगदी काहीही करण्यास तयार आहेत.अगदी गॅस स्टेशनवर गॅस भरण्यासाठी , किंवा वेटर म्हणून काम करायची ही त्यांची तयारी असते.. ह्या प्रवृत्तीवर पण बऱ्याच पोस्ट आहेत…

कोणी एक म्हणतोय की कालचे स्लमडॉग्ज उद्या मिलियोनिअर होतिल आणि आजचे मिलिओनिअर अमेरिकन हे ह्या रेसेशनच्या शेवटी स्लम डॉग्ज होतिल.

एक म्हणते की अमेरिकेत आज कामवाली बाई पण १००० डॉलर घेते. तेंव्हा तिने ४ घरी कामं केलीत तरी तिला आय्टी इंजिनिअर इतका पगार मिळु शकतो. जे काम भारतीय केवळ ३ ते ४ हजारात करतात तेच काम करायला अमेरिकन्स १२ ते १४ हजार घेतात. पर कॅपिटा इनकम यु एस मधलं १५०० डॉलर पर मन्थ आहे. पेप्सी भारतामधे १० रुपये आहे तीच यु एस मधे २ डॉलर आहे.

काही लोकं असंही लिहितात की अमेरिकेत भारतीय लोकं स्लमडॉग्ज प्रमाणेच रहातात. एकाच रुम मधे ४ लोकं रहातात आणि कर्ड राइस खाउन जगतात.. आणि ही कॉमेंट करणारा एक भारतीयच बरं कां! एक माणुस भारतीय असंही म्हणतो, की आम्हाला काहीही म्हंटलं तरीही काही हरकत नाही. आम्ही इथेच रहाणार.

एका माणसाचं असंही मत आहे की मला स्लम डॉग म्हंटल्यावर काही फरक पडात नाही. इट्स जस्ट फ्रेंडली ऍड्रेस.हा भिकारचोट असंही  म्हणतो की ह्याच्या फेलो अमेरिकन कामगार मित्राने खांद्यावर थोपटून ह्याला कॉंग्रॅच्युलेट पण केलं इतकी सुंदर फिल्म बनवल्याबद्दल.अर्था हा एक मल्लू दिसतो.. नावावरून तरी. सुंदरराज नांव याचं.

पण एका गोष्टीचं बरं वाटलं की भारताला डिफेंड करणारे पण बरेच लोकं आहेत रेडिफ वर…

रेडिफ मधे जवळपास ७०० च्या वर कॉमेंट्स आहेत या पोस्टवर. मी जवळपास  २०० वाचल्या.. आणि मग आता मात्र कंटाळा आलाय.. सो इथेच थांबतो..

जर आउटसोअर्सिंग थांबवलं तर अमेरिकन एकॉनॉमीचं काय होइल ते इथे डिस्कस केलंय..हे एक जुनं पोस्ट आहे रेसेशन चा अमेरिकेवर इम्पॅक्ट जरुर वाचा..
फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते की आता पुन्हा भारतियांचे विरुध्द हेट क्राइम सुरु होऊ नयेत हीच इच्छा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to इंडीयन्स ऍंड डॉग्ज नॉट अलाउड..??

 1. amit joshi says:

  तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे याचा पत्ता लागत नाही. तुमचे मत सांगीतलेच नाहीत. केवळ भावनीक उद्रेक. सत्य हेच आहे की आय टी मध्ये काम करणारे लोक रोजगारीच करत आहेत. त्यांना स्थानीक लोकांविरुद्ध उभे करून राजकारणी त्यांचे काम साधून घेणारच. ती अमेरिका असो की महाराष्ट्र. पैसे मिळवण्यासाठी हा अपमान गिळणे भाग आहे. मिंध्याला कसला आलाय स्वाभिमान? भारता्ची अर्थव्यवस्था मजबूत होईपर्यंत हे टोमणे ऐकणे भाग आहे. पोकळ स्वाभिमानाच्या गप्पा कशासाठी? लेखनाचा उद्देश समजला नाही; तुमच्याही, आणि त्या ‘सोशल साईटच्या’ही.

 2. bhagyashree says:

  tumhi mipa varche marathi_manus ka?

  • भाग्यश्री
   मी मिपा वर नसतो.फार थोडे दिवस होतो मी मिपावर. कधिच बंद केलंय तिथे येणं. तिथे पण जेंव्हा होतो, तेंव्हा माझ्या खर्य़ा नांवानेच वावराय्चो- महेंद्रच नांव होतं तिथे पण. मी सगळ्या साइट्सवर माझ्या खऱ्या नावानेच वावरतो .
   अमित
   मी माझं मत आधिच सांगितलंय, दोन पोस्ट आधिच लिहिली आहेत मी रेसेशन याच विषयावर. त्यामुळे पुन्हा आपलं मत टाळलंय. कुठल्याही भारतियाचे रक्त उसळेल असेच लिम्बाह बोलला आहे.त्यामूळे अर्थातच मला पण त्याचं बोलणं आवडलेलं नाही. रेडिफ वरच्या बऱ्याच कॉमेंट्स मी वाचल्या आहेत. तिथे ’त्यांच्या’ कॉमेंट्स आणि ’आपली’ उत्तरं.. वाचली.. जवळपास २०० तरी नक्कीच. ही रेडिफ ची लिंक अगदी कॉमन झालेली आहे. पण नॉरमली आपण फक्त पोस्ट वाचतो, कॉमेंट्स नाही . म्हणुन पोस्ट वाचल्यानंतर इथे कांही कॉमेंट्स पोस्ट केल्या आहेत.कांही भारतियांच्या कॉमेंट्स पण अगदी वाचतांना चीड येते!असो!

   तुम्हाला काय वाटतं? या डॅनी ने हा चित्रपट काढण्यापुर्वी भारताची प्रतिमा वेस्टर्न वर्ल्ड मधे कशी होती? गारुडी, हत्ती, नंगे साधू ह्यांचा देश.. थॅंक्स टु बी बी सी आणि इतर चॅनल्स. भारताची न्युज म्हंटली की आधी नंगे साधू,कुंभ मेळा वगैरे दाखवतात.

   मी मुंबई ला रहातो. मागच्याच आठवड्यात एका वर्क्शॉप साठी गिफ्ट आर्टीकल बघायला म्हणुन धारावित गेलो होतो.दुकानदार म्हणाला, साब फॅक्टरीमे चलॊ.. म्हणुन आत डिप इंटेरिअर्ला घेउन गेला.धाराविला लेदर गुड्स एक्दम मस्त मिळतात आणि रिझनेबल रेट ने. तिथे मला जे दिसलं ते पाहुन तर अक्षरशः चीड आली.काही फिरंगी लोकांना घेउन एक माणुस आला होता, आणि ते लोकं तिथले फोटॊ काढंत होते . ह्या टुर साठी १००० रुपये द्यावे लागतात.आता हाच माणुस अमेरिकेत किंवा जिथुन कुठुन आलेला असेल तिथे परत गेल्यावर हेच फोटॊ दाखवेल नाही कां? आपली किंमत आपणंच कमी करुन घेत आहोत. काही अंशी आपलेच लोकं जबाबदार आहेत असंही वाटतं मला बरेचदा ..!

   विजय, अमित, भाग्यश्री,
   प्रतिक्रिये करिता आभार..

 3. Vijay says:

  सुन्दरराज हे नाव मल्लू नाही. मल्लू सुंदरराजन असेल.

 4. bhagyashree says:

  hmm alrite.. tumchi mata barich same ani kahi vakya tar farch same vatli mhanun vicharla.. !

  amit sarkhach malahi vatate. mala extreme matanvar kahi react nahi karta yet.. tyaamule lekhavar no comments! varchya vakyache explanation lihanyasathi ale..

 5. Kedar says:

  Yes, as you said he must be “Maluu” characterless selfish people

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s