शाळा एके शाळा….

शाळेचा पहिला दिवस आठवतो कां? नाही ? मला तर अगदी स्पष्ट आठवतोय. बऱ्याच गोष्टी आठवताहेत जुन्या.. कालच माझ्या एका स्नेह्यांच्या मुलाने पहिल्यांदा उभे राहिल्याचा पोस्ट टाकला तेंव्हाच एकदम जाणवलं की असे कित्येक आनंद असतात, ज्याची किंमत पैशात करता येत नाही. जसे मुलाने उभे रहाणे, पहिले पाउल टाकणे,पहिला दात पडणे,पहिली दिवाळी, पहिली    होळी , निरर्थक बडबडीतून.. बघ- तो बाबा म्हणतोय, किंवा त्या बडबडीला मुर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करणे.

मुलगी असेल तर आई सोबत मधे मधे करुन दिवाळीत काढलेली पहिली रांगोळी ,थोडी मुलगी मोठी झाल्यावर ,दिवाळीचा फराळ बनवतांना आईच्या मधे मुलीने केलेली मदत  (?)  … लुडबुड म्हणजे  आईला शंकरपाळ्यांचे तुकडे करुन देणे, चकली साचाने काढून देणे, लाडू वळणे, अगदी अजिबात जमले नाही तरीही…शाळेचा पहिला दिवस.. गोष्टींच्या आठवणी सुद्धा अगदी प्राइसलेस!!!! जगातील कितीही पैसा हा आनंद विकत घेउन देउ शकत नाही. मास्टरकार्डने हा शब्द काढला.. मला खूप आवडतो.

माझ्या मुली लहान होत्या तेंव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते. सुरुवातीला माझ्या कडे एक फिक्स्ड फोकस कॅमेरा होता , त्यावरच सगळे  फोटॊ काढून टेवले आहेत. त्या मधे पहिल्यांदा स्वतःच्या हाताने सॉक्स घालतानाचा फोटो, बुटाची लेस बांधणे जमल्यावर काढलेल्या फोटोत आनंद दिसतो चक्क. कॅमेऱ्यामधे कधीही फिल्म टाकलेली असायची. म्हणजे कुठल्याही वेळेस फोटॊ काढता यायचे. माझ्या घरी मुलींचे १८ वर्षात जवळपास ८० अल्बम झाले आहेत ३६ फोटोंचे 🙂

नंतर मग मी याशिका चा एस एल आर कॅमेरा घेतला होता. सौ ला खूप राग आला होता, म्हणे उगाच पैसे खर्च करतोस.. काय करायचा इतका महागाचा कॅमेरा  .. आज ते पटतंय , कारण त्या काळी १३ हजाराचा घेतलेला कॅमेरा आता चक्क अडगळीत पडलाय.तो कॅमेरा घेतल्यावर तर बरेच दिवस लागले किती अपार्चर, किती फिल्म स्पिड, शटर स्पिड आपल्या फायद्या साठी कशी वापरायची, म्हणजे मधले पिक्चर शार्प राहिलं आणि बाजूचे अंधूक.. पण मजा आली होती शिकायला पण.

तसेच व्हिसिआर, रेकॉर्ड प्लेअर .. माफ करा जरा डायव्हर्ट होतोय विषयापासून…डिजिटल युगात ते बाकी बरंय की कुठलेही फोटॊ काढल्यावर प्रिंट काढून यायची वाट पहावी लागत नाही, तर काढून ताबडतोब कम्प्युटर वर पहाता येतात.पूर्वी मजा यायची , फॊटॊ काढल्या पासून ते प्रिंट होऊन येई पर्यंत जी हुर हुर रहायची त्याची मजा वेगळीच होती.

ही जी आठवण आहे ती साधारण १३ वर्ष जुनी आहे. कन्या रत्न नंबर दोन..( जी सध्या नॉन मॅट्रिक पास आहे , म्हणजे दहावीला आहे हो या वर्षी) खरंच एक रत्नं आहे. लहान असतांना,रोज ताई शाळेत जातांना पहायची  ती , आणि मग ताई यायची वेळ झाली की आई सोबत बस स्टॉप पर्यंत जायची रोज.. तिला बरोबर कळायचं घड्याळाचे काटे ठरावीक ठिकाणी गेले, की आई चल नं.. आपण ’ताई आणू’ म्हणून आई च्या मागे लागायची. तर तिला शाळा, बस, पुस्तकं, दप्तर- (स्कुल बॅग) इत्यादींची खूपच आवड होती.रोज ताई बरोबर शाळेत म्हणून हट्ट धरुन बसायची.

अगदी लहानपणापासून स्केच पेन आणि कागद दिला की बराच वेळ खेळत बसायची. शाळा खरोखर सुरु होण्यापूर्वी  तिला खूप अट्रॅक्शन होतं शाळेचं.. ताई साठी नवीन डबा, वॉटर बॅग आणायला गेलं की हिच्या साठी पण घ्यावी लागायची नाहितर, नुसता थयथयाट करुन घर डोक्यावर घ्यायची

तर होता होता दिवस भुर्र कन उडून गेले. आणि तिची पण शाळेत  जायची वेळ आली. तिची पण ऍडमिशन सेंट झेवियर्स मधे केली. ऍडमिशन इंटर्व्ह्युच्या वेळेस सगळं अगदी खाड खाड म्हणुन दाखवलं. शाळेमधले प्री पायमरी साठी सुंदर बेंच होते लहानसे- गुलाबी अन लाल रंगाचे. ते पाहूनच खूश झाली होती ती.

शाळेच्या आदल्या दिवशी आमचं मार्केटींग झालं . स्वारी अगदी  खुशीत होती. दप्तर, लाल डबा, लाल वॉटरबॅग आणि लाल ड्रेस.. आणला. ह्या सगळ्या वस्तू शाळेतच मिळाल्या. घरी आल्यावर सगळा ड्रेस घालुन आणि दप्तर मागे अडकवून पाहिलं. आरशासमोर जाउन मटकुन झालं. मी कशी दिसते????? म्हणून सगळ्यांना विचारुन झालं. आणि ड्रेस  काढून ठेव म्हंटलं तर खरं तर जिवावर आलं होतं तिच्या.. तरी पण शेवटी झोपली एकदाची!

rasika1’डी- डे’ आला एकदाचा . सकाळी ऊठल्या बरोब्बर शाळॆची तयारी ! दोन डबे, चार बुच्च्या ( वेण्या) , दोन वॉटरबॉटल , दोन दप्तरं तयार होती. दोघी मुली  जेष्ठा कनिष्ठा शाळेत जायला तयार झाल्या होत्या. मोठ्य़ा मुलीने आपला ताईपणाचा हक्क अबाधित राखुन तिला बरंच ट्रेनिंग दिलं होतं, मीसशी कसं बोलायचं, शाळेत कसं वागायचं वगैरे वगैरे…आम्हाला वाटत होतं की ती रडेल म्हणून, पण अगदी मोठ्या आनंदामधे बसमधे बसली  आणि टाटा केला..  हा  फोटो आहे पहिल्या दिवशीचा..

आणि हा आहे दुसऱ्या दिवशी चा……

rasika2दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी शाळा म्हणजे काय ते कळल्यावर  मग मात्र.. सकाळी आई माझा पोटा दुखतॊ…. म्हणून अशी गडाबडा लोळली होती.. शाळेत जायचं नाही म्हणून. पण रडत नव्हती , डोळ्यातून अगदी एक टिपूस पण नव्हता पाण्याचा. पण वैताग मात्र १०० टक्के दिसत होता. 🙂 हा फोटॊ मलाखूप आवडतो, आणि तिला अजिबात आवडत नाही.. कशाला काढला हा फोटो म्हणते नेहेमी मला…  :)खरं तर हे फोटॊ स्कॅन करुन टाकायचे होते पण फार पुर्वी एकदा व्हिजीए कॅमेऱ्याने फोटोचे फोटो काढून पोस्ट केल्यामुळे जरा ब्लर्ट आले आहेत.

सगळ्यात शेवटी.. बेस्ट पिरियड ऑफ लाइफ कुठला? बाळपणीचा.. मस्त पैकी दुध प्यायचं, आणि हाताच्या मुठी चोखत पडून रहायचं , सगळ्यांची गम्मत पहात.. कंटाळा आला की भोकाड पसरायचं ( हा नागपुरी शब्द आहे बरं कां… म्हणजे रडायचं) म्हणजे कोणीतरी उचलून घेतच आहे.. नुसती मज्जाच मज्जा… आहे की नाही?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव, परिक्षा.. and tagged , , . Bookmark the permalink.

11 Responses to शाळा एके शाळा….

 1. Aparna says:

  mala mahit navata ki mazi ek post eka blog cha wishay banel….great….mast lekh aahe..ani photo sakat mhanun ajun maja aali wachatana…kai chan memory aahe….

  • दोन दिवसांपासुन घोळतोय विषय डोक्यामधे. आज वेळ मिळाला. टुर वर आहे ना सध्या द्वारका आणि ओखा ला म्हणुन वेळ भरपुर आहे लिहायला..

   • Aparna says:

    आणि हो भोकाड हा व-हाडी शब्द आहे हे मात्र आताच कळलं. मी पण तोच शब्द वापरलाय….

    • Aparna says:

     आणि हो भोकाड हा व-हाडी शब्द आहे हे मात्र आताच कळलं. मी पण तोच शब्द वापरलाय….सॉरी विदर्भातला

 2. sonalw says:

  a faar sunder. kharach majhya mulila baghun malapan punha lahaan whavas watat. aani ek divas hi mothi honaar aani he sagle moments album madhe jaaun basnaar mhanun waait suddha watat.

 3. fanfare says:

  endearing account of childhod, cute pictures- paN shakyato blog var family-photo nakotach asa personally mala vatata, kashala ugach undue exposure apalya mula- balancha…vichar karun pahava. awadale nasel tar sodun dya..

 4. ruchira2702 says:

  kaka kharatar khup ushira vachtey tumcha blog… pan mast mast… aani kay yogayog bagh mi aajacha ‘shaala; ha movie baghitala… aani aajach tumcha post pan….

 5. सनिल says:

  काका मस्त लिहले आहे………खुप आवडला ब्लॉग

Leave a Reply to ruchira2702 Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s