द्वारका – ओखा पोर्ट

12आता मी द्वारकेहुन निघालो आहे . टॅक्सी मधे बसून हे पोस्ट लिहितोय. ओख्याचं काम संपवून आता जामनगर ला निघालॊ आहे. ओखा म्हणजे एक दोन ते अडीच किलोमिटरचा अरबी समुद्रात घुसलेला एक पट्टा. तिन्ही  बाजूनी समुद्र .हवा पाणी एकदम मस्त!

ह्याचं महत्त्व  केवळ हा भाग  गुजरातच्या एक्स्ट्रिम साईडला  पाकिस्तान जवळ आहे म्हणून! म्हणतात इथून पाकिस्तानला जायला३-४ तास खूप झालेत. खरं तर या ट्रिप मधे ओखा आणी वाडीनार ला जायचा प्लॅन नव्हता. पण रिलायन्सचे काम लवकर आटोपलं, आणि वाडिनारला कर्टसी आणि ओखाला काम सुरु आहे ,  म्हणून म्हंटलं की ओख्याला आणि वाडिनारला पण व्हिजिट देऊन येऊ.

सकाळीच  निघालो आणि आधी वाडिनारला पोहोचलो.हार्डली ६० किमी आहे जामनगर पासून. वाडिनारला पूर्वी काहीच नव्हतं पण इथे  आय ओ सी एल चा एक मोठा डेपो आणि जेटी आली आणि जेटीला संरक्षण हवं म्हणून आय ओ सी एल ने कोस्ट गार्डची  सर्व्हीस घेतली आहे. गुजरातचा हा भाग खरं म्हणजे खूपच व्होलाटाइल असतो. कुठेही खुट्ट झालं की त्याचे पडसाद म्हणजे इथली सिक्युरिटी एकदम कडक होते.

आधी वाडिनारला जाउन काही महत्वाच्या लोकांची भेट घेतली . समजलं की जहाज दुसऱ्या पोर्टला गेलेलं आहे . हा भाग अगदी जंगलात, त्या मुळे को्णी बाहेरचा सुसंस्कृत जगातला प्राणी आला की इथल्या लोकांना बरं वाटतं. त्यामुळे कमांडंट शी जनरल गप्पा मारण्यातच ११ वाजुन गेले. शेवटी बाय बाय करुन उठलो आणि ओख्याला निघालो.

ओखा म्हणजे द्वारके पासुन पुढे  ३० किमी. जातांना डायव्हरला म्हंटलं की दर्शन  घेउन मग जाऊ. मंदिरात पोहोचलो तर कळलं की मंदिर १२.३० ते ५ बंद असतं. म्हणून सरळ ओखा पोर्टला निघालॊ. आज पर्यंत इतके समुद्र पाहिले पण ओख्या सारखा सुंदर समुद्र आजपर्यंत कुठेच पाहिलेला नाही. आधी डेप्यु. कमांडंट च्या ऑफिस मधे जाउन त्याची भेट घेतली , आणि सरळ जहाजावर निघालो. सोबत आमचा सर्विस इंजिनिअर पण होताच.

floatfloat-1सध्या ओख्याला खूप हवा सुरु असते आणि नेमकी सकाळची वेळ भरतीची होती. कन्सिस्टंटली रोइंग पिचिंग सुरु होतं. त्यामुळे सारखी हालत असल्यामुळे जहाजावर शिडी लावता येत नव्हती. त्या ऐवजी मधे एक फ्लोट ठेवलेला होता.त्या फ्लोट चा डायमिटर १० फुट असेल .म्हणजेच डेक वर जायला १५ फुट अंतर कापावे लागणार.. आता फ्लोटवरुन जायचं माझं वय राहिलेलं नाही.फ्लोट सिलेंड्रिकल असतो, त्यामुळे त्यावर बॅलन्स करुन उभं रहातांना थोडी ्भीतीच वाटत होती.( खरं बोलतोय) लॅपटॉप ची बॅग सर्व्हीस इंजिनिअरच्या हातात देऊन फ्लोटवर स्वतःला बॅलन्स करित कसा तरी जहाजावर पोहोचलो.१००० हॉर्स पॉवरची तिन जेट्स आहेत ह्या जहाजावर. मस्त स्पिड घेतं. अर्थात कोस्ट गार्डला जास्त स्पिड ही हवीच म्हणजेच तर घुसखोरांना पकडता येइल नां…??

खाली इंजिन रुम मधे गेलो तेंव्हा पिचिंग इतकं वाढलं होतं की मला काहिच सुचेनासं झालं.. तो सर्व्हिस इंजिनिअर सांगत होता, कि सर , हे स्टारबोर्ड साइडचं इंजिन हंटींग करतंय, आणि पोर्ट साइडच्या इंजिनाचा रुटीन करायचंय.. म्हंटलं… ठिक आहे कर तुला काय हवं ते.. आणि सरळ वर डेक वर गेलो. थंड हवा लागली तेंव्हा जरा बरं वाटलं.

वरंच बसुन रहिलो, आणि व्हिल रुम मधे बसुन कोल्डड्रिंक चा कॅन ओपन केला. फेल्ड पार्टस वर व्हिल रुम मधे आण म्हंटलं आणि तिथेच मग चेक केले. खरं तर हल्ली स्वतः काम करणं बंदच झालंय. पण पिआरओ चं काम करता करताच थकून जातो.  जहाजावरचं काम आवरुन बाहेर जेटिवर उभा राहिलो.

सहज गप्पा मारत होतो कॅप्टनशी. तर कॅप्टनने समोर हात दाखवला.. म्हणे ती मिरा बघितली कां? म्हंटलं .. काय़ विशेष? तर म्हणे ६० नॉटच्या स्पिडनी पळते. आयला.. मी तर तोंडात बोटं घालायचीच बाकी ठेवली होती.. २५० ऒबिएम.. मग माझ्यातला इंजिनिअर जागा झाला , लगेच उडी मारुन खाली उतरलो अन सरळ बोटीजवळ गेलो.. miraमोस्ट सेक्सी स्टफ आय हॅव एव्हर सिन.. 2कसली सुंदर होती ती.. एका साइडला तटरक्षक लिहिलेलं.. मागे दोन २५०ची दोन व्हिसिक्स .. वाह!! मस्त वाटलं एकदम. म्हंटलं , कॅप्टन शुड वी गो फॉर अ स्पिन?? तर म्हणे नॉट टुडे.. शी इज अंडर मेंटेनन्स.. इफ़ यु स्टे टुडे वि मे गो टुमारो इव्हिनिंग… म्हंटलंं , नो वे कॅप्टन, गॉट टू गो टु जामनगर , सिन्स माय फ्लाइट रिपोर्टींग टाइम इज ११ ए एम.. मे बी नेक्स्ट टाइम..

कॅप्टनला पण तसं काहीच काम नव्हतं.. शिप अंडर मेंटेनन्स असली की कॅप्टन तसा रिकामटेकडाच असतो. सहज त्याला म्हंटलं, की त्या फिशिंग ट्रॉलर्स अशा का पडल्या आहेत? तर म्हणे इथून पाकिस्तान बॉर्डर फक्त ६० नॉट्स वर आहे ३० कीमी पर्यंत आपली म्हणजे भारताची हद्द आहे. पाकिस्तानी बोटी आपल्या हद्दीत आल्या तर त्यांना पकडून इकडे आणले जाते. पाण्यामधे आपली हद्द कुठपर्यंत आहे हे त्या लोकांनाही ओळखणं कठिण होते. अगदी हाच प्रॉब्लेम आपल्या बाबतीतही होतो. आपले कोळी पण त्यांच्या हद्दी मधे गेले की पकडल्या जातात.  पाकिस्तानी मच्छीमार भारताच्या हद्दी मधे आले की मग त्यांना अटक करुन इथे आणले जाते. २६/११ नंतर जरा जास्तच  कडक झालंय .बऱ्याच बोटी सडल्या होत्या. काही फायबरच्या बोटी पण इथे पडल्या होत्या. त्यांची अवस्था पाहून वाईट वाटलं. सहज एका बोटीवर चढलॊ आणि  माझा इंटरेस्ट म्हणजे कुठलं इंजिन आहे ते बघायला इंजिनरुमकडे वळलो. सगळ्या बोटींची जॅपनिज इंजिन्स होती. जाउ दे तुम्हाला उगाचच बोअर करित नाही.खाली कांही पाकिस्तानी बोटींचे फोटो दिलेले आहेत ..

pakistani-fishing-boats

तस सगळं झाल्यावर म्हणालॊ, कॅप्टन निघतो मी आणि सरळ टॅक्सिमधे बसलो . सध्या इथे हवा मोठी मस्त आहे,. उन्हं अजिबात नाही, छान वारं सुटलेलं असतं. ड्रायव्हरला म्हंटलं की एसी बंद करो आणि खिडकी उघडून मस्त वारं खात प्रवास सुरु केला. डोक्यावर शिल्लक असलेले केस मस्त भुरु भुरु ऊडत होते. वाटलं.. आराधनामधल्या राजेशखन्ना सारखे केस असते तर  मस्त मजा आली असती ! 🙂

आता ५ वाजून गेले होते. म्हणून द्वारकेच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतलं .. ती सुंदर काळी मुर्ती खूपच मनमोहक दिसत होती. शेजारिच शंकराचार्यांचं पण मंदिर आहे तिथे पण जाउन दर्शन घेतलं आणि थेट…. जामनगरला पोहोचलो. बेट द्वारका आणि नागनाथाचं मंदिर राहिलं, वेळेअभावी. असो, पुढल्या वेळेस बघू या..तेवढ्यात सौ. चा फोन आला.. म्हणे जेवण झालं ? म्हंटलं नाही… पण बरं वाटलं.. चला कोणी तरी तर आहे विचारणार…….! 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged . Bookmark the permalink.

7 Responses to द्वारका – ओखा पोर्ट

 1. fanfare says:

  Aaj jara Allistair Mcquaine ( Where Eagles dare, Guns of navarone wala lekhak, ) style technical details bareech alee blog madhye, chaan vatala vachayala.. tumhee kadachit marathhet tasa lihu shakal ki kay asa watataya9 atta taree shanka yetiya asa mhaNana theek hoil- he jara amach puNeripaN bara ka?:-)) , paN of course plot paN tasach Zordar hava! Keep this mind, may be some day:-)

  • कल्पना शक्ती ने लिहिणे वेगळे आणि जे आहे ते लिहिणे वेगळे. अजुन तरी काल्पनिक गोष्टी लिहीण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण कदाचित करिन सुध्दा कधी तरी..

 2. Deepak says:

  अरे वाह झकास आहे ही जागा…. बोटीचे फोटु पण मस्त… 🙂
  मदिंराचे फोटो राहिले बघा.

  • दिपक
   मंदिराच्या आत मोबाइल /कॅमेरा नेणं आलाउड नाही ना म्हणुन फक्त बाहेरुन काढलेला फोटो आहे. आतले फोटो नाहित.

 3. pawar s k says:

  i feel that i am travelling

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s