हरभजन,धोनी आणि पद्मश्री

पद्मश्री कुणाला द्यावे ? लायक माणसाला असेच नां? देशातील सर्वात मोठे अवॉर्ड, ह्या धोनी आणि हरभजन सिंग दोघांनाही काही लाख ( जे त्यांना त्या ऍडव्हर्टाइझ करुन मिळणार होते) रुपयांपेक्षा  कमी महत्त्वाचे वाटलं. धोनी पण तसाच.. त्या  **वाला पण पद्मश्री च महत्व कळलेलं दिसत नाही.बरोबर आहे ,क्रिकेट खेळून फक्त “पैसाच” मिळू शकतो   सामान्य ज्ञान नाही, कारण जर ते असतं तर त्यांनी त्या जाहिराती पेक्षा जास्त महत्त्व दिलं असतं..

माकडाच्या हातात माणिक दिलं तर ते काय करेल?? दाताने चावेल , अन फेकून देईल बरोबर नां? अगदी सेम टू सेम प्रकार इथे आहे. फक्त माकडाच्या जागी धोनी आणि भज्जी..आणि माणकाच्या जागी पद्मश्री…!

लायकी पेक्षा जास्त मान मिळाला की त्याची किंमत रहात नाही. ह्या दोघांची लायकीच नाही हा बहुमान स्वीकारण्याची, आणि ते त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले.एखाद्या वेश्ये प्रमाणे जिथे जास्त पैसा मिळेल तिकडे हे गेले दोघंही. एखादी घरंदाज स्त्री आणि वेश्ये मधे जो फरक आहे तसाच इथे पण मला दिसतो. पद्मश्री मधे पैसा नव्हता, तिथे फक्त मान आहे. कपाळी कुंकाचा टिळा, आणि  आणि मंगळसुत्राची किंमत वेश्येला काय कळणार?

ह्यांना फक्त पैशाचीच भाषा कळते.. पैशासाठीच हे लोकं क्रिकेट खेळतात, बि सी सी आय हा एक क्लब आहे आणि त्यांचा संघ म्हणजे भारताचा संघ नाही.मला असं वाटतं की ह्या क्रिकेटर्सचे जरा जास्तच लाड होताहेत. ते जरा कमी केले पाहिजे, म्हणजे ह्यांचे फिरलेले डोके ठिकाणावर येइल. हरभजन म्हणतो, की मी त्या दिवशी दिल्लीला नव्हतो. अरे तर मग कुठे उलथला होतास रे बाबा? अशी कुठली गोष्ट आहे की तुला ती पद्म अवॉर्ड पेक्षा पण जास्त महत्त्वाची वाटली??

आणि हा पुन्हा वर तोंड करुन सांगतोय, की मी तेंव्हा दिल्ली मधे होतो, हे प्रुव्ह करा, मग मी क्रिकेट खेळणं सोडून देइन. वाह!! फार उपकार करतोस काय रे  ?? सोडून देशील म्हणजे म्हणायचं तरी काय त्या भज्जी ला?

त्याच्यावर आरोप आहे की त्याने ऍडव्हर्टाइझ ला जास्त महत्त्व दिलंय, कारण दुसऱ्या दिवशी  धोनी आफ्रिकेला जाणार होता, आणि त्या ऍड मधे धोनी + भज्जी होते, म्हणून त्या दोघांनीही ऍड चं शूटींग करण्याला जास्त महत्वाचे  वाटले, म्हणून त्यांनी ads ला जास्त महत्त्व दिले.  पद्म अवॉर्ड  सिरोमनी पण त्यांनी   टाळला.

हा भज्जी म्हणतो, की लोकांनी समजलं पाहिजे की आम्ही किती सॅक्रिफाइस करतो फॅमिली साठी ते…. मला वाटतं त्याला म्हणावं.. अरे बाबा, कशाला करतो उगाच त्याग, अन उपकार आमच्यावर क्रिकेट खेळून.. सोडून दे .. नकॊ उगाच इतका त्याग करु रे बाबा आमच्या साठी, मला फार वाईट वाटतं तुझा त्याग बघून.कोण रे तुला कम्पेल करतंय क्रिकेट खेळायला? एक गोष्ट आहे, सोडून दे रे बाबा, खूप उपकार होतील आमच्यावर…! हे खेळतात ते पण पैशा करता. देशा करता नाही..

४० वर्ष हे लोकं जिंकू शकत नाहीत न्युझिलंड मधे आणि मग एकदा जिंकले इथे मोठ्या अभिमानाने पेपर मधे हेड लाइन असते.. इंडीया विन्स आफ्टर ४० इयर्स.. अरे लाजा वाटल्या पाहिजेत, ४० वर्षात तुम्ही जिंकू शकत नाही? मग खेळता कशाला ? हरायला?

बरं इतकी मुजोरी कशाबद्दल?? नेहेमी हरण्याबद्दल?? ते   सारखे हरतात,२० -२० वर्ष एकही मॅच जिंकत नाहीत.. नंतर चुकून कधी  एखादीच मॅच जिंकली तर मग  टीव्ही वर बोलतांना यांचा उद्धटपणा पहा…. की आम्ही काय दिवे लावले म्हणून.. त्या वेळी हे विसरतात की आजपर्यंत सारखे  हारतच आहेत मॅचेस म्हणून..

भारतामधे क्रिकेटचं खुपचं फॅड वाढलं आहे. आता हे कमी झालंच पाहिजे. अर्थात पाकिस्तानातील अटॅक प्रमाणे भारतामधे पण जर काही झाला,तरच इथल्या मॅचेस बंद होतील. आणि इंटेलिजन्स च्या रिपोर्ट प्रमाणे भारतामधे पण हल्ला करण्याचा डाव होताच त्यांचा..

अगदी एक दिवस आधी पद्म अवॉर्डच्या अनाउन्समेंटच्या आदल्याच रात्री, अक्षय कुमारने आपल्या पॅंटचे बटन्स  भर पब्लिक प्लेस मधे बायकोच्या हातुन काढुन घेतले.इथे पण मला तर वाटतं की सिलेक्शन चुकलंच. ह्या व्यतिरिक्त , हेलन मॅडम ला कास दिलंय पद्मश्री?? निकष काय आहे ह्याचा?

असो..उ्गाच डोकं खराब होतं जास्त विचार केला की.. जाउ दे.. असेल पोलिटीकल पुल… असंच म्हणायचं आणि सामान्य  माणसाप्रमाणे अगदी गप्प बसायचं.. ह्या  अतिशहाण्यांची ’थेरं’ पहात!

इथे एक जुनं पोस्ट आहे पद्मश्री ची खिरापत .. वाचा..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , . Bookmark the permalink.

5 Responses to हरभजन,धोनी आणि पद्मश्री

 1. sahajach says:

  यावर खंत एकच वाटते की येव्हढे सगळे झाले तरी भारतातले लोक यांचे सामने आपलं काम बाजुला ठेउन बघतात…देशासाठी वगैरे हे थोतांड हे केवळ अधिकाधिक जाहिराती मिळवण्यासाठी करतात हे क्रिकेट्मधले लोक….
  इथे मस्कतमधे Football साठी हे ओमानी लोक जीव टाकतात….१८ वर्षानी ह्यांनी अरब कप जिंकला…आणि आपले यश केवळ देशाला दिले…कुठल्याही जाहिराती मधे त्या टीम मधले कोणिही नाही…..

  • अमित
   प्रतिक्रियेबद्दल आभार.. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे.आपण काहिच करु शकत नाही ह्या बाबतित.. बस.. नुसतं पहात रहाणं आपल्या हातात आहे.

 2. Amol says:

  I don’t know why people are being CRAZY about this game. Its b*shit, every one tries to monetize it but problem is common man who is putting money in this game is getting ripped off.
  Some one should check eligibility of award decider too, I guess.

 3. Indian_Lost_in_US says:

  इव्हन राज कपुर सुध्दा बरं नसतांना पण स्वतः हा पुरस्कार घेण्यास गेला होता. नंतर लगेच त्याचं देहावसान झालं .
  पद्मश्री चं महत्व ह्या खेळाडूंना कळलेलं दिसत नाही.

 4. A response says:

  chan lekh pan aapan samanya lok nakki kahi karu shakato ka hya var ……………
  desh prem abhiman fakt aaplya la ch aahe ka ………

  elections aahet aata tya var pan lekh liha tumhi
  voting n karane ha gunha aahe aani vote karun gungara la nivdun ha pan motha gunha aahe aani jo paryant yogya umedwar aapan nivdun det nahi to paryant ase “padmashri” hot rahanar …

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s