ऑन स्क्रिन न्युडीटी -आपण तयार आहोत कां?

मधुर भांडारकरांच्या बद्दल मला खरंच खूप आदर आहे. त्यांचे चित्रपट नेहेमीच काहीतरी वेगळे असतात. हिंदी चित्रकर्त्यांच्या भाषेत -’जरा हटके’ असतात. त्यांच्या चित्रपटात अगदी सुरुवातीच्या काळात मराठी कलाकारांना बराच चान्स पण दिला गेला. अतुल कुलकर्णी ह्यांना पण त्यांनीच चित्रपटात आणलं.

फॅशन, ट्रॅफिक सिग्नल – (हा मला खूप आवडला होता)पेज ३, आणि सत्ता सगळेच चित्रपट मला आवडले होते. सत्ता मधे रवी्ना  टंडन आणि अतुल कुलकर्णीचं काम अगदी आठवणीत राहण्यासारखं  झालं आहे.

कालची बातमी की मधुर भांडारकरांच्या ’जेल’ ह्या चित्रपटात बद्दल. नील नितिन मुकेश हा ह्या चित्रपटामधे एका मध्यम वर्गीय मुलाची भूमिका करतो आहे. ह्य़ा भुमिकेत खरेपणा आणण्यासाठी त्याने ठाणे कारागृहांत जाउन तिथल्या कैद्यांची परिस्थिती ची पाहणी केली.दिवसभर त्याचा मुक्काम जेल मधेच होता. त्याने कैद्यांनी बनवलेले जेवण पण घेतले.  नितीन नील मुकेश, नक्कीच एक डिव्होटॆड आर्टीस्ट आहे.  इतकी कमिटमेंट फारच कमी लोकांच्या मधे ( बारिंग आमीर खान- गजनी, अभिषेक बच्चन -गुरु) दिसून येते.

मेल न्युडीटी आता आउट ऑफ क्लोझेट येते आहे. आजपर्यंत भारतीय सिनेमामधे फक्त स्त्रियांनाच सेमी न्युड दाखवले जायचे. मेरा नाम मधल्या त्या सिम्मी गरेवाल चा शॉट हा पहिला न्युड शॉट होता भारतीय सिनेमात. ’कपुर्स’ ने पुढे मंदाकिनीला फ्रंट न्युड शॉट दाखवून  ( म्हणे कहानीकी डीमांड है) एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला.

नील नितीन मुकेश ’फ्रंट न्युड’ सिन देणार म्हणून, बातमी आली, बरेच फिड्स पण पाहिले टीव्ही वर..मला वाटतं की चित्रपटाबद्दल मिडीया हाइप क्रिएट करायला म्हणूनच हे असे टिट बिट्स मिडियाला लिक करण्यात आले . टीव्ही वर किती न्युडीटी दाखवायची ह्यावर आपल्या कडे भारतामधे मला वाटतं सेल्फ गव्हर्नंस आहे. इतकं असूनही प्रत्येक  पेड चॅनलने ही बातमी घोळून घोळून दाखवली.मला वाटत नाही की  ही अशी क्लिप फॅमिली व्हिविंग साठी योग्य आहे म्हणून…

खरं सांगायचं तर लाज वाटते असं काही घरच्या लोकांच्या सोबत पहातांना!  हे वाचलं आणि मला ट्रेसी व्हिटने आठवली सिडने शेल्डनच्या इफ टुमारो कम्स मधली.त्या मधे एक चॅप्टर आहे  , ट्रेसी ला जेल मधे जावं लागतं आणि, तिची मेडिकल एक्झाम होते तो आठवला.

कदाचित चित्रपटाकरिता  करता हा न्युड शॉट डिमांड ऑफ द  स्टोरी असेल  , पण टीव्ही वर दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही.

टीव्ही करता पण एक सेपरेट सेन्सॉर असावं कां? टीव्ही वरचं २६/११ चं कव्हरेज? अशा अनेक घटना मला अंतर्मुख करतात.. मला तर वाट्तं सेन्सॉर -असावं टीव्ही करता, पण असंही वाट्त की जर सेन्सॉरिंग करणे सुरु केले तर पुन्हा आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण होइल.. तेंव्हा आहे तेच ठिक आहे …फक्त टिव्ही च्या प्रोड्युसर्सनी ताळतंत्र सोडू नये….बस्स इतकेच!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s