आजोबा उवाच!…

कित्ती कित्ती हुशार आहेत नाही का करुणानिधी आजोबा? त्यांना पहा सगळं -सगळं कळतं ! आता हेच बघा ना,  त्यांना एक जावईशोध लागलाय.. की प्रभाकरन टेररिस्ट नाही.  (हॅः.. काहीच्या काही बोलतात झालं, असं म्हणताय कां? बरोबर आहे तुमचं.) हा शोध कसा लागला म्हणता? अहो साधी गोष्ट आहे, तो म्हणे ह्या करुणानिधी आजोबांचा मित्र आहे.

बरं का, आपल्या ह्या करुणानिधी आजोबांच्या मित्राच्या ग्रुपने आपले दिवंगत पंतप्रधान श्री राजीव गांधी ह्यांचा खुन केलेला आहे. जी लोकं इन्व्हॉल्व्ह्ड होती ना त्या टेरर प्लॉट  मधे ती अजूनही जेल मधे सडताहेत. आणि तरी पण प्रभाकरन टेररिस्ट नाही.

अरे काय हे, तुम्ही असं कसं विचारता की त्या खुनी व्यक्तिंना फांशी का झाली नाही म्हणून? आपल्याकडे लोकशाही आहे नां.. म्हणून तर आपले राजकीय नेते आणि पार्लमेंट  अजूनही सुप्रीम कोर्टाने आदेश  देऊनही अतिरेक्यांना फाशी देत नाही. कायदेशीर पणे कायद्यातल्या पळवाटा शोधण्यात आपल्या नेते मंडळींचा वेळ जातो. आता अफझल गुरु ला फाशी दिली तर अल्पसंख्यकांची भावना दुखावतील ना..आणि मतं मिळणार नाहीत. म्हणून अफझल गुरु सारखा प्राणी पण मजेत दिवस काढतोय तिहारमधे.आपला देशातला कायदाच तसा आहे!राजकीय इच्छाशक्तीच नाही कांही करायची.

करुणानिधीनी आज अजुन एक वक्तव्य केलंय.. की नलीनी ला ( जिला जन्म ठेपेची सजा झालेली आहे रा्जीव गांधींच्या खुनाबद्दल) सोडून द्यावे..ती सध्या नेल्लोर जेल मधे आहे. ह्या म्हाताऱ्याला खरंच काय  झालंय हेच कळत नाही. मला पण आता काय लिहावं ह्याच्याबद्दल हेच कळत नाही.

दी मॅन इज ऑलवेज नोन बाय द कंपनी ही किप्स..  🙂 जर करुणानिधींचे मित्र ‘असे प्रभाकरन सारखे’ असतिल तर करुणानिधी पण प्रभाकरन सारखे आहेत असे समजायचे कां?   न बोललेलेच बरे.मतांसाठी माणुस  कुठल्या थराला जाउ शकतो ते इथे तामिळ नेत्यांकडे पाहुन लक्षात येतं. करुणानिधी हे पण म्हणताहेत की प्रभाकरनचा मार्ग जरी चुकीचा असला, तरी तो ज्या गोष्टी साठी भांडतोय ती योग्यच आहे…..?????????(छः! काहीतरीच  काय! )

आता दररोज तामिळ निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतामधे परत येत आहेत. तेंव्हा त्यांनी पुन्हा भारतामधे येऊन उपद्रव सुरु केला नाही म्हणजे मिळवले.

पाकिस्तान पण काश्मीर मधल्या दहशतवाद्यांना ’फ्रिडम फायटर’ किंवा मुजाहिदिन म्हणते. आणि अगदी ह्याच धर्तीवर करुणानिधी  पण बोलतात. त्यांच्या सारख्या जेष्ट नेत्याने असं बोलतांना जरा विचार करायला हवा.. पण देवाने जीभ दिलेली आहे ना..मग लावा टाळ्याला, आणि बोला काय वाट्टेल ते! अशी मेंटॅलिटी फॉर्म झालेली आहे करुणानिधी    आणि वायकॊ ची..मला असं वाटतं की म्हातारचळ लागलाय करुणानिधी आजोबांना  !

काय लिहावे  हेच कळत नाही.. पण करुणा निधीचे नाव वाचले की मग मात्र मनातल्या  मनात … @!*&^%&*$#@()*&**@!@$!!!  अशा शिव्या.. ज्या इथे लिहु शकत नाही त्या द्यायची इच्छा होते..  :)नाहितर उत्तरेला काश्मीर आहेच, पुर्वेला मिझोराम, नागालॅंड आहेतच, आणि हैद्राबादला आंध्रा मधे  नक्षलवादी आहेतच, राहाता राहिला तामिळनाडू आता तिथे शांतता राखली जावी अशी इच्छा आहे ! बस्स!

तसेच आज अब्दुल रहामान अंतुले ( आमच्या विदर्भात का बे   रहमान किडे झाले का बे xxत.. असं म्हणतात.. कुठे ते विचारु नका…!)यांनी पण काही मुक्ताफळं उधळली आहेत. एक्स मुख्य मंत्री जर असा काही बोलत असेल तर काही खरं नाही ह्या देशाचं…!केवळ राजकीय फायदा मिळावा म्हणून असं बोलणाऱ्या नेत्यांना आता जनतेनेच त्याची जागा दाखवली पाहिजे.

सगळीकडचे आरक्षण मान्य होतं लवकर.. पण लोकसभेतील आणि राज्यसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण अजूनही बिल पास झालेले नाही. ते लवकर व्हावे असे वाटते म्हणजे अशा म्हातारचळ लागलेल्या नेत्यांची तिकिटं बरोब्बर कापली जातील!जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तरुण लोकांना तरी तिकिटं द्यावीत.. म्हणजे अशा कबरित पाय लटकलेल्यांना जरा साइडट्रॅक करता येइल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged . Bookmark the permalink.

5 Responses to आजोबा उवाच!…

 1. bhaanasa says:

  वर्षोनवर्षे हेच चालले आहे. ज्यांना कशाचीच चाड अन लाज उरलेली नाही त्यांना कोण रोखणार अन भोवतालची लोकही तसलीच. जनता कोणाच्या खिजगणतीत आधीही नव्हती आजही नाही. आनंद आहे असे म्हणायचे, अजिबात चिडायचे नाही.

 2. sonalw says:

  आपल्याकडे राजकारण इतक्या थराला गेलय की तळ सापडणे कठिण आहे. आता नारायण राणे यांच्या भावाचा खून हे एक प्रकरण चिखलफेक करायला नव्याने वापरत आहेत.
  जानार्याचा जीव जातो…प्रेताच्या टाळू वरचं लोणी खाणं म्हणजे काय याचा जिवंत प्रत्यय…

  • नारायण राणेंच्या भावाचं प्रकरण कसं राजकिय वळण घेतं हे पहावं लागेल. नारायण राणे म्हणतात शिवसेनेचा हात आहे ह्यात. इथे पण पॉलिटीक्स… शेम शेम..

 3. करुणानिधी काय किंवा आणखी कुठलाही नेता काय, जिथे सत्ता दिसेल तिथे जाणार चाटायला. या अशा लोकांकडून सेन्सिबल बोलण्याची अपेक्षाच ठेवणं चूक आहे. त्यापेक्षा त्यांना निवडून देतानाच जनतेने दहा वेळा विचार करायला हवा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s