तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?

तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य  समजता?तुम्हाला असं वाटत का तुम्ही इंटरनेटवर अदृष्य आहात म्हणून? तुम्हाला असं वाटतं का की एखाद्याला इ मेल पाठवला की तो कुठुन आलाय हे शोधण्याचं काम फक्त पोलीसच करु शकतात? तसं नाही.. अगदी माझ्या सारखा  मेकॅनिकल इंजिनिअर पण हे काम सहज करु शकतो. त्यात काहीच  अवघड नाही. तुम्ही कुठल्याही पत्यावर इ मेल पाठवली , किंवा कुठल्याही ब्लॉग वर कॉमेंट टाकली की तुम्ही व्हिजिबल होता.म्हणजे काय ??—– सांगतो.

माझी एक सवय आहे की माझ्या ब्लॉग वर आलेल्या ऑलमोस्ट प्रत्येक कॉमेंट ला मी स्वतः उत्तर देतो . कांही दिवसापूर्वी एका मुलीची  एक कॉमेट आली होती.मी तिला  ब्लॉग वर न उत्तर न देता  ई मेल वर उत्तर दिले , तर तिला एकदम आश्चर्य वाटलं.. की इ मेल ऍड्रेस कसा समजला मला म्हणून. कांही लोकं आपल्या इ मेल ऍड्रेसेस च्या बाबतीत फारच सेन्सेटीव्ह असतात. त्यांना इ मेल ऍड्रेस लपवून ठेवायला आवडतो. आणि इथे जेंव्हा तुम्ही कॉमेंट करता, तेंव्हा तर इ मेल सरळ डिस्क्लोझ होतो आणि ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.

असो, हे पोस्ट का? खरं तर मला सगळ्यांना काही गोष्टी सांगायच्या आहेत, विशेषतः मुलींना. तुम्हाला माहिती आहे का, जेंव्हा तुम्ही एखाद्या ब्लॉगवर कॉमेंट देता, तेंव्हा त्या  कॉमेंट सोबतच तुमचा आय पी ऍड्रेस पण पोस्ट होतो, जो केवळ ब्लॉग धारकालाच दिसु शकतो. आता या आय पी ऍड्रेस मुळे काय होऊ शकतं? तसं  विशेष काहीच होऊ शकत नाही. फक्त तुमचं लोकेशन कळू शकतं.

तुमच्या आय पी वरुन तुम्ही कुठल्या गावाहुन मला कॉमेंट टाकली ते पण कळू शकतं.तुमच्या आय पी वरून हे मी सांगु शकतो की तुमचा लॉंजिट्युड , लॅटीट्य़ुड किती आहे ते- आणि हाच डाटा गुगल अर्थ मधे पोस्ट केला की तुमचं लोकेशन एक्झॅक्टली पिन पॉइंट केलं जाऊ शकतं (असं म्हणतात.. मी आजपर्यंत गुगल अर्थ वर जाउन कधीच चेक केलं नाही  . पण गुगल अर्थ ला ही प्रोव्हिजन आहे असं जाणकार सांगतात.) मी सायबर सिक्युरिटीवर एक लेख वाचला होता त्यात हे सगळं आलं होतं. ही एक वेब साईट आहे जी आय पी वरुन लोकेशन (म्हणजे केवळ गावाचे नांव) शोधून देते.

तुम्ही तुमचा इ मेल लपवू शकाल, चुकीचा इ मेल देऊ शकता, पण आय पी लपवता येत नाही. मी स्वतः  मेक इंजिनिअर असूनही इतकी माहिती काढू शकतो, तेंहा जर एखादा आय टी नर्ड असेल तर किती माहिती काढू शकेल ??फक्त तुम्ही फायरवॉलच्या मागे असाल तरच आय पी सिक्रेट राहु शकतो. अर्थात, त्या साठी पण कांही साइट्स आहेत फायरवॉलच्या मागे लपलेले आय पी शोधायला हुज हु वगैरे वगैरे…पण ते जरा अवघड जातं इतकंच..

काळजी करु नका , पण फक्त माहिती असावं म्हणून इथे सांगितलं…. आणि हो, इथे कॉमेंट्स लिहायला घाबरू नका बरं कां.. मी शोधणार नाही तुमचा पत्ता… 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged . Bookmark the permalink.

40 Responses to तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?

 1. Aparna says:

  मस्त माहिती आहे. आता मला कळल मेकवाल्याना आय टीत जॉब कसा मिळतो?

 2. चांगली माहिती दिली आहे.
  शेखर

 3. Nitin Sawant says:

  Yup, we can find the address of the user by using his IP address.

  तुम्ही जर प्रॉक्सी सर्वर वापरला तर तुम्ही private browsing करु शकता.
  But some proxy servers may log the data you posted such as username & passwords,
  your ISP itself can log data you posted on internet.

  THE ONLY WAY TO GO SECURE AND PRIVATE ON INTERNET IS TO USE THE HTTPS SECURE SITES ONLY,
  but i don’t think that it’s possible to enable https protocol on all the sites as the https is more costly and it is not affordable.

  Visit following site to know how much info about you is visible to all people on internet:
  http://www.apnic.net/db/your_ip.html

  there is address of ISP associated with your IP,
  on contacting the ISP we can easily get full address of the user.

  regards,
  Nitin Sawant
  Software Engineer

 4. @॒अपर्णा
  🙂 जनरल वाचन करतो झालं. अहो, अख्खं आयुष्य गेलं मशिन्स रिपेअर्स मधे. हा तर एक विरंगुळा आहे माझा. आता नाही तर अगदी आधी पासुन..राइट फ्रॉम वर्ड स्टार डेज …
  @नितिन
  धन्यवाद. छान कॉमेंट आहे. अजुन वाचायला मिळालं काहितरी. परवाच एक काही तरी शेल म्हणुन शब्द आला होता वाचनात, म्हणे शेल ब्रेक केला की असेस मिळतो. काय आहे ते वाचतोय अजुन पण समजत नाहीये..
  अजुन एक माहिती कळली आहे, की जर आय पी माहिती असेल आणि जर तुम्ही एखादी कोड ब्रेकर स्क्रीप्ट पाठवली आणि ज्या व्यक्तीची आय पी तुम्हाला माहिति आहे त्या व्यक्तीने ती लिंक क्लिक केली तर तुम्ही कम्प्युटर हॅक करु शकता. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे अननोन व्यक्ती कडुन आलेल्या स्क्रिप्ट वर/ लिंक वर/ फाइल वर – स्पेशिअली.. फारच अपिलिंग नेम असलेल्या फाइल्स वर कधिही क्लिक करु नका.तुमच्या पैकी कुणाला जास्त माहिती असेल तर कृपया इथे पोस्ट करा.. धन्यवाद..

  @शेखर
  सगळ्यांचेच आभार.. मी तुमचं लोकेशन जाणून घेइन ह्याची भिती न बाळगता कॉमेंट्स दिल्याबद्दल… 🙂

 5. Nitin Sawant says:

  Shell hacking is possible only if you use Linux systems @Mahendra

  Shell Hacking:
  http://www.youtube.com/watch?v=n-aUNMUOAFg

  http://www.happyhacker.org/gtmhh/shella1.shtml

  If you don’t wanna get hacked then

  1. install powerfull antivirus software like Mcafee, http://www.9down.com/McAfee-VirusScan-Enterprise-8-5i-Plus-Full-Incl-Patch-5-22843/

  2. Download and install latest update for your antivirus

 6. bhagyashree says:

  internet var anonymous koni rahuch shakat nahi! (milind bhandarkarancha lekh athvla.. you have no privacy , get over it! yach vishayavar hota.. ata nahiye to available.. )
  ekhadyala kide karaychi ichha zalich tar aramat kon manus ahe he olakhta yete… so internet has its own pros and cons.. pan baryachada konala itka vel nasto.. ani apan itke famous nasto ki koni aplya vaitavar asava !
  tarihi anonymous rahaycha asel safety sathi, tar http://www.torproject.org/ haa upyogi prakar ahe..

  • @ Bhagyashree

   Thanks for the link. I Will go thorugh it. In fact when i sent the e mail , that girl sound little disturbed, hence i have posted it here so that every one is atleast aware of this fact.

 7. sonalw says:

  chaangli maahiti dilit. tumchya likhanatun tumhi don mullinche baba aahat he saarakh dokawat and that is very sweet. ek caring warm baap asto tumchya saglya likhanat. I know this is off-track but raahawal naahi…:)

 8. sonalw says:

  CON’s of internet ki ‘kaun’ on internet? hahahaa 🙂

 9. ngadre says:

  I recently did Diploma in Cyber Law and Investigation.

  Now, I laugh at people’s comfort of shutting their eyes and feeling that they are invisible on Net.

 10. @nachiket, sonal

  Kaun on internet.. good one.. you got a good sense of humor.
  nachiket, the normal people do have a feeling that if they dont disclose their details, people may not be able to find. In fact, this post i have written for the girls, who have this feeling very often. This was just a caution note for the girls. Tobe aware , there are sharks in the sea.. 🙂

 11. Amol says:

  if u want to use safer internet try using proxy ( K and mathtunnel) they open up their connection, thats what u can use if ur admin has banned u from certain sites, then there is ip spoofing, but ultimately u get caught with MAC address ( if u do serious thing ur ISP will give this info to police) and last but not list is MAC spoofing, u wanna try that with others net tho’
  Btw I am a mechanical engineer too I guess saglya mech valya madhye ha kida astoch 😉

 12. shubhangi says:

  Hiiiiiiiiii,

  blokmadhey marathitun kase type karayache?

 13. good one,

  but i want to describe that there is one s/w called ip hide or ip hide platinum etc..it can hide ur ip and give any ip u selected to websites and when sending emails…

  but the fact is if u use it for exploit and owner of that website or email id want to know ip then he will contact to that s/w developer and then ur original ip will be detected by s/w builder of ip hide or something like that..

  in ip hide s/w database ur ip will recorded and then it gives u fake ip…

  so finaly u r not anonymous or invisible on internet

 14. Thanks sagar.. thanks for the comments… The information is too good. i was not aware of it. But now will give it a search and try..

 15. Pingback: मी पुणेकर

 16. datta godase says:

  http://www.sahajch.com
  marathi web site paha computerchi sampuran mahiti aahe ?

 17. savadhan says:

  धन्यवाद! ही माहिती अतिशय मनोरंजक आणि स्फोटक अशीच आहे.

 18. savadhan says:

  मला अजून ही खूप माहिती करून घेण्याची आणि ती वापर्ण्याची इच्छा आहे. मी ६२ + आहे. महा जालकाबाबत अद्यावत पण सोप्या भाषेत माहिती कोठे मिळु शकेल.अनेक गोष्टी मला जमत नाहीत. मराठी लिहायला ८-१० दिवसापुर्वीच शिकलोय.

  • मराठी लिहायला शिकलात- त्या बद्दल अभिनंदन.. अहो मला पण फारसं काही माहिती नाही< असंच शिकलोय आपणहुन.. इकडे तिकडे वाचत रहातो, आणि जे जमेल ते शिकतो..

 19. It is very good information. thank you

 20. sandip says:

  this right way find more and more knowledge for help (internet)
  my opination

 21. mukund.bapurao.choudhari says:

  mala.dist.nahi.tari.praytn.karit.aaho.krupa.pudhe.chatig.kase.karave.te.jrur-kalva
  m.B.choudhari

 22. Amol says:

  coming back ater long time, so here is a comment, Its easy to track a a computer/cluster if you have the right information, it is also easy to remain anonymous, like my email id right now, ITS DISPOSIBLE use and throw in 10 minutes is also available. as far as IP, I can have n number of IP’s specially after IPv6 .
  THis anonymity is used a lot of times, you can comibing your topic with torrents and then go to torrentfreak.com YOU CAN SEE THE WAR GOING ON about anonimity and use of internet… Indian people are not aware of it but their Internet access will be limited by it once the war ends….

  • अमोल
   मनःपूर्वक आभार. आणि ब्लॉग वर स्वागत. काही आयटी मधल्या मित्रांनी प्रॉक्सी वापरून आयपी बदलता येते हे पण सांगितले. कसं ते माहीत नाही.
   हे फिल्ड माझं नाही, त्यामुळे कोणी सांगेल तेवढंच माहीती आहे. धन्यवाद.

 23. Geet Rao says:

  Thanks for Information. Can you please tell me how to use facebook? I really dont know about that.

 24. kolhe shriram says:

  मला अनेक गोष्टी जमत नाहीत
  मनःपूर्वक आभार

 25. अरे सर मला पण सांगा कि इमेल कसा ऒळखाचा कि तो कुठुण आला

 26. Priya Shedge says:

  Khupach Chan Blog ahe ani khupach informative dekhil.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s