शाळांचे नियम

प्रत्येक शाळा आपापले कांही तरी नियम बनवते. आणि ते नियम कुठल्यातरी समुदायाला जाचक वाटतात. बरं हे केवळ भारतातच  घडत नाही, तर सगळ्या जगात घडते. फक्त कमी जास्त  प्रमाणात !

माझी मुलगी लहान असतांना एकदा ( धाकटी) ने कांही तरी सण होता म्हणून, मेंदी लावली होती. आणि नंतर मात्र एकदम घाबरली. दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं होतं तर म्हणे मी नाही जाणार. म्हंटलं कां? तर शाळेत मेंदी अलाऊड नाही म्हणून …. शेवटी दिला चिठ्ठी लिहुन दिली की लग्नानिमित्त मेंदी लावली होती , तेंव्हा कुठे ती शाळेत गेली.

आपल्याकडे मेंदी, बांगड्य़ा, गजरा,  गळ्यातलं, किंवा कुंकाची टीकली, नेल पॉलिश  ह्या पैकी शाळांमधे कांहीच अलाउड नसतं. एखाद्या धर्माची चिन्हे वापरू नयेत असा ह्या मागचा उद्देश असावा. आपण सगळे एकाच लेव्हलचे आहोत असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटावं म्हणून ,   सामाजिक  किंवा आर्थिक दृष्ट्या आपल्यात कांही फरक नाही , आणि विद्यार्थ्यांच्या मधे निकोप संबंध निर्माण व्हावेत हा उद्देश असावा.

या गोष्टींकडे पहाण्याचा पालकांचा दष्टीकोन कसा असतो? सहज म्हणून हाच विषय कांही मित्रांच्या मधे बोललो होतो, तर बहुतेक सगळ्यांचं म्हणणं की हा शाळांचा अतिरेक आहे. हिंदु धर्माला पद्धतशीर पणे नामशेष करण्याचा भाग आहे. आमची संस्कृती नष्ट करण्याची चाल आहे. या सगळ्या इंग्रजी शाळांना माज आलाय . तसेच जर ह्या  शाळांचा खरा उद्देश निधर्मी शिक्षण द्यायचा असेल तर रोज सकाळी शाळा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास  जिझस च्या कविता ( साम्स म्हणतात कां त्यांना ? की प्रेअर्स?) कां म्हणायला लावतात ह्या शाळा?  दुटप्पी कारभार आहे सगळा. इंग्रजी शाळांच्या मधे ख्रिसमस साजरा केला जातो. पण दिवाळी नाही…

एक बातमी वाचली ,निर्मला कॉन्व्हेंट म्हणून एक शाळा आहे, मध्य प्रदेशात, त्यामधल्या सलिम नावाच्या  एका मुस्लिम विद्यार्थ्याने शाळेत दाढी वाढवायची परमिशन नाही म्हणून कोर्टात केस केली . ह्याच्या वकिलाने म्हंटले की आर्टीकल २५ प्रमाणे दाढी वाढवायची परमिशन दिली पाहीजे शाळेने. यावर बोलतांना जज म्हणाले, की जर तुम्हाला शाळांचे नियम मान्य नसतिल तर दुसऱ्या शाळेत तुम्ही जावे, शाळा केवळ एका मुलाकरता रुलस बदलू शकत नाही. आज तुम्ही म्हणताय दाढी वाढवायची , उद्या म्हणाल बुरखा घालुन शाळेत यायचंय.. असं तालिबानीकरण होणे बरोबर नाही. ही कॉमेंट बहुतेक जे लोकं  तालिबानीझमचं मिनी व्हर्शन भारतामधे आणण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्यासाठी इशारा म्हणून असावं.

ही केस तो मुलगा कां हरला? वकिलाचं नांव होतं एके खान, की ज्याने दाढी वाढवलेली नव्हती. जज म्हणाले, तुमचा विश्वास आहे का धर्मावर..  खान हो म्हणाले.. पण तुम्ही  तर दाढी वाढवलेली नाही ? यावरून हे सिद्ध होते की धर्माचे पालन दाढी न वाढवता पण करता येते.

इंग्लंड मधे  ’वेल्स’ ला एका शाळेमधे शीख  मुलीने पण कोर्टात केस केली होती. २००७ मधे तिला शाळेने लोखंडी कडं घालुन यायला बंदी केली होती. त्यावर एका लिबर्टी नावाच्या हुमन राइट्स कमिशनच्या लोकांनी पण सपोर्ट केलाय. ( या लोकांना कांही कामं नाहीत कां? नको तिथे नुसती बोटं घालत असतात)  की कडं घालणं हा धर्माच्या दृष्टीने एक महत्वाचा संस्कार आहे, त्यामुळे परवानगी देण्यात यावी. शाळा आधी लोकल कोर्टामधे हरल्यावर  आता हाय कोर्टात ही हारली आहे आणि त्या शाळेला काही मिलियन पाउंड्सचा फाइन भरावा लागतोय.

शीख धर्मातिल मुलांना पगडी ही  इंग्लंड मधल्या कांही शाळांमधे अलाउ केली जाते, पण फ्रान्स मधे अजूनही पगडी शाळांमधे चालत नाही.त्याकरता आपल्या पंतप्रधानांनी पण फ्रान्स च्या पंतप्रधानांना रिक्वेस्ट केली आहे. पण अजुन तरी फ्रान्स ची शाळा वाकलेली नाही.

शाळांमधे युनिफॉर्म हा युनिफॉर्मिटी अमंग द फेलो स्टूडंट्स असावी म्हणून असतो.. त्यामधील डेव्हिएशन्स अलाउ न करणं हा शाळेचा निर्णय आहे. त्यावर इतरांना बोलण्याचा अधिकारच नाही असं मला वाटतं,पण ह्याच बरोबर आपली निधर्मी प्रतिमा शाळेने मेंटेन करावी हे पण नमूद करावंसं वाट्तं..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.., सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

10 Responses to शाळांचे नियम

 1. sonalw says:

  खुप चांगला मुद्दा मांडला आहेत तुम्ही. very nice article.

  actually धर्माचे संस्कार आणि निधर्मी संस्कार यात बराच फरक आहे. आपल्या धर्माचे संस्कार करतां आपण दुसर्या धर्माचा आदर करायला शिकावाने हा खरा निधर्मी संस्कार.
  या शाळांमधुन सगळ्या धर्मांच्या प्रार्थना का नाही म्हणुन घेत? त्यातून सगल्या धर्मंची ओळख होईल. मला वाटत की सगळ्या धार्मिक ग्रंथातले निवडक भाग सुद्धा पाठ्यपूस्तकातुन शिकवावे. ज्यामुळे सगल्या धर्मंची शिकवण ही मंसुकी या एकाच धर्माला जावून मिलते हेही मुलांमधे रुजेल.

 2. vishal says:

  mendi wagaire thik aahe ho..pan tiklya?? ekhadi mulgi tilki laawte yavar ka aakshep? aani yaane kune samantevar nirbandh yeto?? aapali sanskriti japaycha aaplya hatat.shallani pan kshullak goshtincha baavoo karu naye.. ha bharat aahe..ithlya samajat tikli vagaire dharmiktechya pudhe geli aahe.. shahraat ata tikli lavne mhnaje adani samjat astil te soda.. misiionary shalancha dutappipana asto.to jara jast elaborate karta aala asta..aso

  • विशाल
   शाळांचा दुटप्पी पणा तर असतोच. सकाळच्या ख्रिस्ती प्रार्थना किंवा कॅरोल सिंगिंग कॉम्पिटिशन्स.. ह्या सगळ्यांमधे आपलीच मुलं भाग घेउन हिरारिने त्या कॅरोल्स ( कि कॅरल्स?) पाठ करतात.
   ईंग्लिश शाळांना जर सगळ्या हिंदु संस्क्रूतिच्या प्रतिकांवर बंदी आणायची असेल तर त्यांनी पण शिक्षण हे धर्म निरपेक्षच ठेवावं . माझी मुलगी परिक्षेच्या आधी गणपतीला हात जोडून शाळेत शिकलेली एक्झॅम प्रेअर म्हणते! आता बोला! तरी बरं तिला रामरक्षा, अथार्वशिर्ष शिकवलं आहे.
   सकाळी थोडा घाइत होतो त्यामुळे जास्त वेळ लिखाणाला देता आला नाही.

   सोनल
   तुमची मुलगी पण आता जाइलच शाळेत, घोडा मैदान जवळच आहे… शुभेच्छा..

   खरी गोष्ट ही आहे की आपण कांहिच करु शकत नाही. मग एखाद्या वेळेस एखादा शिवसेनेचा कार्यकर्ता एच एम च्या चेहेऱ्याला मेंदी फासतो, मग थोडं रिलॅक्स केलं जातं नियमांना कांही दिवस. पॅरेंट्स कम्प्लेंट करायला गेले तर मुलांना मानसिक त्रास दिला जातो..

 3. bhagyashree says:

  english medium chya shalet christachi puja chalte? mala mahit navta.. mala vataycha he, fakt Convent madhe hote. mazya maitrini ahet jya hindu devanchi hi bhaktibhavani puja kartat.. tasach tyanna christ suddha javaLcha vatato, karan convent madhe vadhlya.. english medium madhe he hot asel asa aikle nahi/vatat nahi..

  • भाग्यश्री
   कॉन्व्हेंट्स आता जवळपास नामशेश झाले आहेत भारतामधे. ( फारच कमी आहेत) एक पिंटो म्हणुन गृहस्थ आहेत , त्यांनी भारतभर सेंट झेवियर्स ग्रूप म्हणुन शाळांचा ग्रूप काढला आहे. प्रत्येक गावात त्यांची शाळा ही असतेच.( झेवियर्स, लॉरेन्स वगैरे त्यांच्याच शाळा) . ह्याच्या मुंबई मधेच २०-२५ शाळा असतिल – ज्या कॉन्व्हेंट्स नाहित.

   रोज सकाळी ७ ते ७-३० प्रेअर असते. त्यामधे बायबल मधला उतारा वाचन करणे , आणि इतर प्रेअर्स असतात. घरी आपण मुलांना अथर्वशिर्श , रामरक्षा, मारुती स्त्रोत्र वगैरे शिकवतोच. पण शाळेतल्या सवई प्रमाणे एक्झाम च्या वेळेस मुलांना शाळेत शिकवलेली एक्झाम प्रेअर आठवते, आणि ही गोष्ट आपोआप होते! माझा आक्षेप जो आहे तो म्हणजे जर तुम्हाला हिंदु प्रेअर्स नको असतिल , इतके निय म असतिल तर मग ख्रिस्ती प्रेअर्स पण नसाव्या. शाळा पुर्णपणे निधर्मी असावी.

 4. Raj says:

  Dear Sir,
  My son is in One of the best Marathi medium school having semi english, sanskrit etc. Only option to have best Marathi school with semi english.

  • राज
   तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे. पण जर नोकरी निमित्य इंटरस्टॆट बदली होत असेल तर पुर्ण इंग्रजी मिडीयमला पर्याय नाही.
   महेंद्र

 5. Gurunath says:

  या लोकांना कांही कामं नाहीत कां? नको तिथे नुसती बोटं घालत असतात

  perfect administrative view…..

  convent baddal khup gair samaj astat… mi swata convent passout ahe…. vatate ka mala pahun tase?

  convent madhe shikalyane
  manse christian hot nahit
  amhala lord (generalised for god in english) chi prarthana mhanje sunday meeting nasate….

  diwali la pan celebs astat…. dhulvad pan asate….

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s