काय सांगु आता??

कोणाला कुठल्या गोष्टीचा आनंद होईल तेच सांगता येत नाही. माझ्या मोठ्या मुलीच्या  १८व्या वाढदिवसाला धाकटी ची कॉमेंट “अगं, म्हणजे तू आता ऍडल्ट सिनेमे पहाणार???” आणि सरळ  टाइम्स उघडला कुठला ’ए’ सर्टीफिकेट चा चित्रपट आहे ते बघायला…हसावं की तिला रागवावे हेच कळत नव्हतं.

धाकटी च्या दृष्टीने  ही एक फारच मोठी गोष्ट आहे….मोठी मुलगी आता ऑफिशियली ऍडल्ट झाली ना    , मग  तिला ‘A’ सिनेमा पहाता येईल ह्याचा आनंद  …..

कारण कुठलाही सिनेमा पहायची टूम निघाली की  लहान मुलगी पेपर घेउन बसते आणि हा ’A’ सर्ट आहे, तो ’AU’ आहे  किंवा ‘U’ आहे हे आधी पहाते. फारच ट्रान्स्परंट व्यक्तिमत्त्व आहे तिचं. म्हणूनच जरा जास्त काळजी वाटते. व्यवहारातले छक्के पंजे कळणं आवश्यक आहे. पण तिच्या मते अजुन तरी.. सगळंच  जग खूप   सुंदर आहे….तिला  तिच्या स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आणायची इच्छा होत नाही अजुन तरी.. 🙂

आमचं चित्रपट पहायला जाणं म्हणजे पण एक मोठ्ठा कार्यक्रम असतो. आधी तर कुठला सिनेमा पहायचा हेच ठरत नाही लवकर. कुठला सिनेमा पहायचा  हे ठरवताना इन्फ्लुअन्स असतो तो मुंबई मिरर चा  किंवा बॉंबे टाइम्स चा. ह्या दोन्ही पेपर मधले रिव्ह्यूचं आणि त्याला मिळालेले स्टार्स हा एक डिसायडींग फॅक्टर असतो. आणि दुसरा म्हणजे मैत्रीण. जर तो चित्रपट एखाद्या मैत्रिणीने पाहिलेला असेल तर मग तिला विचारणं होतं. तिने सांगितले , की बराय.. तर मग आम्ही जाणार..!

मी बरेचदा समजावून सांगायचा प्रयत्न केलाय की , प्रत्येकाची आवड वेगळी असते, तेंव्हा तुम्ही स्वतः बघून चांगला की वाईट ते ठरवा .जो माणुस रिव्ह्यु लिहितो, बरेचदा तो प्रिज्युडीस माइंड ने पण लिहू शकतो.कांही दिवसांपुर्वी एक सिनेमा आला होता, अर्शद वारसीचा ’गोल’ नावाचा. टोटल  फ्लॉप गेला, पण चित्रपट मला खुप आवडला होता. एकदा टुरवर असतांना बघितला होता .

चित्रपटाच्या बाबतीत आमच्या मुलींचं  कुलदैवत म्हणजे हॅरी पॉटर.. ह्या चेटक्याची सगळी पुस्तकं अगदी पहिल्या दिवशी वाचली नाही तर अगदी आभाळ कोसळेल.प्रलय येउन जगबुडी होईल असं वागतात. सक्काळी उठून आधी इनऑर्बिट ला जायचं, तिथे त्या मॉल मधे हॅरी पॉटर च्या सगळ्या गोष्टी (चष्मा , कॅप वगैरे) विकत मिळतात पुस्तकांच्या  सोबतच. बरीच मुलं तर दुकानातच पुस्तकं उघडून पुस्तकं वाचणं सुरु करतात.

मी नेहेमी म्हणतो ना, तुम्हाला कुठलंही पुस्तक हवं असेल तर घ्या, मी पुस्तकं विकत घ्यायला कधीच नाही म्हणत नाही. कित्येक वर्ष घरी आर डी , ट्विंकल, सुरु आहेच. तसेच’ टेल मी व्हाय ’चे सगळे भाग, इन्सायक्लोपेडिया ( सिडी नाही-पुस्तक) पण आहेच. म्हणुन त्यांनी हॅरी पॉटरचं पुस्तक मागितलं तरीही नाही म्हणता येत नाही.

असो.. तर त्या हॅरी ने खरंच अगदी गारुड केलंय .  आणि तसेच हॅरी पॉटर चा सिनेमा आला की तो पण लवकरात लवकर पहाणं हा म्हणजे कुलधर्म असल्या प्रमाणे आम्ही वागतो.शक्यतो सिनेमा लागल्यावर अगदी पहिल्या येणाऱ्या सुटीच्या दिवशीच सिनेमा पहाणं अगदी कुळाचार असल्याप्रमाणे आम्ही सिनेमाची तिकिटं वेल इन ऍडव्हान्स बुक करुन ठेवणे हे काम हल्ली मुलीच करतात. सौ. ला हॅरी पॉटर   च्या गोष्टी पहाणं खुप बोअर होतं, अगदी ऍलर्जी आहे म्हणा ना! म्हणते त्या लिखाणाला साहित्यिक व्हॅल्यु नाही.. ( म्हणजे काय़ बुवा?). म्हणून हा सिनेमा दाखवण्याचं काम माझ्याकडेच असायचं. — असायचं?? हो! कारण आता माझी गरज रहाणार नाही त्यांना सिनेमा दाखवायला.. मुलं मोठी झाली, किंवा अगदी स्वावलंबी झाली तरीही एक पोकळी तयार  होते मनामधे.. ~! आई बाबांसोबत जाण्यापेक्षा मैत्रिणींसोबत जायला बरं वाटतं आता सिनेमाला वगैरे..मुलींना सिनेमाला घेउन जायचा आनंद आता मिस करणार तर!

हॅरी पॉटर थिएटर मधे तर जाउन पाहीलाच पण घरी सुद्धा कमीत कमी २५ दा तरी पाहिला असेल सीडी वर आणि चॅनल्स वर . कधीही लागला तरी पहातात त्या दोघी  हा चित्रपट!

हॅरि पॉटर ला ’चेटक्या’  हा सौ. चा शब्द आहे बरं कां! , तिच्य म्हणण्याप्रमाणे ह्या पुस्तकाला साहित्यिक व्हॅल्यु नाही. या पेक्षा आपल्या लहानपणची पुस्तकं पहा, फास्टर फेणे , किंवा गोट्य़ा वगैरे.. किंवा शामची आई वगैरे त्यांना एक साहित्यिक व्हॅल्यु होती. आजच्या मुलांना शामची आई वाच म्हंटलं तर कसली रटाळ भाषा आहे हो बाबा .. असं म्हणुन मोठ्या मुश्किलीने दोन तिन पानं वाचून ठेउन देणार..जुन्या पुस्तकातले लिखाण कुठल्या कॉंटेक्स्ट मधे आहे तेच कळत नाही मुलांना म्हणून ते वाचायचा कंटाळा करतात… तेच एखादे जॉन ग्रिश्म चं पुस्तकं आणलं तर त्यावर तुटून पडणार.. !मला वाटतं की जुनी मराठी पुस्तकं आजच्या रेफरन्स मधे पुन्हा नवीन मराठी मधे आणि इंग्रजीत लिहिली गेली तर बरं होईल ..कमीत कमी मुलं वाचतील तरी..

तर सांगत काय होतो, की सकाळी फायनल झालं की सिनेमा पहायचा आणि कुठला ते ही कळलं, की मग सुरु होतं.. क्लासेस च्या वेळा केंव्हा आहेत, दोघींचेही क्लासेस किती वाजता आहेत? आणि त्याप्रमाणे वेळ नक्की करतो. हल्ली तिकिटांचं बुकिंग फोनवर होतं , त्या मुळे  थिएटरवर बुकींगला जायची गरज नसते.बरं असतं. किती लहानशी गोष्ट पण किती कौतुक नाही कां? सिनेमाची तिकिटं घरी बसून बुक करता येणं ही एक अगदी लहानशी घटना.

या वरुन आठवलं, आम्ही लहान असतांना वाण्याच्या दुकानात तेलासाठी एक बरणी घेउन जायचो. तेल किलो च्या भावाने मिळायचे, मग तो वाणी आधी रिकाम्या बरणीचं वजन करायचा.. डाळ , किंवा गहू वापरुन . आणि नंतर मग किलोची वजन टाकून तेल मोजून द्यायचा. तेलाचा पिपा फक्त १५ किलोचाच मिळायचा. जेंव्हा १ किलो वगैरे ची पाकिटं मिळू लागली होती , तेंव्हा पण खूप आश्चर्य वाटायचं आणि आनंदपण  झाला(आता ती तेलाची बरणी घेउन जायची कट कट संपली म्हणून.. ). तेच झालं दुधाच्या बाटल्यांच्या बाबतीत, बाटल्या कधी गेल्या आणि पाकिटं कधी रुळावली गेली ते कळलंच नाही. वनस्पती तूप म्हणजे डालडा, ह्याचा एक लोखंडी डबा मिळायचा. नंतर मग प्लास्टिक ची बाटली मिळू लागली ( बोर्न्व्हिटाच्या बाटलीच्या आकाराची) ती पण नंतर बंद होऊन त्यांची जागा पण प्लास्टिक पाकीटाने घेतली. आपण कितीही म्हंटलं, तरीही प्लास्टिक हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहेच.

फार दुर कशाला, अगदी आत्ता आत्ता पर्यंत मिल्क मेड चा डबा मिळायचा. त्याची लिड ओपन करतांना खूप त्रास व्हायचा. सौ. चा केक बनवायचा  प्रोग्राम ( एग लेस ना.. मग मिल्क मेड हवंच) असला  की त्या डब्याची लिड उघडायचं काम माझं. आता आपल्या कडे , नुसतं हाताने ओढून त्याची लिड निघत नाही. तर त्याला चक्क ओपनर आणि एक हातोडी घेउन त्याच्याशी कुस्ती खेळावी लागते. ज्यांना हा अनुभव आहे ते माझ्याशी सहमत होतीलच. आणि हे मिल्क मेड पण इतकं घट्टं असतं की लवकर बाहेर पडत नाही. पण आता देवानेच आमच्या सारख्यांचे ऐकले अन मिल्क मेडवाल्यांनी पण लिड बदलेली दिसते. आता नुसता एक की रिंग सारखा गोल असतो, तो ओढला की डबा उघडतो, किती छान नाही?? तसेच प्लॅस्टिकच्या ट्युब मधे पण टुथपेस्ट प्रमाणे मिळतं मिल्क मेड. ही खास मुलांसाठी ( आणि त्यांच्या बाबांसाठी पण 🙂 ) येता जाता मिल्क मेड खायची केलेली सोय 🙂

लहान मुलगी अगदी कुठलेही नियम असो, फारच काटेकोर पणे पाळते. साधी गोष्ट आहे ,   एखाद्या वेळेस बाहेर फिरायला गेलो आणि अमुल आइस्क्रिम चे तयार कोन ( कोर्नेटॊ सारखे) घेतले, वेळ कमी, म्ह्णून चला लवकर बसा गाडीत इथे पार्किंग नाही.. असं म्हणत कारमधे बसलो, की मग त्याच्यावर रॅप केलेला कागद सुध्दा ती रस्त्यावर फेकत नाही. तो कागद हातात धरुन ठेवते, एखादी कचरा टाकायची जागा दिसे पर्यंत. बरं केवळ आपलाच नाही तर सगळ्यांचाच कचरा सांभाळायला पण तिची ना नसते.   मला वाटतं लहान मुलांचा व्हॅल्युज वर खूप विश्वास असतो. म्हणूनच इतकी कमिटमेंट असते त्यांच्यामधे.

बरेचदा काळजी वाटते, इतकं सुंदर निरागस मन, या समाजाचे टक्के टॊणपे न  खाताच निब्बर व्हायलाच हवे , पण तसं नसतं, प्रत्येक गोष्ट आपल्याच तऱ्हेने व्हायची असते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

5 Responses to काय सांगु आता??

 1. Aparna says:

  मी स्वतः हरि कुंभाराची (हे नव-याने त्याला दिलेलं टोपण नाव) सर्व पुस्तकं वाचली आहेत. त्यामुळे पिक्चर पाहताना नवरोबाला सोप्पं होतं असं तो म्हणतो. कारण मी असते ना सर्व समजावुन द्यायला.त्याला पुस्तक घेऊन वाचताना मी पाहिलंच नाहीये. वाचन बिचन सबकुछ नेट असा मामला. आजकाल सर्व मिस करते. आता तुमच्या घरात तुम्ही अजुन मायनॉरिटित आलात….गुड लक

  • हो.. मायनॉरिटिमधे आलो मी आता… पण त्यातही आनंद आहे. 🙂 माझं पण वाचन वगैरे सगळं काही नेट वरच असतं. कधी तरी एखादी कादंबरी वाचतो.. झालं.

 2. Vikrant says:

  Really interesting article. Eventhough I have not read any Harry Potter book nor seen any of those movies, I am widely aware immense magic it has created. I feel that we do get completly crazy about something or soembosy and that liking keeps on linegring for long…. Like I remember getting totally enchanted by Sa Re Ga Ma little champs and especially Mugdha. On most of the occasions, such things take over our daily life. As the time passes, you are thrown into material world once again from soothing universe of fiction & sentiments. But that’s the life. Harry Potter, Mugdha vaisampayan, Sachin Tendulkar, Saint Dnyaneshwar, John Abramaham, Raj Thackrey….there is no dearth of characters/personalities who leave a profound mark on our minds. This is very normal in sensitive people and thats how humans are distinguished from other species !!!!

 3. Piyu says:

  खूप खूप छान आणि निरागस लेख !!! 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s