श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)

आजपर्यंत तामिळ टायगर्सचा दुःस्वास करित आलोय. ते टेररिस्ट ऍक्टीव्हीटीमधे इन्व्हॉल्व्ह्ड आहेत म्हणू न त्यांच्या नावाने काड काड बोटं मोडणं सुरु असतं माझं. बरेचदा एका बाजुने   माहिती असते आपल्याला, किंवा एखाद्या गोष्टीमागची पार्श्वभूमी माहित नसते , त्या मुळे आपण एकांगी विचार करतो, आणि एखाद्या गोष्टी बाबतचे आपले मत  बनवतो.आता वाट्तय माझी चूक तर होत नव्हती ना? ह्या प्रॉब्लेम कडे पहातांना??

तामिळ  लोकं.. तसे भांडकुदळ नाहीत. किंवा फार ऑफेन्सिव पण नाहीत. मग श्रीलंकेमधेच ते इतके ऑफेन्सिव्ह कां झालेत? आजपर्यंत टायगर्सने कित्येक रा्जकीय नेत्यांना मारलंय, बॉंबस्फोट घडवून आणले. कित्येक तामिळ लोकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं.. ह्या तामिळ लोकांना हवंय तरी काय़? आत्ता पर्यंतच्या वाचनावरून असं दिसतं की त्यांना श्रीलंकेचं विभाजन हवंय.. एक थोडासा तुकडा त्यांना वेगळा देश म्हणून हवाय. अशा मागणीचे कारण? ते समजून घ्यायला थोडा इतिहास बघावा लागेल.

इतिहास लिहितांना पण फक्त सनावळ्या लिहित नाही, तर काय आणि कसं झालं ते लिहायचंय आज. नुसत्या सनावळ्या लिहिल्या की वाचायला  बोअर होतं . हे सगळं वाचणं सुरु करण्यपुर्वी एक गोष्ट सांगाविशी वाटते, १९८३ पासुन आज पर्यंत ७०००० च्या वर तामिळ  मारले गेले आहेत श्रीलंकेमधे.

श्रीलंकेच्या सेंट्रल प्रोव्हिन्स  मधे तामिळ लोकांची बरीच लोकसंख्या आहे. आता हे लोकं तिथे गेले तरी कसे?? तर फार फार पुर्वी  ब्रिटीश लोकांनी या बेटावर १८१८ मधे ताबा मिळवला. तिथे चहाच्या मळ्यात कामं करणारे मजूर हवे होते. ह्याच कारणासाठी  , १९-२० व्या शतकात, भारतामधुन  ब्रिटीश लोकांनी कांही तामिळ कामगार श्रीलंकेला चहाच्या मळ्यात काम करण्यासाठी नेले . ह्याच कामगारांच्या महेनती मुळे , चहाच्या मळ्याचं डेव्हलपमेंट  किंवा व्यावसायिकरण ब्रिटीशांना करता आलं.

त्या काळापासून म्हणजे साधारण १९० वर्षांपूर्वी तामीळ लोकं तिथे श्रीलंकेत स्थानांतरीत झाले.तेंव्हा पासून त्यांच्या कित्येक पिढ्या श्रीलंकेतच गेल्या. भारताला जेंव्हा स्वातंत्र्य मिळाले , तेंव्हाच श्रीलंकेला पण स्वातंत्र्य  मिळाले.

ह्या तामिळ लोकांना तिथे इस्टेट तामिळ असं म्हंटलं जातं . श्रीलंकन तामिळ लोकांना बर्घर्स म्हंटलं जातं. यांच्या पैकी   बरेच लोकं अजुन ही चहाच्याच मळ्यातच कामं करतात. या तामिळ लोकांच्या गेल्या कित्येक पिढ्या श्रीलंकेतच अगदी गरिबी आणि दारीद्र्यात गेल्या.आणि अजुन ही दारिद्र्याने खितपत पडल्या आहेत. अंग मेहेनतीची कामं करुन पोट भरणं हेच यांच नशिब!

१९४९ मधे डी एस सेनानायके ह्यांच्या नेतृत्वाखालिल सरकारने तामिळ लोकांची व्होटींग पॉवर काढून घेतली. तामिळ व्होटर्स ची संख्या ही ३३ टक्के होती. देशाचा कुठलाही नेता निवडीचे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेल. याचं कारण ३३ टक्के तामिळ ‘मतं’ देशाचं राजकारण पुर्ण सिंहलींच्या हातून हिसकावून घेउ शकले असते.

इस्टेट तामिळांना व्होट्स न करु देण्यामुळे त्यांचे व्होटींग प्रपोर्शन जे २० टक्क्यांपर्यंत घसरले आणि सिंहली नेत्यांना पार्लमेंट मधे २/३ मेजॉरिटी मिळाली.आता सिंहली लोकांच्या हातात संपुर्ण पार्लमेंट गेल्यावर तिथे तामिळांचे हाल सुरु झाले. त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. अन्यायाला दाद मागायची तर कुठे? सरकारच जर तुमच्या विरुद्ध कायदे करतंय तर मग तुम्ही तरी काय कराल?

सिंहली लोकांना इतकी मेजॉरिटी मिळाल्यावर तामिळ लोकांना इफेक्टिव्ह अपोझिशन करणे शक्य होत नव्हते. हा तामिळ लोकांचा व्होटींग अधिकार का काढून घेण्यात आला? तर पुढे मागे हेच तामिळ लोकं पार्लमेंटवर कब्जा जमवतिल म्हणुन ही काळजी (?) घेतली तत्कालिन सरकारने.स्थानिक सिंहलींना  अर्थातच पार्लमेंट  वरचे डॉमिनेशन सोडायचे नव्हते. ( अगदी हीच भीती भारतामधे पण आहे.. जर एखादा  विचित्र आयडीयो्लॉजी असलेला पक्ष सत्तेवर आला ,तर देशाचं वाट्टोळं करु शकतो)

बरं श्रीलंका सरकार इस्टेट तामिळींचा सिटीझनशिप हिसकावून घेउनच थांबलं नाही, तर गव्हर्नमेंटने त्यांना इथुन हाकलुन देण्याचाही ( इव्हॅक्युएट करण्याचा )प्रयत्न पण केला. —-१९६२ मधे बंदरनायके ह्या श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांच्या  बरोबर ऍग्रिमेंट साइन केलं.दुसरं ऍग्रिमेंट हे तिन वर्षानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबरोबर साइन करण्यात आलं. ह्या ऍग्रिमेंट मधे काय होतं????

“येत्या १५ वर्षात ,६ लाख एस्टेट तामिळ लोकांना श्रीलंकेतुन  एक्स्पेल केले जाइल आणि भारतामधे पाठवले जाईल. आणि  इतर  ३.७५ लाख लोकांना श्रीलंकेची सिटीझन शिप दिली जाइल. ” ते जे ३.७५ लाख तामिळ लोकांना सिटीझन शिप देण्याचे सुरु होते ते काम २००३ मधे पुर्ण झाले. म्हणजे १९६२ ते २००३ हे लोकं विदाउट एनी सिटीझन शिप   रहात होते…..!

सगळे  एस्टेट तामिळ  गृप कांही  भारतामधे आले नाहीत तर त्यांनी तिथेच रहाणे पसंत केले. म्हणजे हे लोकं जे तिथे राहिले त्यांच्या कडे सिटीझन शिप नाही. याचाच अर्थ ते कुठल्याही इतर देशात जाऊ शकत नाही, किंवा श्रीलंकेच्या सामाजिक जीवनात  भाग घेउ शकत नाहीत.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑफिशिअल लॅंग्वेज पॉलिसीएस! डब्लु आर डी बंदरनायके हे निवडुन यावेत म्हणून सिंहली ऍक्टीव्हिस्ट नी बरंच काम केलं आणि १९५६ मधे सिंहली नॅशनलिस्ट प्लॅटफॉर्म वर ’ओनली सिंहली ’ कॅंपेन वर ते निवडून आले.  याच काळात ’सिहला ओन्ली’ हा ऍक्ट पास करण्यात आला. ह्या ऍक्ट प्रमाणे इंग्लिश ही राष्ट्र भाषा न रहाता, सिंहली ही भाषा राष्ट्र भाषा म्हणून नॉमिनेट करण्यात आली…. इथे तामिळ लोकांचं असं म्हणणं होतं की तामीळ पण जॉइंटली राष्ट्र भाषा म्हणुन व्हावी.

फारच कमी लोकं असे होते, की जे इंग्लिश बोलू शकत होते. ७५ टक्के लोकं हे सिंहली भाषेवर प्रभुत्व  मिळवून होते. २५ टक्के लोकं हे तामिळ भाषेवर प्रभुत्व मिळवून होते. ब्रिटीश काळापासुन बरेच तामिळ लोकं पण सिव्हिल सर्व्हिसेस मधे होते. पुर्वी राष्ट्र भाषा इंग्लिश असल्यामुळे मातृभाषा  तामिळ असली तरीही काम चालून जायचे पण आता सिंहली भाषा न आल्या मुळे बऱ्याच तामिळ लोकांच्या नौकऱ्या गेल्या.

या कारणामुळे तामिळ फेडरल पार्टी ने  सत्याग्रह केला. पण हार्डलाइन सिंहली नॅशनल गॅंग्ज ने  मोडून काढला. ह्याच सुमारास एका दंग्या मधे २०० तामिळ लोकं मारले गेले.सिंहली लोकांनी  तामिळ स्त्रियांवर अत्याचार केले. तामिळ प्रॉपर्टी लुटून त्यांना बेघर करण्याकडे सिंहली लोकांचा पुढाकार होता. सरकारने ह्या तामिळ लोकांचे प्रस्थापन उत्तर भागात केले.

हेच काय कमी होतं कां, तर ७० च्या दशकात तामिळ वृत्तपत्र, मासिके, नियत कालिके, चित्रपट ह्यांच्या वर सरकारने बंदी घातली. डीएमके आणि तामिळ युथ लिग वर पण बंदी घातली गेली. तामिळ लोकं सैरभैर झाले.भारतामधे विद्यापिठामधे तामिळ उच्च शिक्षणाकरता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे फॉरिन एक्चेंज बंद  केले. याच सोबत लंडन विद्यापिठाची एक्स्टर्नल डीग्री ची परिक्षा पण बंद करण्यात आली. सरकारचं म्हणणं होतं की हा जनरल रिफॉर्म चा एक भाग आहे. एकॉनॉमिक सेल्फ सफिशिअन्सी साठी हा निर्णय घेतलाय. अर्थातच तामिळ लोकांनी यावर कांही विश्वास ठेवला नाही.

१९७० मधे युनिव्हर्सिटिज ची ऍडमिशन्स स्टॅंडर्डाइझ करण्यात आल्या. ब्रिटीश लोकांच्या अधिपत्याखाली असतांना इंग्लिश राज्य भाषा होती, जिचा फायदा इंग्लिश बोलणाऱ्या जनतेला खूप  व्हायचा. मेजॉरिटी पॉप्युलेशन जी दूर खेड्यात रहायची त्यांना इंग्लिश मिडियम शाळांचा फायदा मिळत नव्हता. उत्तर भागात तामिळ बोलणारे लोकांना मिशनरी स्कुल्स मधे प्रवेश मिळायचा.. व्हॉटएव्हर एकॉनॉमिक स्टेटस मे बी..!केवळ कॉन्व्हेंट्स मुळेच  युनिव्हर्सिटीज मधे शिकणारे जास्तित जास्त इंग्लिश बोलणारे विद्यार्थी तामिळ होते. स्पेशिअली इंजिनिअरिंग आणी मेडिकल ला. शासनाच्या स्टॅंडर्डायझेशन प्रोग्राम मुळे मात्र इथे पण सिंहली विद्यार्थ्यांनाच जास्त ऍडमिशन मिळू लागली अन तामिळ विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली.

पुन्हा एकदा थोडं मागे जाउ या.. सिरिमवो बंदरनायके,यांनी बऱ्याच मिशनरी स्कुल्स   नॅशनलाइझ केल्या.माध्यमाची भाषा ही इंग्लिश न ठेवता केवळ सिंहली करण्यात आली . याचा परिणाम म्हणजे तामिळ विद्यार्थी ज्यांचे सिंहली वर प्रभुत्व मिळवुन नव्हते, त्यांना शाळेचं शिक्षण घेणे पण कठिण झालं आणि सिव्हिल सर्व्हिसेस च्या नोकऱ्या, किंवा विद्यापिठामधे प्रवेश मिळणे कठिण झाले. ७० च्या सुमारासच देशाचे नांव पण सिलोन पासुन श्रीलंका करण्यात आले जे एक सिंहली नांव आहे.अर्थात तामिळ लोकांनी पण त्याला आक्षेप घेतला होताच…

आत्ता पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे सरकारने केलेले अत्याचार झेलत तामीळ जनता तिथेच रहात होती. अगदी काडीचाही प्रतिकार न करता. ह्याच सुमारास ’तामिळ इलम’ चा कन्सेप्ट आला. इलम म्हणजे काय?? इलम हे श्रीलंकेचे जुने नांव आहे.” लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम  ” हे नांवच  ही संघटना कां सुरु झाली हे सांगते. तामिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट ने १९७६ मधे हा कन्सेप्ट काढला. १९७७ च्या इलेक्षन मधे तामिळ लोकांकरता इंडीपेंडंट स्टॆट हा मुद्दा घेउन त्यांनी म्हणजे टीय़ूएलएफ ने इलेक्षन लढले. त्यांनी सगळ्या सिट्स जिंकल्या पण सरकारने ह्या पक्षावरच बंदी आणली- इंडीपेंडंट स्टेट करता  ऍड्व्होकेट केलं म्हणून जिंकलेल्या लोकांना पण पार्लमेंट मधे जाउ दिले गेले नाही..

१९८१ मधे तिन दिवस चाललेल्या दंग्यामधे जाफना येथे तामिळ न्युज पेपर चे ऑफिस जाळुन टाकण्यात आले. जाफना पब्लिक लायब्ररी पण जाळण्यात आली. जाळणाऱ्या लोकांच्या मधे युनिफॉर्म मधले पोलिस पण अग्रभागी होते. ९५००० च्या वर जुनी मॅन्युस्क्रिप्ट्स जाळण्यात आली.

आजपर्यंत दोन्ही बाजुंची अगदी अपरिमित हानी झालेली आहे.

श्रीलंका:- २०,८६६ सैनिक,१००० पोलिस,  २००९ पर्यंत मारले गेले.

तामिळ टायगर्स:- २१०५१,  २००८ च्या मध्यापर्यंत,

८०००० लोकं , इन्क्लुडींग सिव्हिलियन्स मारल्या गेले आहेत २००८ च्या शेवटी .सगळ्यात जास्त सिव्हिलियन्स मारल्या गेले ते २००९ जानेवारिमधे.. ६४३२ सिव्हिलियन कॅजुअल्टीज…

आता पर्यंत आपण इथे श्रीलंका सरकारने काय केले आणी कसे वागले हे  पाहिले .  २३ जुलै ८३ पासुन एल टि टी ई आणि श्रीलंकन आर्मी यांच्या मधे सिव्हिल वॉर सुरु आहे. एल टी टी ई ज्या प्रकारच्या टॅक्टिझ वापरते त्यामुळे एल टी टी ई ह्या संघटनेवर एक टेररिस्ट संघटना म्हणुन बंदी घालण्यात आलेली आहे. एकंदर ३२ देशात, युरोप, भारत, अमेरिका, ब्राझिल, औस्ट्रेलिया, जपान वगैरे इन्क्लुडेड..

दोन तपं कन्सिस्टंट फायटींग.. अन ३ फेल्ड पीस टॉक्स अटॆम्प्ट , आणी ईंडीयन पिस किपिंग फोर्स ची डिप्लॉयमेंट.. याचं आउटकम म्हणजे आजची परिस्थिती.

हे इतकं वाचल्यावर पण तुम्हाला वाटतं कां की श्रीलंकेमधला उठाव हा काश्मिरच्या उठावाशी कम्पेअर केला जाउ शकतो? मला तरी तसं वाटंत नाही..

हे सगळं कसं होत गेलं…?

१९८३:० टायगर्सचा उत्तरेकडे अटॅक, १३ सैनीक मारले गेले. ह्याचाच परिणाम म्हणुन कोलंबो ला राईट्स झाले आणि शेकडो तामिळ मारले गेले किंवा पळून देशाच्या इतर भागात गेले. ’तामिळ इलम’ च्या युध्दाची सुरुवात म्हणता येइल या गोष्टीला हवं तर.

१९८७:-भारतिय ट्रुप्स ( पिस किपिंग फोर्स) पाठवल्या गेली. त्यांनी पण स्थानिक तामिळ लोकांना हत्यारं टाकण्याचं अवाहन केलं पण. ते तयार नव्हते . या युध्दात जवळपास १००० भारतिय सैनिक मारले गेले.

१९९०:- भारताने आपली फोर्स विथड्रॉ केली. दुसरे “तामिळ इलम” युध्द सुरु झाले.

१९९१:- टायगर सुसाइड बॉंबर भारतिय पंतप्रधान राजिव गांधींचा खुन करतात. या नंतर केवळ दोनच वर्षानंतर श्रीलंकन प्रेसिडॆंट रणशिंघे प्रेमदास यांना तामिळ टायगर्स ने मारले.

१९९५:- चंद्रिका रणतुंगे रेबल्स बरोबर युध्द करण्यास तयार . टायगर्स ने नेव्ही चे एक शिप बुडवले.याच बरोबर ’ईलम वॉर ३” ची सुरुवात . टायगर्सच्या हातुन जाफना गेलं. आणी श्रीलंकेने संपुर्ण ताबा मिळवला जाफनावर.

१९९५-२००१:- सेंट्रल बॅंकवरच्या सुसाइड अटॅक मधे १०० लोक मारले गेले. टायगर्स उत्तर आणी पश्चिम भागात विखुरले गेले.कुमारतुंगावरच्या हल्ल्यामधे त्या जखमी झाल्या आणि एक डॊळा गमावला.

२००२:- सिझ फायर वर सह्या करण्यात आल्या. ह्या वेळी नॉर्वे ने मध्यस्थी केली होती. ( मला हे कळत नाही की नॉर्वे कसं काय एकदम पिक्चर मधे आलं?? असो..)

२००३:- टायगर्स ने काढता पाय घेतला, शांतता वार्तेमधुन, पण सिझ फायर सुरुच होतं.

२००४-२००५:- तामिळ टायगर्सचा पुर्वेकडचा अमांडर कर्नल आम्मन वेगळा झाला, आणि ६००० फायटर्स घेउन गेला. श्रीलंकेच्या फॉरिन मिनिस्टरच्या मृत्युची जबाबदारी नंतर यानेच स्विकारली.

२००६:- ’एलम वॉर४” सुरु झालं जिनेव्हा मधे ऑक्टोबरला झालेली शांतता वार्ता फेल झाली.

२००७:- गव्हर्नमेंटने टायगर्सच्या ताब्यातुन पुर्वेकडचा भाग सोडवुन घेतला.

२००८:- श्रीलंका सरकारने सिझ फायर तोडुन जानेवारी महिन्यात पुन्हा ऑफेन्सिव्ह होऊन अटॅक केला.

२००९:- जानेवारी महिन्यात टायगर्स चे स्थान किलिनोच्छी जिंकले.

अप्रिल ५:- श्री लंका मिल्ट्रीने दावा एला की तामिळ अतिरेकी १७ किमी च्या परिसरात वेढले गेले आहेत.

एप्रिल २०:- श्रीलंका सरकारने २४ तास दिले सरेंडर करायला..

अजुनही युध्द सुरु आहेच..

या लेखाचा उत्तरार्ध लिहायचा म्हणजे बराच अभ्यास लागणार आहे.   इथे आता पुर्वार्ध संपवतो.

श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged . Bookmark the permalink.

14 Responses to श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)

 1. sahajach says:

  मला खरच येव्हढी माहिती नव्हती…खुप अभ्यासपुर्ण आणि सखोल लेख होतोय..
  मुळात प्रत्येक युद्धाचा किंवा क्रांतीचा इतिहास समजला की त्याबद्दलचे मत बनवता येते…
  उत्तरार्धाची वाट पहात आहे…..

 2. खुपच अभ्यास करुन लेख लिहिला आहे…
  मध्यंतरी discovery channel वर या संधर्भात छान documentry दाखवण्यात आली.
  एकुणच LTTE ही फ़ार प्रगत आणि सुसज्ज , संघटित अशी संघटना आहे.
  suscide bomber ही संकल्पना त्यांचीच. त्याचा मुळापासुन बिमोड करणे हेच त्याचे उत्तर असेल असं मला वाटत…
  उत्तरार्धाची वाट पहत आहे…

 3. तुमच लेखन मला आवडलं..माझ्या ब्लॉग रोल मध्ये मी तुमचा ब्लोग नक्की ऍड करीन…
  माझ्या ब्लॉग वर तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल..

  http://www.pune-marathi-blog.blogspot.com/

 4. ओंकार, तन्वी, किशोर
  प्रतिक्रिये बद्दल आभार..पुढचा भाग लवकरच लिहायचा प्रयत्न करतो.

 5. आता पर्यन्तच्या लेखापै्की मला सर्वात जास्त आवडलेला लेख. अतिशय अभ्यासपु्र्ण वाटला. खूपच छान माहिती. बरीच मेहनत घेऊन लिहीली आहे.
  खरच ह्या दुसर््या बा्जूचा आपण विचारच करत नाही.
  आतापर्यन्त LTTE बद्दल माझे मत वाईट होते पण हा ले्ख वाचून त्यात थो्डा बदल होतो आहे.
  धन्यवाद.

 6. महेश
  प्रतिक्रिये बद्दल आभार.

 7. sonalw says:

  farach chhan. Itke details dewoon amha wachakanna educate kelyabaddal thanks.
  Ekandarit, LTTE cha parabhav=Srilankan Tamil lokanche haal punha continue… asach arth laawata yeto. Kinva punha ekda tamili asantosh weglya maargane ufaaluun yenar. kaharch he sinhli lok rawanache wanshaj distaat.

 8. Sarang says:

  धन्यवाद, मी अत्ता पर्यंत LTTE चा खुप द्वेष करत होतो, कारण फ़क्त एकच राजीव गांधी हत्या, पण अता त्यांचा ही बाजु समजली, अतिशय छान लेख आहे हा, पण तरीही त्यानी राजीव गांधी यांची हत्या करून भारताचे खुप नुकसान केले आहे.

  • राजिव गांधीचा केलेला खुन ही सगळ्यात मोठी चुक आहे लिट्टॆची..जर त्यांनी ही चुक केली नसती, तर आज भारत त्यांच्या बाजुने उभा राहिला असता.

 9. sudhirkekre says:

  atishay chaan. brilliant.
  very impressed with your research. keep writing.

 10. Sudhir
  Thanks for the comments..

 11. मस्त आहे लेख. एकदम अभ्यासपूर्ण. बरीच नवीन माहिती मिळाली 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s