फिरोझ खान-मानाचा मुजरा!

feroz01

आजच ह्या माझ्या सगळ्यात आवडत्या ’हिरो’ चे देहावसान झाले. कॅन्सरने पिडीत असलेल्या या महान  खऱ्या खुऱ्या  देशभक्त अभिनेत्याने    ’शान ए पाकिस्तान’ हे पाकिस्तानातील   पारितोषिक नाकारले होते .

इस्लामीक देशामधिल मुस्लिम लोकांची जी दयनिय स्थिती आहे त्यावर पाकिस्तानात जाउन स्टेज वरुन बोलण्याचं धाडस पण ह्यानेच केले होते. मुजाहिदिनांना दिली जाणारी बायस ट्रिटमेंट आणी इतर गोष्टींबद्दल त्याने पाकिस्तान सरकारला धारेवर धरले होते.पाकिस्तानी मिडीयाने पण हा इशु खुपच हाइप केला होता आणि, नंतर परवेझ मुशर्ऱफने   या अभिनेत्यावर पाकिस्तानामधे येण्यास बंदी घातली होती. मिडियाच्या प्रेशर पुढे  परवेझ मुशर्ऱफना असे करावे लागले होते..

१९७५ मधे ह्याचा पाहिलेला धर्मात्मा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट रसिकांना मेजवानिच होता. ह्याच्या चित्रपटामधे नेहेमी फॉरिन चं शुटींग, फास्ट कार्स, आणि बेब्स असायच्या. त्या काळचा खरा शो मॅन फिरोझ खानच होता माझ्या मते.

ह्याच्या अभिनयात क्लिंट इस्टवुड नेहेमी डोकावुन जायचा. भारतिय सिनेमामधे ’स्टाइल आयकॉन म्हणावा तसा हाच एक अभिनेता होता.ज्या काळात इतर हिरो केवळ ३ पिस सूट्स घालुन असायचे त्या काळात मळक्या जिन्स घालुन पडद्यावर येणारा हाच एक अभिनेता होता.  एक चित्रपट होता- ’काला सोना’ हा म्हणजे मला अतिशय आवडलेला चित्रपट. खोटे सिक्के मधे त्या काळातील झाडून सगळे ’बॅड मेन’ म्हणजे व्हिलन्स हिरो होते. कुठल्यातरी इंग्रजी चित्रपटावरुन बेतलेली कथा. पण मस्त जमली होती भट्टी.मी ह चित्रपट कमीत कमी १० दा तरी पाहिला होता.

आरझु, औरत आणि सफर हे फिरोझ खानचे गाजलेले चित्रपट.कुर्बानी हा फिरोझ खानने काम केलेला बहुतेक शेवटचाच चित्रपट ( हिरो म्हणून) पण नंतरही कधी तरी चुकून एखाद्या चित्रपटात ह्याचे दर्शन व्हायचे.

आदमी और इन्सान  मधे बेस्ट सपोर्टींग ऍक्ट्रर चं अवॉर्ड  १९६५ साली  फिल्म फेअर तर्फे देण्यात आले होते.नंतरही बरीच अवॉर्ड्स मिळाली फिरोझ खानला इन्क्लुडींग लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड..

मी भारतीय आहे असे पाकिस्तानात अभिमानाने सांगणारा हा मुस्लिम अभिनेत्याचे जाणे काळजाला चटका लावून गेले. ह्या महान हरहुन्नरी देशभक्त कलावंतास मानाचा मुजरा..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged . Bookmark the permalink.

7 Responses to फिरोझ खान-मानाचा मुजरा!

 1. महेंद्रजी,
  नमस्कार
  फिरोजखान वरील ब्लॉग वाचला. आपण एकदम अपडेट राहून ब्लॉगवर नवी नोंद केली आहे.
  शेखर

 2. YD says:

  Mala to avadaycha karan kuthalahee khota aav anala nahee tyane kadhee, sarv masale bharun picture karaycha. Maja yaychee

 3. rani says:

  hya post madhe देहावसान, पारितोषक, देशभक्त, मुजरा asale marathi shabd vachatana adakhalalya sarakha hota. tyapeksha “death”, “award”, “patriotic”, “salute” ase sope ani sutsutit shabd vaparale asate tar flow ala asta.
  firoz khan great hota he matr ekdum correct.

 4. शेखर, वायडी, राणी
  प्रतिक्रियेबद्दल आभार. तो गेला म्हणुन लिहित नाही मी हे पण त्याचे सगळे चित्रपट बघितले आहेत. कुर्बानी बघायला मी सकाळी ५-३० वाजता थिएटर वर पोहोचलो होतो. घरुन निघतांना टॉवेल घेउन निघालो होतो.. पोहायला जातो म्हणुन सांगुन….. 🙂
  राणी, त्या क्षणी जे शब्द सुचले ते लिहिले आहेत , आणि एकदा लिहिल्यावर मग मी परत एडीटींग करायच्या भानगडीत पडत नाही.राणी, रिसेंटली तो शिवाजी भोसले बोलतोय पाहिला ना म्हणुन असे शब्द आले लिखाणात .. पण शुध्द मराठीत लिहायला आवडेल मला.. 🙂

 5. अमित आरोसकर, लंडन says:

  महेंद्रजी
  धन्ययवाद तुम्ही राणी साठी लीहीलेली प्रतीक्रीया वाचली. मी शुद्घ मराठी बोलतो. मझे मित्र माझी सखाराम गटणे म्हणून संभावना करतात. लोकांसाठी तुम्ही तुमच्या भाषेचा दर्जा खालावु नये. लोक आपला दर्जा का उंचावल नाहीत तुम्ही लीहा तुमचे लिखाण आवडते
  ameet_aroskar@yahoo.com

 6. अमित,

  माझं मराठी तितकंसं चांगलं नाही, पण मी प्रयन्त जरुर करतो लिहायचा. अर्थात शक्य होइल तितकं.तुमच्या एनकरेजिंग प्रतिक्रियेबद्दल आभार..शुध्द मराठी लिहायचं आहेच कधी ना कधी तरी. पण हा ब्लॉग नुकताच सुरु केलाय. तेंव्हा हळू हळू सवय होइल असं वाटतं लिहायची.

 7. Jitendra Jadhav says:

  Kharach ha manus royal hota. Tyachi stile ani tyachya entryla wajawale janare music zakkas. 64 bit Music hyane bhartal aikawle, First ferari yane bhartat anli, Jeans chi fashion hyane suru keli. I am big fan of Feeroz Khan.

Leave a Reply to rani Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s