श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)

श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)  इथे वाचता येइल.

ltte_logoएखाद्या मांजराला जरी तुम्ही कॉर्नर करुन मारणे सुरु केले तर ते मांजर पण वाघाप्रमाणे लढत. अगदी हीच गोष्ट  श्रीलंकेतिल तामिळांच्या बाबतीत घडलेली आहे.मी त्या तामिळ टायगर्सचे फोटोग्राफ्स पाहिले आहेत नेट वर. अगदी सडसडीत बांध्याचे आणि बरेचसे तर कुपोषित लोकं वाटतात . आणि हेच लोकं एल टी टी ई चे टायगर्स आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरा कठिणच जाते.

इथे प्रभाकरन सारखा एक माणुस केवळ स्वतःच्या विल पॉवर वर इतकी मोठी संघटना सुरु करतो, आणि तिला आजचे स्वरुप देतो ते वाखाणण्यासारखे आहे. इथे तामिळ लोकांना काहीच गमवण्यासारख नाही. त्यांनी आपलं अस्तित्व पण गमावलेलं आहे श्रीलंकेत . म्हणूनच तर सुसाइड अटॅक्स करण्यासाठी जे ‘डिव्होटॆड फॉर द कॉज’ लोकं हवेत ते आहेत प्रभाकरन कडॆ.प्रभाकरनला सहज मिळतात. जवळपास १०० च्या वर असे लोकं आहेत ज्यांनी अशा अटॅक्स मधे स्वतःला स्वाहा करुन टाकले आहे.

तामिळ टायगर्स च्या काही क्वॉलिटीज आहेत ,  त्या अगदी वाखाणण्यासारख्या आहेत .ऑर्गनायझेशन बिल्डींग ऍबिलिटी, इनोव्हेटिव्हनेस,  बॅटल फायटींग,  मोबलायझेशन ऑफ द अव्हेलेबल रिसोअर्सेस, ऑप्टीमम यूटिलायझेशन ऑफ द रिसोअर्सेस, कमिटमेंट टु द कॉज दे बिलिव्ह इन आणी क्लिअर व्हिजन!प्रभाकरन हा एक बेस्ट मॅनेजर झाला असता कार्पोरेट वर्ल्ड मधे.

मॅनेजमेंट च्या भाषेत बोलायचं तर डिफायनेबल ऑब्जेक्टीव्ह्ज , वेल थॉट प्लान्स आणि प्रोग्राम्स टु अचिव्ह इट!जगातिल हा एकच ग्रुप आहे ज्याने दोन मोठे वर्ल्ड लिडर्स असॅसिनेट केले. एक म्हणजे राजिव गांधी आणि दुसरा म्हणजे प्रेमदासा रणसिंघे.असॅसिनेशन मधे इतका हाय सक्सेस रेट दुसऱ्या कुठल्याही टेररिस्ट गृप चा नाही.

ह्या टायगर्सच्या ट्रेनिंग मधे अजुन एक गोष्ट शिकवली जाते, की कुठल्याही परिस्थितित दुश्मनांच्या हातात जिवंत पडायचं नाही. जर कधी तुम्ही शत्रुच्या हातात पडलाच, तर मग गळ्यात लॉकेट्प्रमाणे घातलेली सायनाईडची कॅप्सुल चावुन ताबडतोब प्राण द्यायचे. याच गोष्टी मुळे त्याचा ठावठिकाणा इतके दिवस सापडत नव्हता.

तामिळ लोकं श्रीलंकेमधे मोस्ट अनवॉंटेड लोकं आहेत.ह्या रेसिडंट्स्चा पदोपदी अपमान होतो, यांचं सर्व्हायव्हल टोटली डिपेंड आहे सिंहली लोकांच्यावर. हिंदु  लोकांची मंदिरं तोडली सिंहल लोकांनी.  समुद्रामधे नेउन देव  बुडवून टाकले.

कित्येक वर्ष अशा ऍट्रॊसिटीज सहन केल्यावर प्रभाकरनने लिट्टे ची स्थापना केली.. मी ह्या बद्दल आता पर्यंत इतकं वाचल,फोटॊ पाहिले आहेत नेट वर की आता यावर अजुन काही लिहायची इच्छाच मरुन गेली आहे. इतके अत्याचार एखाद्या  वंशावर  केवळ  हिटलरनेच केले असावेत. फक्त फरक एवढाच आहे की इथे रिसिव्हिंग एंड ला  ज्युज नव्हते सगळे अत्याचार सहन करायला.

कमरेभोवती बांधायच्या सुसाइड व्हेस्ट चा शोध यांनीच लावला आणी त्याचा इफेक्टिव्ह वापर पण केला.सुरुवातीच्या काळात म्हणजे हा गृप सुरु झाला त्याच्या पहिल्या वर्षी हा पण एक इतर गृप्स प्रमाणेच एक रेझिस्टन्स गृप म्हणुनच होता आणि या गृपची नोंद कुठेही फारशी घेतली गेली नव्हती.पण १९८३ मधल्या पहिल्या मिल्ट्रीवरच्या अटॅक नंतर मात्र ह्या लोकांची स्ट्रेंथ एकदम वाढली. बरेच तामिळ लोकं ह्या गृप मधे सामिल झाले. त्यांना असं वाटायला लागलं, की लिट्टॆ फक्त त्यांना तामिळ इलम देउ शकते. तामिळ टायगर्सनी पब्लिक ट्रान्स्पोर्ट, बुध्दिस्ट टेंपल्स , गव्हर्नमेंट बिल्डिंग्ज या ठिकाणी स्फोट घडवून आपलं अस्तित्व अधोरेखित केलं.

टायगर्सकडे दोन वेगवेगळे फोर्सेस आहेत. एक म्हणजे जे जमिनिवर काम करतात, आणि दुसरे म्हणजे जे समुद्रावर असतात . प्रभाकरन कडे एक सबमरिन पण आहे अशी वंदता आहे.अगदी सुरु वातीच्या काळात भारत सरकारने पण तामिळ टायगर्सला मदत केली होती पण नंतर पिस किपिंग फोर्सेस पाठवल्यावर मात्र बंद केली.

तामिळ टायगर्सच्या मते भारताने पाठवलेली पिस किपिंग फोर्स ही केवळ तामिळ लोकांना नेस्तनाबुत करण्यासाठीच पाठवली. या फोर्स ने काहिही पॉझिटिव्ह ऍक्शन्स घेतल्या नाहित हा क्रायसेस संपवायला, पीस किपिंग फोर्स ने केवळ श्रीलंकेच्या आर्मी बरोबर कांही तामिळ मारले. आपले पण १०००च्या वर सैनिक मारले गेले. त्या पिस किपिंग फोर्स ची खरच पाठवायची खरोखरिच गरज होती कां? असा प्रश्न पण मनात येतो. लंका सरकारच्या चुकिच्या निर्णयाला भारताने दिलेला  पाठिंबा हा तामिळ टायगर्स ला कधीच पसंत पडला नव्हता.राजिव गांधी ह्यांच्यावरचा हल्ला हा केवळ याच  एका कारणामुळे करण्यात आला होता.

कुठलेही राजकिय प्रेशर किंवा निर्णय घेतले गेले नाही भारता तर्फे.. हा क्रायसेस ऍड्रेस करायला. भारतामधे या टायगर्स ची तुलना नेहेमी काश्मिरातिल आतंकवाद्यांशी केली जाते. कारण आपल्या इथे बऱ्याच लोकांना अजूनही हे युध्द कां सुरु झालंय आणि कुठल्या कारणासाठी ? हे अजुनही निटसं माहिती नाही.

पहिला सुसाइड अटॅक जुलै ५, १९८७ , मिल्ट्रीचे ४० जवान मारले गेले. आणि एकदा अशा प्रकारच्या अटॅक्सला यश मिळतं हे बघितल्यावर मात्र मग पुढे जास्त मॅग्निट्य़ुडचे असे १०७ अटॅक्स करण्यात आलेत. ह्या अटॅक्सची माहिती तुम्हाला वाचायची असल्यास इथे मिळेल. या वेब साइटवरचे फोटोग्राफ्स जरा डिस्टर्बींग आहेत .

मे १९९१ मधे श्री राजिव गांधी आणी इतर १८ लोकं पेरम्बुर इथे मारल्या गेले. तसेच या लोकांनी एक मर्चंट जहाज ्जे सप्लाय घेउन जाफन्याला जात होती ती , बुडवली.. केवळ एक तराफा वापरुन.. इथे फोटॊ  दिलाय त्याचा.अशा तराफ्यावर बसुन एखाद्या  जहाजाला बुडवणे.. हा म्हणजे एक चमत्कारच वाटतो मला. इथे पण त्या सुसाइड बॉंबरची कमिटमेंट होती टूवर्डस द कॉज.

टिपिकल तामिळ टायगरची सुसाइड किट अशी असायची. एक हाफ पॅंट , अंगाभोवती बांधलेले  आर डी एक्स आणि त्याचा ट्रिगरिंग बेल्ट  कमरेभोवती.डीटॊनेटर ट्रिगर करायला म्हणुन साधा पेन्सिल सेल वापरला जायचा. डिटॊनेटर एकदा ब्लास्ट केला की मग सोबतचे एक्स्प्लोजिव्ह्ज मोठया प्रमाणात डॅमेजेस घडवुन आणू शकायचं. जो कोणी हा अटॅक करायचा तो अटॅक म्हणजे स्वतःच्या जिवाची अजिबात फिकिर नसणारा माणुस.. त्याची मेंटॅलिटी कशी असेल मरताना? हा प्रश्न मला नेहेमिच सतावतो.त्या सुसाईड अटॅक्सच्या वेब पेज वर कांही फोटॊ आहेत. एका फोटॊ मधे केवळ चेहेरा शिल्लक आहे आणि पुर्ण धड तुकडे तुकडे होऊन गेलंय.

इतके डिसॅस्ट्रस फोटो नेटवर पहातांना अगदी कसं तरी झालं. एका वेब साइटवर एका तामिळ प्रेग्नंट स्त्रीच्या पोटातुन मुलाचा हात बाहेर आलेला दाखवला होता. पण ती लिंक मुद्दामच इथे देत नाही. हे सगळे फोटो पाहिल्यावर   मन कसं विष्ण होऊन गेलं. तो फोटो पाहिला आणि पुढे या विषयावर काहीही वाचायची इच्छाच मेली. म्हणून थांबतो इथेच..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged . Bookmark the permalink.

8 Responses to श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)

 1. Raj says:

  Plase write something about Modi case what U think. Is it political game by Congress?

 2. manishrao18 says:

  Tumcha blog space awaadla mala…. marathi madhe lehnya sathi mala pray-na milalee mala. Lets hope I too will start writing in Marathi

 3. bhaanasa says:

  स्वतःच्या जिवाची अजिबात फिकिर नसणारा माणुस.. त्याची मेंटॅलिटी कशी असेल मरतांना? हा प्रश्न मला नेहेमिच सतावतो– मलाही हे असे व आत्महत्या करणारे लोक नक्की काय विचार करीत असतात ह्याचे कोडे पडलेले आहे. ह्याला धाडसी म्हणावे की भेकड–की आणिक काही? ह्या विषयावर एवढे वाचन मी कधीच केले नाही कारण मला फार डिप्रेस वाटते.
  तुम्ही खूप विस्तृत पण मद्देसूद मांडले आहे.

 4. भाग्यश्री
  प्रतिक्रियेकरता आभार.

 5. श्री. कुलकर्णी,

  तुम्ही लिहिलेला श्रीलंकेवरील व एल. टी. टी. ई. वरील लेख वाचला. या विषयावर खरचं लोकांना सखोल माहिती नसते असे खुप वेळा अनुभवायला येते. त्यामुळे तुमचा प्रयन्त आवडला…

  त्यामध्ये अजुन एक दोन मुद्दे मला सांगावेसे वाटतात:

  १) भारताने पीस कीपिंग फ़ोर्स पाठवायचे एक मोठे कारण होते. श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली होती. जर आपण नाही म्हणालो असतो तर त्यांनी चीन किंवा अमेरिकेकडे मदत मागितली असती. त्यांमुळे त्यांचे सैन्या भारतीय उपखंडात आले असते! म्हणुन राजीव गांधींनी फ़ोर्स पाठवली. पण तुम्ही म्हणालात तसे त्याचा म्हाणवा तसा परिणाम झाला नाही.

  २)आश्चर्याची गोष्ट ही आहे की एल टी टी ई ने स्वताःचे हवाई दल स्थपने केले होते. तेही स्वबळावर. म्हणजे, काश्मीर मधील अतिरेक्यांना पाकिस्तानसारख्या देशाची अघोषीत मदत तरी आहे…. त्यामुळे पाकिस्तानचा infrastructural आणि developmental support त्यांना मिळतो. तसे एलटीटीई बाबत नाही. त्यांना तशी विशेष कोणाची मदत नाही. असे असतनाही त्यांनी हवाई दल बांधले ही एक खुप महत्वाची बाब आहे.

  ३)तुमचा लेख मला थोडसा एल. टी.टी.ई. कडे बायस्ड वाटला. १९९५-२००० पर्यंत त्यांनी श्रीलंकेत तशी बर्यापैकी जरब बसवली होती. तेव्हा वटाघाटी करुन तमिळांसाठी वेगळा देश जरी नाही तरी काही महत्वाचे हक्क ते मिळवु शकले असते. पण त्यांनी त्या संधीचा उपयोग केला नाही. नंतर जी शस्त्रसंधी झाली तेव्हा एलटीटीई जरा डाउनसाईडला होते, त्यामुळे त्यांच्या मागण्यांना लंकेने जास्त भीक दिली नाही.

  • तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. खरं सांगायचं तर तुम्ही माझे आधिचे लेख वाचले असतिल तर त्यामधे एलटीटीई वर भरपुर आग पाखड केली आहे. त्यामुळे या विषयावर वाचन केल्यावर मात्र थोडं झुकतं माप दिल्या गेलं एल टी टी ई करता.
   तुम्ही मला हवं तर थोडा नाजुक मनाचा म्हणा , पण तो प्रेग्नंट स्त्रीचा फोटो, ज्यामधे एका मुलाचा पाय पोटातुन बाहेर आलेला दाखवालाय, तेंव्हा मात्र खरंचा वाईट वाटलं.. म्हणून थोडा बायस्ड झाला असेल हा लेख.
   जर त्यांनी श्री राजिव गांधींना मारलं नसतं तर मात्र आजचं चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं असं मला वाटतं.
   माझा मते वेगळा देश नाही, पण नागरिकत्व जरी दिलं असतं आणी तामिळांना पण समान अधिकार दिले असते तरीही हे प्रकरण शांत झालं असतं. अर्थात , आता हे विचार म्हणजे , आत्याबाईला मिशा असत्या तर?? असेही वाटु शकतात म्हणा!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s