टाटा -चिप ऑर प्राइसलेस??

कांही लोकांचं मला अगदी मनापासून कौतुक वाटतं . एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला, की मग ते त्या कामासाठी कांहीही करायला तयार असतात. पुर्वी क्रिकेटच्या मॅचेस पहातांना भर ग्राउंडवर  स्ट्रेकिंग ( सगळे कपडे काढून पळताना) करतांना कांही ऑस्ट्रेलियन  लोकांना पाहिलं आहे. अशा लोकांच्या बद्दल मी बोलत नाही.

किंवा अमिताभ बच्चनच्या घरासमोर ३ दिवस अन्न पाण्याशिवाय बसून रहाणाऱ्या आणि अमिताभने दर्शन दिल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण न करणाऱ्या भैय्या बद्दल पण बोलत नाही..

सौरव ला मॅच मधे कॅप्टन केलं नाही , किंवा त्याला एखाद्या मॅच मधे घेतलं नाही म्हणून रस्ता रोको करणाऱ्या कोलकत्यातल्या त्याच्या फॅन्स बद्दल पण नाही….तर मग कोणाबद्दल सांगायचंय मला?? सांगतो..पण एकच सांगावसं वाटतं वरील गोष्टी जे लोकं करतात ते कारण एकदम फालतू आहे..  समाजाच्या दृष्टीने त्याची कांहीच किंमत नाही.. मला कौतुक वाटतं ते सामाजिक कार्यात  अशी कमिटमेंट दाखवणाऱ्यांचा.

ग्रिनपिस डॉट ओआरजी यावर पुर्वी पण एक लेख लिहीलाय(इथे वाचु शकाल तुम्ही तो). मग आता पुन्हा का? एकदा झालंय की सगळं लिहुन.. ??

त्या ऑलिव्ह रिडले टर्टल्स चा ब्रिडींग ग्राउंडवर टाटा पोर्ट बांधताहेत ओरिसा मधे, आणि ते होऊ नये olive-ridley-turtleम्हणून ग्रिन पिस नावाची एक एनजीओ काम करते आहे.पब्लिक अवेअरनेस साठी त्यांना एक जाहिरात करायची होती आणि त्या साठी ऍडव्हर्टाइझ साठी  ते पैसे गोळा करत होते, म्हणून त्यांना मदत करा हे सांगायला म्हणून लिहिलेली   ती पोस्ट होती.त्यांनी पैसे द्या म्हणून आव्हान केलं होतं… मी त्यांना ३०० रुपये पाठवले होते.

कालच ग्रिन पिस क्डून एक इ मेल आला, त्यात त्यांनी लिहिलंय की पुरेसे पैसे न गोळा झाल्या मुळे जाहिरात देता आली नाही, म्हणून ज्यांनी कोणी पैसे दिले होते, त्यांचे पैसे परत पाठवण्यात येत आहेत.

पुरेसे पैसे न जमा झाल्यामुळे माझे पैसे ते परत पाठवताहेत????? माझ्या अगदी वाइल्डेस्ट ड्रिम मधे पण मला असं कधी वाटलं नव्हतं… पण रिअल  लाइफ मधे असंही होऊ शकतं???.. .झालंय! त्या एन जी ओ ने चक्क पैसे परत पाठवले! 🙂

बरं पुरेसे पैसे गोळा झाले नाहीत, म्ह्णून या लोकांनी काय लढा थांबवला असं तुम्हाला वाटतं कां?? छे!नाही.. अजिबात नाही. म्हणतात ना व्हेन देअर इज अ विल देअर इज अ वे… !रतन टाटांच्या कानावर यांना ही गोष्ट घालायची होती की “तिथे तुम्ही पोर्ट सुरु केल्यामुळे  ही नामशेष होत असलेली एनडेंजर्ड स्पेसी पुर्ण पणे नष्ट होऊ शकते”.. पण टाटांना यांचं ऐकायला वेळ नव्हता.   काय करावं बरं?? कांही दिवसा्पूर्वी यांनी एक धरणं स्टेज केलं होतं , टाटांच्या कार्पोरेट ऑफिस समोर..पण पोलिसांनी लगेच अटक केली होती.आता पुढे काय करावं ते सुचत नव्हतं . कसंही करुन कमीत कमी एकदा तरी टाटांच्या कानावर घालायचंच.. पण कसं?? अगदी मिलियन डॉलर्स क्वेश्चन!

रशिया मधे युलिया नावाची एक टाटा कस्टमर  आहे . तिने टाटांच्या कार्पोरेट ऑफिस ला फोन केला रशियाहुन आणि टाटांशी बोलायचंय म्हणून सांगितलं. पण   रिसेप्शनिस्ट ने तिला होल्डवर ठेवलं ५ मिनिटे ( मॉस्को वरून कॉल खूप महाग पडतो )आणि नंतर फोन कट केला. तिने पुन्हा फोन केल्यावर सांगितलं की टाटा सध्या प्रवास करित असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं होऊ शकत नाही.

युलियानं काय करावं?? तिने सरळ ग्रिन पिस या एन्जीओ ला फोन लावला आणि सगळी घटना सांगितली . आणि हे पण सजेस्ट केलं की एखादा व्हॉइस मेल सुरु करावा , की ज्या मधे सगळे टाटांसाठी आलेले  मेसेजेस रेकॉर्ड करावे आणि नंतर टाटांना ब्रॉडकास्ट करुन ऐकवावे. बरं ही आयडीया इतकी क्लिक झाली की सगळ्यांनी नक्की केलं आणि प्रोग्राम चॉक आउट केला..

आशिश फर्नांडीस म्हणुन एक मुंबईचा यांचा एक स्वयंसेवक आहे. त्याने काय केले, की एक टॅक्सी घेतली भाड्याने. टाटांचा रोजचा रस्ता माहिती आहेच सगळ्यांना. फाउंटनच्या समोरुन ते रोज सकाळी ९ ते ९-३० च्या दरम्यान पास होतात. भाड्याने घेतलेल्या कार वर एक ऍम्प्लिफायर अन स्पिकर लावला. आणि गुरुवारी सकाळी टाटांच्या गाडीच्या मागे ही गाडी नेली .. सगळे मेसेजेस ऍम्प्लिफायरच्या थ्रु टाटांना ऐकवले. नंतर त्यांच्या ऑफिस समोर पण तिन वेळा सगळे रेकॉर्डेड मेसेजेस प्ले केले. पण नंतर पोलिस आले आणि आशिश फर्नॅंडिस ला अटक करण्यात आली.

आता तो सुटलाय . आणि केस पेंडिंग आहे त्यामुळे या सगळ्या एपिसोडचे फोटो वगैरे कांहीच ना्हीत. तुम्हाला ते मेसेजेस ऐकायचे आहेत कां?? इथे क्लिक करा.your-message-has-been-broadcast-to-mr-ratan-tata.. .आशिश म्हणतो, की हे कॅंपेन त्याचं एकट्याचं नाही हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं आहे.. तेंव्हा आपण सगळे मिळुन काम केलं तर टाटा ऐकतिल….!

हॅट्स ऑफ टू  आशिश ऍंड सच कमिटेड पिपल अराउंड.. असे कमिटेड लोकं आहेत आपल्या कडे म्हणूनच देश चाललाय.!!

ती जुनी जाहिरात जी आजपर्यंत कधीच पब्लिश होऊ शकली नाही ती इथे पुन्हा एकदा पोस्ट करतोय…..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , . Bookmark the permalink.

5 Responses to टाटा -चिप ऑर प्राइसलेस??

 1. bhaanasa says:

  अगदी खरं. सामाजीक प्रश्न ( खाजगीही अर्थात ) हे जिद्दीने पाठपुरावा करूनच कदाचित सुटू किंवा काहीशा मूर्त स्वरूपाला पोचू शकतात. अशी कमिटमेंट असलेले लोक आहेत म्हणूनच तर…

 2. ravindra says:

  अशी निरपेक्षपणे काम करणारी व पुण्यवान लोकं आहेत म्हणूनच हे जग चाललं आहे नाही तर कधीच एक मोठी सुनामी आली असती व……………

 3. आनंद पत्रे says:

  थँक्लेस जॉब करणार्यांचे धन्यवाद कसे मानावे हे या पामराला कळत नाही …

  • मी शक्यतो अभिप्रायाबद्दल धन्यवाद. वगैरे लिहीण्याचं टाळतो. पण कधी तरी उत्तरात कांहीच लिहायला नसलं की मग काय लिहावं हा प्रश्न पडतो. तेंव्हा हा फिरंगी शब्द उपयोगी पडतो.

 4. Pingback: टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम.. | काय वाटेल ते……..

Leave a Reply to ravindra Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s