माझं बॅचलर लाइफ…(५)

सोन्याच्या खाणी.. मॅकेनाझ गोल्ड आठवलं कां? छेः.. तशी नसते गोल्ड माइन्स.  मी दोन माइन्स   पाहिल्या आहेत. एक म्हणजे चिकरगुंटा (कोलार गोल्ड फिल्ड्स) , आणि दुसरी म्हणजे गदग. खरं तर गदग ची माइन्स बंदच पडलेली होती, पण एम ई सी एल ने तिला परत सुरु करण्यासाठी मदत केली.

एमईसीएल ही कंपनी खरं तर जमिनितला स्टॅटा समजण्यासाठी जमिनिला ड्रिलिंग करुन एक संपुर्ण सॅंपल कोअर बाहेर काढते. नाही…. ती तुम्ही जी पाण्यासाठी बोअरिंग करण्याची मशिन पहाता, तशी नसते ही मशिन.  ही कोअर ड्रिलिंग मशिन जरा वेगळी असते. तुम्ही जेंव्हा ड्रिल करता तेंव्हा पोकळ ड्रिल बिट मधे कोअर सॅंपल जमा होत जातो. थोडक्यात काय तर पोकळ ड्रिल असतं. त्यामुळे ड्रिलिंग करतांना एक  कोअर आत शि्ल्लक रहातो.   एमईसिएल ही फक्त कोअर सॅंपल काढुन देते. ड्रिलिंग करतांना मड पंप वापरला जातो ड्रिल ला कुलिंग आणि कोअर सेव्हिंग साठी म्हणुन. तो एक पुर्ण वेगळाच विषय आहे.

गदग गोल्ड  पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होते. पुर्वी जेंव्हा ब्रिटिश लोकं होते तेंव्हा त्यांनी जातांना माइन्स पुर्ण बंद केली होती. सोनं हे ओअर मधे अगदी कमी प्रमाणात मिळतं. दोन टन ओअर क्रश केला की फारतर .२ ग्राम सोनं निघतं. यावरुन कल्पना येइल . इथे ऍक्चुअल माइन मधे काम सुरु झालेलं होतं. सोन्याच्या माइन्स मधे अजिबात सिक्युरिटी वगैरे नव्हती. मला एक दगड खाली पडलेला दिसला. त्यावर पिवळा धमक मेटलचा कण चकाकत होता. मला वाटलं की तो सोन्याचा कण आहे म्हणून. तर माझ्या बरोबर असलेला जीऒलॉजिस्ट म्हणाला, हे सोनं नाही.. याला फुल्स गोल्ड म्हणतात. हे खरं तर पायराइट्स आहेत . हे अगदी मुबलक प्रमाणात दिसतात. पण यांच्यामधे सोन्याचा अंश नसतो. तरी पण तो पिस हातातच धरुन ठेवला , म्हंटलं, सोव्हेनिअर म्हणुन नेतो बरोबर.

चिकरगुंटा साइटला माझा सख्खा मामेभाउ अशोक देशपांडे होता. त्याच्याच रुमवर उतरलो होतो साइटवर. त्या रुमला रुम म्हणायचं कां हा खरं तर प्रश्नंच होता. जिओलॉजिस्ट लोकांचं आयुष्य खरंच खुप खडतर असतं. नंतर तो हा जॉब सोडुन साउथ अमेरिकेला गेला. ही साइट कोलार च्या अगदी लागुनच होती.

कोलार माइन्स अंडरग्राउंड आहे आणि आता माइन फार खोल गेल्यामुळे  माइनिंग करणे फार एक्सपेन्सिव्ह होतंय, आणि म्हणुन भारत गोल्ड माइन्स चे लोकं इथे  अजुन कुठे सोनं सापडतंय कां ते शोधताहेत. ( माफ करा मी वर्तमान काळात लिहिलंय , पण ही गोष्ट साधारण २० वर्ष जुनी आहे)  केजिएफ च्या माइन्स मधे मी  आत  जाउन आलो. खरंच खुप भिती वाटते. तसाही, आपण जमिनिखाली आहोत, ह्या कल्पनेनेच थरकाप उडतो.. आणि इतक्या खोल??? शेवटी सिनेमांचा इम्पॅक्ट पण असतोच नां आपल्यावर! सोन्याच्या खाणित जाउन पण सोनं कांही दिसलं नाही.. 😦

टी गार्डन्स मधे असतांना कालिमपॉंग जवळच होतो. एका गार्डनमधे .. नांव विसरलो आता. त्या काळी सेल फोन नव्हता. त्या मुळे  जो पर्यंत मी ऑफिसमधे अथवा बॉस शी कॉंटॅक्ट करित नसे , तो पर्यंत कोणाशिही कसलाही संबंध नाही. बरं एस टी डी पण इतकं कॉमन नव्हतं. त्यामुळे फोन पण ट्रंक कॉल बुक करावा लागायचा. बरं ट्रंक कॉल लावल्यावर तो थ्रु होईल असे नाही. म्हणजे असं, की फोन बुक करुन बसायचं एखादं पुस्तक वाचत. तुमचं नशिब असेल तर थ्रु होइल तो कॉल २ तास ते कितिही वेळा नंतर 😦

टी गार्डन्स मधे जातांना, ऑफिसमधुन निघतांना कस्टमर्सची लिस्ट दिलेली असायची. आणि सिक्वेन्स पण सांगितला जायचा- जॉग्रोफिकली सोपं पडावं म्हणुन. त्यामुळे ऑफिसला टेंटेटिव्हली माहिती असायचं कुठे आहे ते. कांही काम पडलं तर ऑफिस मधुन टेलिग्राम यायचा . बहुतेक वेळेस पुढचं डेस्टीनेशन त्या गार्डन  मॅनेजरला माहिती असायचं. (सर्व्हिस इंजिनिअर सध्या कुठे असेल ते अझ्युम करुन टेलिग्राम पाठवायचे ऑफिसमधुन) आणि जर एखाद्या पत्त्यावर टेलिग्राम पोहोचला तर तो मॅनेजर अगदी स्वतःच्या घरचं काम आहे असं समजुन पोहोचवायचा आमच्या पर्यंत.

सडनली एक मेसेंजर आला की मला भुतानला एका इंडीयन मिल्ट्रीच्या अंडर असलेले एक इन्स्टॉलेशन बघायला जायचं आहे अशा अर्थाचा एक टेलिग्राम आलेला होता. भारत आणि चिन मधले कनेक्शन असलेले एक ईंडोभुतान मायक्रोवेव्ह प्रोजेक्ट — म्हणजे, एक मायक्रोवेव्ह टॉवर इन्स्टॉल केले होते, साधारण १७००० फुट सी लेव्हलच्या वर. वर जायला फक्त चॉपर्स.  टेम्परेचर सब झिरो १० ते २० कितिही असु शकायचं. तर तिथे एक  त्या क्लिफ वर एक जनसेट लावलेला होता. त्याला संपुर्णपणे रेडिओ कंट्रोल्ड सिस्टिम होती. म्हणजे तो सेट त्या क्लिफ वर न जाता खालुनच चालु करता यायचा, किंवा बंद करता यायचा. लोड चेंज ओव्हर पण ऍटोमॅटीक होतं.  आता वाचायला खुप साध आणि सोपं वाटतंय.. पण त्या काळी हे सगळं म्हणजे अगदी स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी होती. पॅनल मधे बरिच इलेक्ट्रॉनिक कार्ड्स.. आम्हाला फक्त कार्ड बदलणं इतकंच  येत होतं. हा अनुभव अगदी लक्षात राहिला तो थंडी मुळे. 🙂

जग किती लवकर बदलतं नाही? सॅटेलाइट कनेक्टिव्हीटी, किंवा तत्सम गोष्टी वापरुन, आज भारतामधुन अमेरिकेतिल एखाद्या ठिकाणची मशिनरी इंटरनेट च्या थ्रु कंट्रोल करणं पण अगदी सोपं आहे. इतकं सोपं की माझ्या मित्राच्या मुलाने इंजिनिअरींग च्या फायनल इयरला यावर प्रोजेक्ट केलं होतं. 🙂

नागालॅंड साइडला फक्त एकदाच जाणं झालं . नंतर पुन्हा कधिच गेलो नाही. तिथे गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की राज्य भाषा इंग्लिश असल्यामुळे बहुतेक सगळे लोकं इंग्लिश अगदी चांगल्या तऱ्हेने बोलू शकतात. इथे नॅचरल गॅस वर चालणारे जनरेटर्स सप्लाय केले होते. या भागात प्लायवुड मॅन्युफ़ॅक्चरिंगच्या पण खुप इंडस्ट्रिज होत्या.  आसामला बहुतेक बिझिनेसमन्स मारवाडी असायचे. तशिही खाण्यापिण्याची खुपंच आबाळ व्हायची. हॉटेलमधल्या मेनु कार्डमधे पिजन फ्राय , किंवा पिजन करी अगदी बहुतेक ठिकाणी दिसते.

बऱ्याच लोकांना निरनिराळ्या प्राण्यांचं किंवा पक्षांचं मांस खाण्याची क्रेझ असते. परवाचिच गोष्टं, अहमदाबादला गेलो असता, एका मित्राने ऑफर दिली की स्पेशल (हरणाचे) मटन आहे .. चल खायला.. पण म्हंटलं की डायटवर आहे म्हणुन रेड मिट खात नाही, आणि टाळलं. बरं लोकांना, हे असं खायची आवड असतेच, पण आपली पोहोच किती आहे हे दाखवायला म्हणुन खायला घालायला पण आवडतं.

असो..तर काय सांगत होतो, नागालॅंडला असतांना एका हॉटेलला गेलो. अगदी लहानसं हॉटेल.. त्या प्लायवुड फॅक्टरी जवळचं. तिथे जेवायला नेलं मला मेंटेनन्स इंजिनिअरने. ताटामधे खुप मोठा भात, शेजारी कसली तरी करी.. आणि भाताखाली लपलेला मांसाचा एक तुकडा..  जेवण झालं, मग त्याला विचारलं.. ( आणी मुर्ख पणा केला.. कशाला विचारायचं एकदा खाणं झाल्यावर ? पण नाही, जास्त बोलायची आवड नां?) ये कोनसा मिट था? जरा अलगही लग रहा था.. तर म्हणे ये ’जमिन का फिश’ है. माझ्या नजरेतलं प्रश्न चिन्ह बहुतेक त्याला समजलं होतं. त्याने अजुन एक्स्प्लेन केलं, ये स्नेक है……आणि मला एकदम मळमळणं सुरु झालं.. केंव्हा एकदा सगळं खाल्लेलं बाहेर काढतो असं झालं..शेवटी उलटी केली आणि मग दिवसभर तसाच उपाशी राहिलो.

ही गोष्टं जेंव्हा माझ्या मित्राला सांगितली, तर म्हणाला, तु तर लकी आहेस, की तुला डेलिकसी म्हणुन कुत्रा नाही खाउ घातला त्या लोकांनी.. मी बेशुध्दंच पडायचा बाकी होतो. तेंव्हापासुन अगदी पक्कं लक्षात ठेवलं आहे, की कुठेही गेलॊ तरी आधी कुठलं मीट आहे ते विचारायचं आणी नंतरंच खायचं. तसंही मला फक्त चिकन आणि फिशच आवडते 🙂

सगळा भारत पाहुन झाला, पण अजुन राजस्थान मात्र पाहिलेला नाही. हा भाग फक्त फॅमिली सोबतंच पहायचा हे नक्की ठरवुन ठेवलंय. आता सध्या टुर्स फक्त वेस्टर्न रजन मधे असल्यामुळे आता तर ऑफिशिअली तिकडे जायचा चान्संच नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

1 Response to माझं बॅचलर लाइफ…(५)

  1. टू टेक्निकल… डोक्यावरून गेला सगळा लेख.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s