स्वाईन फ्लु

आजपर्यंत बर्ड फ्लु ऐकलं होतं. मॅड काउ पण ऐकलं होतं . आता  हा अजुन एक नवीन प्रकार दिसतोय..

नावावरून तर तो चक्क डुकरांच्यामुळे होणारा ( म्हणजे पाकिस्तान्यांच्या मुळे नाही) रोग वाटतो.खरं तर हा फ्लु डुकरांच्या मधे अगदी कॉमन आहे. अमेरिकेत डुकरं पाळणं (खाण्यासाठी) हा एक मुख्य धंदा आहे. अगदी आपल्या इथे ज्या प्रमाणे पोल्ट्रीज आहेत तशात तिथे पिगरीज आहेत. सॉसेजेस हा तिथला आवडता पदार्थ.आत्ता पर्यंत डुकरांना पाळताना देण्यात येणारे व्हॅसिन्स योग्य रितीने रोगाला अटकाव करित होते. पण आता मात्र व्हायरस अजिबात दाद देईनासा झालाय, त्या व्हॅसिन्स ला.  डुकरांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या लोकांना पण हा रोग होऊ शकतो.

२००४ मधे युनिव्हर्सिटी ऑफ लोवा मधे एका सर्विलन्स स्टडी मधे हे सिद्ध झालं होतं की , जे लोकं पोल्ट्री आणि स्वाइनरी हॅंडल करतात त्यांना झोनोटीक इन्फेक्शन विथ इन्फ्लुएन्झा व्हायरस मुळे त्रास होऊ शकतं .तसा, सहजा सहजी हा रोग माणसांना होत नाही, पण एकदा   झाला की मग मात्र फार वेगाने स्प्रेड होतो.

१९७६, नंतर १९८८ नंतर आताच २००९ मधे ह्या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले .आताच्या या अटॅक मधे १७२ डेथ मेक्सिको मधे आणि २० डेथ आणि १००० च्या वर इन्फेक्शन्स झालेले आहेत.

कांही दिवसापूर्वी एक लेख वाचला होता कृष्ण उवाच मधे सामंत साहेबांचा. त्यात त्यांनी म्हंटलं होतं की अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीयांनी विनाकारण अमेरिकनांचे अंधानुकरण करू नये. बिफ, पोर्क, बेकन्स खाणं टाळावं. आजच्या परिस्थितीत तेच अगदी संयुक्तिक वाटतं. बेकन किंवा पोर्क खाण्यामुळे पण हा रोग होऊ शकतो असे कांही लोकांचे म्हणणे आहे पण कांही डॉक्टर्स म्हणतात की वेल कुक्ड फुड खाल्लं तर कांही धोका नाही.

याचे सिंपटम्स पण अगदी आपल्या नेहेमीच्या फ्लु सारखेच असतात. गळणार नाक,घशातली खवखव ताप, थकवा, भुक न लागणं, खोकला, उलट्या आणि डीसेंट्री, त्यामुळे  ह्या रोगाला इतर रोगापासुन वेगळं आयडॆंटीफाय करणं पण तसं कठीणंच. तरीही अमेरिकेत डॉक्टर्सना सांगण्यात आलेलं आहे .तुमच्या कडे कुठलिही व्हायरल इन्फेक्शन ची केस  किंवा रिस्पायरेटरी इन्फेक्शन ची केस आली तर “स्वाइन व्हायरस” टेस्ट करा म्हणजे हा रोग पसरणे थांबण्यास मदत होईल..

हे कळतं कसं ? किंवा हे कन्फर्म कसं केलं जातं की एखाद्याला स्वाइन फ्लु आहे म्हणुन? तर नाकातलं फ्लुड आणि कफ यांच्यावरपॅथॅलॉजिकल टेस्ट्स केल्या की मग कळतं    स्वाइन फ्लु आहे की नाही ते.

हा डीसिझ कॉंटेंजिनियस आहे. खोकल्या मुळे प्रसारित होणारे जर्म्स – मुळे हा रोग पसरु शकतो. शक्यतोवर हा रोग झालेल्या माणसाबरोबर शेक हॅंड केल्यास साबणाने हात धुणे  आवश्यक आहे. हा रोग शिंकांमुळे पण पसरु शकतो. एखाद्या माणसाला हा फ्लु झाला तर तो  साहाजीकच खोकला आल्यावर तोंडासमोर हात धरेल आणि मगच खोकेल. किंवा शिंक आली तरी पण तो नाकासमोर हात धरेल. असे करण्यामूळे रोगाचे जर्म्स हातावर ट्रान्स्फर होऊन नंतर मग लॅपटॉप्स, टेलिफोन्स, टेबलटॉप्स वर हा व्हायरस फ्लोट होतो. इथून हा डोळॆ, नाक, किंवा तोंडावाटे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करु शकतो.

अल्कोहल बेस्ड जेल्स, किंवा फोम वापरला तर ह्या व्हायरस पासुन बचाव होऊ शकतो. शोशल डीस्टंन्सिंग ही एक दुसरी साधी पद्धत पण व्हायरस दुर ठेवण्यास मदत करु शकते. डब्लु एच ओ ने गाइडलान्स मधे सांगितलंय की ज्याला फ्लु लाइक सिम्पटम्स असतिल त्याने हा फ्लु स्वाइन फ्लु नाही, हे कन्फर्म होई पर्यंत इतरांपासून दुर च रहावे.

अमेरिकेत सध्या टॅमिफ्लु किंवा रेलेन्झा हे ड्रग्ज प्रिव्हेंटिव्ह म्हणुन दिले  जातात.भारत, आणि इतर एशियाई देशात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट करणे सुरु केले आहे. अगदी ह्याच प्रकारच्या ऍक्शन्स बॅंकॉक मधे पण घेण्यात आल्या आहेत. बॅंकॉक मधे तर फॉरिनर्स ला परत पाठवा असाही प्रस्ताव आहे.

आता हा रोग कधी आटोक्यात येइल ते काळच ठरवेल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मेडिकल सायंस and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to स्वाईन फ्लु

 1. abhijit says:

  आमच्या शहरात एक पेशंट सापड्ला. त्यामुळे लोकांमध्ये टेंशन वाढले आहे. येथे तीन दिवस शाळा बंद आहेत. मेक्सिकोची तर वाट लागली आहे. शासनाने सर्व सुविधा बंद केल्या आहेत. १ जून पर्यंत सर्व फ्लाईट्स कँसल झाल्या आहेत.
  शाळा, सरकारी कार्यालये बंद केले तरी लोक स्टॆडिअम मध्ये मॅच पहायला मोठ्या प्रमाणावर जात आहेत. कधी संपणार हे असं वाटत आहे.

  • अभिजित
   काळजी घ्या… 😦
   लोकांना पण सिरियसनेस समजतो की नाही हा प्रश्न आहे. शाळा कॉलेजेस बंद म्हणजे आता सूट्टी असा अर्थ घेतला तर मात्र कठीण आहे.

 2. bhagyashree says:

  reactions chi don toka astat.. ek mhanje seriousness ghyaychach nahi.. niskaLaji rahaycha kinwa atee atee kalji ! tyamule nakki kalatach nahi ki khara kay ahe!
  California la emergency declare keliy.. lets hope yatun lawkar sutka hoil… this is creating panic all over here! 😦

  • भाग्यश्री
   तिथे जेवढं पॅनिक आहे, तितकंच किंबहुन किंचित जास्तंच इथे भारतामधे आहे. प्रत्येकाचं कोणि ना कोणी (कमित कमी ४-५ नातेवाईक ) तिकडे आहेच. काळजी घेणे.. हेच सध्या हातात आहे . कितिही जरी एस्क्ट्रिम वाटली तरिही काळजी घ्यायला काहिच हरकत नाही. कारण एक्स्ट्रा काळजी घेतली तरीही नुकसान कांहीच नाही.

 3. Nitin says:

  भूतकाळ: Economic crisis

  वर्तमानकाळ: स्वाइन फ्लु (Swine crisis म्हणायला हरकत नाही)

  भविष्यकाळ: देव जाणे….
  हा स्वाइन राक्षस भारतात न येवो हीच देवाकडे प्रार्थना!!
  http://www.zbrushcentral.com/zbc/attachment.php?attachmentid=66332

 4. नितिन
  भारतामधे अजुन तरी पोहोचलेला नाही. पण थायलंडला पोहोचला म्हणताहेत..

 5. भारत, आणि इतर एशियाई देशात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट करणे सुरु केले आहे.

  अहो, कसली टेस्ट घेऊन बसलाय? मी परवाच यु.के. वरुन परत आलोय. फ्लाइट लॅंड झाल्यानंतर सर्व प्रवाशांना एका जागी बोलावण्यात/ थांबवण्यात आलं… बरीच मंडळी – “काय घोळ आहे?” याच्याच शोधात होती… अर्ध्या तासानंतर त्यांनी सांगितले की स्वाइन-फ्ल्यु चे टेस्टींग आहे! बरं, ते टेस्टींग सुरु व्हायला तर हवं, काही नाही… सर्वांना प्रश्नावलीची एक – एक फोटोकौपी देण्यात आली ज्यावर तीन प्रश्न होते:
  १. गेल्या १० दिवसांत तुम्ही यु.के., यु.एस. किंवा फ्लु-पिडीत देशातुन आलात का?
  -> हो! नाही कसं म्हणणार – सारेच यु.के. च्या फ्लाइटमधुन उतरले होते!
  २. गेल्या १० दिवसांत, तुम्ही अशा व्यक्तिस भेटलात का?
  -> “अशी” व्यक्ती काय गळ्यात बोर्ड लाऊन फिरते काय? आम्हाला कसं कळणार?
  ३. १. गेल्या १० दिवसांत तुम्हाला सर्दी – खोकला- ताप वगैरे काही आले का?
  -> नाय बा!

  आणि पॅसेंजरचे नाव – पासपोर्ट नं. – फोन नं. ए. माहिती. आणि जा!!
  आता हे काय टेस्टींग झालं??

  भारतामधे अजुन तरी पोहोचलेला नाही. पण थायलंडला पोहोचला म्हणताहेत..

  हे स्वाइन – फ्ल्यु साहेव, भारतात पोहोचलेत… कीमान पाच तरी असे पेशंट सापडल्याचे आजच रात्रीच्या सी.एन्.बी.सी. च्या न्युज मध्ये पाहिलंय!

 6. Pingback: स्वाइन फ्लु.. कोणाला ब्लेम कराल? « काय वाटेल ते….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s