प्रिटीन मदर्स.

परवाच्या पेपरला एक बातमी होती. जयपूरला १२ वर्षाची मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. मला वाचल्याबरोबर धक्काच बसला. कांही दिवसांपूर्वी १३ वर्षाचा मुलगा युके मधे बाप झाल्याचे वाचनात आले होते. तिचं लग्नं पण झालेलं होतं साधारण तिच्याच वयाच्या मुलाशी. तिला बिचारीला अगदी  मुल होई पर्यंत आपण  प्रेग्नंट आहोत हे माहिती नव्हतं आणि जेंव्हा डिलिव्हरीसाठी वेळ आली तेंव्हाच लक्षात आलं. धन्य आहे तिच्या आई बापाची!!!ही बातमी वाचतांना स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? तिला जर मूल १२व्या वर्षी झालं , म्हणजे तिचे यौन संबंध ११ व्या वर्षीच सुरु झालेत. ज्या वयात तिने बाहुलिशी खेळायचं त्या वयात तिला मुलं झालं. राजस्थानात बाल विवाह अजुनही चालतात. तसेच युपी आणि बिहार मधे हरियाणा, आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातही आहेच!

हा प्रश्न केवळ भारतालाच नाही तर संपुर्ण जगालाच छळतो आहे. जगातल्या पुरुष प्रधान संस्कृतिने अजुन ही ह्या संबंधी कायदे होऊ दिलेले नाही तर बाल विवाहामुळे मात्र अजुन ही प्रिटीन्स किंवा टिन एज मदर्सचं प्रमाण खुप प्रमाणात आहे. अंडरडेव्हलप्ड कंट्रिज मधे बाल विवाह, आणि डेव्हलप्ड कंट्रिज मधे प्रि मॅरिशिअल सेक्स,  फार कमी वयात सुरु होणारे डेटींग, किंवा अपरिपक्व वयात पाहिलेले अश्लिल चित्रपट, इंटरनेटवरचे पोर्न साहित्य इत्यादीचे एक्स्पोझर्स मुळे मुलं फार लहान वयात सेक्स ट्रॅप्स मधे ( समवयस्क किंवा वयाने मोठ्या पार्टनर्स ) बळी पडतात. !इटरनेट वर शोध केला असता , अगदी ४०० वर्ष बिसी पासून अशा प्रकारच्या विवाहाला सामाजिक मान्यता दिल्या गेलेली दिसते.

१८७० च्या सुमारास ,८ते ९ वर्षाच्या मुलिंचे लग्न करण पुरातन समाजात सर्व मान्य होतंत्या आधिच्या काळात ७ वर्षाच्या मुलिचे लग्न करुन देण्यात यायचे.. १८६० मधे इंडीयन पिनल कोड मधे सुधारणा केली गेली आणी १० वर्षाखालिल मुली बरोबर यौन संबंध ठेवणे हे कायद्याने गुन्हा मानले गेले.ब्र्ह्मो समाज आणी आर्य समाज ( दोन्ही कलकत्याचे) यांनी पण हा कायदा व्हावा म्हणुन प्रयत्न केले होते ह्या विषयावर कांही निर्णय घेणे हे तत्कालिन ब्रिटीश सरकारला लवकर शक्य झाले नाही. हिंदु पुरातन धर्म वादी लोकांचा याला खुप विरोध होता. तेंव्हा या विषयावर निर्णय न घेउन ,  ब्रिटीश सरकारने पण वेळखाऊ  धोरण  अंगिकारले .

१८८० मधे एका ११ वर्षाच्या मुलीचा (फुलमणी नांव तिचं) तिच्या नवऱ्याने केलेल्या बलात्काराने झालेला मृत्यु, आणि त्या नंतर जवळपास ५०० च्या वर स्त्री डॉक्टर्सनी तत्कालिन व्हॉइस रॉय ला पाठवलेले पत्र, ज्यात लिहिलं होतं की भारतामधे लग्नासाठी आणि यौन संबंध ठेवण्यासाठी लिगल वय हे १४ ते १६ करावे.  पण याचा काहीच परिणाम झाला नाही. फक्त एका नविन विचाराला चालना मात्र मिळाली.

लवकरच हिंदु इन्फॅंट मॅरेज ऍक्ट च्या  विरोधात  मेरठ मधे एका हिंदु माणसाने एक पिटीशन दाखल केले. शेवटी त्याचा निकाल १९२७ मधे लागून हा ऍक्ट पास करण्यात आला.या ऍक्ट नुसार कुठल्याही मुलीचे १२ वर्षा पुर्वी केलेले लग्न हा गुन्हा ठरवण्यात आले होते. हा कायदा करुन सुध्दा चाईल्ड मॅरेजेस सुरु होतेच.स्वातंत्र्या नंतर  १८ वर्ष कमीत कमी लग्नाचे वय म्हणून कायद्याने मान्य झाले.

चाइल्ड मॅरेजेस बरोबरच इन्फॅंट विडॊज चा प्रश्न होताच , पण त्या प्रश्नाला हात घालण्याचा विचार ब्रिटीश लोकांनी केला नाही.म्हाताऱ्या माणसांनी अगदी लहान मुलींशी लग्न करणे हे हिंदु समाजात चालायचे आणि मग लवकरच त्या मुलीच्या नशिबी आलेलं वैधव्य…! अशा पण बऱ्याच इन्फॅंट विधवा होत्या.

बरं , भारतातलं जाउ द्या, अमेरिकेत कायद्या प्रमाणे एखाद्या १६ वर्षाच्या मुलीला आई वडीलांच्या कन्सेंटने लग्न करणे अलाउड आहे. तसे स्वतःच्या मनाने लग्न करायचे असेल तर १८ वर्ष  पुर्ण व्हावी लागतात. अगदी २००८ पर्यंत फंडामेंटल चर्च ऑफ क्राइस्ट ऑफ लॅटर डेट , मुलगी मुलं बेअर करण्याच्या वयाची झाली की करावे असे म्हणत होते.२००८ मधे वॉरन जेफ ह्या चर्च  लिडरला स्टॅचुटरी रेप ( १४ वर्षाची मुलगी आणि १९ वर्षाचा माणुस )यांचा विवाह अरेंज केला म्हणून कोर्टाने शिक्षा केली.

मला वाटतं केवळ म्हणुनच चर्च ने असे विवाह अरेंज करणे बंद केले असावे. टेक्सास मधल्या वाय एफ झेड रॅंच ची केस इथे लिहित नाही. पण वाचा..१७०० एकरार कम्युनिटी फार्म हाउस आहे वर दिलेल्या चर्च च्या मालकीचे.

आफ्रिका, साउथ एशिया, मुस्लिम कंट्रिज जसे सौदी अरेबिया मधे मुलींचे ऍव्हरेज लग्नाचे वय १५ वर्ष असते. बांगला देशात तर जवळपास ५० ट्क्के विवाह हे मुलगी १५ च्या आत असतांनाच होतात. कांही तर अगदी ७ वर्षांच्या मुलींचे पण लग्नं अजुन ही  होतात. आफ्रिकेत कबिल्यांमधे फार जुने रीतिरिवाज  पाळले जातात जसे कॉस्ट पे करणं वगैरे….

childmarriage_fullइतक्या लहान वयात सेक्स्युअल संबंध ठेवले तर सिर्व्हायकल कॅन्सर, एस टी डी,  होऊ शकतो.केवळ ह्याच कारणासाठी का होईना पण असे विवाह बंद करण्यात यावे असे वाटते. आज आपण २१ व्या शतकात आहोत तरीही अशा जुन्या परंपरांना कवटाळून बसलोय, हीच दुर्दैवाची गोष्ट. भारतामधे एक सिरियल सुरु आहे या विषयावर बालिका बधू .. यावर पण मी आधीच लिहिलंय..ह्या सिरियल मधे असेच सगळे ’सिक’ संबंध दाखवलेले आहेत. फक्त अधुन मधुन बाल विवाह हे वाईट आहे म्हणून सांगितले जाते. खरंच काय उद्देश आहे ह्या सिरियल चा हेच कळत नाही. मला तर ती मुलगी अगदी केविलवाणी (पॅथेटीक) वाटते, आणि सिरियल सुरु झाले की सरळ दुसऱ्या खोलीत जाउन बसतो…असे सिरियल्स दाखवून – म्हणायचं समाजात हे होतेच.. आणि अशा गोष्टींना ग्लोरिफाय करणं बंद झालं पाहिजे.

मी ब्लॉग सुरु केला त्याला कारण हे टीव्ही सिरियल.घरची सगळी मंडळी , म्हणजे सौ. आणि मुली ही सिरियल चवीने पहातात, तेंव्हा मला इतर काही उद्योग नसतो, म्हणुन तेंव्हा ब्लॉगवर लिहितो. अशी सिरियल्स ताबडतोब बंद करायला हवी.

बरं लहान गावातल जा्वू द्या. पण मुंबई सारख्या शहरात पण आजही १५ वर्षांच्या मुलींचं लग्न अगदी नेहेमीच होतात स्ल्म्स मधे. जवळपास ५० टक्के लग्नं या वयात केली जातात.२२००० मुलिंचा (२० ते २२ मधल्या )केला असता त्या पैकी ४५ टक्के मुलींचं लग्नं १५ वर्षांच्या आत झालेली दिसली. हे वाचुन तर मला अगदी धक्काच बसला. जर मुंबई मधे असं होऊ शकतं तर  मग लहान गावांत काय परिस्थिती असेल याचा विचार करुनच वाईट वाट्त. अगदी सुशिक्षित लोकंच फक्त लग्नासंबंधीचे कायदे पाळतात असे दिसते. म्हणजे बघा.. इंजिनिअरिंग, किंवा मेडीकल पुर्ण होई पर्यंत २२-२३ वय होतंच.. आणि नंतरच लग्नं केली जातात या क्लास मधल्या लोकांची. प्रॉब्लेम फक्त खालच्या लोकांचा आहे. त्यांच्या मधे अवेअरनेस   आणला गेला पाहिजे.

भारतात एक म्हण आहे.. “म्हातारा नवरा अन कुंकाला आधार”.. एखाद्या स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू असेल तर समाजाचा तिच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. बऱ्याच पालकांना मुलींच्या सेफ्टीची काळजी असते. म्हणुन सुध्दा लवकर लग्नं करुन दिली जातात. मुंबईला २८ टक्के लग्नं अंडरएज मुलींची होतात .आता समाजात    सेफ्टी करता जर मुंबई सारख्या शहरात पण लग्नं होत असतील तर मात्र खरंच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.

अजुनही जगा मधे स्त्री कडे एक उपभोगाची वस्तु पहाण्याची मानसिकता दिसून येते. मुस्लिम राष्ट्रांमधे तर हा प्रकार अजुन ही लिगली जोर धरुन आहे.. किंबहुना इतर धर्मांपेक्षा  खुप च जास्तं…हा प्रॉब्लेम केवळ भारतातील स्त्रियांचा   नाही तर जगातील स्त्रियांचा आहे.आणि हा एका वेगळ्या लेव्हलला ऍड्रेस केला जायला हवा…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

4 Responses to प्रिटीन मदर्स.

 1. Salil says:

  Tumachyaa pramaanech me blog suru karanyaache dekhil serials hech kaaran aahe.
  velechaa itakaa apavyay paahun vaait vaatate.

  Tumachaa blog khup maahitipurna aahe.

  Salil Chaudhary
  http://www.netbhet.com

 2. princess says:

  अरेरे… कित्ती मुलींच बालपण हरवतय :(. पण हल्ली भारतात बालविवाहाच प्रमाण कमी झालय असे वाटते. तरीही मुली लहान वयात आई बनताय, त्याच कारण अज्ञान आणि आई वडिल आणि मुलांमध्ये असलेली एक भिंत ज्यामुळे मोकळेपणी बोलणे होत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s