हे काय आता नवीन?? नाही, नवीन नाही हे.. तसं २२ मार्च पासूनच सुरु आहे. पण ह्या ज्यु लोकांनी असं केलं म्हणून याचा जास्त गाजावाजा झाला नाही. हेच काम जर पॅलेस्टेनियन्सनी केलं असतं तर त्याचा खूप गाजावाजा झाला असता.
हिटलर मुळे ज्यु लोकांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच आपल्या सगळ्यांच्या मनात.. हिटलरने त्यांचा छळ केला म्हणून. हे जरी खरं असलं, तरी आता गाझा पट्टिमधे ते जे करताहेत त्याला काय म्हणायचं??
असो, विषय तो नाही. ह्याच ज्यु लोकांच्या आर्मीने कांही टी शर्ट्स तयार केलेले आहेत. त्यावरचे जे स्लोगन्स छापले आहेत ते वाचले तर वाटेल, की हिटलरने शिल्लक ठेवलेले(ज्यांच्या पुर्वजांनी छळछावण्या पाहिल्या आहेत ते ज्यु) असे का झालेत? खरं तर यांची मेंटॅलिटी अशी व्हायला काहीच कारण नाही.. पण हेट्रेड.. मुळे डॊळ्यावरचा पडदा जुनं सगळं विसरायला लावतो.वर्षानुवर्ष फेस कराव्या लागलेल्या व्हॉयल्न्स मुळे हे लोकं वेडे झाले आहेत. आणि केवळ ह्याच कारणासाठी त्यांनी कांही कुटूंबांवर अटॅक केला होता ऑपरेशन डेड कास्ट च्या अंतर्गत.
कांही दिवसांपूर्वी जे टी शर्ट्स आर्मी ने काढले त्यांच्यावरचे स्लोगन्स इथे खाली देतोय..
१) एक प्रेग्नंट स्त्री दाखवली आहे – अर्थात बुरखाधारी, आणि तिच्यावर गनची क्रॉस वायर रोखलेली आहे. खाली लिहिलंय .. वन शॉट टु किल्स!!
२)दुसऱ्या एका चित्रा मधे एक पॅलेस्टाइन बेबी मेलेली आहे, तिचा टेडी बिअर शेजारी पडलाय अन आई रडते आहे. सोबत कॅंपेन आहे.. “बेटर युझ ड्युरेक्स..”
३)ऑपरेशन कास्ट लिड नंतर लगेच , त्या बटालियनच्या लोकांनी टी शर्ट्स प्रिंट करुन घेतलेत.. ज्या मधे …पॅलेस्टेनियन प्रेसिडॆंटला एक व्हल्चर सेक्स्युअली पेनिट्रेट करतांना दाखवलंय.
४)अ ग्रॅज्युएशन नावाचा एक टी शर्ट आहे ज्या मधे एक पॅलेस्टेनियन बेबी ग्रो होतांना दाखवली आहे. अगदी इन्फॅंट ते टिन एजर.. आणी पुढे अजुन लिहिलंय..” नो मॅटर हाउ ईट बिगिन्स वी विल पुट द एंड टु इट,
५) लाव्ही बटालियनने एक टी शर्ट काढलाय,त्या मधे दाखवलंय की एक पॅलेस्टीनियन स्त्री जखमी अवस्थेमध्ये पडलेली आहे, आणि एक स्लोगन.. “बेट यु आर रेप्ड”
६)एका बटालियनने प्रिंट करुन घेतलाय टि शर्ट.. ज्यात लिहिलंय लेट एव्हरी अरब वुमन नो हर सन्स फेट इज इन माय हॅंड्स..
७)कॅरमॉन टीम ने एक प्रिंट करुन घेतला होता, त्यात लिहिलं होतं..यु गॉट टु रन फास्ट बिफोर इट्स ओव्हर.. खाली एक चित्र होतं अरब महिला ग्रेव्ह समोर रडते आहे… त्या खाली लिहिलं होतं आफ्टरवर्ड दे क्राय.. दे क्राय..
८)ऑपरेशन कास्ट लिड ने अजुन एक टी शर्ट प्रिंट करुन घेतला होता, त्यात एक इस्रायली सोल्जर दाखवला होता, आणि खाली लिहिलं होतं.. इफ यु बिलिव्ह इट कॅन बि फिक्स्ड.. देन बिलिव्ह, इट कॅन बी डीस्ट्रॉईड..
असे टी शर्ट्स प्रिंट करण्यापुर्वी आर्मी मधे कुणाची तरी परमिशन लागतच असेल.. पण हे टी शर्ट्स इस्रायली लोकांची मेंटॅलिटी दाखवतात. ह्या मधे मला तरी काही फनी वाटत नाही.
स्त्रियांचा खून , बलात्कार, आणि इनफॅंट्सचा पण खून करा असा संदेश देणारे हे असे टी शर्ट्स वापरणे म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे . इस्रायली लोकांना मिळणारा ईंटरनॅशनल प्रेसचा पाठींबा तसाही कमीच होत आहे. आणि अशा उद्योगांमुळे नक्कीच संपेल असं वाटतं.. शेम ऑन द ब्लडी इस्रायलिज..
हॉरीबल!
भयंकर आहे हे सगळं….
अरे देवा!!! काही लोकांच्या मनातले क्रोर्य कधीतरी संपेल का?