चायनिज वे टु हॅंडल रेसेशन..

स्थळ :- चायना..

प्रोव्हिन्स :- ह्युबेई.. सेंट्रल चायना…!

smokeइथे एका सरकारी अधिकाऱ्याने  एक सरक्युलर इशु केलंय.. की प्रत्येकाने आपापला स्मोकींग चा कोटा कुठल्याही परिस्थितीत रोज पुर्ण केलाच पाहिजे. म्हणजे काय तर तुम्ही दररोज दोन पाकिटं सिगरेट्स ओढणे हे आवश्यक आहे .तुम्हाला काय वाटतंय मी चेष्टा करतोय ?? दुर्दैवाने तसं नाही. मी अगदी सिरियसली हे पोस्ट लिहितोय..

बरं आणि ब्रॅंड कुठला? तर त्या प्रोव्हिन्स मधे तयार झालेला. दुसऱ्या प्रोव्हिन्समधला ब्रॅंड जर कोणी स्मोक करताना आढळला तर , त्याला फाईन करण्यात येइल.. असंही डिक्लिअर केलंय.२३०००० पॅकेट्स ज्यांची किंमत ४ लाख पाउंड्स आहे ( लॅपटॉप च्या की बोर्ड वर   पाउंडाचं साइन नाही ) सिगारेट्स फुंकुन टाकण्याचे ’आदेश’देण्यात आलेले आहेत.बराच स्टॉक बिल्ड अप झालाय  सेल कमी झाल्या मुळे ,त्या फॅक्ट्री मधे. हा स्टॉक खपे पर्यंत नवीन प्रॉडक्शन बंद होईल म्हणून हा स्टॉक संपवणे अतिशय गरजेचे आहे..म्हणून ही ऍक्शन..

हे असं केल्यामुळे सिगारेट वरचा टॅक्स जमा होईल खजिन्यात.या व्यतिरिक्त सिगारेट्स ओढण्याचे इतर फायदे म्हणजे त्या फॅक्ट्रीतला सगळा स्टॉक संपेल आणि लोकांना पण काम मिळेल. म्हणजेच काय तुमच्या सिगरेट्स ओढण्याने एकॉनॉमी ला मदत मिळेल म्हणुन सिगरेट ओढणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे असे समजून सिगरेट्स ओढा असा फतवा काढला आहे.

सिगरेट ओढल्याने डॉक्टर्स ला काम मिळेल. औषधी खपतील,आणि त्यामुळे इतर बऱ्याच इंडस्ट्रिज चालतील म्हणून–(???)   😀 असे अनेक फायदे नजरेसमोर ठेवून हा निर्णय घेतला असावा असे मला माझ्या अल्प मती प्रमाणे वाटते.

शिक्षकाने लोक जागृती करणे अपेक्षित असते.  त्यासाठी त्या शिक्षकाला चांगल्या सवई असणे आवश्यक आहे. कल्पना करा एक बेवडा शिक्षक , दारु पिणे वाईट असे म्हणून त्यावर लेक्चर देईल तर त्याचं को ऐकेल कां? अर्थात नाही.चायना मधे लोकल शाळांमधे पण टीचर्सला स्मोकिंग कोटा देण्यात आलेला आहे. म्हणजे आता शिक्षक कॊटा पुर्ण करायचा म्हणून वर्गात पण शिकवतांना करंगळी आणि शेजारचं बोटं ह्यामधे सिगारेट धरुन खोल झुरका मारत खॉक खॉक करत शिकवणार तर…! कधी खोकला वगैरे झाला, आणि त्यामुळे सिगरेट स्मोकिंग करता आलं नाही तर मग वर्गातल्या मुलांना सिगरेट ओढायला देतील का शिक्षक?? काही कळत नाही..

बरं एवढं करुन सरकार थांबलं कां? नाही.. एका गावात त्यांनी  ४०० कार्टन सिगारेट्सचा कोटा विकत घेण्यास सांगण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्ही सिगारेट्स घ्या , ओढा, म्हणजे गावातील सिगरेट फॅक्टरी चालतील. असाच नियम जर दारुच्या फॅक्टरिला पण लागू केला तर काय होईल?? काय होईल म्हणजे काय.. सगळे चिंगु लोकं बेवडे…. ! रोज टल्ली होऊन घरी येतील, बायकोला मारहाण करतील, मग पोलिसांना पण काम मिळेल, एखादा माणुस आपल्या बायकोचं डॊकं फोडेल, म्हणून डॉक्टरला पण काम मिळेल, पोलीस येतील.. त्यांना पण काम मिळेल.. आणि एकॉनॉमी हेल्दी होईल चायनाची… हा हा हा!!  एड्स वरचं औषध खपाव आणि ती फॅक्टरी चालावी म्हणून चायना सरकार काय लोकांना बाहेरख्याली  पणा करायला सांगणार आहे का?

चायना गव्हर्नमेंटने भरपुर खर्च करा अशी ऑर्डर काढली आहेत, अशा ऑर्डर  मुळे एकॉनॉमी फ्लरिश होईल. हे जरी खरं असलं तरीही अशा विक एकॉनोमी मधे पैसा असायला हवा ना खर्चायला!

चायना मधल्या ३५० मिलियन स्मोकर्स  पैकी १० लाख  दर वर्षी मरतात. सरकारला त्याचं काही नाही.. मरताहेत तर मरु देत..सरकारला पण असं वाटत असणार.. की बरं आहे.. लोकसंख्या कमी होते.. इथे पण किती फायदा आहे बघा.. लोकं मेल्यामुळे अंत्येष्टी करणाऱ्यांना काम मिळते. आणि ऍकॉनॉमी स्ट्रॉंग होण्यास मदत होते.
बरं इतर प्रोव्हेन्स मधे तयार झालेल्या सिगारेट्स ओढणे हा पण एक गुन्हा समजला जातोय.एका शिक्षकाकडे  स्पेशल टास्क फोर्स ने रेड केली असता त्याच्या कडे ऍश ट्रे मधे  दुसऱ्या ब्रॅंडच्या सिगारेट्सचे बट्स सापडले, म्हणून त्याला फाइन करण्यात आला.

माझ्या लहान पणी एक विचित्र विश्व नावाचं मासिक यायचं त्यातल्या रम्य आणि चमत्कारिक कथा प्रमाणे ही कथा वाटते की नाही?? आणि हे जे वर लिहिलंय ते सगळं खरं आहे टेलिग्राफ मधे न्युज आर्टिकल होतं यावर!खरंच मी ही बातमी जेंव्हा वाचली तेंव्हा तर अगदी आवाक झालो होतो..  ह्या कम्युनिस्टांचं काही समजत नाही मला तरी…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to चायनिज वे टु हॅंडल रेसेशन..

 1. China tere Khel nyare.

 2. Sonal, Asha
  Thanks for the comments.. Sonal more details are given in telegraph..

 3. Nitin says:

  Hyancha kaahi nem naahi!!

  East or west??
  India is best!!

 4. bhaanasa says:

  अरे हे चिंकू इतके वेडे आहेत ना. तेच करू जाणे हे उद्योग.

 5. Sonal says:

  ती सिगरेट बघून काय वाटते माहितेय? की चाइना सरकार आपल्याच जनतेला पायाखाली चिरडून त्यांच्या आयुष्याची राख करते आहे.

  • खरंच.. नशिबाने तसली कांही सवय नाही.. हे तरी बरंय.. पण अगदी राग येण्यासारखं बिहेवियर आहे चायना सरकारचं..प्रतिक्रिये बद्दल आभार..

 6. Pingback: सेक्स पार्क.. चायना -चायना गोज क्रेझी.. « काय वाट्टेल ते…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s