आय पी एल प्लेअरचा ब्लॉग (फेक )

cricket312एक ब्लॉग शोधला आज, संपुर्ण क्रिकेटला कव्हर करणारा . जर तुम्ही आय पी एल चे फॅन असाल तर ह्या ब्लॉगला व्हिजिट देणे मस्ट आहे.. ज्या माणसाचा ब्लॉग आहे त्या माणसाने वेड लावलंय लोकांना.कित्येक हजार लोकं हा ब्लॉग अगदी वेड्यासरखा फॉलो करताहेत.आता मी स्वतः क्रिकेट फॉलो करित नाही, पण जर टिव्ही सुरु केला आणि समोर मॅच दिसली तर मला ऍलर्जी आहे असं पण नाही. मी पहातो मॅच.. असो..

हा ब्लॉग बनवलाय एका आयपीएल क्रिकेटर नी ( -असं म्हणतात!) म्हणजे तो स्वतः ब्लॉगर असं म्हणतो, की तो आयपीएल प्लेअर आहे म्हणून… अर्थात माझ्या मते ते खरं असण्याची शक्यता फारच कमी आहे.

या ब्लॉगचे फॉलोअर्स आहेत ५१७२ … इतके??  .. खरंच आहेत हो.. चेक करा ना.. आपण भारतिय क्रिकेटसाठी कसे वेडे आहोत हे जग जाणतंच नां शेवटी?)प्रत्येक पोस्ट वर ५०० च्या वर कॉमेंट्स आहेत . म्हणजे काय, तर ब्लॉग वर बेस्ट टाइम पास आहे.. 🙂

मी त्याचे सगळेपोस्ट वाचले नाहीत. पण जे कांही वाचले, ते मला तरी एखाद्या क्रिकेटर चे वाटले नाहीत. हा ब्लॉग सुरु झालाय अगदी आय पी एल सोबत. आणि आजपर्यंत प्रोफाइल व्हिजिटर्स आहे ७५००० च्या वर! परवा बातम्या पहातांना या ब्लॉग चा उल्लेख आला होता, म्हणून मी हा ब्लॉग शोधून काढला. आता क्रिकेट इंथ्युझियास्ट लोकांच्या साठी इथे लिंक पोस्ट करतोय. इंटरेस्टेड असाल तर जरुर चेक करा … चांगला ब्लॉग आहे क्रिकेटला वाहिलेला.

हा फेक प्लेअर असं म्हणतो, की मी स्वतः प्लेअर आहे, आणि आफ्रिकेतुन हे सगळे पोस्ट करतोय. मला तरी हे जे लिखाण आहे ते एकाही प्लेअरचे वाटत नाही. कारण इंग्रजी खुपच स्वच्छ आहे, आणि आपल्या प्लेअर्सचं इग्लिश कसं आहे हे आपण जाणतोच. मला असं वाटतं की हा ब्लॉगर एक रेग्युलर पत्रकार असावा.. !त्या शिवाय इतकं चांगलं लिहूच शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्लेअर्सला खेळल्यावर इतका वेळ मिळणं शक्यच नाही, की तो हे सगळं लिहू शकेल.. असो.. तुम्हीच चेक करा ह्या फेक प्लेअर चे व्ह्युज… एक हॅपनिंग इव्हेंट म्हणुन हा ब्लॉग फॉलो करायला हरकत नाही. मस्त ब्लॉग आहे..

बाय द वे , शाहरुख ची मस्त वाजवली आहे या ब्लॉगवर…. !

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , , . Bookmark the permalink.

6 Responses to आय पी एल प्लेअरचा ब्लॉग (फेक )

 1. अनिकेत says:

  सांगु शकत नाही असु ही शकेल खरंच एखाद्याचा. म्हणजे न्युझीलंडचा बॉलर ‘इयान ऑब्रियन’ हा सुध्दा एक ब्लॉगर आहे. जेंव्हा भारत न्युझीलंड दौऱ्यावर होता तेंव्हा मी त्याचा ब्लॉग फॉलो करत होतो. मजा यायची वाचायला. सेहवाग ने त्यांची कशी वाजवली, त्यांच्या योजना काय होत्या आणि ते प्लॉप कसे झाले, ड्रेसींग रुम मधील वातावरणे हे सगळे मोकळेपणाने त्याने मांडले आहे. तो सुध्दा मॅच संपल्यावर ब्लॉग करायचा. आणि आजकाल ब्लॉगींग काय मोबाइलवरुन सुद्धा करता येते.. सो.. सांगता येत नाही.

  इयानच्या ब्लॉगचा पत्ता: http://iainobrien.blogspot.com/

 2. Vikrant says:

  Yeah…..I am following fake player’s blog from quiet some time. Its funny & rib-tickling. I can’t say whether its written by KKR player or by somebody else. There was a rumor that the author is Randip Bose – ex KKR player & now in Kings XI Punjab !!!
  Anyway, I enjoy reading that.
  I also have a strong doubt that Saurav Ganguly is doing this with the help of either soem journalist or some young bangla player or both. We have seen earlir also that he is very very sarcastic & egoistic.
  Majja yete vachtana….u get to know all inside stuff – if it is to be believed 🙂 🙂
  And rahili goshta SRK chi – This money chaser deserves such bashing !!! All teh best to him for selling off KKR 😛 😛

 3. अनिकेत,विक्रांत,
  एखादा भारताबाहेरचा क्रिकेटिअर असु शकतो. पण सौरव गांगुली मला तरी वाटंत नाही. बाबू मोशाय चं इंग्लिश इतकं सुबक असुच शकत नाही असं मला वाटतं.. एखादा जर्नॅलिस्ट पण असु शकतो. पण जो कॊणि तो आहे .. तो बाकी ग्रेट माणुस आहे यात शंकाच नाही. माझ्या सारख्या फारशी क्रिकेटची आवड नसलेल्याने पण त्या ब्लॉगवर २ तास घालवले. ब्लॉग खरंच छान आहे..
  एस आर के ला माझ्या ब्लॉगवर पण वाजवला होता..

 4. माझ्या ब्लॉग वरचा शाहरुख वरचा लेख.. इथे आहे.

  http://tinyurl.com/cf6kmk

 5. मी सगळ्या पोस्ट्स वाचल्या आहेत या ब्लॉगरच्या. भन्नाट ब्लॉग होता तो. आणि प्रचंड लोकप्रियपण! आणि जसजशी स्पर्धा रंगत गेली तसतशी या ब्लॉगरची लोकप्रियता वाढत गेली. २६ एप्रिल या एका दिवसात जवळजवळ दीड लाख लोकांनी त्या ब्लॉगला भेट दिली होती! यावर्षी या fakeiplplayer चं एक पुस्तकपण प्रकाशित झालं The Gamechangers नावाचं. आणि आता हा माणूस कोण आहे तेही उघड झालं आहे. अर्थात तो स्वतःहूनच बाहेर आला. पण ब्लॉग बाकी मस्तच होता त्याचा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s