लग्नापुर्वीची ..

आता ऑफिशियली लग्न ठरलं होतं. सौ. ला अगदी लहानपणापासूनच ऒळखत असल्यामुळे, (आणि ती माझ्या लहान बहिणीची मैत्रिण असल्यामुळे) किंवा तिचे आईबाबा मला लहानपणापासून ओळखीत असल्यामुळे त्यामुळे बाहेर कितीही वेळ फिरायला गेलं तरीही कोणीच ऑब्जेक्ट करत नसे. माझ्यावर फारच विश्वास होता त्यांचा, आता त्या विश्वासाला मी पात्र होतो की नाही तो प्रश्न निराळा.  🙂

तर साधारण १९८७ चा काळ. हिरो होंडा जस्ट लॉंच झाली होती. पण मी मात्र आपली गुड ओल्ड फेथफुल येझ्दी वापरत होतो. टिपिकल बॅचलर्स बाइक होती ती. सायलेंसर्स मधल्या ट्युब्ज काढुन टाकल्यामुळे एक वेगळीच ह्रिदम ऐकु यायची. मागचा स्टे बार, (सिटच्या मागचा धरण्यासाठी वापरायचा) काढून टाकला होता मुद्दाम.. :). त्या मुळे सौ. मागे बसली की घाबरायची अन घट्ट धरुन बसायची 🙂

बरं ते असु दे.. युजवली संध्याकाळी माझं ऑफिस संपल्यावरच मी आधी तिच्या घरी जाउन तिला घेउन मग बाहेर निघत असे. नागपुरला बरेच नाते वाइक आहेत, त्या मुळे अगदी कुठल्याही भागात गेलं तरीही कोणीतरी भेटायचंच.. शक्यतो कुठल्याही नातेवाइकाकडे जाण्यापेक्षा एखाद्या बागेत जाउन बसणं आवडायचं त्या मुळे बाईकवरून जातांना सगळ्या नातेवाईकांना चुकवून पळायचं हे पण एक मोठ्ठं काम होतं.

नागपुरला पाव भाजी मिळणं नुकतंच म्हणजे फार तर २-३ वर्षांपासूनच सुरु झालं होतं.त्यामुळे पाव भाजी खाणं हा एक इव्हेंट असायचा बऱ्याच लोकांच्या बाबतित. फॅमिली हॉटेलिंग म्हणजे एखाद्या साउथ ईंडीयन रेस्टॉरंट मधे जाउन इडली, दोसा खाणं इतकंच असायचं !

एक निलम नावाचं हॉटेल होतं सदरला लिबर्टी समोर. तो आमचा  नेहेमीचा जॉइंट. सौ. ला पाव भाजी   आवडायची म्हणून ते हॉटेल आवडीचे होत ,जास्तीत जास्त वेळा त्याच हॉटेलमधे जाणं व्हायचं.

एक दुसरं हॉटेल होतं निडोज नावाचं.. बर्डीवर. त्या हॉटेल मधे वरच्या मजल्यावर पण संध्याकाळच्या वेळेस कोणीच नसायचं . तिथला वरच्या मजल्यावरचा वेटर पण ओळखीचा झाला होता. गेल्या बरोब्बर आधी सॅलुट मारायचा — कारण विचारता होय का म्हणून ते??? अहो, तिथे गेलो की आधी त्या वेटरच्या हातात ५ ची नोट द्यायची आणि त्याला सांगावयाचे की दोन ज्युस आधे घंटे के बाद..  🙂

नागपुरला नवीनच चायनिझ फुडचं फॅड निघालं होतं. चायनिज खायला जाणं म्हणजे एकदम कुल समजलं जायचं.बऱ्याच लोकांना फारशी टेस्ट पण आवडत नव्हती पण तरीही जबरदस्तीने लोकं  चायनिज ट्राय करायचे.पण मला मात्र अगदी मनापासून आवडायचं चाइनिज!

अगदी याच काळात एक फक्त चायनिझ ला वाहिलेलं हॉटेल ’वॉक इन’ नावाचं उघडलं होतं सरोज टॉकिज च्या जवळच.. सौ. ला एकदा म्हट्लं की चल आज त्या हॉटेलला जाू– तर थोडी काच कुच करतच हो म्हणाली.तिची बॉडी लॅंग्वेज  बघुन मला तरी कळलं नाही, की तिची इच्छा नाही ते..

शेवटी एकदाचं त्या ’वॉक इन’ हॉटेल समोर बाइक पार्क केली, आणि आत शिरलो. ऍम्बियन्स एकदम वेगळाच होता. सौ. शुध्द शाकाहारी ( अजूनही आहे बरं का.. अगदी एग्ज पण खात नाही) त्यामुळे फिश फ्रायचा वास आणि इतर चायनिज नॉन व्हेज चा  ’मस्त सुगंध’ ( सौ. च्या म्हणण्याप्रमाणे घाणेरडा वास 🙂 ) तिथे भरलेला होता. नुसतं त्या सुगंधानेच भूक चाळवली गेली होती. सौ. सोबत होती म्हणुन  प्युअर व्हेज  ( अजूनही आठवतंय काय ऑर्डर केलं होतं ते) जिंजर व्हेज , व्हेज हक्का नुडल्स आणि फ्राईड राइस मागवला होता. तिने थोडं चिवड चावड केलं .. आणि उगाच खाल्ल्यासारखं केलं.. मी मात्र व्यवस्थित जेवलो. शेवटी आइस्क्रिम खाऊन बाहेर पडलो. संपुर्ण तृप्त होऊन बाहेर पडलो होतो मी. बाइक सुरु केली.. सौ. मागे बसली.. आणि आम्ही निघालो.

थोडं पुढे गेलो.. सिग्नलला बाइक उभी केली ,आणि सौ. हळुच कानाशी कुजबुजली.. आपण आता पावभाजी खाऊ या का? मी तर बाइकवरुन ताडकन उडालोच. म्हट्लं अगं आत्ताच जेवण झालं ना.. तर म्हणते, मला अजिबात आवडलं नाही.. मला वाटतं तिची फिश च्या वासानेच खाण्याची अर्धी इच्छा गेली असेल.)अशा तऱ्हेने आमचं पहिलं चायनिज  जेवण झालं . आम्ही मग दुसऱ्या हॉटेलला जाउन पाव भाजी खाल्ली, आणि तिला घरी सोडलं.

अधूनमधून आम्ही बर्डीवरच्या हॉटेल नैवेद्यम मधे जायचो. तेंव्हा ते अगदी नवीनच उघडलेले होते, त्यामुळे जरा चांगलं हॉटेल होतं ते. मी नागपुरला एकटाच रहात असल्यामुळे ( वडिल गव्हर्नमेंट कॉलेज मधे प्रिन्सिपॉल होते यवतमाळला) सारखं बाहेरच जेवण असायचं आणि सगळ्या हॉटेल्स  मधे चांगलं काय मिळतं ते माहिती होत तस माझं फेवरेट म्हणजे कांशिनाथ सावजी, पण त्या ठिकाणी सौ. ला नेणं शक्य नव्हतं.

तसं आम्ही दोघंही  ( मी आणि सौ. ) अगदी मध्यमवर्गीय परिवारातले , त्यामुळे हॉटेलिंग हा गुन्हाच समजला जायचा. तरी पण आता लग्न ठरलं होतंच , त्यामुळे आम्हाला दोघांनाही कोणीच कांही म्हणत नव्हतं.

तर त्या नैवेद्यम मधे आम्ही आधी पण गेलॊ होतो, पण तिथे गेल्यावर युजवली पंजाबी चांगलं मिळतं म्हणून पंजाबिच ऑर्डर केल्या जायचं. सिझलर्स हा प्रकार अगदी नवीनच सुरु झाला होता त्या काळी. प्रत्येक हॉटेलचं सिझलर अगदी वेगळं असायचं. अशोका मधे राइस बेस +कटलेट + फ्राईड व्हेज असं कॉंबो असायचं तर नैवेद्यम ला कटलेट बेस असायचा + व्हेज वगैरे…

एक दिवस नैवेद्यम ला सौ. ने विचारलं की ती कसली डीश आहे? तर म्हंटलं थांब , ऑर्डर करु.. पण नंतर पाव भाजी मिळणार नाही 🙂 .. आणि शेवटी ते सिझलर्स आमच्या समोर आणून ठेवलं त्यातुन निघणारा धुर अगदी मनसोक्त श्वासात भरुन घेतल्यावर एकदाचं खाणं सुरु केलं. इतकी मोठी डिश होती ती की संपल्या संपत नव्हती. शेवटी एकदाची संपवली..  ती ’तव्यावरची डीश’ ! हे नांव सौ. ने दिलं होतं त्या डिश ला. अगदी अजूनही सिझलर्स ला आम्ही खायला म्हणून ’योको’ मधे जरी गेलो तरी त्याला आपापसात बोलतांना तव्यावरची डिशच म्हणतो.

रात्री खाणं फिरणं सगळं झालं की मग सौ. ला तिच्या घरी सोडायला जायचो. तिथे थोडावेळ बसून सगळ्यांशी बोलल्यावर निघाल्यावर , सौ. बाहेर सोडायला यायची. मग तिथे पण , म्हणजे रस्त्यावर पुन्हा रात्री ११ ते १२ पर्यंत गप्पा सुरु असायच्या. मग घरातुन आवाज यायचे, खिडक्या बंद व्हायच्या जोरात.. 🙂 आणि मग ती घरात जायची..

तुम्हाला वर लिहिलेलं सगळं अगदी “यात काय विशेष?” असं वाटत असेल.२२ वर्षा पूर्वीचा काळ होता तो..! पण त्या का्ळी हे सगळं करणं म्हणजे अगदी कुल समजलं जायचं..आणि  मध्यमवर्गियांना या सगळ्या गोष्टी म्हणजे   अगदी स्वप्नवत वाटायच्या…. खरं सांगतो.. सौ. ला अगदी ऍलिस इन वंडर्लॅंड मधल्या ऍलिस सारखं वाटायचं.जाऊ दे .. तुम्हाला यातली गम्मत नाही कळणार.. पुढची गोष्ट नंतर कधी तरी..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

17 Responses to लग्नापुर्वीची ..

 1. abhijit says:

  महेंद्र खूप विशेष आहे. आय एम जेलस !! तुम्ही खूप लकी आहात. (होता :))! एवढं फिरायला मिळणं म्हणजे खरंच भाग्य. ते दिवस मस्त असतात. २००९ मध्ये पण आमच्या भाग्यात ते नाही !:(

 2. sahajach says:

  गंमत का नाही कळणार…मुळात लव्ह मॅरेज करणाऱ्या आणि खरच प्रेम करु शकणाऱ्या प्रत्येक माणसाला हा साधा वाटणारा लेख नक्कीच आवडेल..जसा मला आवडला…………तुम्हा दोघांना मनापासुन शुभेच्छा…लग्नात नाही देउ शकले..म्हणुन आत्ता.. सौ लाही सांगा!!!
  हो आता आमच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळी होती मी नौकरी साठी तिथे गेले होते आणि ते नवऱ्याचे गाव होते त्यामुळे रात्री रस्त्यावरच्या गप्पा वरद गणेश मंदिरात होत आणि घरी (रुमवर ) आल्यावर मैत्रीण ओरडायची झोप ग आता…बाकी तर सगळं सेमच असतं..हो ना!!!!

 3. अभिजित, तन्वी
  हे पोस्ट टाकतांना जरा विचारच केला होता पोस्ट करु की नको म्हणुन. बरंच लिमिटेशन्स येतात लिहितांना.. पण तुम्हाला लिहिलेलं आवडलं.. हे वाचुन बरं वाटलं… धन्यवाद…

  बाय द वे तन्वी, अजुनही घरी सौ. ला माहिती नाहित माझे हे ब्लॉग लिहिण्याचे उद्योग.. 🙂

 4. Deepak says:

  फारच मस्त आहे हे पण तुम्ही ब्लॉग लिहिता हे का दडवून ठेवलय आत्तापर्यंत? 😉

  • खरं सांगायचं तर भिती वाटते ती क्रिटिसाइझ करेल म्हणुन.. 🙂 ती स्वतः सध्या मराठी चरित्र कोष ( १४ व्हॉल्युम्स , ६०० पानांचे) निर्मितीचं काम पहाते आहे नां.. म्हणुन तिचं मराठी थोडं वरच्या लेव्हलंचं आहे माझ्या पेक्षा..आणि ती लिहिते पण चांगलं – म्हणुन..
   थोडक्यात अगदी खरं सांगतो.. म्हणजे मेल इगो हो.. म्हणुन तिला सांगितलं नाही अजुन.. 🙂

 5. bhagyashree says:

  gammat kalali!! 🙂
  cute zalay post!!

 6. Thanks Bhaygayashree.. 🙂

 7. bhaanasa says:

  tumche ani aamche lagna javalpaas ekach velache aahe. tyamule kaalashi relate hone sahaj aahe. Ani hya gamati jamati aamhihi kelyat. aathavani punha tajya zalya.

 8. Vinay Garge says:

  खूप छान लिहिले आहे. प्रेमात पडलेल्याची गम्मत प्रेमात पडलेल्यालाच कळते. तुम्ही काय गम्मत जम्मत केली हे मी समजू शकतो थोडे थोडे ….
  बाकी ‘पोस्ट’ एकदम मस्त. असेच लिहित जावा मला आवडते.

 9. भानसा
  शक्य आहे, म्हणुनच तुम्ही त्या काळाशी कोरिलेट करु शकता.

  विनय
  धन्यवाद.. आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या बद्दल.. 🙂 आणि तुमच्या कॉमेंट वरुन मी पण समजु शकतो, की तुम्ही पण आमच्याच कुळातले… 🙂

 10. xyz says:

  kay rao nusat khanya baddalach lihilay… asss watun rahil ki… hotel madhe kamala hota ki kay….. ajun kay kay kela te sang na rao…

 11. बाय द वे, तुमच्या दिल्लीला तुम्ही जे करता तेच मी केलं बरं कां.. आणि मित्रा, जरी तुमचं खरं नाव दिलं नाहित तरिही तुमचा पत्ता लागु शकतो.. कशाला उगिच एक्स वाय झेड नावाने कॉमेंट टाकता? खऱ्या नावाने टाका की..

 12. एक वर्ष जुनी पोस्ट आता वाचतोय…
  सुंदर आणि रोमॅंटिक बर..सही है 🙂

 13. छान आहे लेख. एकदम रोमँटिक. 🙂 (म्हणजे असावा. आपल्याला काही अनुभव नाही अजून प्रेमात पडण्याचा किंवा लग्न होण्याचा. त्यामुळे रोमँटिक म्हणजे नक्की काय ते इतरांच्या अनुभवावरूनच ठरवावं लागतं अजून… ;-))

 14. Shweta Nare says:

  कुठेतरी वाचलेलं , नक्की आठवत नाही कि, love marriage असो वा arranged marriage प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा आणि मनाला गुदगुल्या करणारा तो सुखाचा काळ म्हणजे engagement आणि लग्नातला मिड period … साठी उलटलेली व्यक्ती असो वा नवविवाहित ह्या काळातल्या आठवणी सांगताना काही वेगळेच तेज त्यांच्या तोंडावर दिसते.. एक मेकांना ओळखण्यासाठी हा period जास्त महत्वाचा ठरतो अस आजपर्यंत ऐकलेच आहे 🙂 . अनुभवले नाही… 😉

  पण तुमच्या अनुभवातून तेच दिसून आलाय ह्या लेखाततरी .. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s