माझं बॅचलर लाइफ…(१)

अगदी सुरुवातीला मी पुण्याला जॉइन झालो होतो . मुद्दाम कंपनीचं नांव देत नाही…..पण नोकरी चा अगदी पहिलाच दिवस.. आम्ही १४ मुलं जॉइन झालो होतो. आम्ही सगळे ट्रेनिंग सेंटरला जमा झाले होते. चेहेऱ्यावर एक वेगळाच अस्थिरपणे.. कॉलेज संपलेलं.. रिअल लाइफ मधला प्रवेश.. नोकरी.. जिच्याबद्दल आज पर्यंत केवळ कल्पनाच केल्या होत्या . आज आम्ही खरंच काम करणार, आणि त्या बद्दल पैसे पण मिळणार! आम्हाला एक लेक्चर दिलं .. ट्रेनिंग मॅनेजरने, की” आता तुम्ही स्टुडंट नाही तर नाउ यु आर गोइंग टु बी अ रिस्पॉन्सिबल इंजिनिअर बाय द एंड ऑफ धिस ट्रेनिंग पिरियड. यु विल अंडरगो ट्रेनिंग इन ऑल द डिपार्टमेंट्स.”

पहिला आठवडा आमच्या पैकी ५ मुलांना असेंब्ली डीपार्टमेंटला पाठवण्यात आलं.तिथे जाउन मॅनेजरला रिपोर्टींग केलं.. असेंब्ली लाइन वर सगळे लोकं कामात मग्न होते. असेम्ब्ली लाइन वर गेलो, आणि तो मॅनेजर म्हणाला, तुम्ही आज सगळे जण मिक्स झालेले नट,बोल्ट, वॉशर्स सॉर्टींग कराल.. एकदम गोट्य़ा कपाळात! म्हंटलं हे काय काम दिलं?? पण सगळ्यांनी निमूटपणॆ दिलेलं काम पुर्ण केलं.. संध्याकाळी परत गेलो.मनातल्या मनात शिव्या घालत होतो त्या मॅनेजरला– हेच काम करायला इंजिनिअरींग केलं का? असं म्हणत आम्ही चौघांनीही त्याला अगदी मनसोक्त शिव्या घातल्या.. आमच्या पैकी दोघांनी तर तेंव्हाच ठरवून टाकलं की अजुन दुसरी कडे पण एक जॉब आहे, तेंव्हा तिथेच जॉइन करु म्हणाले..

दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या ५ पैकी ३ मुलं परत आलेच नाहीत. आम्ही दोघंच फक्त ( कारण दोघंही बाहेर गावचे म्हणून नोकरी एकदम सोडली नाही, विचार केला की दुसरा जॉब मिळेपर्यंत इथेच कंटीन्यु करु.. ) कामावर गेलो. आज तोच कालचा खविस मॅनेजर जरा मवाळ दिसला. म्हणाला, तुम्ही आज सब असेम्ब्लीज करा.. आपल्या हाताने.. माझं तर ते आवडीचंच काम . आणि मला काही हा प्रॉडक्ट नवीन नव्हता. शामबाबुच्या गॅरेजमधे बरेच गिअर बॉक्सेस आणि इंजिन्स रिपेअर केले होते.. आनंदाने आम्ही तयार झालॊ.

तेंव्हा तो खविस मॅनेजर म्हणाला, “तुमचा इगो किल करायचा म्हणून तुम्हाला काल ते सॉर्टींगचं काम दिलं होत जर कालच तुम्हाला असेम्ब्लीचं काम दिलं असतं तर तुम्हाला ते बिलो स्टॅंडर्ड वाटलं असतं.. पण आज बघा, तेच काम तुम्हाला एकदम बरं वाटायला लागलं. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स .. यु हॅव पास्ड द टेस्ट.”

. मला त्याने गिअरबॉक्स बद्दल सांगणं सुरु केलं.. तर त्याला मी म्हणालो, की मला सगळं माहिती आहे आणी मी स्वतः हाताने काम केलेले आहे.. ही वॉज सो सर्प्राइझ्ड.. मला म्हणाला, ओ के. तु एक असेम्ब्ली करुन दाखंव.. आणि मी करुन दाखवली.. इन्क्लुडींग सेटींग ऑफ प्लॅनेटरी गिअरस.. आणि तेंव्हाच मला जाणवलं, की माझं हेच आता पॅरंट डिपार्टमेंट होणार..!

संध्याकाळी, मला ट्रेनिंग मॅनेजरने बोला्वले आणि सांगितलं की माझं इतर डिपार्टमेंटचं ओरियंटेशन ट्रेनिंग कॅन्सल करण्यात आलंय आणि मी इंजिन आणि गिअरबॉक्स सेक्शनलाच ट्रेनिंग पिरियड मधे काम करायचं… चला एक तरी गोष्ट माझ्या मनासारखी झाली !तसाही मला पेपर वर्क किंवा ड्रॉइंग बोर्ड वर काम करणं आवडत नाही.

मॅनेजमेंट ट्रेनी इंजिनिअर म्हणून ७५० रुपये मिळायचे तेंव्हा. अगदी सुरुवातीला निगडीलाच प्राधिकरणात एक फ्लॅट भाड्याने घेउन आम्ही चार मित्र रहायचो. लाइफ एकदम होपलेस होतं. सकाळि ७-५० ते दुपारी ४-२० पर्यंत फॅक्टरीत रहावं लागायचं. त्या काळी ७५० रुपयात महिना पुर्ण महिना काढावा लागायचा. आणि ते ७५० रुपये अगदी खूप व्हायचे. म्हणजे उरत नव्हते पण कमी पण  पडत नव्हते. जस्ट सफिशिअंट -अर्थात आमच्या ग्रुप मधलं कुणीच दारू पीत नसल्याने खर्च लिमिटेड होते.

सकाळचा ब्रेकफास्ट आणि लंच कंपनीतच व्हायचं- सब्सिडाइझ्ड कॅंटिन असल्यामुळे महिन्याभरात फार तर ४० -५० रुपये बिल व्हायचं. संध्याकाळी मग एखाद्या हॉटेलमधे जाउन राईस प्लेट हाणली की झालं.. पण लवकरच त्या शॆट्टी स्टाइल राईसप्लेटचा कंटाळा येणे सुरु झाले. आता तुम्हाला ११ रुपयात जसं मिळावं तसंच जेवण त्या राईसप्लेट मधे असायचं.

शेजारिच एक शेट्टीचंच नॉनव्हेज हॉटेल होतं . मी तर अगदी शुध्द शाकाहारी . पण मित्रांना नॉनव्हेज खायचं म्हणून बरोबर त्या हॉटेलमधे जाउन व्हेज ऑर्डर करायचो.लहानपणापासून अगदी मटन किंवा चिकनच्या दुकानासमोरून जातांना पण मान खाली घालुन , तिकडे शक्यतोवर न बघता पुढे जायची सवय होती. नुसतं मटन किंवा चिकन कडे पाहिलं तरीही कसंसंच व्हायचं.मित्रांना नॉनव्हेज खातांना बघून पण जेवण जायचं नाही. पण तसं कधीही चेहेऱ्यावर दिसु दिलं नाही. म्हंटलं जर लक्षात आलं त्यांच्या तर, आपलंच हसू होईल   .मित्रांच्या बरोबर कधी चवीला नुसती करी आणि मग बोलाईची बोटी ट्राय केली तेच कळलं नाही. कांही गोष्टींची चटक फार लवकर लागते. नॉनव्हेज त्यातलंच एक..!

शेट्टीचं जेवण रोज जेवणं म्हणजे स्वतःवर अत्याचार करुन घेणं… म्हणून एक गोखले काकी होत्या, त्यांना रिक्वेस्ट करुन त्यांचा डबा सुरु केला. कमीत कमी संध्याकाळी तरी घरचं जेवण मिळायचं.. माझं बघून माझ्या रुम पार्टनर्स नी पण डबा सुरु केला. आता जरा लाइफ सेट झालं होतं. रोजचं रुटीन सेट झालं होतं..

संध्याकाळी फॅक्टरीतून परत आल्यावर मात्र काहीच करायची इच्छा रहात नव्हती.कधी एखादा सिनेमा जरी पहायचा म्हंटलं तरी रात्री परत यायला बस मिळणार नाही म्हणून टाळलं जायचं! तेंव्हा माझ्याकडे वाहन नव्हतं पुण्याला. आम्ही सगळे इंडस्ट्रियल पडीक लोकं मग दर गुरुवारी पुण्याला फिरायला जायचो. दिवसभर जिवाचं पुणं करुन मग परत प्राधिकरणात संध्याकाळी परतायचो .दुसऱ्या दिवसापासून मग पुन्हा सकाळी ७-५० त ४-२० चं रहाटगाडगं सुरू व्हायचं.

नंतर मात्र प्राधिकरण सोडून सरळ सदाशिव पेठेतच कॉट बेसिस वर शिफ्ट झालो. कंपनीची बस होतीच रोज जायला- यायला. रुमवर पोहोचायला ४० मिनिटे लागायची. आता संध्याकाळ जरा बरी जायला लागली होती. पुणं खरं काय ते एंजॉय करणं सुरू झालं.. बालगंधर्व च्या फेऱ्या सुरु झाल्या. खूप चांगली नाटकं पाहिलीत त्या काळात…

नोकरी मधला तोच तो पणा आला होता. रोज तेच लोकं, तेच काम, वैताग वाटायला लागला होता. तेवढ्यात ट्रेनिंग पण संपत आलं होतं. म्हंटलं या कंपनीत नवीन शिकण्यासारखं काही नाही. सो स्टार्ट लुकिंग फॉर अ जॉब. आणि दुसरी कडे अप्लाय करणं सुरू केलं.. ..आता केवळ ८ महिने झाले होते पण कंटाळा आला होता ह्या कामाचा. ्ठीक आहे, काम आवडीच होतं, पण तेच ते काम करणं कंटाळवाणं होऊ लागलं. वाटलं की ऑटोमोबाइल्स फिल्ड मधे काही राम नाही. लेट्स ट्राय समथिंग एल्स..

दुसरा जॉब शोधणं सुरु केलं. आणि लवकरच म्हणजे साधारण पणे ८ दिवसातच दुसरा जॉब मिळाला. इथे पण असेम्ब्ली सेक्शन लाच होतो. फरक इतकाच की फक्त थोडं मोठं इंजिन्स होते.. नवीन काही तरी शिकण्यात ला आनंद खरंच शब्दात सांगता येत नाही. सगळी रेंज अगदी कमीतकमी ५ हॉर्स पॉवर ते अगदी हजार हॉर्स पॉवर्स च्या इंजिन्स वर काम करायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला होता. आता मरिन इंजिन्स पण हाताळायला मिळणार … स्वर्गंच दोन बोट उरला होता.

जॉइन केल्यावर लक्षात आलं की इथे पण प्रॉडक्शन लाच काम करायचं . म्हणजे पॉवर पॅक्स बनवायचे आणि  फक्त कस्टमरला डिस्पॅच करायचे. आपण शिपवर कधीच जाऊ शकणार नाही.  पण विचार केला, कमीतकमी सगळी प्रॉडक्ट रेंज तरी पुर्ण शिकुन घेउ. असं करता करता जवळपास वर्ष झालं . आता कन्फर्मेशन झालं होतं. कामामधे पण गती आली होती. प्रॉडक्शन डिपार्टमेंटला काम केल्यामुळे प्रत्येक नट आणि बोल्ट चा साईझ अगदी तोंड पाठ झाला होता. तेंव्हाच आमच्या कोलॅबरेटर चा एक जर्मन इंजिनिअर पण भारता मधेच असायचा. त्याच्या कडुनही बरंच शिकायला मिळालं.

त्याला इंग्रजी अजिबात येत नव्हतं. तेंव्हा एक इंटरप्रिटर होती.. खूप गोड होती दिसायला 🙂  अरे हो…. खरंच…! बरं ते असू दे.. ती आमचं बोलणं ट्रान्सलेट करुन त्याला सांगायची, अन त्याचं आम्हाला. पर्किन्स इंग्लंड  मधून एक आर ऍंड डी मॅनेजर सोडून आलेला होता. त्याच्या कडून खूप नवीन शिकता येइल अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली.. !आता तो रिटायर्ड झालाय म्हणून लिहितोय इथे.. 🙂 माझ्याही ऑफिस मधे कळलंय बऱ्याच लोकांना की मी कांही तरी खरडत असतो ्म्हणून…असो..

तर आता एक वर्षानंतर हे जे नवीन इंजिन आणलं होतं त्यामधे कांही प्रॉब्लेम्स अटेंड करण्यासाठी मला विचारलं की तू जाशील का साइटला काम करायला? म्हंटलं हो.. (अगदी आनंदाने- आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.. ) तर पहिला टुर होता चेन्नाई ला. जवळपास एक महिना चेन्नाई आणि जवळपासचा भाग पिंजुन काढला अगदी. एक महिन्या नंतर परत आलो फॅक्टरी मधे   येण्यापूर्वीच माझ्या कामाचा रिपोर्ट रिजनल ऑफिसने दिलेला होता. चेन्नई ऑफिसने रिस्क्वेस्ट दिली होती की त्यांना मी हवाय सर्व्हिस इंजिनिअर म्हणून चेन्नाई ला… ( अर्थात हे मला काही माहिती नव्हते) आमच्या इथे एक चिफ इंजिनिअर होते.. आर्मिमधुन रिटायर्ड झालेले.. सहा फुट उंच, पांढरे केस, पांढऱ्या मिशा.. चष्मा, आणि रागीट भाव….!

त्यांनी एकदा त्यांच्या केबिनला बोलावलं, आणि चेन्नाई ट्रुर चा रिपोर्ट विचारला. सगळं सांगितल्यावर म्हणाले.. तुला सर्व्हिस इंजिनिअर म्हणजे काय वाटतं?? उत्तर दिलं.. अगदी सोप्पय़ं.. इंग्रजी बोलता आणि लिहिता येणारा मेकॅनिक.. म्हणजे सर्व्हिस इंजिनिअर.. माझं उत्तर ऐकुन “रावण हसला” आणि म्हणाले, यु आर ट्रान्सफर्ड टु सर्व्हिस डिपार्टमेंट. यु विल स्टे ऍट पुणे ऍंड विल ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडीया फ़ॉर अटॆंडिंग द प्रॉब्लेम्स..”

मला अगदी खूप आनंद झाला. काम करणं हा कांही इशू नव्हताच, आणि ट्रॅव्हलिंगची मनापासुन आवड. तर असा माझा सर्व्हिस इंजिनिअर म्हणून करियरचा प्रवास सुरु झाला. आता पहिली वेळ आली होती शिप वर जायची.

हे पोस्ट फार मोठं होतंय.. म्हणून थांबवतो इथेच.. नंतर कधी तरी लिहीन या विषयावर -ह्या पोस्ट वरच्या कॉमेंट्स वाचुन मग ठरवीन पुढे या विषयावर लिहायचं की नाही ते..

पुढचा भाग इथे आहे..

माझं बॅचलर लाइफ…(२)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

33 Responses to माझं बॅचलर लाइफ…(१)

 1. YD says:

  ह्या पोस्ट वरच्या कॉमेंट्स वाचुन मग ठरविन पुढे या विषयावर लिहायचं की नाही ते..
  Mhanje kay ho….lihaylaach pahije pudhe. Blogger peksha, engineer to engineer request samaja hawe tar 🙂

 2. bhagyashree says:

  liha mhanje lihach! 🙂
  kitihi bhag zale tari chaltil ! maja yete asa vachayla! purviche job culture , pune, ekandarit IT shivay vegla kahitari… !

 3. Amol says:

  I wanna read it fully! I am guessing other too want to know more. Its getting interesting actually.

 4. Vikrant says:

  बॉस ……आम्हाला खुप उत्सुकता आहे तुमचे अनुभव ऐकायची सर्विस इंजिनियर म्हणुन काम केले ते……
  तुम्ही लिहा जरूर…… अगदी भारी असणार ते यात शंकाच नाही…..
  बाय द वे , आम्हाला ती तुमची कंपनी लक्षात आली बर का 😉 😉

 5. भाग्यश्री, विक्रांत , अमोल
  तुमच्या प्रतिक्रियेमुळे लिहायचा हुरुप वाढलाय. इन्स्टॉलमेंट्स मधे पोस्ट करतो पुढचे अनुभव.. धन्यवाद..

 6. ngadre says:

  pudhache lavakar liha..

 7. sahajach says:

  नक्की लिहा..पुढच्या भागाची वाट सगळेच पहाताय…आणि तुमच्याच भाषेत सांगु का..मनापासुन लिहिलेले मनापर्यंत पोहोचतेच….

 8. Sudarshan Apte says:

  urvarit post nakki lihine…

 9. तन्वी, सुदर्शन
  तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. पुढचा भाग पोस्ट केलाय. आणि त्याच्या पुढचा म्हणजे तिसरा भाग पण लिहितोय उद्यासाठी.
  अगदी जे कांही मनात येईल ते लिहित गेलोय.. जशा सिक्वेन्स ने आठवलं तसं…

 10. fanfare says:

  hmmm.. telco- the paradise of every mch engineer back then…???

 11. datta shelar says:

  hi sir,Very good experiance and smart writing…………..

 12. Rahul Sonar says:

  Tumacha article khup avadala.. and tumacha anubhav pan.. agadi, sagalyanchya ayushyat ashe prasang yetat, ani apan te kadhi visaru shakat nahit. He vachun mala pan majhe college che ani navya Job che divas athavale.. 🙂

 13. swapna says:

  jya companit tumhi suruvat keli hotit, jya pagaravar… tyach pagarvar mazya vadilanhi keli hoti.. aani aaj me pan tithech suruvat keli aahe. farak evdhach ki me project trainee aahe, mala ek damda hi milat nahi!! pan shikayla matra khup miltay..
  tumacha ha blog vachun mala asa vatla ki ajun tar mala bharpur shikaycha aahe. thoda complex pan aaly karan mala kharach far kahi yet nahi. me nehami lecturer bananyachach vichar kela. tya mule me companit ramalech nahi. pan tumacha likhan vachun mala ithe rahun ajun shikavasa vattay…

  • स्वप्ना
   सुरुवातीला काही विशेष कोणालाच येत नसतं . कॉलेजच्या वातावरणातून बाहेर येऊन खऱ्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे, हेच समजायला चार सहा महिने लागतात.सगळं समजलं की मग खरी काम करायला मजा येते. तो पर्यंत तर … खूप बोअर होत असतं. असो.. 🙂 थोडे दिवस आवडत नसेल तरीही काम करत रहा , आपओआप आवड निर्माण होईल.

 14. joshi l.g. says:

  go on writting, though i cant, our feelings are same i will read other experiences also and then next…

  thanks for creation

  • लक्ष्मण

   ्ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂 अगदी सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा काही विषय सुचत नव्हते, म्हणुन स्वतःबद्दलच लिहिलं होतं. 🙂

 15. geeta says:

  puneri bhashet me bolel 1 number……………………….

 16. geetapawar says:

  sir me samju shakte aaplya jeva kahi aaushat kahi karaiche tharvle na.. tar jag janane hi khup garjeche aaste. i agree with you..

 17. Sagar says:

  Hello Kaka

  Khup khup aadhi vachali hoti hi post .
  Aaj office madhye basun boar hot hot mhnun tumcha blog kadhala vachayala .
  Mast vatatay vachun.sarv bhag vachnar an BTW

  This is my first Job that too in Nigadi Pradhikaran
  🙂

 18. संजय मोरे says:

  मला माझ्या जुन्या आठवणी जाणवल्या

 19. yuvrajsing says:

  barach time milala sir tumhala

 20. Pankaj Z says:

  आज ही सीरिज वाचायला घेतलीये. दुसर्‍या कंपनीचा अंदाज आला आहेच. क वरुन नाव असेल ना?

 21. Santosh says:

  Aila… Kaka… Tumhi tar ekdum Hero ha!!! 😉 🙂
  Solid ahe he sagala… ani tyat pan tumhi engines war work karta mhanje; Hats OFF!!! 🙂

Leave a Reply to geeta Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s