माझं बॅचलर लाइफ…(२)

चेन्नै वरुन परत आलो होतो.जरी तोंडी सांगितलं होत की ’यु आर ट्रान्स्फर्”, तरीही लेटर मिळालं नव्हतं. त्यामुळे  अजुन ही प्रॉडक्शन लाच काम करणं सुरू होतं.   मला असं  समजलं की प्रॉडक्शन ची लोकं मला सोडायला तयार नाहीत म्हणून. पण  आता रावणानेच सांगितलं की सर्व्हिस डिपार्टमेंटला तुझी ट्रान्सफर म्हंटल्यावर प्रॉडक्शन मॅनेजरचं काही चाललं नाही. त्याने उगाचच थोडी कां- कूं केली , “अभी फिरसे नया लडका ट्रेन करना पडेंगा”असं म्हणत  पण शेवटी नाइलाजाने रिलिझ केलं मला.

सर्व्हिस डिपार्टमेंटला  असतांना ऑफिस मधे असतांना कांही विशेष काम नसायचं. फक्त रिजन आणि ब्रॅंचेस चे टेलेक्स रिप्लाय करणं,त्या काळी अगदी फास्टेस्ट मोड ऑफ कम्युनिकेशन म्हणजे टेलेक्स. फॅक्स तर अगदी वगैरे गोष्टी अगदी अमेरिकेत पण सुरु झाल्या नव्हत्या..  किंवा  अर्जंट पार्ट्स अरेंज करण, एवढंच काम होतं.

सर्व्हिस ला अटॅच ट्रेनिंग डिपार्टमेंट पण होतं. त्या मुळे कधी ट्रेनिंग इंजिनिअरने बुट्टी मारली की मग आमच्या पैकी कुणाला तरी क्लास घ्यावा लागायचा.  अर्थात त्यात कांही विशेष नव्हतं.. कारण कस्टमर ट्रेनिंग साठी जे कस्टमर्स यायचे त्यांनाही काही  फारसा ईटरेस्ट नसायचा.. त्यांना मुख्य ईंटरेस्ट म्हणजे पुण्याला फिरायचा.

एकदा आठवतं , कांही आर्मीचे रिकृटस आले होते. (आम्ही आर्मीला स्पेशल पर्पज आर्मी जनसेट्स सप्लाय करायचो, आणि आर्म्ड पर्सनल कॅरिअर्स, आणि टॅंक्स ला पण रशियन इंजिन्स काढून आमची लावली होती- हं.. तो रशियन टॅंक्स ची छान आठवण आहे नंतर लिहीन पुढे )हे रिकृट्स म्हणजे अगदी जस्ट अंडरग्रॅज्युएट असतांनाच आर्मी मधे जॉइन झालेले अगदी लोअर लेव्हल चे लोकं असायचे. म्हणजे अगदी ऑपरेटरच्या लेव्हल चे. ह्या लोकांना फक्त ’सांभाळा’ असं सांगितलं जायचं . त्यांच्या पैकी सगळेच कांही मठ्ठ नसायचे , तरी पण….. !

तर काय सांगत होतो, ते लोकं ट्रेनिंग करता आले होते. ऍज युजवल आमचा ट्रेनिंग मॅनेजर सुटीवर! माझा नंबर लागला ट्रेनिंग घ्यायला. त्या सगळ्यांना घेउन फॅक्टरी व्हिजिट ला निघालो. असेम्ब्ली मधे गेलो असता, ह्या मठ्ठ लोकांनी अगदी विचित्र प्रश्न विचारुन अगदी भंडावून सोडलं होतं . यांना येत तर कांहीच नव्हतं पण फक्त युनिफॉर्म्स चा रुबाब ! एकाने मला विचारलं, साब ये थ्रेड कोनसा है??  ( काय सांगणार कप्पाळ! ) त्याला म्हणालो, ये ’मोदी थ्रेड’ है! 🙂  माझ्या सोबत एक ट्रेनी पण होता तो अगदी मोठ्याने हसायला लागला मोदी थ्रेड ऐकुन.. पण त्या व्हिजिटर्स पैकी एकालाही कळलं नाही की मी त्यांना उल्लु  बनवलं म्हणून! ट्रेनिंग मधे अशाच गमती जमती व्हायच्या. नंतर हा मोदी थ्रेडचा जोक सगळ्या फॅक्टरीत फेमस झाला होता.

सर्व्हिसिंगचं बाहेर काम नेहेमीच असायचं. एक महिनाभर टुर करुन आलो, की १०-१५ दिवस पुण्याला राहता यायचं. नंतर पुन्हा टुर..! बॅचलर असल्यामुळे अजिबात त्रास व्हायचा नाही. टुर ला जायला मी कधीही तयार असायचो. तेवढाच वेगळा एक्स्पिरियन्स.

याच पिरियड ला एकदा चेन्नाइला गेलो असता एक लहानसा वॉकमन विकत घेतला होता. त्यामुळे कुठेही गेलो तरी गाणी ऐकायची सोय झाली होती. अगदी प्रिमीटिव्ह स्टेजचा तो वॉकमन सॅनयो कंपनीचा होता. ५०० रुपयांना घेतला होता विकत. त्या वॉकमनला ऍज अ वॉकमन म्हणून न वापरता, एलिमिनेटर लावून मगच ऐकायचो. कारण त्याचे सेल चे कंझम्पशन  खूपच जास्त होतं .एकदा घातलेले सेल्स फक्त ३ तास चालायचे.. 😦

आम्ही जनरेटींग सेट्स पण विकायचो. ३०० केव्हिए वगैरे चे.. माझं मेकॅनिकल मधलं ज्ञान जरी चांगलं असलं तरीही इलेक्ट्रिकल मधे बोंबच होती. एक ट्रेनिंग अटेंड केलं बंगलोरला किर्लोस्कर मधे अल्टर्नेटर वरचं. कंट्रोल पॅनल्स , साधे असले तर अगदी बिनधास्त अटेंड करायचो, पण जर ’स्पेशल पर्प” असले म्हणजे ऍटोमॅटिक स्टार्टींग , किंवा ऑटो लोड चेंज ओव्हर, किंवा ऑटॊ पॅरललींग तर थोडी बोंब व्हायची. पण नवीन काही तरी शिकायचा ’कीडा’ माझ्यामधे अगदी आधीपासूनच! आमच्या इथे एक नंदी म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअर होता. बंगाली बाबु.. होता तो. फॅक्टरी मधे असलो, की त्या नंदी बरोबर रहायचॊ आणि मग त्याच्याच मुळे रिले टायमर्स चं फंक्शन  आणि लॉजिक शिकलो.

तेंव्हा आजकाल प्रमाणे एक इलेक्ट्रॉनिक कार्ड वापरुन , बायनरी व्हॅल्युज टाकल्या की झालं.. असं नव्हतं.. आणि म्हणूनच फक्त  रिले टायमर्स बेस्ड पॅनल्स   वापरले जायचे.त्यांचं फॉल्ट फाइंडींग करायला तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येणं , आणि लॉजिक समजणं अतिशय आवश्यक होतं . पण एकदा रिले टायमर्स ( ऑन डिले, ऑफ डीले) यांचं लॉजिक समजलं की  फॉल्ट  अटेंड करणं सोपं  होतं.

आजकाल २८६ / usb पोर्ट वरुन लॅपटॉप ला कार्ड जोडलं, की सगळ्या व्हॅल्युज  सेट करता येतात. काही कार्डस तर डायरेक्ट सेटींग चा असेस देतात.  एकदम सोपं झालंय सगळं..अजुन ही खरा प्रॉब्लेम येतो तो मॉडबस कनेक्टीव्हीटी वापरुन कस्टमरने आपला स्वतःचा प्रोग्राम वापरला तर.. असो.. उगाच फार टेक्निकॅलिटीज मधे जात नाही.

साधारणपणे त्याच काळात एक न्वीन ऍप्लिकेशन डेव्हलप झालं होतं- एक्सकॅव्हेटरचं.. पहिल्या ५ मशिन्स डिस्पॅच झाल्या होत्या. असं ठरलं, की त्या मशिन्सचं मॉनिटरिंग आपण स्वतःच करायचं. त्या साठी आम्ही आळीपाळीने साइट्स्वर जायचॊ. मी नर्मदा प्रोजेक्टची साइट अटेंड करायचो. तेंव्हा अगदी जस्ट सुरुवात होती. जेपी असोसिएट्स तिथे मुख्य कॉंट्रॅक्टर होते. त्यांनी नुकतंच गल्फ मधलं काम संपवून तिथली सगळी मशिनरी भारतामधे आणली होती.  मला त्या साइटवर ४ महिने रहावं लागलं होतं. आता तिथे करणार तरी काय? मॉनिटर करणं म्हणजे रोज सकाळी एकदा जाउन बघून यायचं इंजिन, रिडींग्स नोट करायचे आणि २५० तास झाले की मेंटेनन्स करायचं.  उरलेला वेळ काय करायचं? हा प्रश्न अगदी चुटकी सरशी सुटला.

ह्या ५ पैकी दोन मशिन्स भिलाइ स्टिल प्लॅंटला पण सप्लाय केल्या गेल्या होत्या. त्यांची ऑपरेटर्स केबिन स्पेशिअली डीझाइन्ड ३० फुट उंचिवर होती. वर चढतांना तर कांही नाही पण वायरींग चेक करतांना मात्र खूप भीती वाटायची भिलाइला पण कांही दिवस जावं लागलं होतं मॉनिटरिंग साठी .

मला भिलाइला जायला आवडायचं कारण तिथे गेलं की घरी जाउन भेटी घेता यायच्या. बॅचलर्सचया दृष्टीने घरी जाणं ही किती मोठी गोष्टं आहे ते अनुभवल्या शिवाय कळणार नाही.

त्यांच्या वर्कशॉप मधे एक प्रभात म्हणून भैय्या होता. वय असेल साधारण ४० च्या आसपास, अगदी बाप माणुस.. अंगठा छाप, पण हायड्रॉलिक मशिनरी मधे एक्स्पर्ट.मी आणि गिरीश दोघंही डांगरी चढवुन त्याच्या बरोबर त्याच्या कामात मदत करायचॊ. त्याला पण फार बरं वाटायचं, की साहब साथमे काम करता है म्हणून. त्याच्या बरोबर राहुन मग हायड्रॉलिक सर्किट शिकलो.. एकदा त्याने सर्किट डायग्राम समजावून सांगितला डोझर चा आणि त्या वरून मग मी कुठलीही मशिन अटेंड करु लागलॊ. तुम्हाला खोटं वाटेल, पण सगळ्या मशिनरी चं हायड्रॉलिक सर्किट लॉजिक अगदी सारखं असतं.. इंजिन.. ड्राइव्ह करेल हायड्रॉलिक पंप, त्याचे दोन पाइप बाहेर निघणारे, एक बायपास दुसरा प्रायमरी व्हॉल्वला, नंतर सेकंडरी व्हॉल्व्ह, पुढे स्पुल्स व्हॉल च्या थ्रु कंट्रोल असतो. आता स्पुल व्हॉल तुम्ही कसाही कंट्रोल करु शकता, म्हणजे हाय्ड्रॉलिकली किंवा इलेक्ट्रिकली थ्रु सॉलेनॉईड्स. एनी वे…निघतांना प्रभातला आपल्या पैशानी एक एच एम टी अविनाश नावाचं घड्याळ घेउन दिलं.. तेंव्हा त्याच्या डोळ्यांतलं पाणी मी कधीच विसरू शकणार नाही. हाच माणुस होता.. की जेंव्हा ह्याला कळलं की माझा बर्थ डे आहे, स्वतःच्या पैशाने मिठाई आणून वाटली होती वर्कशॉप मधे सगळ्यांना… 🙂

केवडीया कॉलनी मधे दिवस मस्त गेले. अगदी ढोर मेहेनत केली आणि नवीन गोष्टी खुप शिकलो ज्याचा पुढे आयुष्यात खूप फायदा झाला.नर्मदा प्रोजेक्टबद्दल  तेंव्हा असं फारसं कोणालाच माहिती नव्हतं , केवाडिया कॉलनी मधे पण अजिबात कांही नव्हतं. रेडिओ ऐकणं हीच एक करमणूक. माझ्या बरोबर एक गिरीश गणपती म्हणून एक इंजिनिअर होता , तो हायड्रॉलिक मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग मधे काम करायचा. साइटला माझ्या प्रमाणेच पोस्टींग होतं त्याचं पण. दोन महिन्याने नंतर त्याला ओ एन जी सी मधे ऑफ शोअर रिग वर जॉब मिळाला. आणि तो गेला. नंतर कांही वर्षं पत्राद्वारे संपर्क होता, मग तो पण तुटला. नंतर असं ऐकलं की तो कुवेतला रिग वर जॉइन झाला म्हणून .

केवाडिया कॉलनी मधे तेंव्हा करमणुकीचे काहीच साधन नव्हते. कधी तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आम्ही बडोद्याला फिरायला जायचो. मग एखादा सिनेमा, कुठे तरी शॉपिंग वगैरे असायचं.. तेंव्हा आमचा डीए ( टुर मधे मिळणारा) फक्त १२५ रुपये होता. पण तेवढ्यात ही अगदी लॅव्हिशली रहाता यायचं.  ४० रुपये रुमचे , बाकी इतर खर्च.. अगदी कधी ए सी रुम घेतली तर ६० रुपये. पण आम्ही शक्यतोवर नॉन एसी रुम मधेच रहात होतो.

इथे गुजराथ मधे दारु बंदी . अजूनतरी मी दा्रूला शिवलेला नव्हतो. तरी पण गुजराथ मधे अगदी मुबलक प्रमाणात दारु मिळायची. माझे मित्र सगळे रात्री बसायचे बाटली घेउन, पण मी फक्त कोल्ड ड्रिंक घेत असे.आम्ही जिथे रहायचॊ ते गव्हर्नमेंट ऑफ गुजराथ चं गेस्ट हाऊस होतं इरिगेशन डिपार्टमेंटच, त्यामुळे खाणं वगैरे अगदी खुपच स्वस्त होतं. समोर थोडं गेलं की  बसस्टॅड जवळच एक मारवाड्याचं दुकान होतं. तिथे जाउन आइसक्रिम चा फडशा पाडणे.. ( कारण प्रत्येक जण कमीतकमी २ चोको बार, आणि २-३ कप्स आइस्क्रिम सहज संपवत असे.)  हा एक मोठा उद्योग होता. एखाद्या दिवशी आम्ही गेलो नाही तर तो मारवाडी आइस्क्रिम घेउन गेस्टहाउस वर यायचा.. म्हणून म्हणतात ना, धंदा करावा तो मारवाड्यांनीच…!

केवडिया कॉलनी .. या साईटनी मला बरंच शिकवलं.. अगदी बऱ्याच इम्पोर्टेड मशिन्स इथे स्वतःच्या हाताने रिपेअर करता आल्या. हेवी इक्विप्मेंट्स चालवणे इथेच शिकलो. डॊझर, ग्रेडर आणि एक्सकॅव्हेटर तर होतेच, पण सगळ्यात अवघड इक्विप्मेंट म्हणजे क्रेन.. ती पण शिकलो. त्या काळी बुम ऍंगल आणि बुम लेंथ लोड च्या प्रमाणात ऍडजस्ट करणे- कुठलाही चार्ट नसतांना…. शिकलॊ. आउटरिगर्स न लावता लोड उचललं तर क्रेन टॉपल होते हे अनुभवलं.. ( किती मुर्ख पणा आहे नां? पण खरंच मी एक क्रेन चालवतांना आउटरिगर्स न लावल्यामुळे टॉपल झाली होती..)

केवडिया कॉलनीचं काम नुकतंच सुरु झाल्यामुळे डॅमची हाइट फक्त १० फुटाच्या आसपास होती. कॉंक्रीट  करतांना कॉंक्रिटचं टेम्परेचर पाहिलं जायचं पायरोमिटर वापरुन. कॉंक्रिट मिक्सिंग करता बॅचिंग प्लॅंट मधे बर्फ वापरला जायचा टेम्परेचर कमी ठेवायला. चौकशी केली, तेंव्हा असं कळलं की डॅम ची हाइट खूप जास्त होणार आहे म्हणून इतकी काळजी घेतली जाते.

ह्या साईटवरून निघतांना खरंच अगदी आपले जवळच्या मित्रांना सोडून निघतोय असं वाटलं होतं. पण नंतर १५ दिवसांनीच मला पुन्हा इथे पोस्ट करण्यात आलं.. आता एक महीन्या साठी… !

अजुन ही एकाही शिपवर किंवा बोटीवर जायला मिळालं नव्हतं. 😦

ह्याच्या आधिचा भाग इथे आहे..

माझं बॅचलर लाइफ…(१)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

14 Responses to माझं बॅचलर लाइफ…(२)

 1. Super says:

  छान वाटते आहे तुमचा अनुभव वाचताना!!!
  खरच माणसाने घर सोडुन राहायला पाहिजे…..एकतर घराची किम्मत कळते…आणि वेगवेगळे अनुभव मिळतात…!!!

  असेच छान लिहित राहा!!!!

 2. YD says:

  maagchya vel evdhech chaan post

 3. महेंद्रजी नमस्कार
  ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिक्रिया कळवत असता, खूप चांगले वाटते. असाच लोभ असू द्यावा
  शेखर

 4. सुपर, वाय डी , शेखर

  तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. पुढचा भाग उद्या पोस्ट करतोय.

 5. archana says:

  tumache domain knowledge aani lihinyachee hatotee baghun ek suggestion> “RaRangDhang” sarakhe liha kee kaahee taaree. Nusate nostalgic blogsvar adaku naka.
  BTW me aaj chukun aale tumchya blogwar aani haa aagaau salla detiye, pan manapaun watale mhanun sangitale.
  —–
  regards
  archana

  • अर्चना
   धन्यवाद.. तुमच्या सारख्या वाचकांचे सल्ले ’अगदी सर आंखो पर’. 🙂 अहो मी हा ब्लॉग सुरु करुन फक्त ४ महिने आणि ३ दिवस झालेले आहेत आज. अजुन पुरेसा फिल आलेला नाही लिखाणाचा. तरी पण प्रयत्न करतोय. आणि हा ब्लॉग सुरु कां आणि कसा केला हे पण इथेच कुठेतरी एका पोस्ट मधे टाकलंय.. असो..
   तुम्ही जे ’रारंगढंग’ म्हणताय ते काय पुस्तक आहे कां एखादं? माझं ज्ञान जरा कमीच आहे बरं का या बाबतित. फक्त मंगेश पाडगांवकर आणि इंदिरा बाईंची सगळी पुस्तकं वाचली आहेत . इतरही वाचली आहेत पण कमीच…
   आणि आता पुढल्या वेळी अगदी मुद्दाम म्हणून या ब्लॉगवर.. चुकुन नाही.. 🙂
   धन्यवाद पुनश्च एकदा!

 6. archana says:

  ho, “RaRangDhaang” hee Prabhakar Pendharkaranchi (he bhalajeenche suputra baraka) khup lokpriy kadmabree aahe.ek Civil Engineer kathechaa nayak asato. tumheee nakki wachaach milavun.
  tumacha itakyaa warshanacha mechanical engineer aani professional mhanun anubhav aahe, nakkich suchel chaanase kathanak, kunas thauk tumachya dokyat aselhee kadacheet ,ata tyaacha kadmabreechyaa drushteene vichar kelat tar kagadavarhee utrel

  mulaat lekhanamahde kitee divas lihitaay yapeksha sacheepanaa mahtwachaa asato,jo tumachyaa likhanaat aahe,tyamule tumhee khup changale kathalekhak hou shakaal.
  baaki ,aataa tumachaa blog favorite list madhe takala gelay ,he wegale sangayaalaa nako 🙂

 7. sushma says:

  kharach gharapasun dur rahityas gharachi kimmat kalete………….chan lihlay sarv……….

  • तेंव्हा नविनच लिखाण सुरु केलं होतं लिखाण.. आता वाचलं की बऱ्याच चुका दिसतात.. पण .. ठिक आहे.
   घराबाहेर पडलो की खरी किम्मत कळते घराची – खरंय ते.

 8. Suhas Adhav says:

  kharach masta mandle aahet anubhav …vachat rahavasa vatla ….survatila kathin diwas yenarach….
  kay mahit he diwas majhya aaushat pudhchyach varshi yetil 😛 …pan nakkich thode vegle aastil ….IT field madhye aata survat kashi aaste kay mahit
  pan tumche experience ani jasa tumhi te mandlay te ekdam chan …super-like …. 🙂
  pan aaj pariyat tari milala ka शिपवर किंवा बोटीवर जायला ??

  • होय, याच्या पुढच्या भागात आलंय सगळं.. जवळपास सात भाग आहेत याचे.. ब्लॉग च्या हेडर मधे माझं प्रोफेशनल लाइफ म्हणून लिंक दिलेली आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s