माझं बॅचलर लाइफ…(३)

आता सर्व्हिस इंजिनिअर म्हणून रुळलो होतो. कंपनीच्या कामाच्या निमित्याने सगळा भारत पाहून झाला होता. तसा मी अगदी लहान गावातून आलेलो, त्या मुळे विमान वगैरे फक्त आकाशातून उडतानाच पाहिलेलं. त्यामुळे विमान प्रवासाची ्खूपच क्रेझ होती. सर्व्हिस इंजिनिअरच्या लेव्हलला विमानाचा प्रवास अलाउड नव्हता. त्यामुळे अगदी कलकत्त्याला किंवा कोचिन ला जरी जायचं तरीही ट्रेने जावं लागायचं.

आम्हाला तेंव्हा फर्स्ट क्लासचं फेअर मिळायचं. त्यातूनही पैसे वाचवायला आम्ही सेकंडक्लास स्लिपरने प्रवास करित होतो. कारण फर्स्ट क्लासचं तिकिट लावणं जरुरी नव्हतं. तेंव्हा वाटायचं, ’जर ऍट द कॉस्ट ऑफ कम्फर्ट”कांही पैसे मिळत असतिल तर कां हरकत आहे? हे जे पैसे वाचायचे त्याची पुस्तकं घेउन वाचायचो. माझ्या कडे जवळपास १०० च्या वर इंग्लिश नॉव्हेल्स जमा झाल्या होत्या, ज्या मी नंतर एका लायब्ररीला डोने केल्या.पुस्तकं तर अगदी मस्ट होती.. अहो ३६ तास रेल्वे चा प्रवास म्हंटल्यावर करणार तरी काय??

अजुन ही मी प्रवासामध्ये कुणाशी.. म्हणजे अनोळखी माणसाशी गप्पा मारत नाही. कारण माझ्या वडिलांच्या चुलत भावाला गुंगीच औषध देऊन लुटलं होतं, धुळ्याला, आणि त्या औषधाचा अंमल कमी न झाल्या मुळे त्याचा मृत्यु झाला होता.

प्रवासा मधे मी पुस्तक उ्घडून त्यात डोकं घातलं की मग आजूबाजूला काय सुरु आहे याकडे सरळ दुर्लक्ष करतो समोरचा माणुस किंवा फॅमिली कितीही सभ्य दिसली तरीही मी अजिबात बोलत नाही. चेहरे नेहेमीच फसवे असतात असं म्हणतात.

एकदा कोचिन चा एक कस्टमर होता. त्याने आमच्या एम डी ला पत्र पाठवलं होतं , तेंव्हा मी मुंबईला काही कामासाठी आलो होतो. तेंव्हा मला इथून सरळ कोचिनला जा म्हणून सांगण्यात आलं. अर्जन्सी मुळे विमानाचं तिकिट काढून दिलं होतं कंपनीने.. पहिलीच वेळ.. अगदी गांगरल्या सारखं झालं होतं.

त्या काळी फक्त एकच एअर लाइन्स होती , ती म्हणजे आपली इंडियन एअर लाइन्स. त्यांचा स्टाफ तेंव्हा पण खूप उद्धट होता.अगदी आज आहे ना तस्साच!दोन तासांची फ्लाईट होती कोचिनसाठी.

विमानतळावर पहिल्यांदा पोहोचलो आणि एका हातामधे तिकिट धरुन , आणि दुसऱ्या हातामधे बॅग धरुन इकडे तिकडे बावळट सारखा पहात राहिलो. तेंव्हाच विमानतळ जरी आजच्या इतकं चकाचक नसलं तरीही मी स्वतःला ऑड मॅन आउट फिल करित होतो. उगाच वाटत होतं की आपल्या शुज चं पॉलिश खराब झालंय का.. की आपण जरा चांगला शर्ट घालायला हवा होता.विमान तळावरचे सगळे लोकं माझ्या कडेच पाहताहेत असं वाटत होतं.

तेंव्हा चेक इन पण आज प्रमाणे कुठल्याही काउंटरवर होत नसे. प्रत्येक फ्लाइट साठी वेवेगळे काउंटर्स असायचे.  लिहिलेल्या काउंटरवर जाउन उभा राहिलो बरोबर मशिनचे पार्ट्स पण होते.त्या काउंटरवरची बाई खेकसली यु हॅव नॉट स्क्रिन्डबॅगेज.. ह्या बायकांना इंडियन एअरलाइन्स मधे  व्यवस्थित  कसं बोलू नये ,किंवा उद्धटपणे कसं वागायचं ,ह्याचं ट्रेनिंग दिलेलं असावं.तिच्याकडे ओशाळवाण्या नजरेने बघून सॉरी म्हणत रांगे्तून बाहेर पडलो.  माझ्या मधला इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स, आणि ते ऑड मॅन आउटफिलिंग, त्यामुळे काहीही रिऍक्ट न करता बॅग स्क्रिनिंग करु आणली.आणि बोर्डींग पास घेउन एकदाचा विमानात शिरलो.

खिडक्यांमधून खालची गम्मत पहातांना मजा वाटंत होती.थोडी भिती.. विमान खाली कोसळलं तर?? अहो हसता काय.. खरंच असंच वाटंत होतं.अगदी  जीव मुठित धरुन बसलो होतो मी. तरी पण सगळं मॅनेकरु कोचिनला पोहोचलो.. त्या वेळी सिट नंबर होता.. ए २१. 🙂 काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात रहातात, त्यातलीच ही एक. तुम्हाला खोटं वाटेल , मला तेंव्हा विमानातला लंच    मेनू पण आठवतो.आज २३ वर्षानंतर सुध्दा 🙂  🙂 नंतर मात्र बरेचदा विमानाचे प्रवास झाले आणि आता तर जेट एअरवेज चा प्लॅटिनम कस्टमर आहे. म्हणजे वर्षामधे ८० फ्लाइट्स होतातच, पण पहिला प्रवास तो पहिला प्रवास. पक्का आठवणीत आहे.

या बोइंग चा प्रवास वेगळा. पण कांही ठिकाणी जाण्यासाठी ऍव्हरो विमानं होती.  ट्विन इंजिन्स ची प्रोपेलर ड्रिव्हन, त्यामधे वैमानिक समोरच दिसायचा. भर्र्र्र्र्र्र्र्रा आवाज यायचा. त्या विमानात बसलो, की एअर होस्टेस  कानात घालायला कापुस आणुन द्यायची. मुंबई ते पोरबंदर नेहेमी ऍव्हरो ने जावे लागायचे. तिकिट होतं ४६० रुपये फक्त..  🙂

एकदा  प्रॉब्लेम फेस केला होता एका फिशिंग बोटीवर . एका कस्टमर कडे अगदी नवीन पॉवर पॅक मधे थ्रस्ट रिंग चं अनयुजवल विअर झालं होतं, ते अटेंड करायला म्हणून मला गोव्याला पाठवलं होतं. इथे पर्शियन ने पध्दत वापरुन फिशिंग करण्यासाठी हा २०० हॉर्स पॉवरचा पॉवरपॅक लावला गेला होता.

कस्टमर टिपिकल गोवानिज ख्रिश्चन. अतिशय सोबर माणुस होता. होता असं लिहिलंय कारण तो आता वारला. त्याच्या बोटीवर गेलो आणि ही माझी पहिली व्हिजिट बोटीवर जाण्याची. सगळं चेक केलं आणि नंतर प्रॉब्लेम रिझॉल्व्ह केला.  त्याच्या बोटीवर एकदा फिशिंग करता पण जाउन आलो , डिप सी मधे.. ह्यांची फिशिंगची पद्धत थोडी वेगळी होती. बोट डिप सी मधे गेली की मग एक लहान नांव सोडली जाते समुद्रामधे , जाळ्याचं एक टॊक ह्या लहान नावेमधे बांधले जाते. आणि जाळ्याचे दुसरे टॊक घेउन मोठी बोट फुल्ल थ्रॉटलवर गोल चक्कर मारते त्या लहान नावे भोवती.  इतक्या स्पिडने फिरल्यामुळे मासे जरा जास्त प्रमाणात पकडले जातात ने मधे.

समुद्रामधे बोट जेंव्हा फिशिंगला जाते , तेंव्हा ती जो पर्यंत पुरेसा कॅच मिळत नाही तोपर्यंत परत येत नाहीत. मग त्या करता कधी कधी ३-४ दिवस पण लागतात. समुद्रामध्ये जातांना बोटीमधे २ टनाच्या आसपास बर्फ भरुन नेलेला असतो. या फिशिंग ट्रौलर्स मधे सगळ्या सोई असतात. नसते ,ते फक्त टॉयलेट. त्या साठी दोन लांब पट्ट्या बोटीच्या मागच्या भागाला एक्स्टॆंड केलेया असतात. त्यावर बसूनच सगळे विधी डायरेक्ट समुद्रात आटपावे लागतात. नवीन माणसाला निश्चित भीती वाटते. ते बघितल्या शिवाय समजणार नाही. सध्या फोटॊ नाही त्याचा, पण नंतर जेंव्हा कधी काढेन तेंव्हा नक्कीच इथेच या पोस्ट वर इन्सर्ट करिन.

ह्याचं काम आटोपलं आणि तो घरी घेउन गेला. त्याने मला सांगितले की मासे एकदा पाण्याबाहेर काढले आणि मग ते ४ तासामधे कुक केले नाही तर त्यांची स्किन सुटून येते. म्हणे तुम्हाला कळत नाही, पण आम्हा कोळ्य़ांना मात्र नक्की समजतं. पांपलेटचं तोंड दाबल्यावर लाल पाणी बघून तुम्ही लोकं ठरवता म्हणे, पांपलेट चांगलं आहे की नाही.त्याने सांगितलं की,स्किन सुटली की मग फिशचा वास सुरु होतो पण म्हणे तुम्हा लोकांना ते एकदम समजणार नाही. म्हंटलं , अरे बाबा, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधी फिश घ्यायला जाणार नाही.. मला काय सांगतोस हे?? पण ऐकुन घेतलं सगळं.

त्याच्याच घरी पहिल्यांना ऑलिव्हज खाल्ले होते. ऑलिव्ह  हिरवे– आणि ब्राइन वॉटरमधे प्रिझर्व केलेले, आणि मी सकाळी सकाळी म्हणजे ११ वाजता ड्रिंक्स घेत नाही म्हणुन मला ऑरेंज ज्युस..अगदी खरं सांगतो पहिला ऑलिव्ह खाल्ला, तर हे काय विचित्र? आणि हे लोकं खाऊ तरी कसे शकतात? हाच प्रश्न मनात आला पहिल्यांदा. पण त्याने इतक्या प्रेमाने आणले म्हणून टाकुन देणे पण बरं वाटत नव्हतं. म्हणून संपवले कसे तरी. नंतर मात्र म्हणजे संपायला आल्यावर ह्यांची चव आवडायला लागली होती. तसं नंतर पिकल्ड ऑलिव्ह्ज ( व्हिनेगर मधले ) पण एकदा विकत घेउन गेलो होतो घरी. त्यांची चव मात्र फारशी आवडली नव्हती. त्यांचा दाताखाली चावल्या नंतर आंबटपणा पार मेंदूला कुरतडतो..

ह्या कस्टमरनी मग घरीच माझ्यासाठी मुद्दाम बनवलेली फिश, लॉबस्टर्स, आणि इतर बरेच प्रकार खाऊ घातले. हे गोवनिज ख्रिश्चन्स स्वभावाने खरंच खुप चांगले असता्त. आजही माझं हे मत कायम आहे.आणि अरे कारे.. तुका .. माका करु बोलतात.. म्हणजे तुकां समजंत नांही काय रे.. असं म्हंटलं तरी वाईट वा्टून घ्यायचं नाही. अरे कारे करु बोलणं ही इथली पद्धतींचं आहे.बोलतांना ब्लडी फक, ब्लडी मॅन.. करु बोलतात, पण स्वभाव अगदी रॉयल असतो यांचा. एकदा मैत्री झाली की मग बस्स!! ’अगदी दिल खोल के’ तुमच्याशी वागतील.

आता इथे फिशिंगचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, कोचिनला अजूनही चायनिझ फिशिंग ने्सचा वापर करु फिशिंग करतात. ह्या मधे एका मोठ्या खांबाला जाळं बांधलेलं असतं ते पसरलेल्या स्वरुपात. आणि सरळ जाळं खाली समुद्रात टाकलं जातं आणि मग कांही वेळाने ते वर उचललं जातं.. समुद्र किनाऱ्यावरच पकडलेली फिश फ्राय करु द्यायची व्यवस्था आहे तो फोटॊ आहे एकदा काढलेला इथे पोस्ट करतोय..

आमचं एक मरीन डिव्हिजन म्हणून वेगळं डिपार्टमेंट होतं. जे इम्पोर्टेड पॉवर पॅक्स विकायचे आणि सर्व्हिस आणि स्पेअर्स पण प्रोव्हाइड करायचे. त्यांच्या मदती साठी म्हणुन इंडियन नेव्ही च्या फ्रिगेट्स अटेंड केल्या होत्या तेंव्हा.  रशियन अल्टरनेर ला ४०० सायकल, प्रिक्वेसी आणि ११व्होल्ट होता, त्याला कपल केलेली इंजिन्स होती , ती अटेंड केली .

तिथे गेल्यावर पहिले काम काय केलं असेल तर सगळी शीप फिरून आलो. अगदी रडार रुम पासुन तर इंजिन रुम पर्यंत सगळीकडे. तेंव्हा जिपिएस नव्हती. इंजिन रुम मधे अगदी काम करायला पण जागा नसते. पहिल्या वेळी अगदी नव्या नवरी प्रमाणे स्थिती झाली होती माझी.. काय करू? आणि काय बघू? हेच समजत नव्हतं टार्गेट लॉक कसं करतात? टॉर्पेडॊ आणि टॉर्पेडॊ लॉंच कसे होतात ते पण बघितलं.  व्हिल रुम मधे जाउन कंट्रोल रुम बघितली.. मजा आली होती. आता कांहीच वाटत नाही, पण तेंव्हा मात्र खूप अप्रुप वाटलं होतं ह्या सगळ्या गोष्टींचं. आता रिसेंटली सौ. आणि मुली विक्रांत वरचं म्युझियम बघून आल्या. मला म्हणे तुम्ही चला, पण टाळलं.. म्हंटलं, सुटीच्या दिवशी पण काम आठवेल मला, तुम्हीच जा आणि मजा करु या परत.

गोव्याला आयर्न ओअर च्या खुप माइन्स आहेत . त्या माइन्सची मालकी सेसा गोवा, डेम्पो माइनिंग, किंवा साळगांवकरांच्या आहेत. मॅक्झिमम ओअर हा जपान आणि चायनाला एक्स्पोर्ट होतो. गोव्याच्या जवळचा समुद्र जरा कमी खोल आहे, त्या मुळे शिप्स किनाऱ्यावर येत नाहित. सगळा आयर्न ओअर बार्जेस मधुन मदर शिप पर्यंत ट्रान्सफर केला जातो. या बार्जेसची पॉवर पॅक्स कमिशनिंग करता नंतर गोव्याला बरेच दिवस रहावे लागले.

गोव्याला रहाणं सुरु झाल्या पासून रवा फ्राय फिश खायला शिकलो होतो. फिश खाताना काटे वगळून कसा फिश खायचा ते शिकलो. पापलेट पेक्षा चणक किंवा किंगफिशची स्लाइस पण जास्त आवडायला लागली.  गोव्याला असे पर्यंत रोज फिश करी आणि राईस हाच मेन कोर्स असायचा.  सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे गोव्याचा फेमस भाजी पाव आणि मिरची भजी. कधी तरी चेंज म्हणून बन्स ( हे पण होम मेड बरं का, खुप छान टेस्ट असते यांची) आणि चहा पण ट्राय करायचो. समहाउ , गोवा आवडायला लागलं होतं. सुरुवातीला कांही दिवस म्हापसा, पणजी करता करता शेवटी कोलवा बिच वरचं एक हॉटेल फायनल झालनेहेमी रहाण्यासाठी.

या आयर्न ओअर माइन्स मधे कांही डम्पर्स , क्रेन्स वगैरे होत्या. त्या अटॆंड करायला पण मी इथे बरेचदा यायचो. दिवसभर माइन्स मधे काम केलं की मग  रात्री परत रुमवर आल्यावर अंघोळ करायचॊ. तेंव्हा नुसतं लाल पाणी निघायचं केसांतुन! हॉटेलवाला पण आम्हाला दोन टॉवेल्स द्यायचा. एक जुना… आधी जुन्या टॉवेलला डॊकं पुसा नंतर नवीन टॉवेलला.. असं म्हणायचा. :). एकंदरीत अगदी थोड्या दिवसातच मी कंटाळलो गोव्याला.

४ वर्षं झाली होती एकटं राहुन , पण ड्रिक्स ची सवय लागली नव्हती, अगदी स्कॉच जरी समोर ठेवली तरीही मला कधीही इच्छा झाली नाही .आमच्या गोवा ऑफिस चा सर्व्हिस इंजिनिअर एक ख्रिश्चन होता. त्याच्या घरी गेलं की नेहेमी म्हणायचा की  पण नंतर मात्र एखादी बिअर वगैरे घेणे सुरू केले.. ते पण केवळ कंपनी म्हणून.

माझा एक सिनिअर नेहेमी सांगायचा,  रोज तुम्ही कंपनी अकाउंटवर असणार ,तेंव्हा या सवयी साठी स्वतःचा पैसा खर्च करावा लागणार नाही. पण केवळ कंपनी देते म्हणून आपल्याला वाईट सवयी लागु देउ नका.. आणि ते वाक्य अगदी पक्कं मनात बसलं होतं.. आहे… ! अजूनही ड्रिंक्सचं फारसं वेड नाही.. पण कधी तरी बिअर प्यायला आवडते.. अगदी मनापासुन.. !पण कोटा मात्र एक बिअरच्या वर जाऊ दिलेला नाही.. 🙂

माझं लहानपण विदर्भात गेलेलं , त्यामुळे समुद्र म्हणजे खूप आवडायचा. रोज सकाळी समुद्रावर जायला आवडायचं .त्यामुळे गोव्याचं मेन आकर्षण म्हणजे समुद्र….

एखाद्या रिजन मधून रिक्वेस्ट आली की कांही काम जमत नाही , तेंव्हा आम्हाला जावं लागायचं. त्याच पिरियडला माझं पोस्टिंग धनबादला झालं होतं. धनबादला तेंव्हा ऑफिस पण होतं ते कलकत्ता रिजनऑफिसच्या खाली होतं..कोल माइन्स मधे  काम असायचं. धनबादला जरी बिसिसिएल चं ऑफिस जरी धनबादला होतं तरीही माइन्स मात्र आसनसोल ते चांपापुर पर्यंत पसरलेल्या होत्या.

त्यामुळे  माझं रहाणं मात्र अकबर हॉटेलमधे आसनसोल ला होतं. आसनसोलहुन रोज साइटवर जाण्यासाठी एका मित्राची मेटॅडॊर होती.( हो.. मेटॅडॊरच .. त्याच्या कंपनिने त्याला मेटॅडोर दिली होती.. जिप का नाही? ते अजुनही माझ्या लक्षात आलेलं नाही)  दोघांनाही एकाच ठिकाणी काम असल्यामुळे तिथे दोघंही रोज बरोबरंच जाणं येणं करित असुं. त्या माइन्स मधे खाण्यापिण्याचे हाल खुप व्हायचे. रस्त्याने जातांना रानिगंज म्हणुन एक धाबा होता. तिथे नाश्ता वगैरे मस्त मिळायचा. पण सोबतंच प्रॉस्टीट्युशन पण चालायचं , ही गोष्ट लक्षात आल्यावर तिथे जाणं बंद केलं आणि आसनसोलहुन निघतांनाच ब्रेकफास्ट करु निघणं सुरु केलं.

एक झरिया म्हणून माइन्स आहे की ज्यामधे जमिनीखाली कोळसा पेटलेला आहे. ती माइन्स पण बघून झाली . या माइन्सची आग विझवायचा प्रयत्न बरेचदा केल्या गेलाय. पण अजुन तरी यश मिळालेलं नाही. इथल्या कोल माइन मधे मिथेन चं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे कोळसा स्वतःहूनच आग पकडतो ती माई पण बघून झाली. नर्मदा प्रोजेक्ट प्रमाणेच इथले लोकंही आपापली घरं सोडून जायला तयार नाहीत.

आमचं काम तिथे +++ कंपनीत असाय. पण प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे कॅंटीनची वगैरे सोय नव्हती. जेवण्यासाठी म्हणून लहानशा झोपड्यांमधली खास बिहारी हॉटेल्स असायची. समो्रून सारखी डंपर्स ची वर्दळ, त्यामुळे उडणारी धुळ त्या हॉटेलातील स्वयंपाकावर बसायची. पण काहीच उपाय नाही म्हणून आम्ही तिथेच जेवायचो. अर्थात जेवण एकदम टेस्टी असायचं.. तुम्ही म्हणाल, काय चिप टेस्ट आहे या माणसाची पण  अगदी खरं सांगतो, तिथे तुमच्या समोर तंदूर मधुन काढलेली रोटी आणि सरसुच्या तेलामधली भाजी म्हणजे आधी घशाखाली उतरत नव्हती . सरसु च्या तेलाचा वास अगदी सहन होत नव्हता. पण नंतर मग हळू हळू सवय झाली आणि आवडायला लागलं. सुरुवातिचे काही दिवस मी अगदी  साधा भात आणि साधं वरण खायचो. पण नंतर मात्र सगळं खाणं सुरू केलं..असं म्हणायचे की तिथे कसंही खाल्लं तरी पचत. जेवणामध्ये रोज वरण, भात, भुजिया म्हणजे सुकी भाजी, आणि तंदुरी रोटी असायची. कधी तरी चेंज म्हणून सत्तु की पुडी पण असायची.

बिहारात आलू का चोखा नावाचा एक प्रकार मिळायचा. उकडलेला बटाटा, त्यामधे कांदा, हिरवी मिर्ची, कोथिंबिर आणि सरसुचं तेल घालुन एकत्र कालवलेला तो प्रकार पण मला खुप आवडायला लागला होता. कधी कधी तर फक्त आलु का चोखा आणि रोटी हेच जेवण असायचं. अजूनही घरी आम्ही सरसूंच्या तेलाची बाटली आणून ठेवतो चोखा बनवायला.

बिहारात सकाळचा नाश्ता म्हणजे एका स्वच्छ परातीमधे चिकन विंग्ज तयार करु ठेवलेले असायचे एका हॉटेलमधे. आणि ती परात मंद आचेवर ठेवली असायची. रोज सकाळी नाश्ता म्हणजे चिकन विंग्ज (त्याला बंगाली लोकं चिकन चॉप्स म्हणायचे) आणि रोटी असायचा. रोज एकाच नाश्त्याचा कंटाळा यायचा म्हणुन एक व्हेज हॉटेल पण शोधून ठेवलं होतं. आता नांव विसरलो. पण तिथे सत्तूकी पुडी, किंवा सत्तू का पराठा आणि आलु मटर भाजी + जिलबी मिळायची. पण ब्रेकफास्ट मधे दोन पैकी एकच गोष्ट असायची हे नक्की. अगदीच चेंज म्हणून सिंघाडा+ जिलबी पण चालायचं..

किती भर भरुन लिहितोय ना मी खाण्या बद्दल? खरंच हो.. मला खाण्याची अगदी मनापासून आवड आहे. मी एक चांगला कुक आहे बरं कां. त्यामुळे खाण्याचा विषय निघाला की आम्ही खल्लास!!!!!

बायवे , ट्रेने कलकत्याला जातांना ट्रेनमधे ‘ झाल मुडी’ म्हणून एक भेळेसारखा प्रकार मिळायचा. एक घाणेरडा माणुस एक टॊपली आणि त्या टोपलिला अटॅच असलेले लहान लहान डबे ( ज्या मधे फरसाण, दाणे, खोबरं, चणे, इत्यादी गोष्टी असायच्या) तो प्रकार पण मला खूप आवडायचा. त्या मधे सरसुचं तेल घालायचा तो माणुस . तिथुनच मला ती सवय झालसरसूं चं तेल खाण्याची. आणि या सवयीचा मग मला पुढे बराच फायदा झाला.

याच बिहारी कस्टमर्सच्या अनुभवा मधे एक प्रसंग अगदी जीवघेणा होता. एका एक्सकॅव्हेटरचा कुलिंग फॅन तुटला होता. तो फॅन असतो इम्पोर्टेड.. तुटण्याचे कारण म्हणजे जेंव्हा मशिन सुरु केली तेंव्हा काम करतांना मशिनवर राहिलेला स्कृ ड्रायव्हर तिथे पडला आणि फॅन मधे अडकुन फॅन चे अगदी तुकडे तुकडे झाले होते. मी त्याची वॉरंटी रिफ्युज केली , तर त्या कस्टमरने साइटवरच्या ५-६ माणसांना मला धरुन ठेवायला सांगितलं. तलवार काढुन म्हणाला, अगर तुने वॉरंटी रिपोर्ट नही बनाया, तो तेरेको भी काट दुंगा और, ये तो कन्स्ट्रक्शन साईट है, गढ्ढेमे दफना दुंगा..उपर मिट्टी डालके डॊझर चला दुंगा और कॉंम्पॅक्टर ( एक प्रकारचा रोड रोलर असतो हा) चलादुंगा तो किसिको पता भी नहीचलेगा…चल, साइन कर , की फेल्युअर वॉरंटेबल है.. त्याच्या डॊळ्यामधले भाव पाहिले आणि खात्री पटली की हा जे म्हणतोय तेच करु पण शकतो. सरळ आणि थरथरत्या हातांनी रिपोर्ट साइन करु दिला.आणि साईटवरुन बाहेर निघालो. रिअल लाइफ मधे आपण अमिताभ बच्चन नसतो , की लढुन त्या व्हिलनला मारायला. रिअल लाइफ हे खुप वेगळं असतं रिल लाइफ पेक्षा.

रुमवर आल्यावर आधी हेड ऑफिस मधे फोन करु झालेली घटना सांगितली, आमचे एच ओ चे मॅनेजर म्हणाले, ठिक आहे, जे केलं ते योग्यंच केलंस.. आणि विषय संपवला. माझं पण मन थोडं हलकं झालनंतर कळलं , की बिहार मधे असे प्रकार नेहेमिच होत असतात. तेंव्हा स्वतःचा जीव जास्त महत्वाचा हे लक्षात ठेऊनच कामं करायची असतात.

बिहारमधे जवळपास बरेच लोकं तंबाखु खातात. साईट वर पण कु्णीतरी तो तंबाखू मळायचा आणि डाव्या हाताच्या कोपराला उजव्या हाताच्या बोटांनी आधार देत हात समोर करायचा.आधी एक  कण  उचलायचो, नंतर त्या कणाची चिमुट कधी झाली आणि सवय लागली तेच कळलं नाही. 😦 नंतर ही सवय सोडतांना खुप त्रास झाला.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

19 Responses to माझं बॅचलर लाइफ…(३)

 1. sahajach says:

  बाप रे!! तो बिहारचा अनुभव भयंकर आहे………….बाकी लेख वाचतांना सगळे अनुभव जिवंत वाटतात अगदी…….

 2. नमस्कार.
  आपण केलेल्या कौतुकामुळे संकोच वाटतो. तरीही आपण व्यक्त केलेल्या भावनांबद्दल आभार
  शेखऱ

 3. Aparna says:

  तिन्ही भाग अगदी फ़र्मास झालेत….ग्रेट…..

  • अपर्णा..
   अभिप्रायाबद्दल आभार. अगदी सामान्य माणसाचं आयुष्य आहे हे.. अगदी जसं घडंत गेलं तसं लिहिलंय..

 4. sumedha says:

  samanya manasache asamanya aayushya ahe he. khoop chhan lihalay, as vatat ki tumhi samor basoon sangatay he sagal.

 5. ऋषिकेश says:

  “आधी एक कण उचलायचो, नंतर त्या कणाची चिमुट कधी झाली आणि सवय लागली तेच कळलं नाही.”… प्रामाणिकपणाला सलाम !!
  तिन्ही भाग छान झाले आहेत… पुढचे भाग हि लवकर संपवतो… 😉

 6. sumedha says:

  lavkar liha, baki sutti kashee kay zali?
  ani net-sanyas sampala he faar chhan zale…

 7. pradip says:

  Anubhav kiti bolaka asto nahi ka?

 8. mazejag says:

  Kaka assal Govekar ani Bihari agdi asech astat…pan heva vatto kadhi kadhi tumcha..avdichya kamachi naukri ani varun khup travelling….ashi kam hya “Pappa lokanchya pidhilach” milali….kharch :)..maze daddy pan Bayerla 30 varsha hote…sadhe worker hote packing belt war retire zale teva md technical pasun saare ghari sodayla aale hote….

  • आवडीचे काम तर आहेच. पण काही वर्षानंतर थोडं तोच तो पणा येऊन बदल हवासा वाटतो. पण मग वाटतं की, कशाला उगीच थोड्या पैशांसाठी नोकरी बदलायची? म्हणून तो विचार बारगळतो. ते दिवस खरंच खूप वेगळे होते.:) इतकी वर्ष एकाच ठीकाणी काम केल्यावर तितका मान तर असतोच कंपनी मधे.

 9. geeta says:

  ekte rahlya mle manus khup khai shikun jato. khanya pasun te rahnya paryat aani swavlambi banto te disate tumcya wgnya wrun kaka.

 10. Pingback: माझं बॅचलर लाइफ…(२) | काय वाटेल ते……..

 11. vaishu says:

  khup chan….sgle ksa agdi jivant vatata ani dolyasmor disu lagto thnx 🙂

 12. ni3more says:

  kaka watchatana ek dum jinvanta drushya dolyasamor ubhe rahat ahe majya aahi to tumchya baroabr bihar madhe jalela seen to dangours hota

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s