माझं बॅचलर लाइफ…(४)

बिहारमधे दोन प्रकारच्या माइन्स असतात. एक म्हणजे ओपन कास्ट  आणि दुसरी म्हणजे अंडर ग्राउंड. अंडरग्राउंड माइन्स तुम्ही सगळ्यांनी अमिताभ बच्चन च्या सिनेमा मधे  पाहिली असेलच. नांव आठवत नाही आता, पण त्या मधे शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपुर वगैरे होते. अंडरग्राउंड माइन्स  मधे कुठे आणि कसं डिप जायचं ते सगळं जमिनिचा स्टॅटा पाहुन ठरवलेलं असतं. आतला भाग कोसळू नये म्हणुन रुफ बोल्टींग सिस्टीम वापरुन टनेल ला स्ट्रेंथन केलेलं असतं. ह्या प्रकारच्या माइन्स मधे मिथेन मुळे धोका असतो.

ओपन कास्ट माइन्स हा हल्ली खुप पॉप्युलर झालेला प्रकार आहे. जेंव्हा कोळसा जमिनिच्या वरच्या थरापासुन जास्त खोल नसतो तेंव्हा वरची सगळी माती , दगड, खडक, फोडून मग खालचा कोळसा एक्स्पोझ करुन माइनिंग केलं जातं. ह्या प्रकारामधे आऊटपुट खुपच जास्त असतं कारण हेवी मशिनरीज चा उपयोग केला जातो एक्स्कॅव्हेशन साठी.वरची माती काढली की मग खोल खड्ड्यामधे बरंच ग्राउंड वॉटर जमा होतं. त्या करिता डिवॉटरिंग पंप्स बसवले असतात. पावसाळ्यात इलेक्ट्रिक डिवॉटरिंग पंप्स पाण्यात बुडले की मग डिझल पंप्स सुरु केले जातात. माइन्स मधलं पाणी काढायला.

हे सगळं सांगण्याचं कारण?? ओपन कास्ट माइन्स मधे जमिनिला ड्रिलिंग करतात रॉक रोलर बिट्स ने आणि मग त्यामधे एक्सप्लोझिव्ह्ज भरुन नंतर ब्लास्ट केलं जातं . ब्लास्टींग केल्यानंतर निघालेला कोळसा डम्पर्स वापरुन लोडींग पॉइंट ला ट्रान्सफर केला जातो. ब्लास्टींग करता या लोकांना भरपुर एक्स्प्लोझिव्ह्ज लागतात. इथे स्टॉकमधले डिटोनेटर्स वापरुन फिशिंग करण्याचं प्रमाणही खुप दिसलं.

डीटोनेटर ला इलेक्ट्रिक सप्लाय दिला की तो ब्लास्ट होतो. एखाद्या तलावामधे डिटोनेटर टाकुन त्याला ब्लास्ट केलं की मग भरपुर मासळी मरुन पाण्यावर तरंगायला लागते. अर्थात हे लिगली आलाउड नाही. पण अगदी सर्ररास अशा तर्हेने फिशिंग करणं बिहारात कॉमन होतं…! अशा प्रकारे केलेल्या फिशिंग मधे खुप मासे विनाकारण मारले जातात. जे मासे डॅमेज होतात ब्लास्ट मधे ते पाण्यात तसेच राहु दिले जातात- इतर माशांना खाण्यासाठी.आसनसोलला असतांनाचा एकदा हेड ऑफिसमधुन फोन आला की ताबडतोब कलकत्त्याला निघ. म्हणुन ताबडतोब दुसऱ्या दिवशी सकाळच्या ट्रेनने निघालो . दुपारी कलकत्त्याला पोहोचलो. रिजनल ऑफिसच्या ए एस एम ने सांगितले की मला  दार्जीलिंग डूवाट्झ टी गार्डन्स ला जायचं आहे.

ह्या टी गार्डन्स मधे (प्लॅंटर्स म्हणतात त्यांच्या मॅनेजर्सला) जाण्याची ही माझी पहिलिच वेळ होती. किंबहुना दार्जिलिंगला जाण्याचिच पहिली वेळ होती. एअरपोर्ट होता बागडोगऱयाला . जेंव्हा तिथे पोहोचलो, तेंव्हा कळलं की बा बागडोगरा अगदी सेंटरला आहे दार्जलिंग आणि सिलिगुडी च्या मधे.एकदम मन उदास झालं.. अरे? दार्जिलिंगला नाही जायचं तर..  😦 सिलिगुडीच्या पुढे भुतान च्या सिमेवर एक टी गार्डन आहे तिथे जायचं होतं. एअर पोर्टला टॅक्सी आली होती टी गार्डनची. हा माझा हिमालयातला पहिला प्रवास.. म्हणुन लक्षात राहिला.

गाडीत मागे बसलो होतो. सोबतंच एक टी गार्डनचा मॅनेजर आला होता रिसिव्ह करायला. टी गार्डन म्हणजे एक सेल्फ कंटॆंड एरिया असतो. तिथे  रहाण्यासाठी हॉटेल्स वगैरे नसतात. रहाण्याची सोय एका मॅनेजरच्या घरामधेच करण्यात आली होती. मोठे बंगले आहेत अजुनही ब्रिटीश कालिन. एका गेस्ट रुम मधे मला ठेवण्यात आलं. ब्रेक फास्ट ते डिनर, त्या मॅनेजरच्याच घरी.

मी ज्याच्या घरी उतरलो होतो, तो म्हणजे अग्रवाल. खुप छान होता स्वभावाने. आपल्या सारखे कल्चर्ड लोकं तिथे गेले की त्यांना आनंद होतो. आणी पुनासे आया किंवा बॉंबे से आया म्हंटलं की त्यांना तर अगदी आदराचे भरते येते. या गार्डन मॅनेजर्सचा पगार पण खुप असतो. नसतं ते फक्त सोशल लाइफ. हे लोकं आपली मुलं दार्जिलिंगच्या महागडया शाळांत शिकवतात.

टी गार्डन्स मधे एक पद्धत आहे. एकदा सिझन संपला की हे लोकं सगळ्या मशिनरिजचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करुन ठेवतात . मग गरज असो की नसो, प्रत्येक इंजिन उघडून सगळे पार्टस चेक करुन परत असेम्ब्ली करायची. मला तर मुर्ख पणाच वाटला. पण कंपनिला स्पेअर्सचा धंदा मिळतो म्हणुन निमुटपणे कस्टमरचया इच्छेप्रमाणे कामं केली जातात.

टी गार्डन्स मधे एक बामन डांगा टोंडू टी ईस्टेट अगदी लक्षात राहिली होती. तिथला मॅनेजर अग्रवाल आणि मी अगदी मस्त दोस्ती झाली होती. २१ दिवस होतो त्याच्या गार्डनमधे. आमच्या आवडी.. म्हणजे वाचन.. अगदी मस्त जुळायच्या. माझ्या बॅगेतलं त्याने व्हेअर इगल डेअर्स बघितलं आणि, आशाळभुत पणे त्याच्याकडे पहायला लागला. माझ्या लक्षात आली त्याची नजर.. लगेच काढुन त्याला दिलं आणि म्हंट्लं माझं झालंय वाचुन.. . आयर्विंग वॅलेसच्या फॅन क्लब चा तो फॅन होता.. माझ्या प्रमाणेच.. ते पुस्तकं तेवढ्यातंच निघालं होतं.  माझी सगळी वाचुन झालेली पुस्तकं त्याला दिली आणी त्याच्या खजिन्यामधली न वाचलेली मी घेतली. त्या मधे एक केन ऍंड एबल आणी प्रॉडिगल डॉटर पण होतं..

टी गार्डन मधे त्या दिवसांत नक्षलवादी मुव्हमेंटचा इंपॅक्ट अजुन आलेला नव्हता. त्या मुळे टी गार्डनचा ’बरा साब’ म्हणजे मॅनेजर अक्षरशः राजा सारखा रहात होता. मोठ्ठा बंगला, आणि प्लॅंटेशन ची जबाबदारी. तिथे तो अगदी ’जे वाट्टेल ते’ करु शकत असायचा. जास्त डिटेल्स लिहित नाही.

टी गार्डन्स हे हिमालयात उतारावर असायचे. कांही गार्डन्स ऑर्गनाइझ्ड सेक्टर चे होते, आणि कांही प्रायव्हेट सेक्टरचे. प्रायव्हेट सेक्टरच्या टी गार्डन्स मधे दोन प्रकारचा चहा निर्माण व्हायचा. कांही ठिकाणी सिटीसी म्हणजे कट, टिअर, ऍंड कर्ल.. म्हणजे आपण जो नेहेमी दाणेदार चहा विकत आणतो तो आणि दुसरा म्हणजे ऑर्थोडॉक्स , ह्यामधे प्रत्येक पान वाती वळल्या प्रमाणे वळले जाते -अर्थात मशिन्सने आणि नंतर मग गरम पाण्यात टाकला , की ती पानं उमलतात.  बरं आता जास्त डीटेल लिहित नाही.

चहाची झाडं आपण पहातो ती असतात २-३ फुट उंचिची. खरं तर ही झाडं म्हणजे बोन्साय केलेली असतात. जर तुम्ही झाडं कापली नाहित तर त्यांची उंची एखाद्या चिंचेच्या झाडाएवढी होऊ शकते. मी स्वतः असं मोठं झालेलं चहाचं झाड पाहिलं आहे.

रानटी हत्ती पण ह्या लोकांच्या ( म्हणजे कामगारांच्या ) वस्ती मधे यायचे. इथे लोकं तांदुळाची दारु बनवतात. त्याला हाडीया असं नांव आहे. हत्तीला या दारुचा वास आला की ते तिकडे जाउन तोडफोड करतात. हत्तीला दारु आवडते..?? हा एक नविन शोध लागला होता मला. कधीतरी एखादा चिता पण दिसायचा. रान कोल्हे तर हमखास रस्त्यावरुन आडवे जायचे.

हे टी गार्डन तिन्हि बाजुने हिमालयाने वेढलेले होते. आणि चौथी बाजू होती, त्या साइडला डायना रिव्हर वहात होती.पावसाळ्यात नदी ला पुर आला की मग मात्र उर्वरित जगाशी दळणवळण ठप्प व्हायचं इतर वेळी तिथे एक कामचलाउ पुल बांधलेला असायचा, पण पावसाळ्यात तो वाहुन जायचा.

एकदा या भागात कामासाठी तुम्ही गेलात, की कमित कमी दोन महिने तरी परत येता येत नसे इतकं काम असायचं. या दोन महिन्यांच्या काळात माझा  हा सगळा भाग  पाहुन झाला होता. इथे लवकर होणारी सकाळ, आणि संध्याकाळी ४ वाजता पडणारा अंधार अगदी वेड लावायचा. कांही तरी विचित्र वातावरण होतं. मला अगदी धुलाबारी पर्यंत जावं लागायचं.

धुलाबारी म्हणजे नेपाळ आणि भारताच्या सिमेवरचं गांव. तसं ते गांव नेपाळात येतं, पण तिथे  बॉर्डर वर तेंव्हा इम्पोर्टेड गुड्स ची दुकानं होती. मी तिथुन कांहीच आणलं नाही ,पण एकदा जाउन मात्र आलो तिथे.  जस्ट मार्केट बघायला !

माझं स्पष्ट मत आहे, या भागात यावं ते फक्त साईट सिइंग साठी.. कामासाठी नाही.. अगदी १०० टक्के तुम्ही इथे बोअर होणार.. कांहीच एंटरटेनमेंट नाही. या गार्डन्स मधे मग हे प्लॅंटर्स रात्री क्लबिंग करतात. पत्ते, कॅरम आणि इतर खेळ चालतात. मी आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा पुल टेबल इथे पाहिला होता.

एक गोष्ट आहे, ती म्हणजे , ही गार्डन्स सगळी सारखीच.. !इथेच कलकत्याला असतांना एकदा मला कुच बिहारला जायला सांगितलं होतं, तो प्रसंग आधीच एकदा लिहिलेला आहे. पुनरावृत्ती टाळतो.

मला हल्ली एक जाणवतंय की माझं मराठी आता जास्त सुबक होत चाललंय. इंग्रजी शब्दांचा वापर कमी होतोय. कदाचित प्रॅक्टिस मुळे असेल. ब्लॉग लिहिण्याचा हा पण एक फायदा.

असे आठवणित रहाण्यासारखे बरेच प्रसंग आहेत. आपल्या इथे कांही कंपन्या आहेत ( भारत शासनाच्या अंतर्गत) मुखत्वे करुन आय बि एम.. ( इंडियन ब्युरो ऑफ माइन्स- मल वाटलंच आय बि एम म्हंटलं की तुमच्या डोक्यात काही वेगळं येणार म्हणुन इथे क्लिअर करतोय) एम ई सी एल, ( मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पो लि) किंवा मॉयल.. (  मॅंगनिझ ओअर इंडीया लि. ) ही नांवं केवळ, नमुन्या दाखल देतोय.

अशा बऱ्याच कंपन्या होत्या की ज्यांच्याकडे अगदी बाबा आदम च्या जमान्यातल्या मशिनरीज पहायला मिळायच्या. उदाहरणार्थ बुडा क्रेन, रस्टन बुसायरस ५ सिलेंडर इंजिन, किंवा युडी १० युक्लिड डंप ट्र्क्स.. वगैरे. मला या साइटसला जायला खुप आवडायचं कारण , जुन्या व्हिंटेज मशिनरिज , आणि त्या पण वर्किंग कंडिशन मधल्या…म्हणजे पर्वणिच होती. क्रेन च्या खाली शिरुन एकदा बाहेर पडलं की कार्डीयम कंपाउंड जे स्विव्हेल गिअरला लावलेलं असायचं ते शर्टला लागुन माझे कित्येक शर्ट्स खराब झाले आहेत.  त्याचे डाग कांहिही केलं तरी निघत नसंत.

या मॉयल चं गेस्ट हाउस पण खुपच छान होतं. ब्रिटिश स्टाइलचा बंगला होता. तिथे एक खानसामा कम केअर टेकर होता. स्वयंपाक अगदी दिव्य करायचा. सकाळी ब्रेकफास्टला जे ऑम्लेट बनवायचा त्या मधे अंडी कमी आणि कांदाच जास्त असायचा. पण बिचारा, स्वभावाने खुप चांगला होता. बाहेर अगदी ४५ डिग्री जरी टेम्परेचर असलं तरीही त्या रुम्स मधे एकदम थंड वाटायचं. कारण रुमचं छत ३० फुट उंचिवर होतं. आणि भिंती २ फुट जाडिच्या !!

कलकत्त्याला असतांनाच एकदा भुबनेश्वर ऑफिस ला पण गेलो होतो. तिथे जवळंच जाझपुर केओंझार रोड वर माइन्स होत्या. त्या माइन्स मधे काम होतं. तिथे पण जाउन जिवंत दारिद्र्य पाहिलं. अगदी पोटं खपाटीला गेलेले उडिया मजुर .. आणी त्यांची मुलं.. वाईट वाटायचं त्यांना पाहुन. या भागामधे इतकी पॉव्हर्टी होती की हे लोकं फारंच कमी पैशात कामं करायला तयार व्हायची. किमान मजुरी कायदा वगैरे सगळा धाब्यावर बसवलेला असायचा. इथे जंगलातुन शिकार करुन आणलेले ससे, आणि हरिणाचे मांस मिळायचे. माइन्स मॅनेजरच्या घरिच गेस्ट हाउस होतं. त्याच्या घरी रोज पारधी, म्हणण्यापेक्षा लोकलं लोकं एखादा प्राणि घेउन यायचे. मी असतांना माझ्या समोर दोन सुंदर पांढरे शुभ्र सशाचे पिल्लं घेउन आला होता. दोन्ही पिल्लं जिवंत होती. आणि माझ्या कांही लक्षात येण्याच्या आतंच त्याने त्या सशाचे पांय धरले आणी त्याला गर गर फिरवुन त्याचे डोके खाली आपटले..  😦  माझं डोकं सुन्नं झालं तो प्रकार बघुन. मी  तिथे असे पर्यंत रोज फक्त ऑम्लेट आणि रोटी खाउन दिवस काढले. कधिही कुठलंही मांस खाल्लं नाही..कांही प्रसंग मनावर कोरले जातात, त्यातलाच हा एक!

जनरेटींग सेट्स बहुतेक सगळ्याच प्रकारच्या ईंडस्ट्रिज मधे वापरले जातात. त्या मूळे बहुतेक सगळ्या प्रकारच्या फॅक्टरिजला जावं लागायचं. निरनिराळे कस्टमर्स भेटायचे. अगदी स्पिनिंग मिल्स ते डाइंग प्रिंटींग.. अगदी स्मॉल स्केल ते लार्ज स्केल.

सगळ्यात जास्त फॅसिनेट करणारा बिझिनेस म्हणजे डायमंड कटिंग .. सुरतेचा. एकेका लहानशा बिल्डींग मधल्या इंडस्ट्रिज जेंव्हा मार्केट वर होतं , तेंव्हा कमित कमी १००० कोटींचा धंदा करित असे. डायमंड कटींग असं म्हंटलं जातं, पण ऍक्चुअली डायमंडला ग्राइंडींग व्हिल वर घासुन शेप मधे आणलं जातं.

हे माझं चौथं पोस्ट याच विषयावरचं. आता थांबवतो . अहो, २५ वर्षांचा फिल्ड एक्सपिरिअन्स, त्यामधे ८ वर्ष मार्केटींग .. ( सेल्स इंजिनिअर म्हणुन, प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणुन ३ वर्षं , इतर उरलेला सगळा सर्व्हीस डिपार्टमेंटचा एक्सपिरिअन्स) त्यामुळे बरेच अनुभव.. बरे.. आणि वाईट आहे .जसे आठवले तसे लिहिले. आता हा विषय इथे बंद करावा म्हणतोय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

22 Responses to माझं बॅचलर लाइफ…(४)

 1. sahajach says:

  आज तुमचा लेख वाचतांना पुन्हा एकदा मामाची आठवण आली…तो ही असाच सतत भारतभ्रमण करत असतो…आणि मग अनुभवांबद्दल भरभरुन बोलत असतो…..गंमत अशी की ते कधिही बोअर होत नाहीत…
  तसेच तुमच्या लेखांबद्द्ल …तेव्हा Keep Posting…

  • तन्वी
   इतक्या आठवणी आहेत कांही लोकांच्या चांगल्या तर कांही लोकांच्या वाईट. बरंच लिहिलंय.. आता थांबवतो हा विषय कांही दिवसांसाठी..खुप गमती आहेत, जेवणात सांप खाल्याची .. वगैरे वगैरे… मला पण प्रवास कधिच बोअर होत नाही. उलट घरी असलो एखादा आठवडा कंटिन्युअस की मग बाहेर निघावंसं वाटतं कुठेतरी टुरवर..
   आवर्जुन आभिप्राय दिल्याबद्दल आभार..

 2. अनिकेत says:

  ‘काला पानी’ त्या सिनेमाचे नाव. अमिताभ, राखी, शशी कपुर, परवीन बाबी, शत्रुघ्न सिन्हा आणी नितु सिंग. अमिताभचा ‘ऍंग्री यंग मॅन’ अफलातुन

 3. Aaditya says:

  Are mama ithe vishay band karu nako, khup intresting picture pahatana light gelyasarkha watel..
  mee tar dar roj tu kaay nav lihal aahes yachi wat pahat asato…

  • अरे बाप रे.. आदित्य?? तु पण वाचतोस ?? अरे कालच सुरुचीचा पण स्क्रॅप होता.
   म्हणजे आता मला जरा सांभाळुन लिहावं लागेल तर..!
   🙂

 4. manoj says:

  far chan lihile ahe, na baghitale sudhha dolyapude chitra rupane ubhe rahate.

  kharokhar far chan lihile ahe,
  Krupaya Likahn chaluch thewave.
  Dhanyawad.

 5. Amol says:

  I dont want to be critic or something, nor I have the ability but ; well keep writing this, but can you change the angle, see what’s happening when you write; you are writing is some of it with angle of engineer so we see technicality, also when you write you give it HUMAN TOUCH, i.e. what you experience and about other people. Thats what makes it interesting. human interactions and emotionalism attracts more reader. and it would be fun to read those, specially with your kind of travelling and interaction experience. please keep writing if possible.

 6. bhaanasa says:

  khupach chaan lihitay Mahendra. Vachatana kahi prasang dolyasamor ubhe rahat aahet. Aawadatey.

 7. अमोल,
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. खरं सांगायचं तर कांहीच ठरवुन लिहिलेलं नाही. आणि खरं तर सगळं आयुष्यंच या फिल्ड मधे गेलंय त्यामूळे थोडं जास्तंच प्रेम आहे इंजिनिअरिंग विषयांवर..थोडं जास्त पर्सनलाइझड होणं शक्य आहे… विथ सम ह्युमन टच..
  प्रयत्न करतो पुढे.

  भानसा
  धन्यवाद. अहो, आता आठवतोय तर एकदम जाणवतं की आपण, जागांची नावं विसरलोय, लोकांचे चेहेरे फक्त अंधुक आठवतात. नांवं लक्षात नाहीत.
  सगळा जुना पिरियड एकदम डोळ्यासमोरुन सर्रकन गेला एका क्षणात.

 8. Aparna says:

  अनुभव इतक्या छान पद्धतीने लिहिलेत की सलग वाचत राहावेसे सर्व भाग झालेत..मलाही आता जास्त जुने न झालेले दिवस आपल्याकडून लिहुन घ्यावेसे वाटताहेत….:)

 9. prabhakar says:

  त्या सिनेमाचे नाव ” काला पथ्थर ” असे आहे . काला पाणी नाही. काला पथ्थर म्हनजे दगडी कोळसा .

 10. sachin says:

  सर तुमचे चार पोस्ट वाचले. आवडले. मला वाटते तुम्हि पुस्तक लिहा. नाव इंजिनिअर एक्स्पिरिअन्स. आकार छोट्या डायरी

  • सचिन
   मनःपुर्वक आभार. पण पुस्तक वगैरे कोणी विकत घेऊन वाचणार नाही. मी ह्याची पिडीएफ फाइल ( इ बुक ) बनवण्याच्या विचारात आहे . अजून ट्राय केलेले नाही, पण इच्छा आहे.

   • Santosh Kudtarkar says:

    Kaka… PDF book banawlat… Tar naaw… “Engineer Diaries” asa thewa, chaan watel 🙂 😉

    • संतोष

     तसा विचार नाही बनवायचा.. कारण बनवताच येत नाही 🙂

     • Ashish says:

      दादा, आताच ही आपली सिरीज वाचली सलग.
      १ ते ४ तर झक्कास जमले आहेत. पुढचे वाचत आहे लगेच.
      इथे प्रत्युत्तर द्यायचे कारण की PDF चा विषय निघाला न माझ्यातला कॉम्पुटर इंजिनीअर चा किडा वळवळला.
      आपली परवानगी व इच्छा असेल तर मी ह्याच्या PDF बनवून आपणाला देऊ शकतो.
      किंवा आपणही बनवू शकता PDF९९५ हे सोफ्टवेअर डाऊनलोड करून.
      कळावे.
      खूप दिवसानंतर आपला ब्लॉग वाचणारा

      • आशिश, धन्यवाद. हे लेख अगदी सुरुवातीला लिहिले होते, जेंव्हा लिहायला काहीच विषय मिळत नव्हता तेंव्हा उगीच स्वतःच्या आठवणी लिहीत होतो. नंतर ओपन ऑफिस मधे पिडीएफ बनवायला शिकलो, पण पिडीएफ करूनही काय फायदा? म्हणून पुढे गेलो नाही.

 11. Pankaj Z says:

  अहाहा… टीगार्डन, टी इस्टेट्स, डोंगरउतार… निळे आकाश, कापशी ढग… दिल गार्डन गार्डन हो गया. आय एन्व्ही यू !

 12. Pingback: माझं बॅचलर लाइफ…(२) | काय वाटेल ते……..

 13. ni3more says:

  kulkarani kaka ekdum horror story ahe ho tumchya life chi kuthe kuthe firave lagat hote tumhala aani to tumcha bhinar madhala dangour anubhav watchatana angawar shahara aala majya

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s