सोन्याच्या खाणी.. मॅकेनाझ गोल्ड आठवलं का? छेः.. तशी नसते गोल्ड माइन्स. आपल्या डॊक्यात कसल्या भन्नाट आयडीयाज असतात ना एखाद्या गोष्टी बद्दल?
मी दोन माईन अगदी जव्ळून पाहिल्या आहेत. एक म्हणजे चिकरगुंटा (अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्स) , आणि दुसरी म्हणजे गदग. खरं तर गदग ची माइन फार जुनी . अगदी ब्रिटीशांच्या काळापासून सुरू असलेली माईन ही त्यांनी जातांना बंद केली होती, पण एम ई सी एल ने ही माईन परत सुरू करण्यासाठी सरकारला मदत केली.
एमईसीएल ही कंपनी मुख्यत्वे करुन जमिनीतला स्टॅटा समजण्यासाठी जमिनीला ड्रिलींग करुन एक संपुर्ण कोअर सॅंपल बाहेर काढते. नाही….या करता वापरली जाणारी मशिन ही , तुम्ही जी पाण्याकरता बोअरिंग करण्याची कॉम्प्रेसर ड्रिव्हन मशिन पहाता, तशी नसते ! ही कोअर ड्रीलिंग मशिन खूपच वेगळी असते. कारणं उद्देश हा जमिनीला भोक पाडणं नसतो, तर त्यातुन जमिनीचा सॅंपल बाहेर काढणं हा असतो.
तुम्ही जेंव्हा ड्रिल करता तेंव्हा सॅंपल कोअर काढतात. मग त्याचा सॅंपल स्टडी करुन जमिनिखाली काय असेल ते ठरवतात. एमईसिएल ही कोअर सॅंपल काढुन , त्याचं ऍनॅलिसिस करुन देते. ड्रीलिंग करतांना कोअर तुटू नये म्हणून मड पंप वापरला जातो. म्हणजे काय, तर ड्रिल ला थंड करणे आणि कोअर सेव्हिंग साठी स्पेशल मातीचं मिश्रण करुन ते ड्रीलिंग करतांना इंजेक्ट करतात. हे मिश्रण त्या कोअरला एक प्रकारे कोटींग फॉर्म करुन प्रोटेक्ट करते. असो.. तो एक पुर्ण वेगळाच विषय आहे.
गदग गोल्ड माइन्स ही एक फार जुनी माइन्स. अगदी ब्रिटीशांच्या काळपासुन. ब्रिटीश जेंव्हा भारत सोडून गेले, तेंव्हा ही माइन्स बंद करण्यात आली. आता पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले शासनाने. या माइन मधे सोनं हे अगदी कमी प्रमाणात मिळतं. दोन टन ओअर क्रश केला की फारतर .२ ग्राम सोनं निघतं. यावरून कल्पना येइल . असं म्हणतात , की पूर्वीच्या काळी सोन्याचे तुकडे सापडायचे गदग ला- खरं खोटं देव जाणे..
इथे ऍक्चुअल माइन मधे काम सुरु झालेलं होतं. सोन्याच्या माइन्स मधे अजिबात सिक्युरिटी वगैरे नव्हती. मला एक दगड खाली पडलेला दिसला. त्यावर पिवळा धमक मेटलचा कण चकाकत होता. मला वाटलं की तो सोन्याचा कण आहे म्हणून. तर माझ्या बरोबर असलेला एक अधिकारी म्हणाला, हे सोनं नाही.. याला फूल्स गोल्ड म्हणतात. हे खरं तर पायराइट्स आहेत . हे अगदी मुबलक प्रमाणात दिसतात. पण यांच्यामधे सोन्याचा अंश नसतो. तरी पण तो पिस हातातच धरुन ठेवला , म्हंटलं, सोव्हेनिअर म्हणुन नेतो बरोबर. आणि घरी नेऊन सगळ्यांना उल्लू बनवतो.
चिकरगुंटा साइटला माझा सख्खा मामेभाउ अशोक देशपांडे होता. त्याच्याच रुमवर उतरलो होतो साइटवर. त्या रुमला रुम म्हणायचं का हा खरं तर प्रश्नच होता. जिओलॉजिस्ट लोकांचं आयुष्य खरंच खूप खडतर असतं. नंतर तो हा जॉब सोडून साऊथ अमेरिकेला गेला.
ही साइट कोलार च्या अगदी लागुनच होती. कोलार माइन्स अंडरग्राउंड आहे आणि आता माइन फार खोल गेल्यामुळे माइनिंग करणे फार एक्सपेन्सिव्ह होतंय, आणि म्हणुन भारत गोल्ड माइन्स चे लोकं इथे अजुन कुठे सोनं सापडतंय का ते शोधताहेत. अडरग्राउंड माइन्सला जातांना प्रोटेक्टिव्ह गिअर्स म्हणजे, हेल्मेट, माइनिंग शु, बॅटरी आणि हेल्मेटवरचा टॉर्च हे मस्ट असतात. माझ्या कडे शुज नव्हते, म्हणून एका इंजिनिअरने त्याचे शुज काढून मला दिले. साईझ थोडा लहान होता, पण ठीक आहे.. मॅनेजेबल होता. केजिएफ च्या माइन्स मधे मी आंत जाउन आलो. खरंच खूप भितीदायक वाटते. ( बरेच लोकं मान्य करणार नाहीत, कदाचित आपला मॅचो नेस दाखवायला म्हणून! पण खरी परिस्थिती म्हणजे जर तुम्हाला सवय नसेल तर भीती वाटतेच) तसाही, आपण जमिनीखाली आहोत, ह्या कल्पनेनेच थरकाप उडतो.. आणि इतक्या खोल??? शेवटी सिनेमांचा इम्पॅक्ट पण असतोच ना! सोन्याच्या खाणीत जाउन पण सोनं कांही दिसलं नाही.. 😦
टी गार्डन्स मधे असतांना कालिमपॉंग जवळच होतो. एका गार्डनमधे .. नांव विसरलो आता. त्या काळी सेल फोन नव्हता. त्या मुळे जो पर्यंत मी ऑफिसमधे अथवा बॉस शी कॉंटॅक्ट करत नसे , तो पर्यंत कोणाशीही कसलाही संबंध नाही. बरं एस टी डी पण इतकं कॉमन नव्हतं. त्यामुळे फोन पण लावणे सोपं नव्हतं.ट्रंक कॉल बुक करावा लागायचा. ट्रंक कॉल लावल्यावर तो थ्रु होईल याची खात्री नसायची. म्हणजे असं, की फोन बुक करुन बसायचं एखादं पुस्तक वाचत. तुमचं नशिबच असेल तर थ्रु होईल तो कॉल, नाही तर बसा वाट बघत.
इथे ऑफिसमधून निघतांना कस्टमर्सची लिस्ट दिलेली असायची. आणि सिक्वेन्स पण सांगितला जायचा- जॉग्रोफिकली सोपं पडावं म्हणून. त्यामुळे कांही काम पडलं तर ऑफिसला अंदाज असायचा की कुठे असेल हा सर्व्हिस इंजिनिअर म्हणून.. तर, काही काम निघालं की मग ते टेलिग्राम पाठवायचे . बहुतेक वेळेस पुढचं डेस्टीनेशन त्या गार्डन मॅनेजरला माहिती असायचं. ( टेन्टेटिव्हली कुठे असेल ते अझ्युम करुन टेलिग्राम पाठवायचे ऑफिसमधून) आणि जर एखाद्या पत्त्यावर टेलिग्राम पोहोचला , आणि तुम्ही पुढच्या डेस्टीनेशनला गेलेले असाल, तर तो मॅनेजर अगदी स्वतःच्या घरचं काम आहे असं समजून टेलिग्राम पोहोचवायचा आमच्या पर्यंत.
आकस्मितपणे एक टेलिग्राम आला की मला भुतानला एका इंडीयन मिल्ट्रीच्या अखत्यारीत असलेले एक इन्स्टॉलेशन बघायला जायचं आहे. भारत आणि चिन मधले कनेक्शन असलेले एक ईंडोभुतान मायक्रोवेव्ह प्रोजेक्ट — म्हणजे, एक मायक्रोवेव्ह टॉवर इन्स्टॉल केले होते, साधारण १७००० फुट समुद्र सपाटीच्या वर. वर जायला फक्त चॉपर्स. टेम्परेचर सब झिरो १० ते २० कितीही असू शकायचं. तर तिथे एक त्या क्लिफ वर एक जनसेट लावलेला होता. त्याला संपुर्णपणे रेडिओ कंट्रोल्ड सिस्टिम होती. म्हणजे तो सेट त्या क्लिफ वर न जाता खालूनच सुरू करता यायचा, किंवा बंद करता यायचा. लोड चेंज ओव्हर पण ऍटोमॅटीक होतं. आता वाचायला खुप साध आणि सोपं वाटतंय.. पण त्या काळी हे सगळं म्हणजे अगदी स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी होती. पॅनल मधे बरीच इलेक्ट्रॉनिक कार्ड्स.. आम्हाला फक्त कार्ड बदलणं इतकंच येत होतं. हा अनुभव अगदी लक्षात राहिला तो थंडी मुळे. 🙂
जग किती लवकर बदलतं नाही? सॅटेलाइट कनेक्टिव्हीटी, किंवा तत्सम गोष्टी वापरुन, आज भारतामधून अमेरिकेतील एखाद्या ठिकाणची मशिनरी इंटरनेट च्या थ्रु कंट्रोल करणं पण अगदी सोपं आहे. इतकं सोपं की माझ्या मित्राच्या मुलाने इंजिनिअरींग च्या फायनल इयरला यावर प्रोजेक्ट केलं होतं. 🙂
टी गार्डनचं काम झालं की मग मी कलकत्याला परत जात असे. कलकत्याचं महाराष्ट्र मंडळ, अगदी मस्त आहे . रहाण्याची आणि जेवण्याची सोय अगदी उत्क्रुष्ट आहे. तिथे पण माझ्या अगदी जवळच्या ओळखीचे कुलकर्णी रहायचे. त्यामुळे थोडं ऍट होम फिल व्हायचं. एक दिवाळी मी तिथेच होतो. मला सुटी न मिळाल्यामुळे मला कलकत्यालाच रहावं लागलं होतं. खरं तर बॅचलर माणसाला घरी काय आणि कुठे बाहेर काय- काहीच फरक पडत नाही. पण भाउ बिजेला मात्र घरची आठवण यायची.
दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्र मंडळात अगदी अभ्यंग स्नानासाठी उटणं , नंतर फराळासाठी चकली, चिवडा, वडी आणि इतर बरेच पदार्थ होते. नंतर जेवणातही अगदी घरच्या प्रमाणे.. आणि आग्रह करुन वाढणारे लोकं.. खरंच .. मी त्यांनी केलेली सरबराई कधीच विसरू शकत नाही. बघा ना.. आता २५ वर्षानंतरही आठवण आहे.. 🙂
नागालॅंड साइडला फक्त एकदाच जाणं झालं . नंतर पुन्हा कधीच गेलो नाही. तिथे गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की राज्य भाषा इंग्लिश असल्यामुळे बहुतेक सगळे लोकं इंग्लिश अगदी चांगल्या तऱ्हेने बोलू शकतात. इथे नॅचरल गॅस वर चालणारे जनरेटर्स सप्लाय केले होते. या भागात प्लायवुड मॅन्युफ़ॅक्चरिंगच्या पण ्खूप इंडस्ट्रीज होत्या. आसामला बहुतेक बिझिनेसमन्स मारवाडी असायचे. तशीही खाण्यापिण्याची खूपच आबाळ व्हायची. हॉटेलमधल्या मेनू कार्डमधे पिजन फ्राय , किंवा पिजन करी अगदी बहुतेक ठिकाणी दिसते.
बऱ्याच लोकांना निरनिराळ्या प्राण्यांचं किंवा पक्षाचं मांस खाण्याची क्रेझ असते. परवाचीच गोष्टं, अहमदाबादला गेलो असता, एका मित्राने ऑफर दिली की स्पेशल (हरणाचे) मटन आहे .. चल खायला.. पण म्हंटलं की डायटवर आहे म्हणून रेड मिट खात नाही, आणि टाळलं. बरं लोकांना, हे असं खायची आवड असतेच, पण आपली पोहोच किती आहे हे दाखवायला म्हणून खायला घालायला पण आवडतं. असो..तर काय सांगत होतो, नागालॅंडला असतांना एका हॉटेलला गेलो. अगदी लहानसं हॉटेल.. त्या प्लायवुड फॅक्टरी जवळचं. तिथे जेवायला नेलं मला मेंटेनन्स इंजिनिअरने. ताटामधे खुप मोठा भात, शेजारी कसली तरी करी.. आणि भाता खाली लपलेला मांसाचा एक तुकडा.. जेवण झालं, मग त्याला विचारलं.. ( आणि मूर्ख पणा केला.. कशाला विचारायचं एकदा खाणं झाल्यावर ? पण नाही, जास्त बोलायची आवड नां?) ये कोनसा मिट था? जरा अलगही लग रहा था.. तर म्हणे ये ’जमिन का फिश’ है. माझ्या नजरेतलं प्रश्न चिन्ह बहुतेक त्याला समजलं होतं. त्याने अजुन एक्स्प्लेन केलं, ये स्नेक है……आणि मला एकदम मळमळणं सुरु झालं.. केंव्हा एकदा सगळं खाल्लेलं बाहेर काढतो असं झालं..शेवटी उलटी केली आणि मग दिवसभर तसाच उपाशी राहिलो. नंतरचे दोन दिवस पण जेवायला बसलो, की मळमळ सुरु व्हायची.
ही गोष्टं जेंव्हा माझ्या मित्राला सांगितली, तर म्हणाला, तू तर लकी आहेस, की तुला डेलिकसी म्हणुन कुत्रा नाही खाउ घातला त्या लोकांनी.. मी बेशुध्दंच पडायचा बाकी होतो. त्याने सांगितले, की इथे एक पद्धत आहे. एखाद्या कुत्र्याला तिन दिवस उपाशी ठेवतात, ( त्याचं आतड साफ व्हावं म्हणून) नंतर एक दिवस त्याला बासमती भात खाउ घालतात. आणि नंतर काही वेळाने त्याला तो भात डायजेस्ट होण्यापूर्वी हेड ऑफ करतात. नंतर , त्याच्या पोटातला भात हा नंतर कांही कुकिंग प्रोसेसेस करुन एक डेलिकसी म्हणुन खाल्ला जातो. झालं, नंतर तर मी तिथे असे पर्यंत भात खाणं पण बंद केलं होतं. फक्त ब्रेड आणी बिस्किट्स वर दिवस काढले होते. तेंव्हापासून अगदी पक्कं लक्षात ठेवलं आहे, की कुठेही गेलॊ तरी आधी कुठलं मीट आहे ते विचारायचं आणि नंतरच खायचं.
Aga aaiga, saap khallaa. Khare aahe ekda khavoon zalyavar kashala vicharyche, :). Ani he kutryache lihilet…ई…………खरचं की काय? शीशी…काय काय लोक खातील तेवढे थोडेच आहे. तुमच्या ह्या मालिकेतून काही गोष्टी कळत आहेत. छान चाललेय. 🙂
भानसा
खरंय ते.. अहो अजुनही नागालॅंड मधे साप वगैरे खाणं अगदी नॉर्मल समजलं जातं. मी नंतर पुन्हा कधी तिकडे गेलो नाही.. कुत्र्याचं.. हॊ, ते ऐकलंय तिथेच असतांना…
प्रतिक्रियेबद्दल आभार.
ur fast……, ratri jagun jagun lihitay wa! nagaland la chinese food chee hawa lagle li distey 😉 , Me ajun saapacche meat pahile nahi aahe, pan ROAST BEEF navacha ek prakaar atishay vichitra asto he me ethe baghitley kadachit tas kahi hot kaa?.
any ways पण आपली पोहोच किती आहे हे दाखवायला म्हणुन खायला घालायला पण आवडतं. he matra me barech da anubhavala aahe mitra madhye.
अमोल,
रात्री नाही लिहित.. लिहितो दिवसाच, फक्त शेड्युल करुन ठेवतो ब्लॉग वर पब्लिशिंग साठी. तशी प्रोव्हिजन आहे वर्ड प्रेस वर.
सापाचं मिट पांढरं असतं फिश प्रमाणे.. दिसायला.
tumhi lihitaay ha kaal 80’s hota kaa? aani tya velela drills kuthli hoti? customs drills ki imported ones ? photo aahet ka ?
हा काळ साधारण ८३ ते ९० चा. या वेळेस भारता मधे कोरस ड्रिल्स , व्होल्टास रॉक ड्रिल्स, आणि ग्रिव्ह्ज ड्रिल्स ( सगळी स्किड माउंटॆड) अव्हेलेबल होती.इतरही लोकल लोकं मॅन्युफॅक्चरिंग करित असत. ९-७/८ इंच साइझ चं ड्रिल वापरुन कोअर सॅंपलिंग केलं जायचं.
८८ च्या पिरियडला मग नावाचं ट्रक माउंटॆड ड्रिल ( इन कोलॅब्रेशन) आणलं मार्केटला. ते बाकी एकदम फास्ट होतं. एकदा तुम्ही आउटरिगर्स सेट केले की ड्रिलिंग एकदम फास्ट व्हायचं.
त्याकाळचे फोटो नसतिल पण तरिहि चेक करतो एखादी हार्ड कॉपी असेल तर स्कॅन करुन टाकतो.
http://mecl.gov.in/Drilling.aspx Some pics you can see here..
मला वाटतय हे सगळे लेख एकत्र करुन ते तुम्ही प्रकाशित करा…असेही बरेच लोक आहेत जे ब्लॉग्ज वाचत नाहित….आणि तुमचे अनुभव त्यांच्यापर्यंतही पोहोचावेत असे वाटते……….
बाकी ते साप आणि कुत्रा वगैरे भयंकर…..
तन्वी
धन्यवाद.. पण नाही .. हो, इतकं काही चांगलं लिखाण जमत नाही अजुन. पण तुम्हा लोकांच्या शुभेच्छा मुळेच लिहीणं होतंय.. आणि पुन्हा हुरुप वाढतोय लिहिण्याचा.
तकं काही चांगलं लिखाण जमत नाही अजुन
ase mhanu naka lokanana aavadate mhanun te vachatat……
pustak liha jast bhav khavu naka.
अमोल
अभिप्रायाबद्दल मनःपुर्वक आभार..
प्रयत्न करिन पुढे..
सध्या तर लिहिणंच सुरु ठेवतो कांही दिवस..
tumachi sapachi gosht vachun , aappasaheb khot yanchee “bhook” he katha
aathavali. tyat ajantepanee aai aapalya bhukelya mulana masa mhanoon saap khau ghalate.
sumedha
thanks for the comments.. ON vacation now, so will repy in details at leisure.
७ पासून उलटा वाचत निघालोय…
तुम्ही जे कुत्र्याचं म्हणताय ते मी उंटाबाबत वाचलं होतं… खाणं बोकडाच्या पुढे नाही मात्र! 🙂
सर्व साधारण माणसाचं आयुष्य आहे ते. बस्स..
kay tras sahan karav lagla khanya babat aaplya bhartat khanya babat sudhaa vivdhta aadhlun yete…
गीता
त्याला साहस म्हणता येणार नाही, कारण सगळं नकळत घडत गेलंय.. मुद्दाम केलं तर साहस, नाहीतर एक अनुभव या पलिकडे काही नाही.
Pingback: माझं बॅचलर लाइफ…(२) | काय वाटेल ते……..
kulkarani kaka tumhi agadi dangour life jagala ahat hot tumacha to snek khanyacha prakar te aaikun tar majya angawar kaate aale
नितीन
तरुण रक्त… सगळं चालायचंच.
तुम्ही मागील एका लेख मध्ये लिहिले होते की साप खाल्ला ते सांगेन
ते आता वाचून अंगावर काटा आला.
मी शाकाहारी पामर माझ्या एका मित्राने पनीर च्या भाजीमध्ये एकदा चिकन चा एक तुकडा मिसळला होता
तो तुकडा कशाचा होता हे मला माहित होते पण सध्या हा लेख वाचून डोक्यात शिट्ट्या वाजल्या.
मस्त लिखाण
तो प्रसंग आठवला की अजूनही अंगावर काटा उभा रहातो .