माझं बॅचलर लाइफ…(६)

सुरतेला एक कस्टमर होता. त्याच्या सेट ला रिपिटेड प्रॉब्लेम्स आले होते, त्या मुळे तो  जरा वैतागलेला होता.  मला त्या कस्टमर कडे पाठवले होते.  त्याच्या समोर जाऊन बसलो, काम तर करू देत नव्हत, पण नुसत्या   धमक्या  मात्र देत होत.  सारखं आपलं एकच पालूपद लावलं होतं त्याने “मसिन बदली कर दो.. नहीं तो गोली मार दुंगा…”

जेंव्हा मला सांभाळणं अवघड झालं, तेंव्हा   आमच्या मॅनेजरला  साइटला या म्हणून विनंती केली .आमचे एक  मॅनेजर होते मराठीच..त्यांचं  खास पुणेरी मराठी म्हणजे ऐकायला मस्तं वाटायचं. एखाद्या  कस्टमर कडे जाउन आल्यावर सांगायचे ” अरे तुला काय सांगु? त्या कस्टमरने माझी चडीच काढुन घेतली” . नंतर मग ते टुरला गेले की त्यांच्या कीती चड्या कस्टमर्सने काढुन घेतल्या ते आम्ही मोजायचो. त्यांना आम्ही बाबा म्हणायचो- ’अ फादरली फिगर ’म्हणून!पण ऍज अ पर्सन एकदम मस्त होते बाबा. खुप काळजी घ्यायचे आमची.

तर एकदा आमचे हे मॅनेजर सुरतला आले होते. मी  अर्थात   तिथे साइटलाच  त्यांची वाट पहात बसलो होतो. कस्टमर म्हणजे एक  नावाजलेला गुंड   सुरतेतला.त्याला भेटायला गेलो, तर त्याने आपलं रिव्हॉल्व्हर काढलं, आणि त्याच्याशी खेळु लागला. मला वाटतं आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न असावा.’बाबा’ एक्स नेव्ही- अगदी शांत बसला होता.त्याने रिव्हॉल्व्हर उचलले आणि  म्हंटलं, अरे भाइ ये कोनसा बाबा आदमके जमाने की गन युज करत्ते हो? मेरे  जैसे मिडलक्लास आदमी के पास भी जर्मन रिव्हॉल्व्हर है- आप तो बडा  आदमी है? फिर भी इतनी फालतु गन रखते हो?

हे ऐकलं आणि तो एकदम चांगला बोलायला लागला. मला कळेचना की कालपर्यंत माझ्यावर इतका ओरडणारा हा माणुस शांत झालच कसा? त्या नंतर मशिन बद्दल बोलणं नव्हतंच, बोलणं सुरू झालं,कुठली गन चांगली? वगैरे वगैरे.. मग त्याच्या समोरच बाबा मला म्हणाला, अरे तू यहां क्या कर रहा है? जा मशिनपे जाके काम कर. मै और वेल्जी भाई जरा बाते करते है. मी जरा घाबरत वेल्जी भाई कडे बघितलं.. पण त्याने ठीक आहे अशा अर्थाने मान हलवलली…आणि मी मशिनवर गेलो आणि पॅनल मधले रिले  बदलले.मला आश्चर्य वाटते ते ह्याचं की बाबाला का सोडून दिलं त्या कस्टमरने?

एकदा एका साईट वर असतांना एका अर्थ मुव्हिंग कंपनीचे व्ही पी साइटला आले होते.कॉमन कस्टमर होता. आणि तिथे मिटींग झाली कस्टमरशी बोलणं झाल्यावर मला त्यांनी जॉब ऑफर केला. म्हणाले नागपूर ऑफिस मधे तुला .. म्हणून  जॉब देतो.  पेपर टाकायचा ठरवलं, मग कंपनी मधल्या आमच्या मुंबई रिजनल ऑफिस मधल्या एका वेलविशर मॅनेजरबरोबर बोललो, त्यांना या ऑफर बद्दल  सांगितलं -तर ते म्हणाले, नोकरी कशाला सोडतोस? तुला नागपुरला ट्रान्स्फर करु या.. आणि माझं  पण आता लग्नाचं वय झालं होतंच त्यामुळे आता जास्त दिवस टूर वगैरे करणे शक्य नव्हते म्हणून एका जागी स्टेबल जॉब म्हणून   नागपूरला झालेली बदली मान्य केली.

माझा लॅप टॉप क्रॅश झालाय म्हणून ह्या दुसऱ्या कंप्युटर वरून  पोस्ट करतोय पण ह्याच्या की बोर्ड च्या ड्रायव्हर्सना प्रॉब्लेम असल्याने  फार त्रास होतोय. नंतर पुर्ण करीन हे पोस्ट माझा लॅप टॉप दुपारी मिळाला की.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

9 Responses to माझं बॅचलर लाइफ…(६)

 1. Nandkeishore says:

  Hey Sir your articles are really good and readable….. mi nehmi vichar karto ki mala ase keva lihita yeil…

 2. Vikrant says:

  Hmm…..Waiting for your laptop to resume & your next article…
  This is becoming very enchanting now….
  Taking inspiration from you & Aniket, I also started writing some blogs in Marathi !!!!
  Visit my blog to read my latest one ते मंतरलेले दिवस….

  Reg

 3. abhijit says:

  तुमची ब्लॉग लिहिण्याची स्पीड भयंकर आहे ! मानला पाहिजे. तुमचे एवढे अनुभव पाहुन वाटतं अपनी तो अभी शुरुवात है।

 4. अभिजित
  मार्केटींग मधे असे खुप लोकं भेटतात.
  नविन जागा, नविन लोकं.. मजा असते.
  प्रॉडक्शन पेक्षा तरी नक्कीच बरंय!
  मी सेल्स मधे पण ८ वर्ष काम केलंय.. तो पण एक
  वेगळाच अनुभव आहे.

  आणि इथे लोकं वाचताहेत ना,
  म्हणुन लिहायचा उत्साह आहे.

 5. geeta says:

  really matr thakkkha jhale……………

 6. Pankaj Z says:

  “ये कौनसा बाबा आदमके जमाने का…” हाहाहा… हे बेस्ट होतं.

 7. Pingback: माझं बॅचलर लाइफ…(२) | काय वाटेल ते……..

Leave a Reply to Pankaj Z Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s