जिझस जिन्स मधे..

आजच वाचण्यात आलं की  इंग्लंड मधे ( इस्ट ससेक्स मधे) फादर डेव्हिड बकले, यांनी एका ३५ हजार पाउंड किमतीच्या सात फूट उंचीच्या जिझस च्या पुतळ्याचे उदघाटन केलं .  त्या पुतळ्याचा फोटॊ खाली दिलेला आहे.

जिझस जिन्स, ओपन बटन शर्ट, आणि जिन्स घालुन आहे.हवेमुळे शर्ट उडतोय. बरं जिझस चे केस पण अगदी व्यवस्थित कापलेले आहेत, दाढी ट्रिमिंग केलेली. हा पुतळा १०० फुट उंचिवर लावण्यात येणार आहे.

याचा उद्देश आहे, जिझस अ मॅन ऑफ २१ सेंचूरी म्हणून डिपिक्ट करण्याचा उद्देश आहे.असंही मुख्य प्रिस्ट ने सांगितले. जिझस ला लोकांच्या जास्त जवळ पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. जर तुमचा देव तुमच्या सारखाच असला, तर मग तुम्हाला त्याच्या बद्दल जास्त आत्मियता वाटेल .. असा उद्देश असावा एकदम स्टायलिश जिझस आहे हा. नेहेमीचा क्रुस वर लटकणारा काटेरी मुकुट असलेला जिझस बघून लोकांना त्याच्या बद्दल कणव येते, म्हणून तर अशी प्रतिमा तयार केलेली असावी…

एका स्विडीश चर्च ने ३०,००० पिसेस लेगो ब्लॉक्स वापरुन स्टॉकहोमपासुन ७० किमीवर असलेल्या एका चर्चमधे लावलेली आहे.

बरं हे एकच नाही, आणखी एक गोष्ट आहे..

आपल्याकडे दर वर्षी गणपतीच्या वेळेस वेगवेगळे गणपती बघायला मिळतात. त्यामधे एखादा, नारळाचा, एखादा सुपाऱ्यांचा , एखादा अजुन कसला तरी.. असे अनेक प्रकार असतात. लोकमान्य टीळकांच्या स्वरुपातला गणपती तर प्रत्येक वर्षीच असतो. खरं तर आपण सगळ्यांनी गणपतिला कुठल्याही स्वरुपात ऍक्सेप्ट केलेलं असतं. पण …..
gpepsi
हे अशा तऱ्हेने  इतर देवांच्या बाबतीत ,त्यांच्या पारंपारिक स्वरुपाशी कांही प्रयोग केलेले भारतात सहज मान्य केले जात नाहीत.

कांही दिवसापुर्वी भारतामधे एकदा लखनौ मधे बांके बिहारी मंदिराच्या पुजाऱ्याने कृष्णाला जिन्स ,घालुन हातामधे सेल फोन दिला होता बासरीच्या ऐवजी  म्हणून त्याला पुजारी पदावरुन काढून टाकलं होतं. आता मला तरी या मधे काही विशेष वाटत नाही. विनाकारण एखाद्या गोष्टीचा इशू करतो आपण.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s