बऱ्याच वर्षांपूर्वी अगदी नवीन नवीन पहिल्यांदाच गुजराथला गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे. गुजराथी भाषा तेंव्हा मजेदार वाटायची . अर्धं कळायचं आणि ,उरलेलं अर्ध पुढचा माणुस काय बोलला असेल ह्याचा अंदाज लावायचा. त्यातल्या त्यात कच्छी कस्टमर असेल तर अजूनच पंचायत व्हायची.
कच्छी गुजराथी फारच वेगळी असते. भुज, अंजार साईडला गेलं की खूप वेगळं वाटायचं. एखाद्या कस्टमर ला भेटायला म्हणून तुम्ही गेलात आणि जरी तो हिंदी मधे बोलत असला तरी पण तो काय बोलतोय ते समजायला हिंदी टु हिंदी भाषांतरकाराची आवश्यकता भासायची. ह्या गुज्जू कच्छी लोकांचं हिंदी पण अगदी गुजराथाळलेलं- आणि अगम्य वाटायचं. माझा पहिलाच टूर कच्छ मधला.
कस्टमर ला भेटायला गेलो. तिथे गेल्यावर बाहेरच्या प्युनने आत जाउन सांगितलं की पुना से कंपनी का साब आया है. ती फॅक्टरी होती टाइल्स ची. मालकाने आम्हाला आत बोलावले. ते महाशय . धोतर, शर्ट, पोट सुटलेलं, समोर टेबलवर वर्तमान पत्रा वर फाफडा आणि जलेबी ठेवलेली, शेजारी कच्ची पपई आणि तळलेली मिरची..
त्याच्या समोर दोन त्याच्याच सारखे दोघं शेठजी बसलेले. त्यांना शेटजी म्हणतो, कारण ते खरंच शेठजी सारखेच दिसत होते. सगळ्यांचं सारखं खाणं सुरू होतं . आपण एखाद्या ऑफिस मधे आलो, की अजुन कुठे? अशी शंका यावी! आम्हाला पाहिलं, आणि म्हणे खुर्ची कडे इशारा करुन बसा म्हणाला. तोंडात फाफडा जिलेबी चा तोबरा असल्यामुळे बोलता येणे शक्य नव्हतं. मी काही बोलण्यापूर्वी , पहले फाफडा खाओ..असा इशारा केला… ठीक .. आहे असं म्हणत फाफडा उचलला,एक लहानसा तुकडा मोडून तोंडात घातला , तर तो शेट जिलबी कडे बोट दाखवून.. ये लो.. असं म्हणून जिलबी हातामधे दिली. मला प्रश्न पडला,संपल्या शिवाय जिलबी हातात घेऊ कशी? पण तो माणुस जिलबी हातात धरुन समोर ! फाफडा डाव्या हातात ट्रान्स्फर केला आणि उजव्या हातात जिलबी धरली. आणि म्हट्ल, वो आपका जनसेट माटे आया हुं… सरळ दुर्लक्ष करुन म्हणतो, पहले खाओ भाई. काम तो होताही रहेगा.
और क्या लोगे, चाय या काफी? म्हट्लं चाय! आणि सगळा फाफडा संपेपर्यंत तो कांही बोलला नाही. त्याचं त्या दोन मित्रांशी पण बोलला नाही. थोड्याच वेळात एक कळकट माणुस चहाची किटली आणि बशा घेउन आला. तिथे असलेल्या सगळ्यांच्या हातात रिकाम्या बशा दिल्या. एक बशी मला पण दिली. आणि किटली मधून डायरेक्ट बशीत चहा ओतला.. ( अगदी खरं सांगतोय.. अजूनही ह्या प्रकारे चहा देण्याची पद्धती आहे. कच्छ मधे, )हल्ली जर कोणी बाहेरचा माणुस आला असला तर मात्र कपात देतात चहा.
सगळे जण मस्त फुर्रकरके पियो.. प्रमाणे चहा पित होते. मी पण चहा संपवला बशीतला, तर तो चहावाल्याने अजुन एकदा बशी भरली. तेंव्हा माझ्या लक्षात आलं की हो.. हा चहावाला अजुन गेलेला नाही..!
सगळं झालं, आणि मग त्याने काय प्रॉब्लेम आहे ते सांगितले. पण व्यक्तिमत्त्व मात्र एकदम मजेदार होतं. मी जनसेट जवळ गेलो, आणि लॉग बुक बघून चेक करतोय की मेंटेनन्स कधी केलं होतं वगैरे.. तर हा मालक तिथे पण आला, आणि म्हणाला… वो बादमे देखो, चलो, पहले खाना खा लो..
अरे म्हंटलं, थोडा देर रुको, अभी तो आया हूं.. पण हा माणुस काहीच ऐकायला तयार नव्हता.शेवटी सगळं काम बाजुला ठेवून मग ह्याच्या बरोबर गेलो . जेवून आलो, आणि मग नंतर काम केलं. दर अर्ध्या तासाने तोच चहा वाला, परत यायचं आणि बशी समोर धरायचा. शेवटी त्याला म्हट्ल भाई , मेरेको चाय नही देनेका. हे गुज्जु लोकं इतका चहा कसे पिऊ शकतात?
दुसऱ्या एका कच्छी कस्टमर कडे एकदा गेलो होतो ( ह्यांच्या कडे शिक्षण जरी नसलं तरी व्यवहार ज्ञान मात्र खूप असतं.) . तो अगदी थेट कच्छी भाषेतच बोलायचा. त्यामुळे त्याचं अर्ध्याहून जास्त बोलणं डोक्यावरून जायचं. डिलर सोबत ह्या कस्टमर च्या ऑफिस मधे शिरलो, तर हे महाराज तिथे बसले होते, पायातली चप्पल बाजुला पडलेली. मोठ्या रुममध्ये समोरच एक बाप्पा सियाराम चा मोठा फोटॊ, दोन उदबत्त्या आणि एक पितळेचा दिवा पेटलेला. मोठ्ठं टेबलं, मागे एक मोठ्ठी खुर्ची- शेठजीं करता बसायला(पण खुर्ची रिकामी). समोर चार खुर्च्या- व्हिजिटर्स साठी . मागे एक सोफा ! आणि हे मालक सोफ्यावर बसलेले!!!
आम्ही आत शिरलो आणि खुर्चीवर बसलो. त्याच्याकडे साहजिकच पाठ होत होती. अपेक्षा अशी होती की हा माणुस समोर खुर्चीवर बसेल, पण तेवढ्यात तो गुजराथी मधे कांही तरी बोलला. डिलर म्हणतो, सर जरा कुर्सी घुमा लिजिये.. आम्ही खुर्ची फिरवली आणि तोंड त्या शेठजी कडे करुन बसलो.
तो म्हणाला ” म्हारो इंजन हालतो नथी” … हालतो नथी?? अरे बाबा कसं काय हालेल? बेस फ्रेम ग्राउट केली असेल नां? मग हालेल कसं? मला काहीच कळेना.. मी जरा प्रश्नार्थक मुद्रेने डिलरकडे पाहिलं, तर आमचा डिलर म्हणतो, उसका मतलब है इंजन चलता नहीं.. म्हट्लं, उसको बोलो, उसका इंजन हलायेगा हम अभी जा के…. 🙂
गुजराथला अजूनही जातंच असतो रेग्युलरली, पण आता मात्र बराच फरक पडलाय गुजराथ मधे. ते जुने कच्छी लोकं आता मात्र कमी झाले आहेत. पुढची पिढी आलेली आहे बिझिनेस मधे. तुम्हाला खोटं वाटेल, मोरबी मधला बराचसा धंदा याच लोकांच्या हातात आहे आज काल.
एक साईट आहे भुज पासुन ७० किमी असेल . तिथुन पाकिस्तान बॉर्डर फक्त ३०-४० किमी आहे . अगदी समुद्र किनाऱ्या वरची साईट आहे ती. तिथे ब्रोमाईड चं मॅन्युफॅक्चरिंग चालतं.मस्त प्रॉडक्शन आहे. रॉ मटेरिअल म्हणजे समुद्राचं पाणी, आणि इलेक्ट्रिक पॉवर .. दॅट्स ऑल… त्या फॅक्टरीमधे तर लोकं सगळे भुज ला रहातात,आणि रोज जाणं येणं करतात .
पण एकदा तुम्ही बाहेर पडलात की सगळी कडे ते पाकिस्तानी ड्रेस मधले लोकं दिसतात सगळी कडे. रस्त्यावर कांही ठिकाणी खवा विकतांना दिसतात. अगदी शुद्ध दूधामधे साखर घालुन आटवलेलं पेढ्या सारखा खवा अगदी अप्रतीम मिळतो. तिथे गेलो की खवा/पेढा खाण्यासाठी म्हणून एक स्टॉप हमखास असायचा.
याच रस्त्यावर अगदी लहानसं हॉटेल . त्याला हॉटेल म्हणणं पण हॉटेलचा अपमान करणंच. एक लहानशी झाडांच्या पानांनी शाकारलेली झोपडी होती ती. तिथे चहाच्या बशा घेउन बसलेला एक माणुस- समोर चहाचं भांडं त्यामधे चहा+दुध+साखर ( -पाणी) खळ खळ उकळत होतं. तो माणुस हातामधे एक मोठा चमचा घेउन ते ढवळत होता.
चहा बनवतांना गुजराथी लोकं पा्णी वापरतात की नाही ही मला शंकाच आहे. इतका घट्ट चहा असतो, की आपण तो एक पुर्ण कप भर पिऊच शकत नाही . दोन तिन बरण्यात चवाण (फरसाण) भरलेलं. आम्ही तिथे स्पेशल चहा बनवायला सांगितला. स्पेशल म्हणजे पाण्याचा चहा, आणि दूध कमी! 🙂
गुजराथमधे पुर्वी जेंव्हा गॅसच्या ऑटॊ रिक्षा नव्हत्या , तेंव्हा लोकं रिक्षामध्ये केरोसिन आणि पेट्रोल मिक्स करुन चालवायचे. एकदा जातांना सहज पाहिलं की एका वळणावर वर एक रिक्षावाला पाय बाहेर काढून साईड दाखवतोय.. म्हंटलं.. हा काय प्रकार आहे? तर सोबत असलेला इंजिनिअर म्हणाला, यहापे ऐसाही सिस्टम है.. साईड दिखानेके लिए पैर दिखाते है.. गुजराथ मधले वाचक पृष्टी करतिल याची. याचं कारण अनॅलाइझ केलं असता असं लक्षात आलं की लोकं केरोसिन वापरतात पेट्रोल मधे त्यामुळे, जर ऍक्सिलरेटर सोडून हाताने साईड दाखवली तर ऑटॊ बंद पडण्याचा चान्स असतो..म्हणून पायाने साईड…. काय ?? सही आहे ना आयडीया??
अनुभव ! चीन मध्ये एक म्हण आहे एक मैल लांब अक्षरे वाचण्यापेक्षा एक मैल लांब चालल्याने माणसाला जास्त कळतं !
छान अनुभव आहेत. आणखी ब्लॉग्स ची वाट पाहतो आहे.
U are best SIR(DUDE lihinar hoto pan itkya anubhavi mansala DUDE manu ka nako prashna padtoy!baki ha pakau prof wala sir nahi ha!!!)
Mi ithe navin ahe,maze life madhle pahile te shevatch sagle aatach wachle!
Tumala bhari anubhav alet!As a mechanical engg,Mi mazya bhavishyat pan asha anubhavanchi apexha kartoy.
kalam prassana ahe lihit raha
Mandar
Thanks for the comment.
I have lived life as it come. Have never planned any thing in life, may be its wrong.. but thats the way i lived my life.. 🙂
Kaka… Aho wrong ani right kai ahe; it’s inspiration for many others like Me.
Dhanyawaad… Ayushyakade pahaycha tumcha swatahcha wegala drushtikon ahe… it’s so nice!!!
I believe the same!!! 🙂
Keep Walking!!!
संतोष
धन्यवाद .
Hello
AVADALE apalyala!!!
mast!!
ekdam 7 blog vachale tumache chan ahet!!!
best luck for next..
महेश
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता मनःपुर्वक आभार. 🙂
tumche purna 7 blogs ekdam vachle. tumchi likhanachi shaily ekdam sadhi pan lokanparyant pochnari ahe. asech navin navin vishayanvar lihit raha. vat baghte..
केतकी
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता आभार. येत रहा!
Chan ch ekdum, avadala 🙂
Ajun yeu dya kaka!
स्नेहा
अगदी सुरुवातीला ब्लॉग लिहायला विषय मिळत नव्हते तेंव्हा लिहिलं होतं हे पोस्ट. पुढचे भाग लिहायचे आहेच.. लिहिन लवकरच..
I have been a reader of your blog from some time now. One of the main reason i read it is cause you put your thoughts in Marathi. Today, i discovered your section on “my bachelor life” …was an interesting read.
It was even more involving cause, i’m in this working bachelor phase of my life. I think that i have a lot of potential and everything i dream, desire and plan at this time can be achieved.
Over-enthusiastic and impatient … that’s why sometime, i think i don’t value all the things that i have got. I was trying to learn for you experiences.
संदीप
ब्लॉग वर स्वागत. लिहिलेलं आवडलं हे तुम्ही आवर्जुन सांगितल्याबद्दल आभार.
ते सुरुवातीला मी अगदी काय लिहावे म्हणून समजत नव्हते, तेंव्हा ते लेख लिहिले होते. आप्ल्या आयुष्याकडे पुन्हा निर्विकार होऊन पहाण्याचा अनभव एक वेगळाच असतो.
तुमच्या पुढील आयुष्याकरता शुभेच्छा.
i am not a writer like u,
nor a good typist hence plesse forgive,
i cant type the MARATHI,
mhanun english made lihayacha prayatna kartoy.
ya pudhach blog lihal tevha plesse mala pathva
vat bahgotoy.
kahi gostinche vyasan lagate tasa tumachya blog che vyasan lagale aahe. aaj paryant uttar det navato avadel ka nahi mahit nahi,
pan aaj dhadas kartoy,
kshama kara,
KOLHAPUR la jevha yenar asal, tar adhi ek message dya mala bhetayala aavadel
madhunach kuthun tari bankecha ullekh disala anubhav changala hota suspence watla
pan pudhe kay zale? kalalecha nahi
krupaya kalava
wel done mahendajee
जीवनातले काही निवडक प्रसंग लिहिलेत. तुम्हाला आवडले , यातच भरून पावलो. आभार.
shubhaaste paMthaanaam
मनःपुर्वक आभार..
tumche bacelor life purna vachle ata! Kharya anubhavache bol!
निनाद
धन्यवाद..
पुढे आयुष्यात एखादं पुस्तक लिहायचंय कार्पोरेट लाइफ वर. 🙂
Sorry for giving feedback so late but……. Tumche he articles ( 1 to 7 ) nahi mahnalaat tari 60-70 vela vachleyat me………. He sarv anubhav dolyasamor ubhe rahtaat jashechya tase……. As I’m also completing engineering studies I’m also expecting all this in my future lyf……… If would get it………. I’ll definately implement some of ur tectics……….thanx ani pudhe tumi book lihinar asal tar mag majjach maja……… But nakki try kara book lihayala………
महेश
धन्यवाद. मला वाटतं प्रत्येकाला असेच काही अनुभव येत असतील. मला स्वतःच्या कार्पोरेट लाइफ बद्दल एक पोस्ट लिहायची आहे, पण ती रिटायरमेंट नंतर..
पुढची पोस्ट कुठेय? लिहा..
मनोज
अजूनही नोकरी सुरु आहे, आणि म्हणून सध्या करंट अफेअर्स बद्दल लिहीणं तितकंसं योग्य वाटत नाही म्हणून सध्या तरी या वर लिहीण्याचे काही मनात नाही, पण पुढे मागे नक्कीच संपूर्ण कारकिर्द लिहीन.. 🙂
what abhijeet quoted as a chinese proverb is true,but when we read what mahinra writes we feel as if we are walkingon his road.so nice description.
kadhi lihnar tumche pudhche blog me khup aaturtene waat pahat aahe………………..
्गीता
हे जे लिहिलं आहे, तेंव्हाचे बरेचसे लोक आता रिटायर्ड तरी झाले आहेत, किंवा संपर्कात नाहीत. पण या पुढचं लिहायचं म्हणजे ज्यांच्याबद्दल लिहायचं ते संपर्कात आहेत अजून.. म्हणून थांबलो इथेच.. पुढे कधी तरी लिहीन 🙂
pan kadhi sir?…..
लवकरच. … 🙂
Apratim….eka damat sagle vachun zale… ase vatat hote ki ha anubhavacha sangrah sapuch naye…
* sanpuch
सचिन
मनःपूर्वक आभार. गेले काही दिवस नेट वर नव्हतो म्हणून उत्तराला उशीर होतोय.
Pingback: माझं बॅचलर लाइफ…(२) | काय वाटेल ते……..
kaka ajun liha hya pudhe awadale tumche likhan i like u likhan
या पुढचे लिखाण नोकरी वर असे पर्यंत तरी करणार नाही. कदाचित नंतर लिहीन.. 😉 धन्यवाद नितीन.
बॅचलर लाईफ च्या सागळ्या पोस्ट एका दमात वाचुन काढल्या. सगळ्याच खुप आवडल्या.
फारच छान लीहीलं आहे.
अप्रतिम !!!!!!
नितीन
स्वतःबद्दल लिहीणं फार सोपं 🙂
lai bhari
महेंद्रजी, फार छान लिहिलं आहे. बॅचलरच्या पोस्ट सुंदर आहेतच. बाकी लिहिलेल्या पोस्ट पण आवडल्या.
Chan lihilay…mast