एअरपोर्ट सिक्युरिटी.

आज सकाळी मुंबईहून नागपुरला आलो. सोबत आमचा दिनेश भाई होता. तो सकाळी वापीहून आपल्या कारने आला मुंबईला ( म्हणजे तो सकाळी ३ वाजता निघाला असावा वापीहून). असं ठरलं होतं की त्याला फार लवकर निघावं लागेल म्हणून त्याने आपली कार आणायची आणि मग आधी मला पिकअप करुन एअर्पोर्ट ला जायचं . आम्हाला ड्रॉप केलं की त्याचा ड्रायव्हर गाडी माझ्या घरी पार्क करेल, आणि मग संध्याकाळी परत मुंबईला पोहोचल्यावर दिनेश भाई कार घेउन जाईल..

कसलं जबरी प्लानिंग केलंय ?? नाही का? अहो इतका विचार जर आपल्या कामाच्या बाबतीत केला तर टर्न ओव्हर दुप्पट वाढेल. 🙂 पण तसं होत नाही ना… हीच तर खरी शोकांतिका आहे. असो..

तर एअर्पोर्ट ला पोहोचल्यावर चेक इन बॅगेज टाकलं आणि आम्ही हात हलवत इकडे तिकडे फिरत होतो. दिनेश म्हणे.. प्रॉपर युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस असायला पाहिजे. पण तेच  जमत नाही.

जर ते जमलं तर मात्र भरपूर पैसा वाचु शकेल, एक माणुस जास्त काम करू शकेल. म्हंटलं.. अरे भाई.. जरा होश  मे आओ.. आज साला तुम्हारे पास काम नही है तो आदमी को भगा दोगे, बादमे  जब जरुरत पडेगी तो आदमी कहांसे पैदा करोगे? ईतने स्किल्ड आदमी जो तुम्हारे पास है , दस सालोसे, उनकॊ इतनी आसानिसे छोड दोगे?? अगर ऐसा करोगे, तो इट्स द मोस्ट फुलिश डिसिजन यु विल बी टेकिंग…!

म्हंटलं दिनेश भाई बेस्ट, युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस जर पहायचे असतिल तर त्या मद्राशाकडे पहा.आमच्या समोरंच एक मद्रासी उभा होता. स्वच्छ पांढरा शर्ट, काळी पॅंट, गळ्यामधे एअरपोर्ट ऍथोरिटीने दिलेला आय कार्ड… चेहेऱ्यावर एक वेगळाच उर्मटपणा..
ह्या मद्रासी लोकांचा चहा आणि कापी वर अगदी एकाधिकार आहे. हा फोटॊ बघा

1

ट्रॉली – एअरपोर्ट ऑथॉरिटी ची,(एअर पोर्ट १ बी.)ह्याचं इनव्हेस्टमेंट फक्त दोन थर्मास आणि चहाचे कप. बरं, एअरपोर्टवर आत येण्यासाठी लागणारा पास पण ह्याच्या गळ्यात लटकत आहे, म्हणजे नक्कीच ह्याने एअरपोर्ट ऑथॉरिटी च्या सिक्युरीटीच्या कडून हा एंट्रन्स पास कसा मिळवला असेल तो पण एक संशोधनाचा विषय़ ठरेल. . जो चहा बाहेर सायकलवरचा भैय्या ( मुंबईकरांना माहिती असेल, की भल्या पहाटे कांही भैये लोकं सायकलवर चहाची किटली ठेऊन चहाचा/कॉफीचा धंदा करतात) ५ रुपयात विकतो, त्याच क्वॉलिटीचा चहा हा मद्राशी भैय्या १५ रुपयात विकतो.  याला म्हणतात बेस्ट युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस…असं काही तरी करा !

हे सिक्युरिटी वाले आपल्या सारख्या सामान्य प्रवाशाला किती छळतात? समजा पाण्याची जरी बाटली असली तरी पाणी पिउन दाखवा म्हणतात. बरं हे तर सोडाच, ह्यांचा हलकटपणा इथेच संपत नाही, तर  लहान मुलाचं दूध असेल, तर त्याच्या आईला ते पण पिऊन दाखवायला लावतात हे सिक्युरिटी वाले—

आणि मग या मद्राशाला कसा काय तो पास मिळाला असेल? कोणी त्याला परमिशन दिली असेल? म्हणजे   त्याने  कोणाला पैसे खाऊ घातले असतील  म्हणून त्याला असा एक्स्लुझिव धंदा करण्याचा परवाना मिळाला असावा एअरपोर्ट मधे सिक्युरिटीच्या धज्जा ऊडवणारे हे असे लोकं अगदी राजरोस पणे फिरतात एअरपोर्टवर.

राजकोट एअरपोर्टवरच्या ह्या सिक्युरिटीत तर अशा तर्हेने तपासतात, जसे कांही तुम्ही स्पेस शिपमधेच बसायला चालले आहात. लॅप टॉप असेल तर त्यांच्या कडे एक मोठा ट्रे असतो, त्या ट्रे मधे तुमचा लॅपटॉप काढून त्या ट्रे मधे ठेवायचा. आणि रिकामी बॅग त्या एक्स रे मधून पास करायची. असा मुर्खपणा त्यांना कोणी आणि कां करायला सांगितला आहे ते कळत नाही. तुमची लॅपटॉप्ची बॅग ही रेक्झिन ची किंवा लेदरची असते, त्या मधून एक्स रे सरळ पास होऊ शकतात.. पण नाही.. ह्या निर्बुद्ध लोकांना ते कोण सांगणार?

बरं ह्यांचे नियम एअरपोर्ट गणिक बदलतात. म्हणजे जे काहि सिक्युरिटी च्या नावाखाली राजकोटला करतात, ते नागपुरला करतात असे नाही , किंवा अहमदाबादला जे हॅंड बॅगेज मधे चालतं ते भुजला चालेल असं नाही. प्रत्येक ठिकाणचा तो ठोंब्या सिक्युरीटीवाला आपल्याला वाटेल तसे नियम बनवतो.

परवाचीच गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात मी नागपुरला आलो होतो . इथुन परत जातांना आईने मला आवडतं म्हणून कच्च्या फणसाचं आणि कैरी चं मिक्स लोणचं दिलं होतं. मी विचार केला, की जर हे चेक इन बॅगेज मधे टाकलं, तर कदाचित बाटली फुटेल. म्हणून ते हॅंड बॅगेज मधे ठेवलं. सिक्युरिटीच्या वेळी त्या माणसानी अडवलं मला, म्हणे आप नहीं ले जा सकते ये चिज? म्हंट्लं क्यो? तर म्हणे इसमे तेल है, और तेल अलाउड नही है फ्लाइटमे. मी त्याला सांगून पाहिलं की मुंबईहून येतांना मी एक मुंबईचं लोणचं इथे आणलं होतं.. तर म्हणे वहांका कानुन अलग है.. !!!

या मूर्ख  आणि अशिक्षित लोकांशी जास्त वाद घालण्यात काहीच फायदा नसतो. बरेचसे लोकं मग आपल्या हॅंडबॅगेजमधले, शेव्हिंग क्रिम्स, डिओडॊरंट्स, आणि इतर तरल पदार्थ काढून तिथे टाकुन देतात. मला तर अगदी दाट संशय आहे, की हे पॅसेंजर्स कडून काढून घेतलेले सामान नंतर हा सिक्युरिटी स्टाफ वाटून घेत असेल. नाही तर यांची लायकी आहे का फ्रेंच पर्फ्युम वापरायची? नक्कीच एखाद्या पॅसेंजरचा ढापलेला असेल  तो…..!

एखादा पॅसेंजर जर इटरनॅशनल फ्लाइटने आला असेल तर त्याच्या हॅंडबॅगेजमधंल बरंच सामान हे लोकं सिक्युरिटीच्या नियमाखाली काढून घेतात. त्यांचे खास बकरे असतात हे बाहेरुन आलेले . तो पॅसेंजर मग अगदी जीव तोडून सांगत असतो, भैय्या , मै ये अमेरिकासे हँडबॅगेज मे लाया है. इसमे कुछ नहीं है.. पण ह्यांच्या चेहेऱ्यावरची रेष पण हलेल तर शपथ! हे म्हणतात, इंडियामध्ये नही चलता है ये हॅंड बॅगेज मे.आणि मग त्याला सांगितलं जाते की आप ये चेक इन बॅगेजमे  डाल दो.. बरेच लोकं मग ते सगळं सामान चरफडत तिथेच डस्ट बिन मधे टाकतात.. भिकाऱ्यांची जशी कटोरी तशी या सिक्युरिटी वाल्यांचं भिक मागायचं मोठ्ठं भांडं म्हणजे ती मोठ्ठी डस्ट बिन.. त्याला खरंच डस्ट बिन म्हणायचं कां?? बरं कस्टम मधे काय होतं त्यावर एक वेगळा लेख होईल.

जगामधे कांही लोकं असे आहेत की ज्यांचा मी अगदी मनापासून तिरस्कार करतो, त्यापैकी हे खाकी कपडे वाले! बरं तुम्हाला आणि आम्हाला इतका त्रास देणारे हे लोकं , एखादा मंत्री आला, की त्याला सरळ सॅलुट करुन जाऊ देतात. मग तेंव्हा सिक्युरिटीचं काय होतं? बरेचदा, लहान एअरपोर्टवर त्या मंत्र्या बरोबर त्याचे चमचे अगदी आतपर्यंत येतात त्याला सोडायला.. ते कसं चालतं? आणि कुठल्या नियमात बसतं ते??

गुजराथ मधे एक अंजार नावाची जागा आहे. इथे तलवारी , चाकू इत्यादी वस्तु तयार होतात. त्याला सुंदरश्या पितळेची मूठ असते, छान लाल मॅन असतं.. मी एकदा सहज म्हणून तलवारी घेतल्या दोन विकत, म्हट्लं, की छान शो पिस आहेत. चेक इन ला टाकलं बॅगेज, तर तिथे मला म्हणतो, अलाउड नहीं है.. मला जरा रागच आला, त्याला म्हणालो, ऐसा कहां लिखा है की चेक इन बॅगेजमे तलवार अलाउड नही   है? मोठ्या मुश्किलीने सोडलं त्याने मला.

कांही वर्षांपूर्वी, अजुन एक फार्स होता इंडियन एअरलाइन्स चा. तुमचं चेक इन केलेलं बॅगेज, ते लोकं बाहेर एका रांगेत मांडून ठेवायचे नागपूर एअरपोर्ट ला, आणि मग तुम्ही सिक्युरिटी मधून पास झाल्यावर ते तुम्ही आयडॆंटीफाय करायचं, मग एक सिक्युरिटीवाला त्या टॅग वर क्रॉस करेल आणि मग ते बॅगेज विमानात चढवले जाईल. हा फार्स फक्त इंडियन एअरलाइन्सचे लोकंच करायचे, जेट ने तुम्ही जात असाल ,तर या प्रोसिजरची गरज नसायची?

तुमचे अनुभव .. एअरपोर्ट सिक्युरिटीच्या बाबतीतले तुम्ही इथे कॉमेंट्स मधे पोस्ट करु शकता..

मला नेहेमी पडणारा प्रश्न.. जेट आणि इतर एअरलाइन्सची सिक्युरिटी वेगळी कशी?? आणि का? जाउ द्या.. आलिया भोगासी असावे सादरं, चित्ती अ्सू द्यावे समाधानं!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात.... Bookmark the permalink.

11 Responses to एअरपोर्ट सिक्युरिटी.

 1. mipunekar says:

  he laptop checking asha prakare sadharan jagbharat chalata.
  He laptop checking kahich nahi, London cha airport ya bakwas checking baddal atanta prasidhdha ahe. Bharatat tari aapalyala personal checking la shoes nahi kadhave lagat. UK ani US madhe shoes, moje sagala kadhayala lagata.
  Mala ekda US airport var body cream chi mothi batali/conatainer je kahi asata te takun dyava lagala, tar tya x-ray checking karanarya bai la tyacha mazhya peksha jasta vaiet watala. 4 vela sorry mhanali. Mi tila vicharnar hoto return flight ne parat yeiparyanta sambhalnares ka? marala asata tini.. 🙂

  • भारतामधे लॅपटॉप चेकिंग फक्त कांहीच ठिकाणिच असं चालतं.. प्रत्येक ठिकाणी असं चालतेच असं नाही.मला हेच म्हणायचंय की प्रत्येक एअर पोर्ट वर नियम कां आणि कसे बदलतात? जर एखादा नियम असेल तर मग तो अगदी सगळ्या एअरपोर्ट वर सारखाच असायला हवा नां? पण तसं नाही. कांही ठिकाणी क्रिम्स , लोशन्स, अलाउ करतात, कांही ठिकाणी नाही.. असं कां?

 2. sahajach says:

  माझी आई जेव्हा मस्कतला चेक ईन करत होती तेव्हा तिला तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढायला लावल्या होत्या..त्यात म्हणे बाकी ईतर मेटल आहे…त्या काढताना काचेच्या बांगड्या फुटुन रक्त आल्यावर मात्र बाबा चिडले त्यांनी कंप्लेन केली…पण त्याबद्दल सगळीकडे त्यांची माफी मागितली गेली….हेच मुंबईला कोणीतरी भय्या…ओमान एअरचा टॅग बॅगला लावला नाहीये म्हणुन त्यांची बॅग फेकुन उर्मटासारखा उभा राहिला…….तक्रार करेन म्हटल्यावरही ढिम्म हलला नाही……..

 3. security checking la aapan nahee mhanu naye. karan te shewati aaplya satheech asat.

 4. Amol says:

  mr.Mahesh kulkarni, even in USA and England they do same checking for laptop, I mean u have to remove laptop from bag and put in tray. I dont know why, in fact in LA we were trold to rewmove the shoes as well. It seems common.
  Any ways He kaam chalau lok ashe astat, magchya velela me India la aalo, Checking madhun vaegre pass zalo, nantar ek karmachari yeuin mhnae, Saheb India la aalyachya khushit kahi dya mhane. ME tyala Mhnalte 20 $ aahet fakt, to mala mhane, Thik aahe, Enjoy ur trip. Mhanje kaay gurmi salyachi, paise fukat havet aani tehi 20 peksha jaast. Sagli kade sarkari karbhar asach chalu aasto, chya…….

 5. Prashant says:

  महेंद्र,

  मला वाटतं, तुमचा दृष्टीकोन बराच चुकीचा आहे. अनेक ठिकाणी अजाणतेपणी तुम्ही सिक्युरिटी स्टाफचा दुस्वास करीत आहात.

  काही ठिकाणी अपवादात्मक असे लोकं असतील (उदा. अंजार चा अनुभव) जिथे काहीबाही सांगुन वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतील. पण आता अधिकाधीक ठिकाणी नियम सारखे आहेत. काही नियम नुकतेच बदललेले आहेत. ते का याबद्दलही अनेक बातम्या दिल्या होत्या. जे नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत, त्यांना शिव्या घालून काय साध्य होईल ?

  सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवासापूर्वी सगळे नियम माहिती करून घेणे. कारण यात वारंवार बदल होउ शकतात. जे नियम बदलतात त्यात काही वेळा तुम्हाला असा अनुभव आला असेल की काही ठिकाणी वेगळे नियम काही ठिकाणी वेगळे….. कारण, कर्मचार्‍यांनाच सुचना व प्रशिक्षण देण्याची वेळ व पद्धत व बदलाबत प्रवाश्यांना माहिती नसणे, ई.

  लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक व धातूच्या वस्तू बाजूला का काढाव्या, हे एव्हाना कळलं असावं… नसेल तर इमेल वर आपण संपर्क करूयात.

  द्रव वस्तू अगदी लहान मुलांसाठी असल्या तरी त्याची खात्री करून घेणे केव्हाही योग्य. ’लहान मुलाचं दुध असेल, तर त्याच्या आइला ते पण पिउन दाखवायला लावतात’ तर यात आईला कशाबद्दल लाज वाटली पाहिजे? आई तर नेहमी तापमान वगैरे तपासून पहात असतेच, तर मग थोडं प्यावं लागलं तर त्यात वाईट काय?

  कस्टम हे सिक्य़ुरिटीपेक्षा वेगळे आहेत, आणि मला जास्त अनुभव नसल्यामुळे कदाचित आपलं म्हणण योग्य असेल.

  सिक्युरिटीचे नियम मला योग्य वाटतात आणि सगळ्यांनी त्याबद्दल माहिती ठेवावी व पाळावेत. शेवटी सर्वसामान्य माणसाने नियम चुकविण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला, तर त्याचा फायदा वाइट लोकं घेऊ शकतात हे समजून योग्य रितीने वागावं.

 6. bhaanasa says:

  लॆपटॊप चेकिंग हे भारताबाहेर कुठेही गेलात तरी असेच चालते. शिवाय जोडे-मोजेही काढावेच लागतात. ३ओंसाच्या वर कुठलेही द्रावण चालत नाही. गमंत म्हणजे जर बाटली ४ ओंसाची असेल आणि अगदी तळ झाकेल एवढेच लोशन असेल तरीही नेऊ देत नाहीत. करेबियन्सहून येताना मी चाच्यांची दारूची बाटली तिला कातड्याने मढवलेले आणली तर माझी हॆड्बॆग बाजूला काढली. मला म्हणे नेता येणार नाही. मी हसून म्हटले, अहो आधी बघा तरी ती रिकामी आहे. पाहिल्यावर इतका खजिल झाला, दहा वेळा सॊरी म्हणाला. खरे तर म्हणतात ना की कुठल्याही वर्दीतल्या माणसांशी हुज्जत घालूच नये, ते आपल्यालाच वेडे बनवतात. 🙂

 7. आशाताई, अमोल, प्रशांत भानस,आणि तन्वी
  तुमच्या प्रतिक्रियेकरिता धन्यवाद.

  माझा मुद्दा हा नाही, की सिक्युरिटी नसावी, किंवा इतकी क्लिष्ट असु नये. सिक्युरिटी जरुर असावी. फक्त एकच वाटतं की जे कांही रुल्स आहेत ते सगळी कडॆ सारखेच असावेत. सिक्युरिटीचे नियम प्रत्येक ठिकाणी वेगळे असल्यामुळे प्रवाशांना खुप मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान होतं.

  एक मुद्दा काल राहुन गेला. शेव्हिंग किट मधली कात्री अलाउ करित नाहीत कांही ठिकाणी.. पण ऍज पर रुल्स भारतात, फोल्डींगची कात्री नेलेली चालते.

  मध्यंतरीच्या काळात फोर्क, स्पुन्स सगळे प्लास्टीक चे केले होते. पण आता पुन्हा स्टिल चे देतात. त्यातली सुरी चांगली ३-४ इंच लांबीची असते. एखाद्याने स्टोन शार्पनर सोबत नेला तर त्या सुरिला सहज धार लावता येउ शकते.

  नियम जरुर असावे, फक्त त्या मधे सुसुत्रता असावी.. बसं इतकंच वाटतं.

 8. Pingback: एअर इंडीया « काय वाटेल ते….

 9. माझा आजवरचा सिक्युरिटीबद्दलचा अनुभव चांगला आहे, पण कस्टम्सबद्दलचा अनुभव मात्र तितकासा चांगला नाही. कारण नसताना पैसे मागणे हा कस्टमवाल्यांचा स्थायीभाव.

 10. माझा जास्त प्रवास होत नाही, पण वर्षातून दोन-तीन वेळेला नक्कीच होतो, एअर इंडिया म्हटल कि डोकं फिरत, दुसरा पर्याय बऱ्याचदा ट्रेन नेच प्रवास प्रिफर करतो. एअर इंडिया पेक्षा स्पाइस जेट, इंडिगो बरे.

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s