मुकेश अंबानी करोडॊ रुपये किमतिचं घर बांधताहेत अल्टमाउंट रोडला , मुंबईला. प्लॉट्ची साइझ तशी मॉडरेट आहे .. फक्त ४५३२ स्क्वेअर मिटर्स.. म्हणजे साधारण ४५ हजार स्क्वेअर फुट. ही जागा अंबानींनी २००२ मधे विकत घेतली होती.त्याच्या बद्दल खरं तर बरंच येउन गेलंय.. पण इथे एक फोटॊ पोस्ट करतोय..आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे खाली.
२७ मजले.. काचेच्या तावदानांचा पुढचा भाग असलेली बिल्डींग असेल ही. या बिल्डींग मधे १६० कार्स आणि तिने हेलिपॅडची सोय असेल.
इतकं मोठं घरं म्हंटलं की नोकर माणसं आलितंच. म्हणुन जवळपास ६०० स्टाफची सोय असेल इथे .
घराच्या प्लॅन प्रमाणे १७३ मिटर उंचिची बिल्डींग असेल ही. जर एखादी रेगुलर बिल्डींग असती तर एवढ्या उंचिच्या बिल्डींग मधे ६० मजले उभे केले असते बिल्डरने. पण इथे तसं नाही. फक्त २७ मजलेच आहेत.
असं म्हणतात की खालचे सहा मजले फक्त पार्किंग करताच राखिव आहेत. जवळपास १६८ इम्पोर्टेड कार्स पार्क करण्याची व्यवस्था इथे केल्या गेली आहे.
एका मजल्यावर एक फुल फ्लेज्ड सिनेमा हॉल कम एंटरटेनमेंट सेंटर असेल. ह्या मधे काय काय एंटरटेनमेंट असेल हे तर अजुन फारसं कळलेलं नाही. पण सिनेमा व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी असाव्यात.. जसे स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, इन डॊअर स्विमिंग पुल, जिम.. वगैरे..
मिनी थिएटरचा रुफ टॉप हा गार्डन साठी असेल. आणि वरच्या बाल्कनी मधे पण टेरेस गार्डन असेल. टेरेस गार्डन म्हंटलं की मला आपलं ते चार पाच कुंड्या बाल्कनीत ठेऊन त्यात लावलेले क्रोटन्स आठवतात.. पण तसं नाही हं इथे.. 🙂
नऊवा दहावा आणि अकरावा फ्लोर हा हेल्थ फोअर म्हणुन इअर मार्क केला गेलाय. इथे स्विमिंग पुल, अथलेटीक गेम्स कोर्ट,वगैरे असेल.
त्याच्यावरचे दोन मजले अंबानी परिवाराच्या गेस्ट लोकांसाठी असतिल. सगळ्यात वरचे चार मजले जे अरेबियन सी चा व्ह्यु देतिल, ते सगळे मुकेश आणि त्याच्या बायको आणि दोन मुलांसाठी आहेत. म्हणजे प्रत्येक मजल्यावर फक्त एकच जण रहाणार.
ह्यांच्या घराच्या वरचे दोन फ्लोअर्स हे मेंटेनन्स एरिया म्हणून रहातिल . आणि सगळ्यात वर एअर स्पेस फ्लोअर असेल.
ह्या घराची एस्टीमेटेड किंमत आहे. ४००० करोड….. हुश्श.. समोर किती शुन्य द्यायचे हे न कळल्यामुळॆ शब्दामधे करोड लिहिलंय..
hahaha sahi 🙂
दाम करी काम येड्या
दाम करी काम ………
आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा मेरा या प्रमाणे आवो नेता लुटे सारा भारत देश आधा तुम्हारा आधा मेरा.
कामामुळे दाम
oh…………………..how much———–costly
आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा मेरा या प्रमाणे आवो नेता लुटे सारा भारत देश आधा तुम्हारा आधा मेरा.
Correct!! Thats the way our country works.. 😦
दाम करी काम येड्या
दाम करी काम ………
Oh! Father your Great for give me this empire, all depended in man’s luck the luck is great,99 % hard work & 1% luck this is totally wrong , true is only Luck , (1% hard work & 99% Luck) e.g. Above Ambanis House,
A Farmer / labour all day work Hard but he does not arrange 1 time full lunch, that is the luck factor.
Mera Bharat Mahan
ya dheshat jo jalamala ala tyane je karmache fal yethech bhogayache aste tashe vagayache pan aste mag ambani sarkhya mansane camavalelya paishanche tyane yavhade alishan mothe ghar bandhale tar kay chukate fhakt ambani yanhni he visarta kama naye ki apala deshatla eak pan garib upashi zopata kama naye tumchakade jo paisa ahe tyacha upayog garibancha nokri & bhakari sathi upayog kara deshala pudhe geun ja bhratachar karu naka dhanaywad
ya dheshat jo jalamala ala tyane je karmache fal yethech bhogayache aste tashe vagayache pan aste mag ambani sarkhya mansane camavalelya paishanche tyane yavhade alishan mothe ghar bandhale tar kay chukate fhakt ambani yanhni he visarta kama naye ki apala deshatla eak pan garib upashi zopata kama naye tumchakade jo paisa ahe tyacha upayog garibancha nokri & bhakari sathi upayog kara deshala pudhe geun ja dhanaywad
बाळासाहेब शिंपणकर
संत कबीराचे एक वाक्य आठ्वले.. माणसाला जागा किती लागते?? सहा फूट लांब आणि दिड फुट रुंद!!
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
Very Nice
Kalyani
Thanks!!
नक्की घरच बांधतायना ……
कि maal ……बांधताय…हे विचारयला हवे ….
प्रतिमा
धन्यवाद.. त्यांच्या काय घरीच माल बांधतील ते.. 🙂