ऑर्कुट वरचा माझा मृत्यु.

कालच ऑर्कुट चा अकाउंट डीलिट केला.जेंव्हा अकाउंट डिलिट केला तेंव्हा ऑर्कुटवरुन एक मेसेज आला होता, की तुमची रिक्वेस्ट मिळाली आहे , आणि येत्या २४ तासात माझा अकाउंट डिलिट केला जाइल.

थोडं… नांही.. खुप वाईट वाटलं आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना सोडुन जातांना. कधी उगिच टेन्शन असलं, किंवा ’लो’ वाटतंय असं वाटत असलं की मी ऑर्कुटवर जायचो, चांगल्या कविता, विचार ,चर्चा वाचायचो. ऑर्कुटींग हा एक बेस्ट पर्याय होताटेन्शन्स रिलिझ करण्यासाठी..आज पुर्ण डीलिट झालाय अकाऊंट.

तसा हा अकाऊंट मी जवळपास ४-५ वर्षं मेंटेन केला. बरेच व्हर्च्युअल फ्रेंड्स झाले होते. वेळ मजेत जायचा अगदी. कधी असं वाटायचं की ह्या सगळ्या लोकांना अगदी जवळून ओळखतो. प्रत्येकाच्या घरच्या मेंबर्सची पण माह्ती झालेली होती . बरेच लोकं ऑर्कुटवर खोटी माहिती देउन अकाउंट सुरु करतातत्यांना मी कधिच ऍड केले नाही लिस्ट मधे.. पण माझ्या अकाउंट्वर अगदी सगळी खरी माहिती होती.. इन्क्लुडींग वय  🙂

मी मंगेश पाडगांवकरांचा डाय हार्ड फॅन. म्हणुन  त्यांच्या कम्युनिटी मधे बरंच कांही पोस्ट केलं माझ्या कडे पाडगांवकरांची अगदी सगळी पुस्तकं आहेत. बरेच माझ्याच सारखे वेडे फॅन्स भेटले ऑर्कुट वर. कधी कधी मजा पण वाटायची की इतके लाइक माइंडेड लोकं आहेत जगात, आणि त्यांच्यपैकी कांही लोकांशी मैत्री पण झाली . अगदी  जवळचे मित्र झाल्यासारखे वाटतं होते. या कम्युनिटीचा पण को ओनर झालो होतो.

इंदिरा संत या गुणी कवियत्रीकडे इंटरनेटवर बरंच दुर्लक्ष झालंय असं वाटतं होतं. म्हणुन त्यांची एक कम्युनिटी सुरु केली. त्यांच्या कवितांमधे रस घेणारे पण कांही लोकं मेंबर झाले. काव्य, शास्त्र विनोदेन कालो गच्छती धिमताम… अगदी मस्त वेळ गेला ऑर्कुट वर. हल्ली ऑर्कुटवर आहे म्हंटलं की लोकं नाकंच मुरडतात. पण ऑर्कुटचं चांगलं रुप मी पाहिलंय आणि माझं अजुनही स्पष्ट मत आहे की ऑर्कुट इज गुड प्लेस टु हॅंग ऑन.

माझा ऑर्कुट वर अकाउंट क्रिएट केला होता तो माझा मित्र गिरिश मुळे. नंतर एकदा सहज चेक करतांना एक इंजिन रिसर्च कम्युनिटी ,तसेच एक ऑटॊमोबाइल्स इंजिनिअरिंग ची कम्युनिटी पण सापडली. अगदी आपलं स्वतःचं फिल्ड , त्यामुळे खुप रमलो त्या कम्युनिटी मधे. सुनिल सिंह म्हणुन एक मित्र पण झाला चांगला. जेंव्हा त्याला शेवटला स्क्रॅप केला, तेंव्हा तो म्हणाला, की अकाउंट डीलिट करु नका.. ह्या दोन्ही कम्युनिटीज मी मॉडरेट करित होतो.

ह्याच प्रमाणे  ऑर्कुट म्हंटलं की योगेश पितळे ( मानबिंदु डॉट कॉम) साइटचे सर्वेसर्वा आणि मानबिंदु – मराठी इंटेलेक्चुअल्स या ग्रुप सुरु करणारे,  यांचा उल्लेख केल्याशिवाय ऑर्कुटींग पुर्ण होऊच शकत नाही.योगेशचं मराठीवर मनापासुन प्रेम. आणि कल्चर्ड बिहेवियर.. त्याच बरोबर गाण्यांची आवड, ह्या सगळ्या कॉमन गोष्टी होत्या. या कम्युनिटीवर पण छान वेळ गेला. मॉडरेटर असलो, तरिही मी कधिही कुठलेही पोस्ट आधी वॉर्निंग दिल्याशिवाय डिलिट केले नाहीत. (कुठल्याही कम्युनिटीवर).

ऑर्कुट वरचा माझा घालवलेला वेळ  , प्रा. नरेंद्र , निखिल,प्रज्ञा, ज्ञानेश, संजय वैद्य , प्रियाल ,आणि गणेश ( भांडकुदळ म्हणुन फेमस पण मला अतिशय आवडायचा हा माणुस.. मित्र म्हणुन) तसेच शैलेंद्र सिंह पाटील ( ह्यांचे पोलिटीकल विषयावरचे भाष्य़ अगदी  वाचण्यासारखे आणि अभ्यासपुर्ण असायचे) . अर्चना, अपर्णा, तन्वी, शैलजा, सुजाता आणि बऱ्याच चांगल्या मित्र  मैत्रिणिंच्या मुळे मस्त गेला. तातुजींशी माझी कांही फारशी ओळख झालेली नव्हती पण त्यांचे संस्कृत प्रचुर विचार वाचायला मजा यायची.

मुक्तपीठ वर पण मी बराच वेळ घालवलाय. तिथे पुर्वी फार छान चर्चा चालायच्या, हल्ली शिवराळ भाषेचा वापर अगदी कॉमन झालाय , म्हणुन त्या कम्युनिटिवर जाणं कमी केलंय. बऱ्याच मित्रांनी पण म्हंटलं की कां डिलिट करताय अकाउंट? कंटाळा आला असेल तर कांही दिवस लॉग इन करु नका. खरी गोष्ट म्हणजे इतक्या सुसंस्कृत मित्रांमधे मला कंटाळा येण्याचं काहिंच कारण नाही. मला ऑर्कुटींग आवडायचंमग कां डीलिट केला अकाउंट?सांगतो शेवटी..! 🙂

व्हर्च्युअल रिलेशन शिप आणि रिअल लाइफ रिलेशन शिप मिक्स अप करण्याचा मी कधिच प्रयत्न केलेला नव्हता. पुलं प्रेम नावाचा ब्लॉग असलेला एक ’वल्ली ’ दिपक पण इथेच भेटला, आणि जवळचा मित्र झाला. माझा ब्लॉग सुरु करण्याचे श्रेय त्यालाच जातं.त्यानेच मला एनकरेज केलं म्हणुन ब्लॉगिंग सुरु झालं.

ऒंकारचा उल्लेख तर करायलाच हवा. अफाट वाचन. इतिहासाची आवड, गोनिदांचा भक्त (माझ्या प्रमाणेच) त्यामुळे आम्ही मित्र झालो. रामदास स्वामिंच्या दासबोधावर माझ्या इतकंच ह्याचंही प्रेम..

माझे जवळपास २०० च्या वर फ्रेंड्स झाले होते.बरेच मित्र हे टेम्पररी होते. म्हणजे कांही दिवस संबंध होते, पण नंतर काळाच्या ओघात त्यांच्याशी संबंध संपले.तरी पण ते फ्रेंड्स  लिस्ट मधे होते.पण कांही मित्र मात्र अगदी नियमीत संबंधात होते. रोज कमित कमी सकाळी एकदा आणि रात्री एकदा ऑर्कुट ला लॉग इन केल्याशिवाय बरंच वाटंत नसे. मुंबईला असेल तर दुपारी पण लॉग इन केलेलं असायचं.

माझ्या मुलिला मी १२वी होई पर्यंत इव्हन इ मेल अकाउंट पण उघडू नको असं म्हंटलं आणि तिने ते ऐकलं होतं.मी नेहेमी म्हणायचॊ, की १२ वी झाली, की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे आणि मग काय वाट्टेल ते कर.. इन्क्लुडींग गाणं शिकणं, कींवा नाच शिकणं . आता १२वीची परिक्षा झाली, सिईटी झाली आणि तिने अकाउंट उघडलाय नेटवर. जर माझा ऑर्कुट अकाउंट मी ठेवला तर, मला एक वडिल म्हणुन तिच्यावर उगिच लक्ष द्यावसं वाटेलंच. आणि   निःश्चितच तिचे मित्र कोण, मैत्रिणि कोण?आणि कम्युनिटीज इत्यादी वर वॉच ठेवायची इच्छा होइलच.   माझा माझ्या मुलिंवर पुर्ण विश्वास आहे,म्हणुन उगिच तिच्या पर्सनल स्पेस मधे माझी लुडबुड होऊ नये म्हणुन सरळ माझा अकाउंटच डिलिट करुन टाकला. म्हंटलं.. लेट हर हॅव हर ओन स्पेस 🙂

तसंही सगळ्याच मित्रांना आणि मैत्रिणींना माझ्या ब्लॉग बद्दल माहिती आहे. म्हणजे सगळ्य़ांशीच संपर्क राहिलंच अशी अपेक्षा आहे… 🙂

एका व्हर्च्युअल अस्तित्वाचं मरण.. हे पण इतकं मनाला त्रास देउन जाउ शकतं??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

49 Responses to ऑर्कुट वरचा माझा मृत्यु.

 1. A response says:

  achha muli sathi mhanun delete kele a/c mala vatale security mhanaun …………………

  • हो ना! प्रत्येकाला पर्सनल स्पेस हवी असते. ती द्यावी म्हणतोय मुलिंना पण.

 2. A response says:

  Aniket che a/c gmail a/c hack zale mala vatale tyacha parinam ki kay ………………….. plz chk http://manatale.wordpress.com/
  “Bombala maze gmail hak le” 🙂

 3. sahajach says:

  एका व्हर्चुअल अस्तित्वाचं मरण….योग्य शब्द वापरलात…
  आज सकाळी ऑर्कुटला लॉग इन केल्यावर आता तुमचे स्क्रॅप्स नसणार……याची पुन्हा जाणिव झाली. आधि कल्पना होती तरिही फ्रेंड लिस्टमधले एक जाणते नाव दिसले नाही त्यामुळे चुकल्यासारखे वाटलेच………..
  राधिकाला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा….

  तन्वी

  • तन्वी,
   धन्यवाद.. अहो, खरंच सांगतोय, मला पण वाईट वाटलं अकाउंट डिलिट करतांना. पण शेवटी केला एकदाचा माउस क्लिक.. !
   मी इथे आहेच ब्लॉग वर, म्हणजे संबंध रहातिलच..
   शुभेच्छा तर हव्यातच तुमच्या कडुन मुलिंना.. धन्यवाद..

 4. Vikrant says:

  This new look and feel of your blog is extremly beautiful !!!!!!

  • विक्रांत
   पण फॉंट्स मला फारसे आवडले नाहित. वाचायला त्रास होतोय. नविन थिम शोधतोय.. !

 5. A response says:

  green color nako tras hoto aahe vachatana

 6. bhaanasa says:

  अरे असे झालेय का? तरीच मला तुम्ही ऒर्कुटवर दिसला नाहीत.
  बापरे, ही एवढी बटाट्यासारखी अक्षरे का दिसत आहेत? 🙂

  • अहो, नविन प्रकारच्या थिम्स ट्राय करतोय.पण अजुनहि एकही मनासारखी सापडत नाही.

 7. mipunekar says:

  ek pakka orkutian mhanun mi tumacha dukhkha samaju shakato. Pan muli sathi kelela tyag baghun bhari watala. Great…

  • प्रतिक्रीये बद्दल अभार. पण त्याग वगिरे काही नाही, हे दुसऱ्याच्या स्पेस चा रिस्पेक्ट करणं आहे. बस्स!

 8. sudhir kekre says:

  Mahendra,

  I read with interest your post. well , i too have been undergoing a dilemma but not for your reason.

  you will be surprised that my nephew and neice are my orkut friends and even their friends too have added me.

  we respect each other’s space ( I mean i respect his and her 🙂 )

  i guess since you trust your daughter so much, you just had to open minded.

  but then , this is my view. just wanted to share.

  I respect yours though.

  • सुधिर
   आधी खुप विचार केला, मग लक्षात आलं की आपल्याला उगिच लक्ष ठेवायची इच्छा होइल.. म्हणुन मग सरळ डिलिट केला अकाउंट.
   वेळ काढुन, आवर्जुन प्रतिक्रिया दिलित त्याबद्दल धन्यवाद.

 9. Aparna says:

  खुलासा केल्याबद्द्ल धन्यवाद. मला थोडसं चुकीचं वाटतय. म्हणजे अकौंट डिलिट करण्यापेक्षा तो मोह सरळ सरळ टाळता आला नसता का?? थोडं छोट्या तोंडी मोठा घास घेतल्यासारखं पण मला ते जास्त सोप्प वाटतय.

 10. दिपक says:

  महेंद्र,

  कसा आहेस यार?

  तुझे अकांउट झाले हे मला आज कळले. थोडे वाईट वाटले.. मी तुझा जुना स्कॅर्प षोधत होतो तो मिळाला नाही म्हणुन शंका आली .. आणि ब्लॉग उघडला हे सगळं.. तु घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे मी सांगणार नाही. कारण तु तुझ्या मनाने घेतलेला निर्णय आहे. मन जे ठरवते तसेच वागावे.. तुझ्या निर्णयाच्या (मनाच्या) मी बरोबर आहे.. ब्लॉंगींग मात्र अखंड चालु ठेव.. मी तर असणारच तुझ्या बरोबर..

  (तुझा जिव्हाळ्याचा मित्र) दिपक
  पु.ल.प्रेम
  http://cooldeepak.blogspot.com

  • दिपक
   आत ब्लॉगिंग हाच विरंगुळा आहे. म्हणजे ब्लॉगिंग सुरु रहाणारंच. आणि आता कशावरही लिहायची सवय झाली आहे, त्यामुळे सोपं पडतं.. ब्लॉग वर संपर्क राहिलंच. तुझ्या ब्लॉग मी नेहेमीच बघत असतो..कांही नविन पोस्ट आहे का या साठी…

 11. supriya uday says:

  Namaskar Maheshaji,
  mi Tanvichi lahan bahin, mi nehami Tanvichya account varun tumachya account var tumache lekh vachayala yet ase…mala tumache sagale lekh khup avadatat …khup informative asatat..aapala kahihi parichay nahi tarihi aamchyakade nehami tumache lekhanvar mi Maze
  Mr DR Udayshi bolat asate.
  All the best Wishes to ur Daughters.
  DR Supriya

  • सुप्रिया
   धन्यवाद. अहो, तुमच्या सारख्या लोकांच्याच तर प्रोत्साहनामुळे हे लिखाण सुरु राहिलंय नाहितर कधिच बंद पडलं असतं. आज ४ महिने ३ दिवस झालेत. दररोजचा कमित कमी एक तरी पोस्ट आहेच..
   –मी पण एंजॉय करतोय लिहिणं..
   ऑर्कुट जरी बंद झालं तरी फेस बुक वर आणि लिंक्ड इन वर आहे मी . पण फेसबुकाला ऑर्कुटचा चार्म नाही..
   आणि परिचय नाही कसं म्हणता? तन्वीची बहिण ना तुम्ही.. मग काय, झाला ना परिचय… 🙂

 12. महेंद्र काका,

  मी तुमची मानबिंदु, मुक्तपीठ, आणि कुठेतरी छानसे वाचलेले या समुहांवर टाकलेल्या पोस्ट नेहमी वाचायचो. अकाउंट डिलीट करण्यामागचं तुमचं कारण समजु शकतो. परंतु मला वाटतं अकाउंट डिलीट करण्यापेक्षा इतर उपाय काढता आला असता.

  अकाउंट डिलीट केले तर तुमच्या त्या प्रोफाइल वरुन पोस्ट केलेल्या सर्वच्या सर्व पोस्ट्स डिलीट केल्या जातात. तुमच्या अकाउंट डिलीट करण्याने तेच झालंय. तुमच्या सर्व पोस्ट्स डिलीट झाल्या आहेत. [:x]

  माझ्या मते, कुणा मित्र/मैत्रिणीला सांगुन तुम्ही पासवर्ड बदलावायला हवा होता. त्या मित्रास/मैत्रिणीस ’तो पासवर्ड मला कधीही सांगु नकोस’ असे सांगितले असते तरी तुमचा हेतु सफल झाला असता आणि पोस्ट्स सुद्धा तश्याच शाबुत राहिल्या असत्या !

  • दिपक
   ही गोष्ट मला माहिती नव्हती.. ऑर्कुट मधे बरीच डेव्हलपमेंट झालेली दिसते आहे. कालंच मला हाच मेसेज एका दुसऱ्या मैत्रिणिने पण दिला होता. जी मेल अकाउंट हा आता एक मुख्य अकाउंट झालेला आहे. त्यामुळे त्याच्या पास वर्डची गरज ही इतर ठिकाणी पण पडते. असो..
   ऑर्कुटवरचे दिवस बाकी तुम्हा सगळ्यांच्या संगतित मस्त गेले. अजुनही आठवण येते.. प्रतिक्रियेकरता आभार..

 13. Aparna says:

  tithe sarva tumchi maanbindu war aathwan kadhtahet tyana hya post chi link dili aahet….(free adv 🙂 tashi garaj nahiye tumhala pan)

  • अपर्णा,
   मी अजुनही ऑर्कुट मिस करतो. ऑर्कुट ची मजा फेस बुक वर नाही. तसे गेम्स वगैरे बरे आहेत, फेस बुक वर. माफिया वॉर तर खुपच पॉपुलर झालाय. पण ऑर्कुट ची मजा नाही.. 😦

 14. Chintamani Palsule says:

  हे असे करायची जरूर नव्हती माझ्या मते. माझ्या घरात मी, बायको आणी मुलगी तिघांचेही अकाउंट आहेत. पण मी स्वतः कधिही तिच्या अकाउंटला भेट देत नाही. तीला काहिही सुचना करीत नाही. जसे मुलीच्या बाबतीत वागतो तसेच बायकोच्या बाबतीतसुध्दा. आपण उगीचच अकांउट डिलीट केला असे माझे मत आहे.

  • चिंतामणी
   मी अगदी खुप विचार केला, पण नंतर लक्षात आलं की कदाचित मी जास्तंच इन्क्वेझिटीव्ह होइल ..म्हणुन डिलिट केलाय..आणि डीलिट करतांना खरंच खुप वाईट वाटलं.. हे अगदी मनापासुन लिहितोय.. तुमच्या सारख्या मित्र मंडळीत वेळ खरंच छान गेला ऑर्कूट्वर.. 🙂

 15. archana says:

  महेंद्र काका,

  बऱ्याच दिवसानी ऑरकुट वर बसले आणि मानबिंदु वर भेट दिली पाहते तर तुमचे प्रोफाइल दिसले नाही.व् त्याविषयी पियालभाऊबरोबर विचारोउस केलि. तुम्ही प्रोफाइल डिलीट केले हे समजले आणि खुप वाईट वाटले,तुमच्या कोम्मिनितिवारील चर्चा मी मनपूर्वक वाचायचे. भरपूर शिकायला मिलाले त्यातून.खरेच तुम्ही प्रोफाइल डिलीट करायला नव्हते पाहिजे.

  • अर्चना
   धन्यवाद.. पण मी इथे आहेच ना ब्लॉग वर , भेट देत जा. काही गोष्टी फारसा विचार न करता केल्या जातात, प्रोफाइल डीलिट करणे ही त्यातलीच एक.. 🙂
   शुभेच्छा..

 16. नरेंद्र says:

  महेंद्रजी, आपण घेतलेला निर्णय मला वैयक्तिक दृष्ट्या मान्य नसला, तरी शेवटी तो तुमचा निर्णय आहे. त्यामुळे मला त्याचा आदर राखला पाहिजे.
  बोलण्यासारखे बरेच काही असले, तरी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने सांगाविशी वाटते, की तुम्ही तुमची मानबिंदूवरील मॉडरेटरशिप योग्यरित्या आणि नि:पक्षपातीपणे पार पाडलीत.

 17. जळगाव. says:

  महेंद्रजी.

  आपली नुकतीच मैत्री झाली होती, तुमचे अभ्यासपूर्ण लेखन मला खूप आवडायचे.. मानबिंदू वर कमी वेळ असायचो पण मुक्तपीठ वर तुमच्या लेखनाचा आनंद घेतलाय. ज्या कारणासाठी तुम्ही ओर्कुट आत्महत्या केलीत ते फार वेगळे वाटले… मुले ओर्कुट वर आल्यावर त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य हवे हे खरेच.. पण त्या साठी खरच अकौंट डिलीट केले नसतेत तर खूप छान झाले असते..

  माझी पत्नी, मुलगा, मुलगी यांचे अकाउन्ट्स आहेत पण मला त्या वर लक्ष ठेवावे असे नाही वाटले.. याला कदाचित कारण म्हणजे आपण त्यांना दिलेले संस्कार..

  तुम्ही परत ओर्कुट वर याल हीच इच्छा आहे.. परत सक्रीय व्हा.. आज सर्वत्र फक्त चिट चाटिंग करणारी मंडळी आहे त्यात आपल्या सारखे लिहिणारे हवेतच हवे..

  कृपया विचार नक्की करा आणि परत सक्रीय व्हा…. आम्ही वाट पहातोय…

  संजय वैद्य.
  जळगाव.

 18. Sandesh says:

  एका बुद्धीमान अँक्टिव मेम्बरला मुकल्याच दुःख आहे पण त्याच वेळी एका सहृदय बापाला भेटल्याचा आनंदही आहे
  खर तर अकाउंट डिलीट करायची गरज नव्हती मोह टाळता आला असता तर बर झाल असत

 19. ugich delete kelat…

  apan orkut var aslo ani ti kay karte te baghitla mhanje laksh thevla asa nahi…mag gharat kay karte tyavar pan laksh deu naka…baghu ch nakaa tichyakade..

  ani laksh thevlach tar kay chuk ahe?..you shud and can know what she is doing..If she is not doing anything wrong…

  Come Back…we cannot escape from social networking and certainly not hide from it if we are active on cyberspace…

  • Mahendra says:

   योगेश
   सोशल नेट्वर्किंग वर मी आहेच. फेस बुक आणि लिंक्ड इन वर पण आहेच. फक्त ऑर्कुट वर .. तरीही काही दिवसांनंतर येइन परत.

 20. श्रद्धा says:

  महेन्द्रजी…मी नुकतीच मुक्तपीठवर आलेली एक सदस्य आणि सध्याची मॉडरेटर…

  मुक्तपीठचा इतिहास यामधे तुमचे नाव वाचले आणि हा ब्लोग मिळाला… खरच तुम्ही ऑर्कुट अकाउंट डिलीट करायला नको होते असे मला अजुनही वाटते. तुमचे पोस्ट काही नाही मिळाले वाचायला पण येथील पोस्ट वरुन असे वाटतेय की तुम्ही खरच लोकप्रिय असणार.

  माझा मुलगा पण माझ्या लिस्ट मधे आहे आणि त्याला हवी तशी स्पेस देते मी. बघा तुम्ही ऑर्कुटवर परत या असे मी अजुनही म्हणेन.सगळीच मंडळी तुम्हाला मिस करत आहेत असे दिसतेय…प्लिज परत या…….[:)]

  • श्रध्दा
   अहो ते अकाउंट डिलिट केलं तेंव्हाच सगळे पोस्ट पण डिलिट झाले म्हणतात. तसेच मी सुरु केलेल टॉपिक्स पण डीलिट झाले आहेत असं अपर्णाने सांगितले. ऑर्कुटवर मी जवळपास तिन चार वर्षं होतो.जो पर्यंत तिथे होतो,तो पर्यंत खरंच खुप छान वेळ गेला. मुक्तपीठ वर बराच राबता असायचा. ब्लॉग सुरु करण्याचे कारण, पण ऑर्कुट डीलिट करणेच आहे. येइन लवकरच पुन्हा ऑर्कुटवर.. पण इतक्यात नाही.. सध्य तरी हे ब्लॉगिंग एंजॉय करतोय…

 21. ज्ञानेश.. says:

  नमस्कार महेंद्रजी,
  आहे का आमची ओळख?? 🙂

  • अरे वा.. ज्ञानेश..
   आनंद झाला तुम्हाला भेटुन.. बरेच दिवसा नंतर बोलणं होतंय .. कसं काय सुरु आहे?? मुपी वरचे दिवस मस्त होते नां.. ? मजा यायची..
   आपला तो हटेला गंपु ( गणेश) आहे का अजुनही मुपी वर?? बाकी मंडळी काय म्हणतात?

 22. नमस्कार महेंद्रकाका,

  मुक्तपीठचा इतिहास नावाचा टॉपिक सुरु होता, त्यात तुमची आठवण काढल्याशिवाय राहवलं नाही..तिथे तुमच्या ह्या लेखाची लिंक मिळाली….आजवर कसा काय नजरेतुन सुटला हा लेख माहीत नाही…पण पहिल्यांदाच तुमच्या ऑर्कुट सोडायचं कारण कळलं…तुमच्या प्रॉब्लम वर जालीम उपाय आहे…एक फ़ेक प्रोफ़ाईल करुन या मुपीवर…घरच्यांनाही सांगु नका. [:D] [:D]
  हल्ली मुपीवर फ़ेक प्रोफ़ाईल्सचा नाहीतरी खुप सुळसुळाट झालाय..

  • शैलेंद्रसिंह,
   नमस्कार.. अरे वा.. बरेच लोकं भेटताहेत जुने. बरं वाटतंय.. अहो मुपी /मानबिंदु बंद झाल्यावर काहीतरी लिहिण्याची आवड तर होतीच, ती पुर्ण करायला म्हणुन हा ब्लॉग उपयोगी पडला, बरेच लोकं रेग्युलरली वाचायला पण लागले..मुपी वर यायचं, तर नक्कीच येईन.. अकाउंट सुरु केला की.. आणि हो… फेक प्रोफाइल कशाला, पुन्हा सुरु करीन तर खऱ्या नावानेच सुरु करेन ऑर्कुट प्रोफाइल…

 23. rohan says:

  मुक्तपीठचा इतिहास ह्या टॉपिक मधून तुझा तिकडे पुनरजन्म झालाय रे बाबा … 🙂
  चांगल्या गोष्टींना वेळीच अंत येत असता तरी त्या कधीच विसरल्या जात नाहीत हेच खरे.

  • मुक्तपीठावर तु कधी भेटला नाहीस ते? मी तर भरपुर ऍक्टीव्ह होतो मुपी वर.. जवळपास तिन वर्षं.
   अरे गम्मत म्हणजे ज्या मुली साठी अकाउंट डिलिट केला तिने तर ऑर्कुटवर अकाउंट उघडला पण नाही.. 🙂

   • rohan says:

    मी मूकवाचक होतो खुप काळ मुपिवर… आता सध्या थोडा एक्टिव झालोय…

    अरे… ये की मग परत. की ऑरकुटमुळे ब्लॉगला पुरेसा वेळ देता येणार नहीं असे वाटते आहे तूला ???

    • आता काम इतकं वाढलंय की ब्लॉग ला पण वेळ देता येईल की नाही ते सांगता येत नाही.. लिहितो सविस्तर तुला..

 24. ज्ञानेश.. says:

  महेंद्रजी, गंपू हटेलाला हटवला मालकांनी !
  बाकी मंडळी आहेत मजेत.

  मी पण सगळ्यांप्रमाणेच विनंती करतो, या परत मुपीवर. तुमच्यासारखे मेंबर्स हवे आहेत आम्हाला.

  वाट बघतोय.

  • अच्छा… जरुर येईन. कारण मुलीने अकाउंट सुरु केलाच नाही ऑर्कुटवर.म्हणजे जे कारण होतं तेच राहिलेलं नाही..

 25. tejali says:

  kaka..tumach tar “IDEAL DAD” sathi nomination whayala haw….:)!!!!

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s