घर पहावं बांधुन

असं म्हणतात, की घर पहावं बांधून.. मगच खरा प्रॉब्लेम काय ते कळतं. एकदा हा प्रयोग केला होता, नागपुरला असतांना. घर बांधण्याचा. त्या वेळेस सगळा अनुभव घेतला होता. म्हणून बरेच वर्षांपूर्वी मुंबईला बदली झाल्यावर पण आज पर्यंत कधी घर बांधायचा विचार डोक्यात येऊ दिला नाही. अर्थात, सध्या रहात असलेलं मोठ्ठं घरं ( अहो ११०० स्क्वेअर फुट म्हणजे मोठच मुंबईच्या हिशोबाने) अर्थात कंपनी अकोमोडेशन असल्यामुळे कधी आवश्यकता वाटलीच नाही.दुसरं म्हणजे सौ. आणि मुली इथे इतक्या छान सेट झालेल्या होत्या, की असं वाटलंच नाही की इथे घर घ्यावं विकत. दुसरं म्हणजे असंही वाटत होतं की ,इथून बदली झाली तर मग काय करणार.. ? पण आज जाणवतंय हा निव्वळ मुर्खपणा होता माझा.. आ्धीच घर घ्यायला हवं होतं इथे..!

प्रत्येक मिडलक्लास माणसाची  ( मी जरी एच आय जी मधे अप्लाय केलेला असला, तरीही मी मिडलक्लास मधेच मोडतो बरं कां!) एक इच्छा असते, की आपलंही एक घर असावं. आणि हे स्वप्न पुर्ण करायला तो मग कांहीही करायला तयार असतो. वेळप्रसंगी घरातलं सोनं, सेव्हिंग्ज, स्टॉक्स सगळं कांही पणाला लावतो. हे स्वप्न पुर्ण होणं पण इतकं सोपं नसतं. मग सुरु होतं, विरारला, किंवा बोइसरला घर घ्या.. आणि आयुष्यातला बराचसावेळ ट्रेन ट्रॅव्हल मधे घालवा. मग ठाणे जिल्ह्यात घर घ्यायचं.. हा एकंच उपाय उरतो. हल्ली तर विरार, वसई ला पण ्खूपच जास्त रेट्स झालेले आहेत. अर्थात, आता या रेसेशन मुळे ४० टक्के रेट्स कमी झालेले आहेत.पण तरीही तिकडे घर घ्यायची इच्छा होत नाही. खाईन तर तुपाशी नाहितर उपाशी अशी मेंटॅलिटी आहे माझी  .म्हणजे घर घेईन तर ठाणे पर्यंत, किंवा इकडे बोरिवली पर्यंत..असं पक्कं ठरवलंय मनाशी.

या इलेक्शन मुळे स्टॉक मार्केट अगदी पॉझिटिव्ह स्विंग घेतोय. त्यामुळे असंही वाटतं की इन्फ्रास्ट्रकचर किंवा बिल्डर सेगमेंट्स ला पण आता चांगले दिवस येतील  .म्हणजे अजुन भाव जर वाढले तर मग पुन्हा लांबणीवर टाकावे लागेल.

पण आत्ताच साधारणतः दोन  महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा मी कारने ऑफिसला जात असे. माझ्या बरोबर परत येतांना एक गुजु मित्र असायचा. तो सहज म्हणाला, कमसे कम अप्लाय तो करो.. म्हाडा का ऍड आया है… म्हणाला, कल सवेरे किसिको भेजके फॉर्म मंगा लेते है..

आणि एकदाचा फॉर्म आला.  या मित्रामुळे स्टॉक मार्केट मधे  बरेच पैसे कमावले. अगदी राइट टाइम सजेशन मुळे मार्केट क्रॅश होण्यापूर्वी  बराचसा स्टॉक विकून टाकला होता, त्या मुळे मार्केट क्रॅश चा फारसा परिणाम झाला नाही माझ्यावर.  त्यामुळे ह्या मित्राचं सजेशन मी अगदी सिरियसली घेतो.. स्पेशिअली फायनानशिअल मॅटर्स मधे.

पुर्ण फॉर्म वाचून बघितला, आणि विचार केला की कमीत कमी दोन ठिकाणी अप्लाय करु या, म्हणजे चान्सेस ड्बल होतिल सिलेक्शनचे. मी त्याला म्हंट्लं, मै तो लॉटरी मे बहुत अनलकी हूं.. पण त्याच्या इनसिस्टंन्स वर दोन फ्लॅट्स बुक केले.. सायन, आणि सहकार नगरचे!

आज म्हाडाचा रिझल्टं. सकाळपासुन बेचैन वाटतंय.अगदी दुपारपासुन इतका अनिझी आहे, की सारखा नेटवर कांही दिसतंय कां ते शोधण्यात वेळ घालवतोय. आजच नेमकी म्हाडाची वेब साइट आउट ऑफ ऑर्डर!! बोंबला… काय करणार?? इतकं बीपी वाढतंय.. काय करावं?? शेवटी  शेवटचा उपाय म्हणून माझ्या काकाला फोन केला.. त्याला पण कांहीच माहिती नव्हती, म्हणाला , रात्री चेक कर साईट..   …आता काका ला का फोन केला? ते जाऊ द्या.. असं समजा की त्याचा बराच वट आहे मुंबईत.. अरे काय हे… तो काही भाई वगैरे नाही हं……. तुमच्या मनातले विचार मी ओळखले म्हणून इथे एक्सप्लेन केलंय..

घराकरता अर्ज तर केलाय. पण पैशाची सोय केलेली नाही. म्हंटलं, जर नंबर लागला  तर पाहू  या काय करायचं ते.म्हणजे मग दुसरं टेन्शन सुरु होणार ! अर्थात आपली माय बाप एस बी आय आहेच ना लोन द्यायला….

अजूनही बसलो आहे टीव्ही पुढे, पण स्टार माझा वर सारखे दहिसरच्या साईटचे नंबर्स दाखवताहेत. असं कळलं की अजूनही लॉटरी काढणं सुरु आहे. म्हणजे आता सरळ झोपावे, म्हणजे सकाळी ऊठून पहाता येइल म्हाडाच्या साईट्वर.. काय झालं ते.. म्हणजे ’निकाल’ लागला की आपला निक्काल लागलाय सोडतीत ….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

6 Responses to घर पहावं बांधुन

 1. Prasad says:

  खरच् आहे..’घर् पहावे बांधुन्..आणी लग्न्…हा हा हा!!’..all the best!!

  • थॅंक्स प्रसाद.. अजुनही टिव्ही पुढेच बसलोय आणि वेब साइट ला ट्राय करतोय… नथिग इज हॅपनिंग राईट टुडे..

 2. Sudarshan Apte says:

  hi post update kara nikal lagala ki. Tumacha number laganar…. nakki lagnar…

  • सुदर्शन..
   शुभेच्छांबद्दल आभार.. अहो झोप उडाली आहे पार डोळ्यांमधली.. अजुनही नेट वर ट्राय करतोय म्हाडा.कॉम साइट. नाही तर उद्या सकाळी म्हाडाला चक्कर नक्की…नंबर लागला ना, तर मग इतके वर्ष मुंबईला राहुन घर न बांधल्याचा पापाचं कांही प्रमाणात परिमार्जन होइल..

 3. A response says:

  tumhi vait vatun naka ghevu ki aadhi ka ghar ghetale nahi …… ghar hi ashi gosta aahe ki vel aalya shivay hot nahi ………….. aamhi ghar ghetana khup firalo toch toch area 10 vela baghun aalo tari ghar book kele nahi jar aadhi kele aste book tar rate kami hote 900 per sq ft ase aani aamhi jeva book kele teva 2000 rs per sq ft ne tyach area madhe …………….. so don’t worry aani aadhi kele aste etc etc ase kahi nasate …………………..

  • आता बाकी मुंबई ला रहावंस वाटायला लागलंय. आधी वाटायचं की आपण इथे राहुच शकत नाही. आता मुली म्हणताहेत की नागपुरला येणार नाही. म्हणजे तिथलं घर उगिच बांधलं असं झालंय.. असो.. होईल कधी तरी. आता जरा जोर लावतोय इथे घर शोधायला. बघु कुठे जमतंय ते..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s