प्रभाकरनचा मृत्यु.

आजच बातम्या ऐकल्या.. प्रभाकरनचा मृत्युने.. क्षणभर सगळं स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. एका अर्थाने जे काही झालं ते बरं झालं . जर प्रभाकरन जिवंत हाती लागला असता, किंवा भारतामधे शरण घेण्यास आला असता तर भारतासाठी अजुन एक नवीन प्रॉब्लेम सुरु झाला असता मुळे भारताच्या दृष्टीने जे कांही झालं ते बरंच झालं असं मला वाटतं.

प्रभाकरन च्या मृत्यु मुळे दुःख पण झालं. एक  लढवय्या म्हणून  त्याच्या जाण्याचं वाईट वाटलं. त्याचं लढण हे टेररिझम म्हणून समजलं जावं कां हा एक वादाचा प्रश्न आहे. राजपक्ष म्हणाले, की आता प्रभाकरन मेला आहे, तेंव्हा तिथल्या सगळ्या तामिळ लोकांना सिंहलींच्या बरोबरीने अधिकार दिले जातील, अर्थात माझा यावर अजिबात विश्वास नाही. कारण सिंहली पार्टीनेच तर तामिळींचे सगळे अधिकार काढून घेतले होते- घटना दुरुस्ती करुन..ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज पक्षांच्या वर किती आणि का विश्वास ठेवायचा?  आता जरी त्यांनी तामिळ लोकांना अधिकार दिले नाहीत तर काय होणार आहे? आवाज उठवायला कोणीच तर नाही श्रीलंकेत?   केवळ इंटर्नॅशनल समुदायासाठी दिल्या गेलेलं एक स्टेटमेंट आहे ते.  .

इक्वल राइट्स.. हे तामिळ लोकांना जर आधीच दिले असते, तर हा वाद इतका चिघळलेला नसता. पण श्रीलंका सरकारचे आडमुठे धोरण हेच या नरसंहाराला कारणीभूत ठरले आहे. जेंव्हा आणि जिथे शक्या होईल तिथे तामिळ लोकांवर अत्याचार करण्याचे कांही या सिंहली लोकांनी सुरु ठेवले. जाफना लायब्ररीचं जळीत कांड, किंवा, तामिळ दुकान दारांच्या दुकानांच जळीत,आणि सर्वसामान्य तामिळींनी जे मारल्या गेलं , त्याच मुळे असुरक्षिततेच्या भावनेतून , तामिळ टायगर्सचा उदय झाला.

ह्या माणसाने एक बेसिक रुल केला होता. प्रत्येक टायगर्स च्या गळ्यात लॉकेट प्रमाणे एक कॅप्सुल लटकत असायची. जर तुम्ही कधी पकडला गेलात तर ती सायनाइडची कॅप्सुल चावा, आणि कुठल्याही परिस्थितीत जिवंत हाती लागू नका सिंहलींच्या हा मुळ मंत्र होता, त्यामुळे टायगर्सचा ठाव ठिकाणा कधीच समजू शकला नाही श्रीलंकेला.

शेवटच्या काळात, स्वसंरक्षणासाठी ह्युमन कव्हर घेउन युद्ध करण्याच्या याच्या निर्णयाला गनिमी कावा म्हणावा  की कसंही करुन जीव वाचवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड? ज्या लोकांसाठी लढायचं, त्यांचाच शिल्ड म्हणून वापर करायचा????

असो. श्रीलंकेतिल राजकारणाचा भारतावर अगदी डीप परिणाम होतो. भारतीय तामिळींनी अर्थातच त्यांच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल राग असणं सहाजिकच आहे. पण कांही दिवसापुर्वी एक लहानशी बातमी होती, की कोइमतुर ला लष्करी कॉन्व्हॉय वर हल्ला केला तामिळ लोकांनी. हा लोकल लोकांचा तामिळ इलम ला सपोर्ट दाखवतो.त्यांना असं वाटलं होतं, की हा कॉन्व्हॉय श्रीलंकेसाठी मदत घेउन जातोय .. गोळा बारुद आणि इतर गोष्टींची.इथे कुठलाही सपोर्ट नसतांना किंवा नेतृत्व नसतांना स्वयंस्फूर्तीने केल्या गेलेला हा हल्ला तामीळ लोकांच्या मानसिकतेबरोबर बरंच कांही सांगून जातो.

कल्पना करा , हा माणुस श्रीलंकेमधे जर इतकं करु शकतो , तर तो भारतामधे काय करु शकला असतां? त्याला इथे तर पॉलिटिकल सपोर्ट पण होता, करुणानिधी आणि वायकोचा.

ह्या माणसाची सगळ्यात मोठी चुक म्हणजे राजीव गांधीवर केलेला हल्ला. ह्या हल्ल्या नंतर जयललीताने पण ३० हजार रिफ्युजी तामीळांना परत पाठवले होते, त्यांच्या इच्छे विरुद्ध!. अर्थात त्या वेळेस तामिळ लोकांनी पण राजीव गांधीचं किलिंग ऍक्सेप्ट केलेलं नव्हतं.. ( राजीव गांधींच्या खुन्याला सपोर्ट करणाऱ्या पार्टीचा कॉंग्रेसला सपोर्ट घ्यावा लागला या इलेक्शन मधे !

हे सगळं करणं शक्य का झालं प्रभाकरनला? त्याने आत्महत्येला ग्लोरिफाय केलं आणि त्याचा संबंध थेट देशभक्तीशी लावला. आत्महत्या = आत्मघाती हल्ला= देशभक्ती असे सिनोनेम्स तयार झाले टायगर्सच्या डिक्शनरीमधे.

११ वर्षाच्या मुलाची गोष्ट वाचली असेलच तुम्ही अफगाणिस्थान मधल्या. आत्मघाती हल्ल्या नंतर जन्नत नसीब होइल आणि ७४ कुंवारी कन्याओंका साथ मिळेल असं याला सांगण्यात आलं होतं. पण इथे टायगर्स म्हणजे सगळे वयाने मॅचुअर्ड झालेले लोकं होते.

तामिळनाडूची सेल्फ प्रोक्लेम्ड आयर्न लेडी.. ( खरंच??) जयाने तर असंही म्हंटलं होतं की तिथे आपण आपलं सैन्य पाठवायला पाहिजे, ता्मीळांना वाचवायला. एका बाबतीत राजपक्षाच कौतुक करावं लागेल, इतक्या इंटरनॅशनल प्रेशर नंतर सुध्दा या माणसाने हल्ला करणे बंद केले नाही टायगर्सवर. अगदी हेवी शेलिंग करुन कित्येक तामिळ लोकांना मारले . (याचे बरेच यु ट्य़ुब व्हिडिओज आहेत  मी पाहिलेले.) बातम्यांत  श्रीलंकन सरकारने बोटीने पळून जाणाऱ्या निरपराध नागरिकांना पण सोडलं नाही. कित्येक बोटी , ज्यामधे श्रीलंकेतून भारताकडे पळून येणारे सामान्य नागरिक होते, त्यांच्यावर शेलींग करुन ते टायगर्स होते असा प्रचार पण करायला कमी केले नाही श्रीलंकेने. श्रीलंके कडे भारताची केवळ एक फ्रिजेट गेली असती तरी त्यांना शरण यावं लागलं असतं.त्यांची नेव्ही अगदीच कमकुवत आहे. आणि टिचभर देश.. काय केलं असतं त्यांनी??

राजीव गांधींचा शांती सेना पाठवण्याचा निर्णय चुक की बरोबर याचा उहापोह इथे करित नाही. पण त्याच वेळेस जर डिप्लोमॅटीक प्रेशर टाकलं असतं श्रीलंकेवर आणि तामिळ लोकांना अधिकार देण्यासाठी भाग पाडलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण भारतीय शांती सेनेने तिथे जाउन ऍडिशनल सिंहली सेनेचेच काम केले. तामिळांना वेचून मारले गेले तिथे- आणि १ हजाराच्या वर भारतीय सैनिक पण मेले आहेत श्रीलंकन वॉर मधे, पण त्याचं सोयर सुतुक कुणालाच नाही. असो..

मी तर द्विधा अवस्थेत आहे.. प्रभाकरनचं चुकलं की बरोबर होतं?  जरी ते काही असलं तरी त्याच्या मत्यू  हा एक हाडाच्या लढवय्यांचा,  कुशल नेतृत्वाचा, अस्त  म्हणून कायम लक्षात राहील.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , , . Bookmark the permalink.

5 Responses to प्रभाकरनचा मृत्यु.

 1. Rohan says:

  प्रभाकरनचा मृत्यू म्हणजे एकूण तामिळ दहशतवादाचा अंत नव्हे. त्यांच्या संघटनेचे जाळे जगभर, मुख्यत: युरोपात आहे. प्रभाकरनच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अनेक तामिळ तरुण-तरुणी स्वत: मानवी बॉम्ब व्हायला तयार होण्याची शक्यता आहे. भारताला तर अधिकच सावध राहायला हवे. विमाने हायजॅक करण्यापासून ते बॉम्बस्फोट घडवून आणण्यापर्यंत आणि श्रीलंकेतील आणि भारतातील राजकीय नेत्यांचे खून घडविण्यापर्यंतचे कट आताच शिजू लागले असतील. प्रभाकरनने असे विकृत व हिंस्र निष्ठा असलेले अनेक अनुयायी तयार केले आहेत.

  प्रभाकरन हा त्याही अर्थाने भारताला हव्या असणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर होता. तो जिवंत सापडला असता, तर त्याला भारताच्या हवाली करावे लागले असते. त्या परिस्थितीतही त्याचा मृत्यू अटळ होता. योगायोग असा, की राजीव गांधी यांच्या मृत्यूला उद्या अठरा वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांच्या हत्येच्या या सूत्रधाराला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.

  • तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. पण एकच वाटतं, की प्रॉपर नेत्या शिवाय कुठलिही चळवळ यशस्वी होत नाही.
   आणि इथे तर प्रभाकरन आणि त्याचा उजवा हात ( नांव विसरलो) तो पण मारल्या गेला आहे.
   अर्थात, युरोप मधे थर्ड इन कमांड कोणी असेल तर मग मात्र ही संघटना जिवंत राहू शकेल.
   अन्यथा काळाच्या ओघात नामशेष होइल असे मला वाटते.

   प्रभाकरन जर भारताच्या हाती दिल्या गेला असता, तर त्याला काहिही झाले नसते.
   कारण??? आपले सरकार इतके कार्यक्षम आहे की अजुनही अफझल गुरु ची क्षमा याचिका पेंडींग आहे –प्रतिभा ताईंच्या कडे..
   आता, ताईंना जेंव्हा कधी वेळ मिळेल त्यांच्या पद्मश्री पदकं वाटणॆ, आणि उदघाटन सोहोळे या सारख्या महत्वाच्या कामातुन ,
   तेंव्हाच त्या निर्णय घेतिल,
   कदाचित ’बाईंना” विचारुन………..

   तो पर्यंत आपण म्हणु या मेरा भारत महान.. यहां करते सब टेररिस्टोंकॊ भी सलाम.!
   हे सगळं होत असतांना ह्युमन राइट्स वाले कुठे द्डून बसले होते कोण जाणे. तिथे अरुंधती आणि इतर मंडळींना पाठवायला हवे होते !

 2. rohan says:

  त्याचा उजवा हात >>> पोट्टू अम्मान ??? (गुप्तचर खात्याचा प्रमुख)

 3. bhaanasa says:

  prabhakaran ne aatmahatya keli he vaachale ani pratham tumchi aathavan aali. Tumhala nakki dhakkaa basala asnaar. hmm, vyaktisha: Itki mothi organisation chalvinaarya Prabhakaran nehi shevati jiv dyava? Ek faar bare zale ki to Bharatat aala nahi sharan ghyayala. Nahiter khareh tumhi mhanata tase tyala kahihi zale nasate. Sahishunta aamhi sodanaar nahi mag itarani aamhala kahihi karo. aso.

  Rajeev Gandhi matra aaj nakki hayat asate, jer aapan bare ani aapala desha bara ase mhantale asate ter. Te jya prakare marale gele ti ghatana aajhi manala atishay traas dete.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s