सरदारजी & भिकारी

गेले ३ दिवस एकटाच घरी होतो. सौ. गेली आहे लग्नाला. पण आज सकाळपासूनच जरा धावपळ सुरू झाली आहे. काका आणि काकू आज अमरावतीहुन आलेत. ती केसरीची युरोप टूर आहे ना .. लिल चॅम्प्स सोबत , त्या मधे त्यांनी बुक केलंय. त्या साठी ते अमरावतीहुन आजच आले. सकाळच्या ट्रेनची येण्याची नक्की वेळ माहिती नव्हती. काकांचा जेंव्हा अमरावतीहुन फोन आला होता ,म्हणाले कुठे उतरु? आता वय ७३ च्या आसपास झाल्यामुळे मुंबईला यायचं म्हट्लं की त्यांना जरा टेन्शनंच येतं. म्हणुन त्यांना सांगितलं की तुम्ही इथे दादरलाच उतरा म्हणजे मला तुम्हाला घ्यायला येता येइल.

सकाळची जुनी वेळ आठवत होती ट्रेनची. बरेच दिवसांत नागपूर हून कोणीच न आल्यामुळे नविन वेळ माहिती नव्हती. पुर्वी ही ट्रेन नागपूरहून सुटायची , पण नंतर ही ट्रेन गोंदिया ते मुंबई करण्यात आलेली आहे. बरं नेट वर चेक करु म्हंट्लं तर ,नेट पण बंद.. ब्रॉड बॅंड कर्टसी एमटीएनएल ! सकाळचा ४ वाजताचा वेक-अप कॉल लाउन झोपलॊ.

४ वाजता उठल्यावर मग लवकर लवकर आटोपून दादरला निघालो, तेवढ्यात फोन वाजला. फोन काकांचा होता. म्हणाले, ट्रेन अराउंड ७ वाजता पोहोचेल. म्हट्ल ठीक आहे आणि पुन्हा झोपलो- ते ६ चा अलार्म लावून. सकाळच्या वेळी माझं घर ते दादर अंतर पार करायला अर्धा तास पुरतो. शिवसेना भवनाचा सिग्नल बंद होता, पण लेफ्ट टर्न घ्यायचा म्हणून, सिग्नलकडे दुर्लक्ष करुन वळलो, तर समोर ट्राफिक पोलीस उभा!!

साहेब, गाडी साईटीला घ्या… मुकाट्याने गाडी साइडला लावली, त्याला म्हंटलं, काय ते लवकर आटॊप… तर म्हणे कायद्याने जेवढा वेळ लागेल, तेवढा लागेलच.. समहाऊ, कसंतरी करुन त्याला रिक्वेस्ट करुन म्हट्लं की माझे काका यायचे आहेत, तेंव्हा हवी असेल तर गाडी इथेच ठेऊन मी टॅक्सिनी जातो. गाडी नंतर घेउन जाईन.. त्याने माझ्याकडे जरा रोखून पाहिलं.. आणि त्याला माझ्या म्हणण्यात ला सिरियसनेस कळला असावा.. म्हणाला.. निघा आता…. मी हलकेच हसलो, आणि निघालो स्टेशनला..मुंबईला मराठीमधे बोललात पोलीस किंवा बस कंडक्टरशी तर तुम्हाला कमी त्रास देतात. माझ्या केस मधे त्याला लक्षात आलं असेल, की मी खरंच सिरियसली बोलतोय, म्हणून.. त्याने मला सोडला असावा.. कुच चाय पानि घेतल्याशिवाय. 🙂

पार्किंगची आजकाल जरा बोंबच असते दादरला. पुर्वी त्या स्वामीनारायण मंदिराच्या गल्लित गाडी पार्क करता यायची पण आज मात्र सगळ्या जागा अगदी फुल्ल्ल होत्या. सरळ दादर टीटी ला जाउन गाडी लावून आलो. तो पर्यंत ७ वाजायला १० मिनिटे कमी होती. स्टेशनला पोहोचलो तर काका येतांना दिसले.. कुली नेहेमी प्रमाणे हुज्जत घालत होता. १०० रुपये मागत होता, दोन सुटकेस आणि दोन टॊट बॅग्ज साठी.शेजारीच नेहेमी लोकांना त्रास देणारा टॅक्सी वाला सरदार पण उभा होता.

त्या सरदारने मला पाहिले आणि एकदम तोंड चुकवून पळून गेला. तो सरदारजी मला पाहून का पळून गेला? एक लहानसा प्रसंग आहे दोन वर्षांपूर्वीचा…. त्या सरदार टॅक्सीवाल्याने एकदा माझ्या वडिलांना दादरहुन मालाडला आणले होते. नेहेमी २२० ते २४० रु होतात. पण तो ३५० रुपये मागत होता. वडील काढून देणार तेवढ्यात मी खाली आलो. आणि मिटर बघितलं. मिटरप्रमाणे पण ३४० रुपये होत होते. सरदारला म्हंटलं, की तुम्हारा मिटर खराब है.. यहां तक २२० रु होता है.माझा कॉन्फिडन्स बघुन त्याला लक्षात आलं की मला सगळं माहिती आहे म्हणून..तो उगाच वाद घालु लागला.. सेल फोन काढून पोलिसांना फोन करणार तर तो म्हणाला, की जाने दो साब ३०० दे देना.

मी त्या सरदारला म्हणालो. मैने पुरा भारत देखा है, तुम्हारा पुरा पंजाब घुमके आया हूं, लेकीन आजतक कभीकिसी सरदार कॊ भिकारी की तरह पैसा मांगते हुए नहीं देखा था. आज तुम्हे देखा.. और मै धन्य हो गया! तुम्हारे लिये भी बडे फक्र की बात है, की तुम भारत देशके पहले सरदार भिकारी हो.. मै तुम्हारा फोटॊ निकालता हूं फिर तुम्हे ३०० रुपया दुंगा. तुम्हारा फोटॊ मै इंटर्नेट पे डाल दुंगा, ताकी सारी दुनिया देखे भिकारी सरदार कैसे होता है..

तो सरदार एकदम ओशाळला आणि दोनशे रुपये घेउन गेला होता त्या वेळेस.. पण एक बाकी आहे, मी आज पर्यंत कधी सरदार ला भिकाऱ्या प्रमाणे भीक मागताना पाहिलेलं नाही. अतिशय अंग मेहेनतीचं काम करू शकणारी जमात आहे ही. इतकं फिरलो पण कुठे भीक मागताना दिसला नाही सरदारजी.

एखाद्या सरदारने बिझिनेस सुरू केल्यावर त्याने एकच काम करायचं असते, रेग्युलरली गुरुद्वारात जायचं आणि थोडी कार सेवा करायची. एकदा इतर सरदार लोकांना कळलं की हा एक नवीन सरदार आहे, ते बरोबर त्या सरदारला धंद्यामधे मदत करतात.

आता मराठी माणुस.. आणि तो पण धंदेवाला.. मी दोन दिवसांपुर्वी आयडियल बुक डेपो ला गेलो होतो. वेळ दुपारची . दुकानाचे शटर्स खाली केलेले होते. पण एक शटर उघडं होतं एक बाई तिथे बाहेर बसून कांही तरी एंट्रीज करित होती. मला तंबी दुराईचं पुस्तकं दोन फुल एक हाफ हवं होतं. लग्नात प्रेझेंट द्यायला. ( मी बहुतेक पुस्तकंच प्रेझेंट देतो लग्नात) . डॉं ब.ना. पुरंदरेंचं शल्य कौशल्य मी कित्येक लोकांना दिलंय लग्नात प्रेझेंट म्हणून..

त्या बाीला म्हणालो, की दोन फुल.. काढुन द्या. तर ती बाईने बोट दाखवलं एका छाडमाड व्यक्तिमत्त्वाच्या एका माणसाकडे, म्हणाली त्यांना सांगा..  मी त्याच्याकडे गेलो, तर तो मी कांही बोलण्यापूर्वीच म्हणाला, ३ नंतर या, आता नाही.. अरे म्हंटलं ऐक तरी जरा. .. पण तो मराठी दुकानदार अगदी पक्का होता. म्हणाला आता लंच टाईम आहे.. आता काहीच मिळणार नाही.. शिव्या घालत तिथुन सरळ बाहेर पडलॊ आणि एक रिकामं पाकीट घेतलं हातात घालायला.. मराठी माणसा मधला उध्दटपणा… त्या आयडियल वाल्याला अगदी वहाणेने मारावे असे वाटत होते.. पण राग आवरला.. म्हंटलं .. थोडे दिवस थांब, एखादा गुज्जु इथे आला आणि नवीन दुकान उघडलं की तुझ्या दुकानात कोण येतोय….!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

11 Responses to सरदारजी & भिकारी

 1. शिरीष says:

  अगदी योग्य दिवशी सूचक छापलेय… पण भौतिक भिकारी अवस्थेपेक्षा मनाने श्रीमंत असणे जास्त महत्वाचे असते… हे जरा नमूद करावेसे वाटले म्हणून ही लिखापढी उपद्व्याप.. इतकेच. खरंतर मनाने भिकारी असू नये… स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे रामदास लिहीते झाले कधितरी… आणि ज्याचा खरा अर्थ आम्हांला उशीरा कळला…!

 2. Raj says:

  anubhav chhaan aahet. sarva mudde paTale.

 3. bhaanasa says:

  मुंबईत पोलिसाशी, विमानतळावर, जिथे जिथे सरकारी शब्द येईल तिथे तिथे मराठीत बोलल्याने त्रास कमी होतो. आपुलकी भिडते हो अगदी. 🙂
  बाकी तुमचे observation बरोबर आहे, खरेच मलाही आठवत नाही कोणा सरदारजीला भिख मागताना पाहिलेले.

 4. fanfare says:

  PaN baryach veLa asehi disun yete kee Sardar lok apramaNeek asataat, businessminded asatat he khare paN kahihee karaNyachee tayaree paN tyanchyat disate, no scruples whatsover,…Gujarathi jatil tethe sarvajaneek thikanee ghaN karaNyat dhanyata manatat, tee tyana tyanchya paishchee shaan ahe ase watate…He lok khoop agrssively itaranshi wagatat tyana apalyabaddal kahee apulkee kinva adar nasato, apaN kashala tyanche evadhe guN gayache/? tehee swat:kade kameepaNa gheun???

  • शिरिष, राज, दत्ता, भानसा आणि फॅन फेअर,
   अभिप्रायाबद्दल आभार..

   सरदार लोकं बिझिनेस माइंडेड असतात किंवा अप्रामाणिक असतात हे मात्र अगदी खरं आहे. जितके डुप्लिकेट स्पेअर पार्ट्स भारतात बनवले जातात, त्यांचा व्यापार हेच लोकं करतात.

   त्यांच्यामधे कोणी भिकारी दिसलेला नाही अजुन तरी.. हाच एक पॉझिटिव्ह मुद्दा आहे. बस्स! बाकी ते कांही सुपर मॅन नाहीत, त्यांच्यामधे पण गुण दोष आहेत.. कदाचित दोष जास्तंच असतिल…

 5. Aniket Vaidya says:

  Mahendra,
  I read your blog regularly. You write it interestingly.

  I got same mail about Sikh people. There were 10 friends, who went to see Delhi. They hired a taxi. Taxi driver was a sardar. During their journey, they made lot of jokes on sardar. At the end of day, driver gave 20 coins of Re.1 to them and said, “You made lot jokes on sardar, take these coins and give to sardar beggar you will find.”
  They did not find any sardar beggar till date. Sardar will work hard, bur never beg.

  Aniket Vaidya.

  • Aniket
   Thanks for the comment.
   Its true, i had a close frnd by name Nirmal Singh, he use to say this always. Any saradar found begging, is given some work in gurudwara, or some other place and he is taken care. They support each other a lot.. and thats the spririt which keeps the community together..

 6. guruprasadkanitkar says:

  Mahendra good 1
  I really liked what u wrote

  Best Regards,
  Guruprasad

Leave a Reply to fanfare Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s