लगान इन रिअल लाइफ..

माझे काका नामांकित वकील. म्हणजे इतके की अमरावतीला नुसतं आप्पा कुलकर्णी अमरावती , इतका पत्ता टाकला तरीही पत्र मिळेल. तसे बार कौन्सिलवर पण निवडुन आले होते पुर्वी, त्यामुळे पण बऱ्याच लोकांना माहिती आहेत ते.. खरं तर वकिली हा एक बेस्ट बिझिनेस आहे असं माझं मत आहे. जसे जसे तुमचे वय वाढत जाते तसे तसे तुम्ही जास्त पैसे कमाऊ शकता..डिमांड वाढते. रिटायरमेंटला काहीच वाव नाही. तुम्ही जरी केसेस घेणं कमी केलंत तरीही लोकं मागे लागतात,की कसंही करुन  ही एवढीच केस तुम्ही लढवा म्हणून.त्यामुळे अजूनही काका  खूप बिझी असतात..

काकांना खूप गोष्टी सांगायची सवय आहे. अगदी मनापासून समरसून गोष्टी सांगतात.  स्मरणशक्ती इतकी दांडगी की अजूनही प्रत्येक प्रसंगाचे वर्ष सांगतात, कधी काय झालं होतं, किंवा कोण काय म्हणालं होतं ते अगदी नावानिशी सांगतात

.इंग्रजांचं राज्य होतं,तेव्हाची ही गोष्ट आहे…इंग्रज कसेही असले तरी एक गोष्ट आहे जी त्यांचा सुसंस्कृतपणा दाखवते. ती म्हणजे त्यांनी कोणालाच आणि कधीही गुलाम म्हणून वापरलं नाही, विकलं नाही .  अर्थात, मजूर म्हणुन मलेशिया, श्रीलंकेत कांही लोक नेले होते , त्यांना पण पैसा देऊनच काम करवून घेतलं गेलं. नेमका ह्याच्या विरुद्ध अमेरिकन्स नी जिथून शक्य होईल तिथुन गुलाम नेले होते. म्हणूनच भारत गुलाम गिरी मधे होता हे म्हणणे चुकीचे वाटते . भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता असे म्हणणेच बरोबर ठरेल..

कालच बोलतांना एक गोष्ट सांगितली माझ्या आजोबांची. माझे आजोबा म्हणजे आर. जे. कुलकर्णी.. शेवटच्या काळात म्हणजे १९५५ च्या सुमारास ते कलेक्टर होते अकोल्याचे, त्यांच्या संदर्भातली ही गोष्ट आहे. अगदी सिनेमातल्या सारखा प्रसंग आहे ह्यात.

तुम्ही लगान पाहिला आहे का? मला सुरुवा्तीला तो चित्रपट पाहिला आणि त्यात जे कांही दाखवलंय ’ब्रिटीश लोकांचे वागणे – कायद्याला धरुन” हे जरा अतिशयोक्ती ्पूर्णंच वाटलं होतं. असं वाटायचं की त्यांच्या हातामधे सत्ता असतांना त्यांनी सत्तेचा (दूर) उपयोग का केला नाही?? शेवटचा बॉल नो बॉल दिला नसता , किंवा कॅच दिली असती तर कोणाला कळलं असतं?? पण त्यात हे दाखवलंय की ब्रिटीश अगदी कायदेशीर पणे खेळ खेळलेत, आणि जेंव्हा भारतीय जिंकतात तेंव्हा त्या युरोपियन माणसाला शिक्षा करतात. पण जी गोष्ट काकांनी सांगितली ती ऐकल्यावर मात्र पटलं ते..

ही गोष्ट आहे माझे आजोबा जेंव्हा तहसिलदार होते तेंव्हाची. १९२७ चा काळ. माझे आजोबा तेंव्हा तहसिलदार होते अमरावतीला. आजोबांचे केस अवेळीच पांढरे झाले होते. तेंव्हाचा इंग्रजांचा काळ. सगळ्या वरच्या पोस्ट्स इंग्रजांकडेच होत्या. तेंव्हा सी पी ऍंड बेरार प्रोव्हेन्स होतं, आणि त्या प्रोव्हेन्स चा कमिश्नर आय सी एस अधिकारी  जेम्स ग्रिन फिल्ड होता. हा अधिकारी नुकताच आलेला होता या भागात.

त्याने कुठलीही गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे करण्याची सुरुवात केली. कुणालाही नोकरिवर ठेवणे किंवा काढून टाकणे ह्याची ऍथोरिटी त्याच्याच कडे होती.  तुम्हाला फोर्ड ची ती गोष्ट  आठवते का? एका इंजिनिअरला त्याने टाईट पॅंट घालतो, म्हणजे तो गे आहे असे म्हणून नोकरी वरून काढून टाकले होते तसलाच प्रकार होता ग्रिन फिल्ड चा .

एके दिवशी सकाळी आजोबा त्यांना भेटले असता त्याचे लक्ष आजोबांच्या पांढऱ्या केसांकडे गेलं. त्याने ताबडतोब ऑर्डर काढली की आर.जे.कुलकर्णी यांचे केस पांढरे आहेत आणि त्यांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे ( ही गोष्ट पुर्ण पणे खोटी होती. आजोबांना हार्ट चा कांहीच त्रास नव्हता.) म्हणून नोकरी वरून बर्खास्त करण्यात येत आहे.

आता करायचं तरी काय? लग्न झालेलं, लहान लहान मुलं, म्हणून स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून त्यांनी ’शाला पत्रिका’ नावाच्या मराठी विकली पेपरचं संपादन सुध्दा केलं. त्या काळी अमरावती मधे ना.रा.बामणगांवकर ’उदय’ नावाचा पेपर पण काढत होते. असो. विषयांतर होतंय..
तर काय सांगत होतो,की आजोबांना नोकरी वरून काढल्यानंतर त्यांनी सरकार दरबारी त्या आय सी एस कमिश्नरच्या अगेन्स्ट अपील केलं. डॉ. व्हॉड म्हणून तेंव्हा एक मोठे सरकार दरबारी डॉक्टर होते. त्यांच्याकडे आजोबांची मेडीकल चेक अप करण्याची  केस गेली !

सरकारने असा निर्णय दिला की डॉ. व्हॉड हे आजोबांची तटस्थपणे मेडीकल टेस्ट घेतिल आणि आपले फाइंडींग्स सरकारला जमा करतिल. कोर्टात केस सुरु होतिच – बर्खास्तीची..डॉ. व्हॉड ने मग सगळं टेस्ट करुन आजोबांना काहिच झालेले नाही असा रिपोर्ट दिला.

त्या रिपोर्ट च्या आधारावर आजोबांना पुन्हा नोकरीवर  घेण्यात आलं. आणि ग्रिनफिल्ड ची बदली करण्यात आली.

ही गोष्ट ऐकली आणि मला पटलं, की हो… लगान मधे जे दाखवलंय ते होऊ शकतं…!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to लगान इन रिअल लाइफ..

  1. he wachun tar asa wichar yeto, ki jar aaj British asate tar kaya Law & Order aatta aahe tyapeksha chagale asate?

  2. वैभव
    तुमचे म्हणणं पटतंय.. कदाचित कायदा आणि सुव्यवस्था जास्त चांगली राहिली असती..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s