राज – उध्दव आणि फडताळातली भुतं..

माझ्या आधीच्या एका पोस्टवर खुप डीटेल्स कॉमेंट आली आहे .. मनसे आणि ममता या पोस्ट वर.   आधीच्या राज ठाकरेंच्या फॉर आणि आजची तर एकदम व्होलाटाइल कॉमेंट आहे ,तशी ती राज किंवा उद्धव दोघांनाही ‘फॉर’ नाही पण इन्फर्मेटिव्ह आहे..

रमेश केणी… शैला केणी… ही फडताळातली भुतं आता पुन्हा उद्धव ठाकरेने बाहेर काढली आहेत.  खरं सांगायचं तर अगदी विसरायला झाली होती ही नांवं. कोणे एके काळी अगदी हेडलाइन असणारी ही नावं काळाच्या ओघात अगदी स्मृतीआड गेली होती. पण आज उद्धव आणि राज च्या भांडणात ही सगळी नांवं पुन्हा चर्चेत आलीत.

शिला केणी ह्यांचे पती रमेश केणी यांचा खून मिस्टीरियसरीत्या एका सिनेमा हॉल मधे करण्यात आला. या नंतर रमेशची पत्नी शैला हिने राज ठाकरे, त्याचे मित्र  यांनी केलेले आरोप प्रत्यारोप सगळी डिटेल्स त्या पोस्ट मधे दिलेले आहेत. पोस्ट अतिशय इनफर्मेटिव्ह आहे (कॉमेंट नंबर २०). ते वाचूनच हा आजचा टॉपिक निवडला लिहायला.उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांवर  आरोप किंवा प्रत्यारोप करण्यात अतिशय व्यस्त आहेत. हे करतांना त्यांना हे पण कळत नाही की आपण काय बोलतो आहे ते..

उद्धव च्या प्रेस स्टेटमेंटवर काही बोलण्या आधी ,& रमेश केणींच्या केस वर कांही कॉमेंट करण्यापूर्वी मला  राज ठाकरेंच्या ..     राम जेठमलानी परप्रांतीय आहेत  या स्टेटमेंटवर माझं मत लिहावंसं वाटतंय..

अजूनही पाकिस्तानात भारतातुन गेलेल्या मुसलमानांना मुजाहिदिन म्हणून कनिष्ठ वागणूक दिली जाते. एक पिढी पुर्ण पाकिस्तानात गेली तरीही ते मुजाहिदिनच आहेत. त्याच प्रमाणे राज ठाकरेंचे वक्तव्य आहे. राम जेठमलानी आज ८४ वर्षाचे आहेतत्यांनी लॉ ची पदवी वयाच्य़ा सोळाव्या वर्षी मिळवली होती.  वयाच्या  12 व्या वर्षी ते भारतामधे आले . त्यांना ही वकिली ची पदवी देण्यासाठी खास परमिशन दिली गेली बार काउन्सिल तर्फे. . त्यांचं पुर्ण आयुष्य मुंबई ला गेलं -ते परप्रांतीय कसे???

आणि दुसरा मुद्दा अर्धवटरीत्या पुढे रेटला होता, की ते जेम्स लेन चे वकिल होते आणि तरीही त्यांना उध्दवने मत दिले.. राम जेठमलानी हे जेम्स लेन चे नव्हे तर त्या पुस्तकाच्या प्रकाशन संस्थेचे वकील आहेत. आणि वकीली करतांना  त्यांनी कुणाची केस घ्यायची आणि कोणाची नाही हे राज ठाकरेंना ठरवायची गरज नाही. ..कुठलीही केस घेण्याचा त्यांना अधिकार आणि पुरेसे बुध्दी स्वातंत्र्य राम जेठमलानींना आहे  असे वाटते.तो त्यांचा धंदा आहे, आणि ते तो सचोटीने करतात. त्यावर काहीही भाष्य करण्याचे कारण मला तरी दिसत नाही. तसेच उध्दवने कुणाला मत दिले त्याबद्दल पण स्पष्टीकरण का मागताहेत राज?

रमेश केणींच्या केसच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी केलेले स्टेटमेंट की राज ठाकरे त्यात पुर्ण अडकले होते, आणि आम्ही म्हणजे उद्धव आणि बाळासाहेबांनी त्याला त्यातुन सोडवले तरीही तो अहसान फरामोश झाला आणि आमच्यावर आरोप करतो आहे … हे स्टेटमेंट जर कोर्टाने एक कबुलिजबाब म्हणुन कन्सिडर केले तर रमेश केणींची केस पुन्हा उघडली जाउ शकते. आणि राज ठाकरेबरोबर , उद्धव ठाकरे पण गोत्यात येण्याचे पुरेपुर चान्सेस आहेत.  उद्धव चा कबुलीजबाब हा फारच सेन्सेटिव्ह इशु होऊ शकतो,आणि बंद करण्यात आलेली ही रमेश केणी केस पुन्हा ओपन करण्यासाठी कोर्ट आदेश देऊ शकते.

जर ही केस ओपन झाली, तर खुनाचा साथीदार म्हणून उध्दव ठाकरेंवर पण तेवढेच सिरियस चार्जेस (३०२) लागु शकता. खून करण्यास मदत करणे, पुरावे लपवणे इत्यादी …म्हणून ही फडताळातली भुतं बाहेर न निघणे राज आणि उद्धव च्या दृष्टिने बरे राहील..

अमिताभ बच्चनच्या डायलॉगवरच्या अगदी खालच्या दर्जाच्या ( झोपडपट्टी लेव्हलच्या) उध्दव च्या कॉमेंट ने तर अगदी कहरच केलाय. त्यात उध्दव म्हणतोय, की राज ने एकिकडे अमिताभ चा दुस्वास करायचा आणि दुसरिकडे त्याचे डायलॉग वापरणे म्हणेज स्वतःच स्वतःची मारुन घेणे आहे..  शेम शेम!!!! इतक्या खालच्या लेव्हलला गेल्यावर आता यावर राज काय म्हणतो हे बघायचं..काळाची गरज हिच आहे की उध्दव आणि राज दोघांनीही पब्लिक स्टेटमेंट्स ऑन कॅमेरा देणे टाळले तर ते दोघांच्याही आणि मराठी माणसाच्या दृष्टिने बरे होइल..

अरे वा. हल्ली माझं मराठी बाकी सुधरतंय. लिहितांनाच योग्य मराठी शब्द सुचताहेत. आता बघा ना, स्केल्ट्न्स इन द कपबोर्ड्स ला फडताळातिल भुतं कसा अगदी योग्य शब्द फारसा विचार न करता लिहिल्या गेला? रोज कांही तरी लिहिण्याचे हे परिणाम.

Raj Udhhav

हे कार्टून बघा, कालच  अभिजीत ने पाठवलंय इ मेल ने.. मस्त आहे एकदम..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , . Bookmark the permalink.

13 Responses to राज – उध्दव आणि फडताळातली भुतं..

 1. abhijit says:

  राज आणि उद्धव भांडतच राहतील. आजच माझ्याकडे मस्त कार्टून आलंय. राज आणि उद्धव वर. तुम्हाला कसे पाठवता येईल?

  (एक दुरुस्ती मुजाहिदिन नव्हे मुहाजिर)

 2. Rohan says:

  Why cant i follow your blog ??? i cant see the feed for that … !

  • रोहन
   फिड ऍक्टीव्हेट केले आहेत. मला नक्की माहिती नाही ते काम करतं की नाही ते. पण कृपया चेक करुन सांगाल तर बरं होईल.. धन्यवाद.

 3. sahajach says:

  अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे हा सगळा….या लोकांना मराठी अस्मितेशी काहिही घेणं देणं नाहीये…….
  मला खरच मनापासुन वाटत आपल्या देशात हुकुमशाही आली पाहिजे….पण तो हुकुमशहा हा आजच्या राजकारणातला कोणीही नको…..

  • तन्वी
   राम जेठमलानींच्या सारख्या विद्वान माणसाला नावं ठेवतांना तरी थोडा विचार करायला हवा होता. राम जेठमलानी फाळणी पुर्वीच भारतामधे आले होते. कमित कमी त्यांच्या विद्वत्तेचा आणि वयाचा तरी मान ठेवायलाच हवा.
   याच राम जेठमलानी यांनी राजला त्या केणी केसमधुन बाहेर काढले होते. असो..राजकारण्यांचे कोणिच मित्र किंवा शत्रु नसतात. सगळीकडे फक्त स्वार्थ आहे झालं. हुकुम शाही चा विचार मजेशिर आहे.. 🙂 एक वेगळंच डायमेन्शन ह्या प्रॉब्लेमला..
   प्रतिक्रियेबद्दल आभार..

 4. Shailesh joshi says:

  I agree with this, but one thing we have to remember, Uddhav bats only on prepared ground.He doesnt hve personality, command or even concepts to command on mass.
  This, what is is happening in between raj & Uddhav is because of ppl around Uddhav.
  He was no where in picture when raj & other team in Shivsena took hard efforts to spread Shivsena all around Maharashtra.
  Once Shivsena got power then some of the nuisense factors in Shivsena, some close ppl, who were financing shivsena gave spark to Uddhav to fulfil there mottos.
  Since Uddhav has taken over Shivsena many of actually working ppl in shivsena have come out.
  raj is leader of mass, at least now his vision & fundas are good.
  Lets try something new.

 5. yogesh1111 says:

  chhan aahe,, majhya mate — doghehi aata bore karu lagale aahet,

  Marathi bhasha aani lok khup samruddha aahe, aasha makdanchi, marathi mansala bilkul garaj nnahi.

 6. guruprasadkanitkar says:

  मित्रांनो जरा विचार करा जर हेच कार्टून जर राज किंवा स्वतः बाळसाहेब ठाकरे यांच्यापैकी एकाने काढला तर ते कस दिसेल पण हे कार्टून पण खुप छान आहें

  अभिजीत धन्यवाद

 7. vishal says:

  राज यानी जेठमलानी बाबत जे उद्गार काढले ते बरोबर नसतील पण सुरुवात जेठमलानी यानी केलि. राज यांना ‘स्थानिक दहशतवादी”सम्बोधायाची काय गरज होती? (ते वरुण गान्धिलाही असाच काहीतरी बोलले होते!) जेठमलानी परप्रांतीय नक्कीच नाहित पण सेनेने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.
  मराठी संस्कृति आणि महाराष्ट्राला यानी बदल्यात काय दिले? त्यांच्या विद्वात्तेशी लोकांना काय देने घेणे? ते वादग्रस्त केसेस घेवून चिकार पैसा आणि प्रसिद्धि खेच्न्यात तरबेज आहेत!!
  या माणसाने वादग्रस्त केसेस ladhavane (इन्दिअर्जिंचे मारेकरी, जेसिका लाल्चे मारेकरी) आणि इंग्लिश चॅनल वर आक्रसतालेपने बकबक करने यातच आपली ‘सचोटी’ खर्ची घातली आहे. त्यावरपण बोला की. कारण बर्याच लोअकन्ना वाटत की इंग्लिश न्यूज़ चनेल्वर कोणी बडबड केलि म्हणजे तो खूप भारी!!
  तसेच राज वरच्या टीकेला अर्थ आहेच.( सेना पराभूत झाल्याचे पाहूं अति आनंदाने हिंदी संवाद बोलताना राज स्वताचे हसे करून घेतात. कांग्रेस आल्याचे यांना काही वाटत नाही. पण सेनेची जिरली याचा केवढा आनंद!!)

  बाकी राज आणि उद्धव यानी जो तमाशा लावला आहे त्यावर आपल्या मताशी सहमत!!

 8. ARUDE SUSHANT NARAYAN says:

  raj thakare is the best man.

  • I would suggest , lets not form any opinion at this juncture. Now the elections are over.. what are steps taken in the interest of Marathi Manoos?? Not a single party has uttered a word after election. This issue will come up during next elections .. Lets see what happens…..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s