चायना मधे वडा पाव.

Yiwuमुंबईला दोन प्रकारचे हॉटेल्स आहेत . एक म्हणजे शेट्टी लोकांचे आणि दुसरे म्हणजे  पण शेट्टी लोकांचे 🙂 तसे तुरळक हॉटेल्स मराठी लोकांची किंवा गुजराथ्यांची पण आहेतच पण मुख्य शेअर जो आहे तो आहे शेट्टींचा.प्रत्येक सबर्ब मधे ‘चालणारं’ हॉटेल हे शेट्टीचच असतं . कारण मॉडरेट चार्जेस आणि फास्ट सर्व्हीस. अगदी चौघांचं जेवणाचं बिल पण    २०० ते ३०० च्या घरात होतं,आणि क्वॉलिटी पण बरी असते.  .

परवा आमच्या नेहेमीच्या शेट्टी कडे गेलो होतो विथ फॅमिली. तसे दोन शेट्टी आहेत, एक म्हणजे गोरेगांवचा सेंट पायस जवळचा, दुसरा सत्यम शिवम हा कांदिवली चा , ज्यांच्या कडे आम्ही नेहेमी जातो. युजवली मेनू कार्ड न पहाताच ऑर्डर दिली जाते. सगळ्यांचं अगदी ठरलेलं असतं.. काय मागवायच ते. अगदी कार मधे बसल्यापासूनच डिस्कशन सुरू होतं.. कोणाला काय हवं आहे ते त्या्मुळे हॉटेलला पोहोचे पर्यंत पक्कं  झालेलं असतं…

शेट्टी हॉटेलचा मेनू म्हणजे कमीतकमी ५०० च्या वर आयटम्सची लिस्ट असते. भाज्यामधे पण इतके प्रकार असतात की तुम्ही कनफ्युज व्हाल.. पण एक बाकी आहे, जरी निर निराळी नावं असली तरीही, टेस्ट जवळपास सारखीच असते.    एखाद्या भाजी वर एक मेणबत्ती लाउन आणली की व्हेज अंगारा.. त्याच भाजीवर काजू किसमिस चे तुकडे घालुन आणले की तिच भाजी काश्मिरी व्हेज म्हणुन खपुन जाते. त्याच भाजीमधे  थोडं जास्त तिखट घालुन एक लाल तळलेली मिरची उभी खोचून आणली की त्याला व्हेज कोल्हापुरी असं नांव दिलेलं असतं.. एकंदरीत काय तर भाजी एकच असते.

शेट्टीच्या हॉटेलमधे व्हेज बिर्याणी ही नेहेमी लाल रंगाची असते, आणि हैद्राबादी म्हंटलं की हिरवी.. आता एखाद्या हैद्राबादी माणसाने जर ही हैद्राबादी बिर्याणी बघितली तर तो नक्कीच बेशुद्ध होईल. बरं बिर्याणीवर खवलेलं नारळ (?) आणि एखादा कढीपत्ता (?) दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कुठल्याही शेट्टीच्या हॉटेलातली चव ही सारखीच असते, फरक असतो तो केवळ ऍम्बियन्स मधे.तुम्ही एसीमधे बसाल तर एक्स्ट्रॉ १० टक्के चार्जेस.

धाकट्या मुलीला उगाच मेनू कार्ड वाचायचा छंद आहे. टाइम पास म्हणून मेनू कार्ड आणि अगदी मसाल्याच्या पाकिटावर चे कंटेट्स पण वाचून काढते ती. नर्गीसी बिर्यानी, काश्मिरी बिर्यानी सोबतच काजोल बिर्यानी, हिंदुस्थानी पुलाव वगैरे नावं पण होतेच.  एका वेगळ्या नावाने आकर्षित केलं.. ते म्हणजे चायनीज भेळ. काय बरं असेल हा प्रकार?

बाबा ट्राय करायची  का  चायनिज भेळ…..?? म्हंटलं.. ठीक आहे.. नेहेमीच्या डिश सोबत चायनिज भेळ पण मागवली. व्हेज मन चाऊ सुप ( हे खरंच चायना मधे लोकं खातात कां?) हे आमचं फेवरेट. खूप स्ट्रॉंग मसाले असलेलं,आणि आलं, मिक्स व्हेज , सोया सॉस बेस असलेलं हे   काळं सूप आणि त्यामधे घातलेल्या तळलेल्या नुडल्सच्या स्ट्रिंग्ज.. अगदी भारतीय टेस्ट असते – आम्ही आवडीने खातो.

सौ. नेहेमी प्रमाणे कुठलाही प्रयोग करण्याच्या मनःस्थितीत नसते आणि सरळ टोमॅटॊ सूप वर कॉम्प्रोमाइझ करते.. पण ती चायनिज भेळ म्हणजे काय असेल?? लवकरच आमचा वेटींग पिरियड संपला.

चायनिज भेळ ऍज अ स्टार्टर म्हणून आली. तळलेले नुडल्स + भारतिय भेळेचे सगळे पदार्थ म्हणजे कांदा, टोमॅटो,स्प्रिंग ओनियन्स, चिंचेची चटणी,  इत्यादी + टोमॅटॊ केचप ( कसलं भारी कॉंबो आहे नां? ) सगळं एकत्र मिक्स केलेलं.. आणि भली मोठी डिश.. एकटा माणुस तर खाऊच शकत नाही इतकी क्वॉंटीटि ! आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं.. पण जेंव्हा पहिला घास घेतला, तेंव्हा मात्र .. अरे वाह~~~~ मस्त आहे ! आपण आधी का ट्राय केली नाही ही डिश? टेस्ट मात्र एकदम मस्त होती. एक प्लेट संपल्यावर दुसरी पण बोलावली.. इतकी आवडली ती सगळ्यांना..

शेट्टी कडचा पिझा पण चांगला असतो. अगदी भारतीय टेस्ट. डोमिनोज चा पिझ्झा मला अजिबात आवडत नाही. त्या ऐवजी मी शेट्टी कडला मसाला पिझ्झा प्रिफर करतो.स्मोकिंग जोज, किंवा पिझ्झा हट मधे भारतीय टेस्ट चा पिझ्झा मिळतो. पनीर टीक्का मसाला पिझ्झा, किंवा तत्सम कांहीतरी.तो एक वेळ चालेल , पण डोमिनोज.. सिंपली हॉरिबल टेस्ट.. म्हणजे टेस्ट लेस पिझ्झा..!

अरे हो….पण आज हे सगळं खाण्याचं का आठवतंय?तसं तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच की मी किती खादाड आहे ते.आणि खाण्यावर प्रेम म्हणून लिहिलं पण खूप जातं प्रेमाने. 🙂

एक बातमी वाचली. चायना मधे वडा पाव.. भारतातले जास्तीत जास्त लोकं ट्रॅव्हल करतात यिवु ( YIWU)  ला ! बिजिंग किंवा चायना पेक्षा जास्त ट्रॅव्हल करतात.यिवु हे एक लहानसे गांव पण इथे भारतीयांचा खूप राबता आहे. भारतीय पण जे जातात ते नेहेमी राजस्थानी, गुजराथी किंवा महाराष्ट्रीयन असतात.घनःशाम आणि गिरिश हरियानी हे दोघं मुळचे उल्हास नगरचे. एकदा काही कामानिमित्त चायना मधे गेले तेंव्हा त्यांनी इथलं पोटेन्शिअल बरोबर ओळखलं आणि इथे एक इंडीयन रेस्टॉरंट सुरू केलं. असं रेस्टॉरंट की जिथे अगदी वडा सांबार, ते व्हेज मिल्स, किंवा नॉन व्हेज मिल्स अगदी ऑथेंटीक इंडीयन स्टाइलचं मिळेल.त्या रेस्टॉरंटचं नांव स्वाद ए हिंदुस्थान!  ! आपल्या कडे भारतामधे कसे कलकत्याला चायनिज लोकं आहेत ना शु मेकर्स?? तसेच!.

ह्या दुमजली हॉटेल मधे एक मजला केवळ व्हेजीटेरियन लोकांसाठी राखीव आहे. दुसऱ्या मजल्यावर व्हेज आणि नॉन व्हेज पण मिळते. रेश्मा पाटील म्हणुन एक हिंदुस्थान टाइम्सची चायना करस्पॉंडन्स आहे तिच्या ब्लॉग वर तिने लिहिलंय की चायनामधल्या ह्या हॉटेल मधे तिने अगदी दोसा, इडली , वगैरे सगळं ट्राय केलं आणि टेस्ट अगदी सेम टु सेम.. 🙂 जस्ट इंडीयन..

इथे मुंबईचा वडापाव पण मिळतो. मॅक्झिमम गुजराथी आणि महाराष्ट्रातले लोकं येतात इथे, म्हणून हे हॉटेल चांगले चालते असे तिने लिहिले आहे. या रेस्टॉरंट मधे चायनिझ पेंटर्सनी पेंट केलेलं इंडीयन आर्ट वर्क आहे भिंतींवर . तसेच टिव्ही वर नेहेमी सिडीज सुरु असतात .. विक्रम और वेताळ वगैरेच्या. त्या मुळे अगदी ऍट होम फिल होतं इथे.. भारताबाहेर आहे असं वाटतंच नाही.

जर तुम्ही चायना ला गेले  असाल,  तर तुम्ही माझा  भारतीय रेस्टॉरंट मधे जेवण्याचा आनंद तुम्ही समजू शकाल.इथे जेवणाचे फारच हाल होतात .. असं म्हणताहेर रेश्मा पाटिल.. या चायनिज वडापावातील भाजी कशी असेल?? पानकोबी, शिमला मिर्ची , आणि स्प्रिंग ओनियन्स ह्यांचं  मिक्सचर बटाट्यामधे मिक्स करुन त्याचे वडे + पाव+आणि पावाला लावायला चटणी ऐवजी व्हिनेगर, आणि सोया सॉस   असेल कां? असं मला उगाच वाटून गेलं . पण तसं नाही . अगदी रेग्युलर बटाटा वडा + लसुण चटणी+ चिंचेची चटणी+ पाव असतो बरं का इथे स्वाद ए हिंदुस्थान मधे. आणि ही बातमी कुठे आली आहे?? तर चायनाच्या पेपरमधे.. 🙂

इंग्लंडची नॅशनल डीश म्हणजे चिकन टीक्का, किंवा टिक्का करी झाली आहे.  तसेच आता काही दिवसातंच चायनाची नॅशनल डिश ही वडा पाव होइल कां?? अहो……. काय सांगावं होईल पण..   🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा. Bookmark the permalink.

9 Responses to चायना मधे वडा पाव.

 1. rohan says:

  वा.. हे बेस्ट केलात. आज एकदम माझ्या आवडत्या विषयावर लिहीलत. हा.. हा.. मज्जा आली वाचायला..

 2. sahajach says:

  अरेरे सकाळी सकाळी कालची पोळी आणि चटणी खाउन ब्रेकफास्ट करु म्हटलं तर हा तुमचा चमचमीत लेख….गिळवेल का आता ते?
  भारतात करायच्या कामांच्या लिस्टमधे गाड्यावरची भेळ, पाणिपुरी, रगडा हे काम अग्रस्थानी असतं आमचं…..

  लेख मस्त झालाय… आणि वड्याची चायनीज रेसिपी मस्त बनवलीये तुम्ही….मी तर कल्पना करुन पहातेय कसा दिसेल तो वडा…

 3. रोहन, तन्वी
  हा अगदी आवडता विषय.. म्हणुन जरा जास्तंच आवडीने लिहिले जाते.. पण चायनामधे इंडियन रेस्टॉरंट्स काढण्याची कल्पना फक्त सिंधी लोकांनाच सुचु शकते.

 4. princess says:

  अहाहा !!! मुंबईच्या वडापावची आठवण करुन दिलीत. कित्ती बरे वर्षे झालीत खाऊन…. आठवत नाही.

  सेंट पायसजवळचा शेट्टी आपला पण फेवरिट बर का….

  ब्लॉग मस्तच आहे तुमचा- विविध रंगी.

  -प्रिन्सेस…

  • प्रिन्सेस,
   मुंबईच्या वडापावावर एक वेगळा लेख नक्कीच होऊ शकतो. किर्ती कॉलेज, फोर्ट -जीपीओ जवळचा, ठाण्याचा,कुर्ला स्टेशन इस्ट साईडचा आणि असे अनेक जंबो वडा वाले. प्रत्येकाची एक खासियत असते.. कितिही हॉटेल्स उघडली तरिही मुंबईच्या शेट्टी हॉटेल्सला पर्यायच नाही. 🙂
   प्रतिक्रियेबद्दल आभार.

 5. swati says:

  Veg Angara 🙂 🙂 ..bhannat aahe try kela pahije ..
  maja aali wachun

  • एक टॊमॅटॊ पोखरुन त्या मधे एक लहानशी मेणबत्ती लावलेली असते. अंधुक प्रकाश असेल तर मोठी मस्त दिसते सजावट.. 🙂

 6. rohan says:

  महेंद्र दादा … माझा स्वतःचा एक फ़ूड ब्लॉग आहे.

  http://foodateachglance.blogspot.com/ 😀

  मी ‘मुंबई वडापाव’ वर एक पोस्ट लिहायचा प्रयत्न करीन. अर्थात त्याला सुद्धा रिसर्च हवाच … 😉

 7. हो, तो शाल्मली बरोबर चा ना? मला माहिती आहे. मी नेहेमीच वाचतो तो ब्लॉग. मस्त आहे एकदम.

Leave a Reply to rohan Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s