२० वर्षांपुर्वी आणि आज…!(२)

काल पासून त्या काळी असणाऱ्या टिव्ही चं नांव आठवतोय. आज आठवलं ते. म्हणून कालचेच पोस्ट पुढे सुरु ठेवतोय  .  इसी टीव्ही आणि दुसरे म्हणजे डायोनारा टीव्ही त्या काळी  फार पॉप्युलर होते . नंतर अपट्रॉन टिव्ही पण  आला होता, हा टिव्ही उत्तर प्रदेश सरकारच्या अंडरटेकिंग वाल्या फॅक्ट्रीत तयार व्हायचा.आणि हेच नांव कांही केल्या मला आठवत नव्हतं कालपासून. आता लिहायला बसलो तेंव्हा आठवलं.

नंतर कांही काळाने बुश टिव्ही वगैरे पण मार्केटला आले. पण त्या रेडीओ सदृष्य टिव्हीच्या काळात अबाधित राज्य केलं ते डायोनारा आणि इसी टिव्ही ने. त्याला रेडिओ सदृश्य म्हणण्याचे कारण हे की ते टिव्ही म्हणजे व्हॉव्हच्या रेडीओ सदृश्य दिसायचा. आमच्या घरी पाय कंपनीचा रेडीओ होता– रेडियो ची आठवण यायची या टीव्ही कडे पाहिलं म्हणजे..टीव्ही म्हणजे एक प्राईड पझेशन असायचं. सौ. चा एक फोटॊ आहे ’टिव्ही सोबत’(!) ती लहान असतानाचा. खरंच!!!

हिंदी बातम्याचं वाचन करणारी एकच बाई होती ती म्हणजे सलमा सुलताना. मराठीत भक्ती ताई होती. मला भक्ती बर्वे बातम्या द्यायला आली की तिने सरळ बातम्या सांगणे बंद करुन ती फुलराणी मधला तो प्रसिद्ध प्रवेश करुन दाखवावा असे वाटायचे. इतक्या जणी होऊन गेल्या पण भक्ती सारखा तो प्रवेश कोणीच सादर केलेला नाही. नुकताच , एका ठिकाणी सुप्रिया पिळगांवकर ने हा प्रवेश सादर केला होता, तेंव्हा वाटलं की हो.. हीच ती फुल राणी…

त्या दिवसात  आमच्या घरी आम्ही सगळॆ जण नेट लावतो म्हणजे  याचा अर्थ असा होता, की आम्ही सगळॆ मच्छरदाणी लावून झोपतो 🙂 नेट म्हणजे इंटरनेट हे कुणालाच माहिती नव्हतं.. मॉस्क्युटॊ रिपेलंट म्हणजे कछुवा छाप मच्छर अगरबत्ती. त्याच्या धुराची मला तरी ऍलर्जीच होती. तरी पण आमचं गांव डासांचं शहर, म्हणून   कछुवा लावावाच लागायचा.

मच्छरदाणितला एक मच्छर हा मच्छरदाणीच्या बाहेरच्या डझनभर मच्छरांपेक्षा पण जास्त डेंजरस असतो, हा शोध लावण्याचे दिवस तेच होते. विदर्भात यवतमाळ, अमरावती हे जिल्हे म्हणजे डांसांचे माहेरघर असलेले जिल्हे होते.

राजीव गांधी यांचे फक्त नाव फक्त ऐकलेले होते. आम्हाला फक्त इतकंच ठाऊक होतं की इंदिरा गांधींचा एक मुलगा आहे — जो पायलट आहे, आणि त्याची बायकॊ एक फॉरिनर आहे. बस्स! संजय गांधी अगदी फॉर्म मधे होता आणि राजीव गांधी मात्र अगदी लो प्रोफाइल घेउन होते. असं कधीच वाटलं नव्हतं की  राजीव गांधी हे कधी पंतप्रधान होतील म्हणून. .

रेडीमेड कपडे घालण्याचे दिवस नव्हते ते. सगळेच लोकं कपडे शिंप्याकडे शिवून घालायचे. बेल बॉटम पॅंट मधे पँट चा बॉटम अगदी ४० पर्यंत असायचा. मला आठवतं माझ्या एका मित्राने ४४ बॉटमची पॅंट शिवली होती. कांही मुलं पण हाय हिल्स ची चप्पल घालायचे .

सगळेच सिनेमे हे लॉस्ट ऍंड फाउंड या थिम वर अवलंबून असायचे. प्रकाश मेहेरा वगैरे मंडळी खूपच पॉप्युलर होती. आरडी बर्मन ची गाणी ऐकणं म्हणजे अगदी कुल समजलं जायचं. ऋषी कपूर चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध होता. मल्टिप्लेक्स वगैरे कांही नव्हते. आणि प्रत्येक सिनेमा पहिले कांही दिवस तरी नक्कीच हाउस फुल्ल असायचा.

नवीन सिनेमा आला, की एक रिक्षा किंवा टांगा गांवभर ऍडव्हर्टाइझ करित फिरायचा. त्यावरच्या लाउडस्पिकर वर ” आपके अपने राजकमल टॉकिज मे … धर्मेंद्र और जितेंद्र का… धमाकेदार पेशकश.. रोजाना ४ खेल.. ” अशा जाहिराती करित तो रिक्षा गावभर फिरायचा. सोबतच एक ३ बाय ६ च्या साइझ चं ऍडव्हर्टायज ऑफ्सेट वर प्रिंट केलेले उधळीत जायचा तो रिक्षा/टांगा वाला, आणि मुलं त्याच्या मागे धावायची ते पॅम्प्लेट घ्यायला. ( मी पण असायचॊ त्या मुलांमधे:) )

कांही चित्रपटाचे तर अगदी सकाळी सहा वाजल्यापासून खेळ सुरू व्हायचे. जे अगदी सिनेमाचे खास वेडे चाहते होते ते सकाळच्या ६ च्या शो ला पण जायचे. मला आठवते की मी फिरोझखानचा कुठलाही चित्रपट अगदी फर्स्ट शो चुकवत नसे.खोटे सिक्के मी सकाळी ६ वाजता जाउन बघितला होता. घरुन निघतांना टॉवेल घेउन घरुन निघालो होतो, पोहायला जातो म्हणुन सांगुन.. 🙂 मी खुप बदमाश होतो ना?? हा माझा एक फेवरेट पिक्चर..

फिरोझ खानच्या चित्रपटात व्हिक्टर ह्युगो मोंटॅंग्रॊ च्या ट्युन्स असायच्या. तुम्ही क्लिंट इस्ट्वुड चे सिनेमे पाहिले आहेत कां? गुड बॅड ऍंड अगली, किंगा फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर?? त्यातल्या सगळ्या ट्य़ुन्स विह्क्टर्च्या आहेत. माझ्या कडे त्याची एल पी आहे अजुनही.. 🙂  क्लिंट इस्ट वुड , क्रेझी बॉइज, पोलिस ऍकेडमी हे माझे आवडते चित्रपट. आजही माझ्या लॅप टॉप मधे पोलिस ऍकेडमी चे सगळे भाग सेव्ह करुन ठेवलेले आहेत. वेळ मिळेल तेंव्हा पहातो. ह्या सिनेमात कांही सिंगल एक्स रेटेस सिन्स असल्यामुळे घरी पहाता येत नाही. पण तेवढं सोडलं तर पिक्चर्स एकदम मस्तं..

बरं त्या काळी फिरोझखानच्या सिनेमात ( ज्यांचं शूटींग नेहेमी फॉरिनला व्हायचं) त्यात तो कार मधल्या फोनवरुन बोलतांना दाखवायचे. तेंव्हा हा प्रश्न पडायचा की हे कसं शक्य आहे? वायर तर नाही फोनला? हा काय ट्रान्समिटर आहे कां? मोबाइल फोन म्हणजे अगदी कल्पनातित होता. कॉर्डलेस फोनला मोबाइल फोन म्हंटलं जायचं. आणि फोन घरी असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण असायचं. दोन किंवा तिन आकडी फोन नंबर असायचे. फारच झालं तर चार आकडी..

परदेशी जाण्याला म्हणायचे   फॉरिनला जाणं.. आणि त्यासाठी मिळायचे केवळ ५०० डॉलर्स. जास्त पैसे हवे असतील तर ते मनी एक्स्चेंजर कडुन ब्लॅकने घ्यावे लागायचे. आजकाल हवे तेवढे पैसे नेऊन खर्च करता येतात. खूप फरक पडलाय या कांही वर्षात.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

9 Responses to २० वर्षांपुर्वी आणि आज…!(२)

 1. bhaanasa says:

  फक्त २० वर्षात अनेक गोष्टींमध्ये, विचारसरणीमध्ये, भौतिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, अगदी आपल्यातसुध्दा प्रचंड फरक पडलाय नाही. 🙂

  तुम्ही एकदम आठवणींच्या राज्यात नेऊन सोडलय. पोस्ट नेहमीप्रमाणे छान.

 2. Prasad says:

  फारच छान्..
  लहाणपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. मी जरी तुमच्यापेक्षा बराच लहान् असलो, तरी बुलठाणा सारख्या खेड्यातुन् असल्यामुळे ह्या लेखातल्या काही गोष्टी मी सुध्धा अनुभवल्या आहेत्..

  • भानस
   कधी तरी एकटा बसलेला असलो, की मग आठवतात जुन्या गोष्टी.. ( मी म्हातारा झालॊ असं वाट्तंय.. कारण, सुरु केलं नां, मी पण — आमच्या वेळेस असं होतं, आणि तसं होतं…. ) 🙂

   प्रतिक्रियेबद्दल आभार..
   प्रसाद
   धन्यवाद.. जे कांही लिहिलंय ते अगदी खरं आहे. तरीही कांही गोष्टी लिहायच्या राहुन गेल्या आहेत.
   जस्त, डोक्यावर गॅसबत्त्या घेउन जाणाऱ्या बायका माणसं – ( लग्नाच्या वराती मधे) हल्ली जनरेटर असतो, आणि डोक्यावर ट्युबलाइट!
   अजुन कांही गोष्टी सुटल्या असतिल..
   प्रतिक्रिये करता धन्यवाद..

  • प्रसाद
   प्रतिक्रीये करता धन्यवाद….

 3. sahajach says:

  कालच्या पोस्टनंतर लिहायचे राहिले….म्हणुन आज कमेंट लिहितेय……
  जुन्या आठवणींना उजाळा मिळाला……आमच्या घरी मी चौथीत असताना टी.व्ही आला तेव्हा मी शाळेत बाईंना आनंदाने सांगितल होतं आणी त्यांनी उत्तर दिले की खूप पाहायचा नाही पण नाहितर मी माझ्या घरच्या कॅमेऱ्यातुन बघिन तुला आणि रागावेन….नंतर कितीतरी दिवस वाटायचे की बाई बघताहेत मला….आधि black & white मिळाला होता आठ दिवस कलर TV बाबांनी बुक केला होता…..बाबांच्या स्कुटरसाठीही तसेच होते…..आता काय शोरुममधे जा आणि वस्तु आणा…..वस्तु लगेच मिळते पण तेव्हा वाट पाहिल्यानंतर जो आनंद मिळायचा तो आता कुठे…….
  असो प्रत्येक काळाचे काही लाभ आणि तोटे….पण आताच्या मुलांना मिळणाऱ्या वस्तुंची किंमत मात्र नसते…..

  • मुलांना वस्तुंची किंमत नसते, हे तर मी पण रिअलाइझ केलंय.. पण आजकाल काय होतं, की आपल्याला काय मिळालं नाही ते आपण मुलांना भरभरुन द्यायचा प्रयत्न करतो.. म्हणुन त्यांना किंमत नसेल ..

 4. Ravindra says:

  Salma sultanc agdi makkh cheryane batmya dyaychi,janu putlach batmya vachtoy.Junya athavani tajya kelya badal dhnywad.He don lekh kalidoscope sarkhe aahet.

 5. anukshre says:

  आमच्या कडे माझ्या वडिलांच्या कंपनीचा रेमंड चा टीव्ही होता. १९७५ च्या आसपासची हि खरेदी असावी. आता बाबा व आई दोघेही हयात नाहीत पण मावशीला कदाचित आठवत असेल..आठवण करून दिलीत विचारावयास हवे. तेंव्हा दूरदर्शन हे एकच चानेल होते नंतर डीडी म्हणून आले होते वाटत.. छाया गीत बघण्याकरता आमच्या कडे समारंभ असावा इतके पाहुणे, नातेवाईक यायचे… ह्नं… बित गये वो दिन सुहाने..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s