मिटिंग

काल सकाळी घरुन लवकर निघालो पुण्याला जायला. आम्ही सहा लोकं जाणार होतो मिटिंगला म्हणून शेवरले  टवेरा बोलावली होती. त्या गाडीमधे मागच्या सिट्स आडव्या (म्हणजे फेसिंग इच अदर) होत्या !

दहा वेळा त्या टॅक्सीवाल्याला सांगून पण पुन्हा आडव्या सिट्स असलेली टॅक्सी बघून खरं तर टाळकच सटकलं होतं.. शांतपणे त्या  टॅक्सीच्या मालकाला फोन केला, आणि विचारलं  तर तो म्हणाला, दुसरा गाडी ले के जावो.. माटूंगा मे रखा है एक क्वालिस.. म्हंटलं तुमकू पहलेच तो बोला था, तो ये गाडी क्यूं भेजा? तर उगाच हसला आणि सॉरी म्हणाला…त्या मुळे सरळ माटुंग्या राममंदिरा समोर गेलो, आणि गाडी बदलली.लक्षात आलं की मुंबईला आल्यापासून आपणही तसंच हिंदी बोलायला लागलोय बरेचदा.

तिथे समोरच तंबी अय्यप्पा च रोडसाईड दुकान उघडं होतं.  हे एक फेमस दुकान आहे.इथे अगदी ऑथेंटिक साउथ इंडीयन मिळतं. द बेस्ट क्वॉलिटी. बस्स्स्स्स्स्स! खाण्यावर उगाच जास्त लिहायचं नाही.. ठरवलं तरी पण लिहिलच जातंच.त्या दुकानातून मेदु वडा पॅक करुन घेउन म्हणजे गाडीत बसून खाता येइल असा विचार करुन त्या दुकानात गेलो, तर तंबी म्हणाला, अभी तयार होनेका है .. !!!!!! दिवसच खराब दिसतो आजचा.

मिटींग ९-४५ला सुरु होणार होती. पण तसं असलं तरीही हे नक्की माहिती होतं की मिटींग ही १०-३० च्या आधी सुरू होणार नाही.घाईने निघालो, की आपण वेळेवर पोहोचलेले बरे. पण  एक्सप्रेस हायवे सुरू होतांना एक मॅक डी चं दुकान आहे. चालेल ना त्याला दुकान किंवा हॉटेल म्हंटलं तर? की आउटलेटंच म्हणुं??  🙂 ते दुकान आलं आणि आमच्यातल्या एकाने म्हट्लं की ड्राइव्हथु मधून काहीतरी स्नॅक्स घेउन जाऊ या म्हणजे वेळ वाचेल. पण जशी गाडी थांबली सगळेच खाली उतरले, आणि आम्ही आत शिरलो.

मॅक डी मधे हल्ली सकाळच्या वेळेस ब्रेकफास्ट प्लॅटर मिळते- एक नविन डिश, म्हणुन तिच मागवली. फारशी चांगली नव्हती. 😦  इथे थांबण्यापेक्षा फुडमॉललाच थांबलो असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं.

परफॉर्मन्स रिव्ह्यु मिटींग किती वेळ चालेल ते सांगता येत नाही. पुर्वी आमचे एक मिटींग प्रिय जी एम होते. त्यांच्या काळात तर एकदा मला रात्री १२-३० पर्यंत मिटिंग चालल्याचे आठवते. मिटिंग नंतर कॉकटेल्स होते, पण आम्ही सगळे डिप्लोमॅटच्या टेरेसवर  पोचायलाच  रात्रीचा एक वाजवला. नंतर  सगळ्यांनी अख्खी रात्र जागवली.

प्रितिश नंदी जेंव्हा विकली मधे लिहायचे तेंव्हा त्यांचा एक लेख वाचला होता. त्यात ते म्हणतात, मिटिंग इज अमंग द ग्रुप ऑफ पिपल हु इंडिव्हीज्युअली कॅन नॉट डु एनी थिंग बट, कलेक्टिव्हली , दे कॅन टुगेदर सिट, थिंक ऍंड डिसाईड दॅट नथिंग कॅन बी डन..

अतिशयोक्ती जरी सोडली वरच्या वाक्यातली , तरीही त्यात कांही तरी तर तथ्य असावं..! अगदीच काही टाकाऊ विचार नाहीत ते. मीटिंग्ज मधे दिवसभर बसून खाल्लेली बिस्किट्स आणि रिजवलेले चहाचे कप, संध्याकाळपर्यंत पोटामध्ये गुड गुड करायला लागतात.  बरं स्वतःवर ताबा रहात नाही समोर बिस्किटांची प्लेट असली म्हणजे.

इकडे हे दिवसभर असं खाणं झाल्यावर रात्री कॉकटेल्स मधे परत ते विचित्र स्नॅक्स असतातच.. एक- व्हेज क्रिस्पी आणि दुसरा चिकन टीक्का.. कितीही खाल्ले तरीही समाधान होत नाही. म्हणजे अखखा दिवस नुसतं बसून खाणं आणि खाणं  जे सुरू होतं ते अगदी रात्री पर्यंत होतं.  एक बिअर , भरपूर खाणं आणि ग्रुप्स मधल्या दिवसभराच्या डिस्कशन्स वरच्याच  गप्प.. पुन्हा तेच! दिवस भर मिटिंग केल्यावर पण रात्री पण त्याच विषयांवरच्या गप्पा सुरू असतात कांही ग्रुप्स मधे

मी त्यातल्या त्यात एक सिनेमा प्रेमी ग्रुप पहातो आणि त्यांच्यात जाउन नवीन  काय पाहिलं, किंवा राखी सावंत कसली चिकणी दिसते ( ???हा हा हा….:) )  असल्या गप्पा ऐकत बसतो.

थोड्याच वेळात त्या ग्रुप मधे बोअर झालं की एक जरा सिन्सिअर गृप असतो त्यांच्या मधे जाउन उभा राहातो, त्यातला प्रत्येक जण व्ही.पी, बरोबर कशी जवळीक करता येइल हा विचार करतांना दिसतो, मधेच एखादा एक्स्क्युज मी… म्हणून बाजुला होतो, आणि तुम्ही त्याला नजरेने फॉलो कराल तर लक्षात येतं , की तो बॉसच्या समोर जाउन , उगाचच कुठल्यातरी गोष्टीवर बोलतोय. त्याला हे कळत नाही की बॉस पण मा्णूसच आहे आणि दिवसभराच्या मिटींग मुळे तो पण वैतागलेला आहे.

एक नवीनच जॉइन झालेल्या मुलांचा ( अगदी यंगस्टर्स चा ग्रुप) वेगळा असतो. त्यांच्या जवळुन जरी तुम्ही पास झालात तर त्यांचं बोलणं एकदम थांबतं.. आणि ते कॉशस होतात. अशा मुलांना मी नेहेमी एकटा सोडतो. केवळ स्मित हास्य करुन .. आणि .. एखाद्याच्या हातातला ग्लास संपलेला असेल तर.. व्हेअर इज युवर ड्रिंक?? गो  ऍंड हेल्प युवर सेल्फ.. असं काहीतरी उगाच बोलून पुढे सरकतो.

तेवढ्यात एक जुना मित्र भेटतो. त्याच्याशी नुकतंच झालेलं भांडण आठवतं. त्याने शिवी गाळ करुन लिहिलेला इ मेल आणि व्हीपीला मार्क केलेली कॉपी आठवली आणि कपाळावर आठ्या पडल्या. मनात विचार आला. हॅव टु पे हिम इन हिज ओन कॉइन्स.. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि समोर मोठा बॉस एकटा दिसला.त्याच्याजवळ जाउन त्या इमेलचा विषय काढला, आणि हे पण सांगायला विसरलो नाही, की त्या इ मेलच्याच भाषेत मला पण उत्तर देता आलं असतं पण, केवळ संस्कार आडवे आले , म्हणून तशी भाषा मी वापरली नाही. तेवढ्यात दुसरा एक  माणुस बॉसच्या दिशेने सरकताना दिसला, आणि मी बाजुला झालो.

एकटाच उभा राहिलो बाजुला जाउन.. म्हंटलं जरा पर्सनल स्पेस हवी .. तर आमचा एक इंजिनिअर समोर येउन उभा झाला..आणि जसा मी वर बॉसशी बोललो, तसंच काहीतरी बोलायला लागला. घड्याळाकडे लक्ष गेलं.. रात्रीचे १० वाजलेत. म्हंटलं.. मी जेवून घेतो आता. आणि सुप घ्यायला त्या टेबलकडे गेलो.

इतका चिकन टिक्का आणि फिश टीक्का खाणं झालं होतं की फक्त सुप आणि सॅलड्स घेउन जेवण संपवलं .

आता सकाळ झालेली आहे, आणि पुन्हा  एका मिटींगलाच जायचंय , तेंव्हा तयारी केली पाहिजे.. म्हणून आता थांबवतो. रात्री मुंबईला परत जाइन. उद्या लिहीन व्यवस्थित पोस्ट..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

11 Responses to मिटिंग

 1. Vikrant says:

  सर,
  ते शेवरलेट नाही ’शेवरले’ आहे 🙂
  BTW, तुमच्या डिनरमध्ये डेझर्ट नसतं का ? त्याविषयी काहिच लिहिले नाही 😦

  • अहो, आम्ही भारतामधे तिला शेवरलेट कांही लोकं तर शेव्हरलेट पण म्हणतात. शेवटचा ट सायलेंट आहे हे लक्षातंच रहात नाही.. 🙂
   आणि हो, डेझर्ट्स असतात ना.. पण मी शक्यतो टाळतो काय आहे ते पहाणं.. ( वजन वाढतंय ना म्हणून)

 2. Prasad says:

  हा!!हा!!हा!!..तुम्ही कीतीही प्रयत्न केला तरी तुमची गाडी खाण्यावर् येउन् थांबते. 🙂

  • प्रसाद
   हाडाचा खवय्या आहे मी. मुम्बईतल्या पण ’चांगलं’ खाण्याच्या जागा, जितक्या मला माहिती आहेत त्यावर पण एक लेखांची मालिका होऊ शकते. 🙂
   माझं काम ऑफिस अटॅच नसल्यामुळे, मी मुंबईला पण नेहेमीच फिरत असतो बाहेर. त्यामुळे हॉटेल्स हे पार्ट ऍंड पार्सल आहे लाइफचे..कधी तरी लिहिन म्हणतो.. मुंबईमधली खवय्येगिरी वर..

 3. fanfare says:

  meeting madhye -rather meeting nantar boss barobar smalltalk karata yeNe hee ek vegaleecha kala ahe, kamapeksha jasta bolayala jamayala pahije aNee tehi sahajgatya..
  anayya not that it mattersa lot, paN mala swt:la ugach appa marayala jamatach nahee bossbarobar.. aNee kahee lok kiti armaat he karatana distaat, tenva vaTata kadhi kadhi ki thoda apaN hee hi goshta shikun ghetali pahije…

  • कार्पोरेट कल्चर मधला तो एक महत्वाचा भाग आहे. दोन पेग संपल्यावर कोणिही काहिही ऐकायला तयार असतं.तिच वेळ असते आपल्याला जे काही सांगायचं आहे ते सांगायची. मिटींग नंतरची पार्टी हा एक मोठठा विषय आहे. माझ्या ऑफिसचे पण कांही लोकं वाचतात ब्लॉग म्हणुन जास्त लिहिले नाही.. 🙂 आणि ती कला आलिच पाहिजे.. गप्पा मारण्याची.. 🙂

 4. fanfare says:

  ANee khadyajeevan tumhee already mumbai, Pune , nagpur, bihar ithale barech cover kele ahe:-)) prasad mhaNattat te kahee khote nahee..:-))

  • आणि मला आवड पण आहे .. स्वयंपाक करण्याची सुध्दा. रविवारी स्वयंपाक घरात खुड बुड सुरु असते काही तरी. घरी मी पुर्ण शाकाहारी आहे, मग काय चिकन मसाल्यात, चिकन न घालता, बटाटे किंवा पनिर घालुन खातो झालं..

   मला खरंच अगदी मनापासुन आवड आहे चांगलं खाण्याची.. 🙂

 5. fanfare says:

  asa ekada tumhee declare kelat kee tumachya asankhya girlfriends ( blog followers ho bakee kahee nahee:-)) tumachyawar aNee paryayane amachyawarahee recipe cha mara karateel:-)) no offense meant ladies, just pre-empting the possible conversion of the blog into: “batatya aivajee marar ghala, chicken masalyat, jasta chaan lagata wagaire:-))
  Mahendrajee moderation kara bara asha comments alya tar:-))

 6. fanfare says:

  shivya paravadalya ho..:-))

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s