अभी तो मै जवान हूं..

भानुरेखा  गणेशन… ही कोण बया??

पडला ना प्रश्न? बरं उमरावजान रेखा?? हं.. तिच !  तिचा जन्म १० ऑक्टॊबर १९५४ मधे झालेला. म्हणजे ती माझ्यापेक्षाही ६ वर्ष मोठी.तसा कुठल्याही हिरोइनच्या प्रेमात वगैरे मी कधीच पडलो नाही.   कुठल्याही  हिरोइन्स वर क्रश वगैरे कधीच नव्हता. फक्त त्यांचा प्रेझेन्स आवडायचा पडद्यावरचा, एवढंच.

जेमिनी गणेशन आणि पुष्पा गणेशन ह्या दक्षिण भारतीय दांपत्याची ही कन्या!आई आणि वडील दोघंही कलाकार, त्यामुळे हिचं लहानपण सेट्स आणि स्टुडीओ मधेच गेलं. त्यामुळेच असेल की ती वयाच्या तेराव्या वर्षी पण कॅमेरा फेस करतांना अगदी ऍट इज होती.

वयाच्या १३ व्या वर्षी तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. तिने जेंव्हा हिंदी सिनेमात कामं सुरु केलीत तेंव्हा तिला हिंदी पण नीटसं येत नव्हतं. पण लवकरच शिकली ती.. आणि तिच्या हिंदी उच्चाराचे बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे उमराव जान..अगदी कुठल्याही अंगाने तिने उर्दू उच्चार करतांना मद्रासी असेंट जाणवू दिला नाही. इव्हन हेमा मालिनीचे उच्चार अजूनही असेंटेड वाटतात. म्हणूनच रेखाचे या बाबतीत कौतुक करावे लागेल.

फक्त वहिदा रेहमान मला खूप आवडायची( जुन्या चित्रपटातील) आणि जेंव्हा माझं वय होतं सिनेमे पहायचं तेंव्हा पर्यंत तीने सिनेमात हिरोइन म्हणून काम करणं बंद केलं होतं.. अर्थात एखाद दुसरा सिनेमा यायचा.. जसा अमिताभ बच्चन  बरोबरचा एक आला होता.. तो “अरे भैय्या एक चाय देना खडा चम्मच मलाई मारके वाला” पण तो पर्यंत ती हिरोइन म्हणून पार संपलेली होती आणि आईचे रोल करायला लागली होती.

रेखा बद्दल बोलायचं तर तिचा पहिला चित्रपट सावन भादो (१९७०) मधे तिला नवीन निश्चल बरोबर पाहिला होतं. दोन ठोकळे एका सिनेमात, असं काहिसं वर्णन करता येइल त्या सिनेमाचं. त्या मधे ति म्हणजे एक टिपिकल मड्डू मुलगी..भरपूर लठ्ठ , आणि दंडामधे रुतणारे ब्लाउझ घालणारी.. अशी दाखवली गेली. तिच्या मधे अजिबात ग्लॅमर, सौंदर्य नव्हतं.. अगदी मिडीऑकर दिसायची ती तेंव्हा.

नंतर चेही चित्रपट ज्यात एक धर्मेंद्र बरोबरचा अरे राफ्ता राफ्ता देखो, गाणं असलेला ,मधे पण तशीच जाड आणि ठोकळा दिसली होती….  आणि आमिताभ बरोबरचा खुन पसिना मधे थोडा बरा वाटला तिचा फॉर्म!

सुरवंटाचं फुलपाखरात रुपांतर होतं, आणि ते एकदम सुंदर दिसायला लागतं. तसंच काहिसं झालं रेखाचं.. तिचा एक चित्रपट आला होता, खुबसुरत .. त्या नंतर मात्र, रेखाकडे अगदी १०० टक्के दुर्लक्ष करणारे लोकं पण या फुलपाखराला ’खुबसुरत’ मधे पाहुन एकदम आश्चर्य चकित झाले होते. आपण नेहेमी पहातॊ तिच का ही रेखा?? त्या चित्रपटात तिचा सुंदर चेहेरा, फॉर्म आणि अभिनय .. अगदी वादातीत आहे. हा चित्रपट पण मी बरेचदा पाहिला. खरं सौंदर्य तिचं खुलून दिसलं.. या सिनेमात. त्यासाठी तिने किती वेळा कॉस्मेटिक सर्जरी केली, आणि कसं वजन कमी केलं, हे तिला एकटीला च माहिती असेल.

तिने साकारलेली उमराव जान… लाजवाब!!!! अगदी जिवंत केलंय तिने ते कॅरेक्टर.. काय अभिनय केलाय तिने? आणि किती सुंदर दिसली आहे त्यात नाही कां? तसाच शेखर सुमन सोबतचा तो कामसुत्र सिनेमा पण मला खूप आवडला होता. त्या मधला तो रेखा  चा सीन.. ज्यामधे ती ते खूप मोठे सोन्याचे दागिने घालुन येते आणि शेखर सुमन एक एक करुन सगळे काढतो.. आणि नंतरच्या दुसऱ्या एका सिन मधे एक लपवलेली कळ दाबते आणि  तो दागिना एकदम खळ्ळकन जमिनीवर पडतो तो.. खूप आवडला होता.  तेंव्हाचे तिच्या चेहेऱ्यावरचे भाव .. मार्व्हलस…! नंतरचे पण इतर प्रसंग.. बरेच आहेत त्या सिनेमातले. पण इतर सगळे विसरल्या सारखे झाले आहेत. केवळ हा दागिन्यांचा, आणि दुसरा म्हणजे ती ते पांघरुण ओठांनी ओढुन काढते तो लक्षात राहिलाय माझ्या.कोणी काहिही म्हणो, माझ्या मते हा चित्रपट रेखाचा सर्वोत्तम चित्रपट..

अमिताभ बच्चन बरोबरचे तिचे जवळपास २० चित्रपट … आणि ही जोडी अगदी सुपर हिट होती हिंदी सिनेमात.. सिलसिला नंतर मात्र तिने अमिताभ बरोबर काम केलं नाही..  ( कारण सगळ्यांनाच माहिती आहे 🙂 )त्या नंतरच्या प्रत्येक चित्रपटात रेखा, ही एक ’प्रेक्षणीय’ ( मुद्दाम सुंदर शब्द वापरत नाही) दिसली होती. रिसेंटली तिला पाहिलं होतं कुठल्यातरी एका फिल्म फेअर अवॉर्ड मधे. सोनेरी रंगाची साडी, चेहेऱ्यावर खूप वेळ खपून चढवलेला मेकप, की जो खरडून काढला तर कमीत कमी एक किलो पावडर , क्रीम, आणि लिप्स्टीक मिळेल असा होता.स्वतःचं वय लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यातुन डोकावत होता. इतका गॉडी मेकप आणि भडक कपडे फक्त दक्षिणात्य बायकाच करू शकतात.

आता ५४ वय झालंय . म्हणजे वेळीच लग्न होऊन मुलं बाळं झाली असती तर ती आता आजी म्हणून मिरवली असती. पण तसं झालं नाही! तिने केलेली लग्नं पण  खूपच वादग्रस्त घटना होत्या. त्यावर आता काही लिहित नाही.

आज रेखा आठवली कारण तिचं ते स्टेटमेंट की महाराष्ट्र शासनाने देऊ केलेलं लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड तिने नाकरलंय, ती म्हणते,लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड  ह्या नावावरून असं वाटतं की आता माझं सगळं काही संपलंय, आणि मी म्हातारी झाली आहे, म्हणून ते अवॉर्ड घेण्यास तिने नकार दिलाय.

बरं, या पुर्वी रेखाने असेच अवॉर्ड्स हे फिल्म फेअर आणि तत्सम फंक्शन्स मधे स्वीकारले होते. मग आताच तिला काय झालं? रेखाचा एक प्रॉब्लेम आहे, स्वतःला ती अजूनही तरुणच समजते. ५४ म्हणजे अगदी राइप नाही पण मॅचुअर्ड वय म्हणता येइल. हा पुरस्कार स्विकारणं म्हणजे, आपण आता म्हातारे झालो आहोत हे मान्य करणं असा होईल अशी तिला ्भीती वाटली असावी..

राजकपुर गौरव पुरस्कार घेण्याचे तिने नाकारले आणि ही पण एक न्युज झाली. राज ठाकरेंनी ताबडतोब, त्यावर आपलं  म्हणणं सांगितलं.. आणि मला वाटतं राज ठाकरेंनी दिलेली ’समज’ तिच्या समजली असावी.

जे काही कारण असेल ते असो.आत्ताच न्युज वर दाखवताहेत की तिला आज पुरस्कार दिला जाईल ,म्हणजे तिने स्वीकारला वाटतं पुरस्कार.. म्हणजे हा लेख उगाच लिहिला.. जे काय असेल ते असू दे… पण रेखा इज रेखा.. नो कम्पॅरिझन. .

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन. Bookmark the permalink.

18 Responses to अभी तो मै जवान हूं..

 1. fanfare says:

  paN tichyabarobar shekhar suman mhaNaje pharach lacklustre watala hota tya cinemaat, aNee GaNee sundar hotee, especially, – chod gaye nainonko kiranonke pakhee wala atee sundar hota..

 2. fanfare says:

  also khoobsurat madhye rhishikesh mukherjeeni tichyakadun pahilyndach abhinay karun ghetala! tya adhee tiche chitrapaT mhaNaje kuThalyataree awayawanwar focus karun cheap pradarshan karaNarech hote. khoobsurat brought the actress in her to the fore, cannot forget the bubbly vivaious Rekha in that movie…

 3. fanfare says:

  also khoobsurat madhye rhishikesh mukherjeeni tichyakadun pahilyndach abhinay karun ghetala! tya adhee tiche chitrapaT mhaNaje kuThalyataree awayawanwar focus karun cheap pradarshan karaNarech hote. khoobsurat brought the actress in her to the fore, cannot forget the bubbly vivaious Rekha in that movie…
  rama bans navachya baine tya kalee pahilyanda aerobics anee diet asa weight loss program introduce kela hota aNee Rekha used to vouch for that apparently it worked fo her plus some cosmetic surgery mus have played a role, but the effect was undeniably beautiful!

 4. मनसेच्या मते – रेखा यांना ज्यावेळी आंध्र प्रदेश सरकारनं जीवनगौरव प्रदान केला त्यावेळी रेखा यांनी कोणतेही नखरे न करता तो स्वीकारला. आताच का आढेवेढे घेत आहेत ?

  • दिपक
   हाच प्रश्न मलाही पडला आहे, म्हणुनच हा लेख लिहायला घेतला, पण नंतर बातम्या पहातांना ऐकलं की रेखाने पुरस्कार घेण्याचे मान्य केले आहे. रेखा म्हणजे शिंग मोडून वासरात वावऱण्याचा प्रयत्न करणारी भाकड गाय.. असं मला वाटतं.. खुप स्ट्रोन्ग झालं कां विधान??

 5. अनिकेत says:

  ” पण रेखा इज रेखा.. नो कम्पॅरिझन. “.

  अहम्म अहम्म, तुम्ही ‘बार्बी डॉल’ कॅट च्या चाहत्यांना दुखावताय म्हणलं. ती पण भारी आहे बरकां.. बघा हिंदी मोडकं तोडकं बोलेल, पण कधी त्यात ब्रिटीश एक्सेंट जाणवुन दिला का तिने? पोरगी लहान आहे अजुन, थोडा वेळ द्या!!

  • अनिकेत
   वयाचा फरक पडतो नां.. तिला बघितलं की आपली मुलगी डॊळ्यापुढे येते नां.. काय करणार बोला??

   • हे हे .. आमची सुद्धा काहीशी अशीच अवस्था होते काका ! फरक इतकाच की आम्हाला रेखाच्या जागी आईच दिसते !!! [:p]

 6. fanfare says:

  mandalee, rekhane award sweekarale anee maratheet bhashan dekhil kela, attach tv war pahile, jaya bacchan peksha taree baree mhanayachee..

  barbie doll cat zara matthha nahee ka watat tunhala aniket??? tichyapeksha Indian barbie mhaNoon Bipasha basu suitable hotee- quitessential Indian looks ahet mhaNun mhaNala.. anyway… enough bollywood for me today i guess..

 7. fanfare says:

  OK thode vishayantar.. tumachya log war “mumbai burning’ pahila. 26/11 nantar sattewarun dur zalelya vilas deshmukhanan ata cabinet madhye ek prakare promotion milale nahee ka?? wait watala hee sagaLee audacity aNee befikiree pahun….yawar tumhee kahich kasa nahee lihile????

 8. Prasad says:

  काका..पहिलेतर् लेखाचे शिर्षक वाचुन जरा बिचकलोच म्हटले आज काका कुछ अलग मुड मे है..
  पण ‘रेखा इज् रेखा..’ तीने सुंदर भुमिका तर् केल्याच पण् ‘अॅग्री वुमन’ म्हणुन सुध्धा शोभायची ती…

  • ऍंग्री वुमन म्हणुन तिचा आज एक चित्रपट होता, कबीर बेदीबरोबरचा. त्या बद्दल लिहायचं राहुन गेलं.. ती खरंच सुंदर दिसायची अन काम पण छान करायची.
   धन्यवाद..

 9. sonalw says:

  baki sgal chaan..fakt ekach chukicha wakprachar khatakala…
  Wahida Rehmaan kalachya padadyaaad? ha wakprachar mrut wyaktinsathi waaprtat. Wahisaji ajun jivant aahet.
  Evadhya chaan abhinetrila as kalachya padadyaaad pathwalat mhanun raahawal naahi.

 10. रेखाजींमधे मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे अवॉर्ड सोहोळ्यात आजच्या हिंदी तारका पाश्चात्य पद्धतीचे गाऊन्स घालून आल्या पण रेखाजींनी मात्र चापून चोपून साडी नेसून आपलं भारतीयत्व जपलं. त्यांच्या आवाज, त्यांचे डोळे याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्यांनी अवॉर्ड नाकारावा की स्विकारावा ह्या वादात मी पडत नाही. त्यांचं आयुष्य, प्रेमप्रकरण, लग्नं हीदेखील वादग्रस्तच ठरली पण यामुळेच रेखाजींभोवती एक प्रकारचं गुढ वलय निर्माण झालंय असं मला वाटतं. बहुधा ते वलय छेदून ’रेखा’ पर्यंत पोहोचण्याची उर्मी मनात दाटून असल्यानेच, त्यांची पन्नशी उलटल्यावरही त्यांची चर्चा करण्यापासून आपण स्वत:ला थांबवू शकत नाही.

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s