पुतळ्यांचं राजकारण

भंडारकर संस्था पुणे! या ठिकाणी खूप जुने आणि दुर्मीळ दस्ताऐवज होते . संभाजी ब्रिगेड च्या काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या संस्थेला आग लाऊन सगळी जुनी कागदपत्र जाळून टाकली. या ठिकाणी शिवाजी , पेशवे कालीन जुन्या नोंदी हस्तलिखीताच्या स्वरुपात होत्या.

जेम्स लेन ला एक ग्रंथ लिहीण्यासाठी या संस्थेने सहकार्य केले, म्हणून त्या सगळ्या ग्रंथ संपदेला जाळून टाकण्यात आले. संभाजी ब्रिगेड ने हे काम कां केले असावे? ऑफ कोर्स स्वतःची न्युसेन्स व्हॅल्यु दाखवायला! .आणि स्वतः कसेही करून लाइम लाइट मधे रहाण्यासाठी यांनी हे केलं असावं. जेंव्हा हा एपिसोड झाला, तेंव्हा या ब्रिगेडला कोणी फारसं ओळखत नव्हतं. दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरु नव्हते, आणि रामदास स्वामींच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम हे नेहेमीच करतात. दादोजी कोंडदेव पुरस्काराचे नांव बदलायला पण यांनी शासनाला भाग पाडले होते.

यावर एकच वाटतं, की इतिहासातल्या  एखाद्या महापुरुषाला ,एखाद्या जातीच्या दावणीला बांधायचे आणि मग त्याचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा. हे लोकं श्री रामदास स्वामींना पण खूप शिव्या घालतात तेंव्हा, त्यांनी जर बाबासाहेब पुरंदऱ्यांना पण शिव्या घातल्या तर त्या मधे कांहीच आश्चर्य नाही.

आप्पा, तुम्ही गेलात, फार बरं झालं हो, नाही तर गोनिदा पण ब्राह्मण म्हणून शिवाजी महाराजांच्यावर कांहीच लिहिण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही , असं ह्या  लोकांनी म्हट्लं असतं. शिवराळ  भाषा, ही या लोकांचे शस्त्र आहे. सभ्य माणसांप्रमाणे बोलणे किंवा वादविवाद यांना जमतच नाही. पण एक आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  काही नेते लोकं मिळून यांना फार मोठं करताहेत. अर्थात काही दिवसांनंतर मात्र हे आपल्याच ’आका’लाच गोत्यात आणतील..

पश्चिम महाराष्ट्रात जसे शिवाजी चे प्रस्थ आहे, तसेच विदर्भात आंबेडकरांचे आहे. प्रत्येक शासकीय ठिकाणाला आंबेडकरांचे नांव द्यावे असा आंबेडकरी मंडळींचा आग्रह असतो. माझा सगळ्यात जवळ्चा अगदी लंगोटीया मित्र नवबौध्द आहे. अगदी लहान पणा पासून एकमेकांच्या स्वयंपाकघरापर्यंत जाणं येणं होतं. आता तो सध्या एक मोठा प्रतिथयश डॉक्टर आहे. तो नेहेमी म्हणतो, आमच्या जातीमधल्या अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित लोकांना बहकवून त्यांना अशा कुठल्या तरी फालतू वादामधे अडकवून आपले स्वार्थ साधायचे , हाच आमच्या नेत्यांचा प्रयत्न असतो.

इथे दोन फोटॊ पोस्ट करतोय..

ambedakar

नागपूरचे विमान तळ हे बाबासाहेब आंबेडकर विमान तळ झाले आहे. मागच्या नागपूर भेटीत रेल्वे स्टेशन समोरुन जातांना, फ्रंट साइडला एक  फोटो दिसला. इथे पोस्ट करतोय. तसेच मुंबईला ही एक जाहिरात लावलेली दिसली. तिचा पण फोटो पोस्ट करतोय…Nagpur Railaway station

एकच विचारावंसं वाटतं , की असे पुतळे उभे केल्याने काय अचिव्ह होतं- हे मला तरी समजत नाही. मराठवाडा विद्यापिठाचे नांव बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठ करण्यात आलंय, त्याने काय दलित वर्गातल्या  लोकांचा शिक्षणाकडे ओढा वाढला क? असे प्रयत्न केले पाहिजे की सगळ्यांना शिक्षणाची महती कळेल,  आणि बाबासाहेबांना पण हेच अपेक्षित होतं.. पण नेमकं हेच विसरुन आपण मात्र आता पुतळ्यांच्या राजकारणाला सर्वस्व मानतोय..

आंबेडकर किंवा शिवाजी महाराज ऑलरेडी मोठे आहेतच. त्यांना असल्या खोट्या मोठेपणाची कांहीच गरज नाही. ह्या शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी मुळे मोठेपणा जर कोणाला मिळणार असेल तर तो आहे एखाद्या नेत्याला.  महाराजांच्या नावावर मतांचा मलिदा खायला मिळावा, म्हणून हा सगळा प्रयत्न असावा..

शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला काय किंवा केला नाही तरीही त्यांना काहीच फरक पडत नाही. फक्त राजकारणी मात्र आता या घटनेचा फायदा करून घेण्यासाठी मराठा- ब्राह्मण तेढ वाढवायला करुन घेताहेत.. असो..

या सगळ्या राजकारणात चार दोन टाळकी फुटतील,  चार-दोन मुडदे पडतील , नंतर मग  त्या शिवाजीच्या पुतळ्याशेजारीच एक लहानसं शहीद स्मारक पण उभं केलं जाइल शासना तर्फे- ज्या वर हुतात्मा झालेल्यांची नावं पण असतील. श्रध्दांजली म्हणून…. वर्षातून एकदा या स्मारकाची सफाई केली जाईल, त्याला हार फुलं वाहिली जातील.

महाराजांचा पुतळा मात्र हे सगळं बघून मनातल्या मनात ्हसेल, म्हणेल- मुर्खांनॊ, तुम्हाला   शिवाजीची शिकवण हीच  समजली का रे??

नंतर सारं सारं कसं शांत शांत होईल…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय... Bookmark the permalink.

21 Responses to पुतळ्यांचं राजकारण

 1. Nandkishor says:

  he lok sudharanar nahit kadhich……..brahman dvesh ha tyancha agenda ahe….

 2. archana says:

  Maratha cardcha waparnyache parinaam Sharada pawar aani companyla hya niwdnukit disalech aahet,tareehee he lok shahane hot naaheet mahanje hadda aahe.
  tumachyaa mitrasarakhyaa sujaan lokanee ughadapane hya virodhaat bolale paheeje. nahee tar jateey dwesh pasaravanyachaa hya loakanche kuteel kaarsthan safal honar, aani aapalyaa sarkhee sammanya manase matra horpalnaar,

  • अर्चना
   तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. उगिच अशा प्रकारच्या वादामधे कांहीच अर्थ नाही. उगिच वातावरण मात्र गढूळ होतं.

 3. त्याचं काय आहे, ह्या राजकारणी लोकांना नेहमीच नवीन तुंबडी लागते, त्यात मग नव-नविन विषय शोधायचे.. कधी पुतळे, कधी इतिहास! मग त्यासाठी, मराठा – ब्राह्मण किंवा इतर जातीय द्वेष काय, केवळ मतांसाठी ही आग तेवत ठेवायची आणि त्यावर आपल्या राजकारनाची पोळी चांगली भाजून घ्यायची!

  दादोजी कोंडदेव हे महाराजांचे गुरु होते, हेच आम्ही शिकलो, आजही तेच डोक्यात आहे. मग त्याचे राजकारण कशासाठी? आ. पुरंदरे यांच्यासाठी अपशब्द अन् गुंडगिरीची भाषा कशासाठी?

  एकमेकांची डोकी फुटतील – हे खरं – मात्र त्यात किती डोकी [बिन-डोक ?] राजकारणी असतील?

  थोडक्यात सांगायचे तर त्याचं काय आहे, डुक्कर [माफ़ करा, कदाचित तुमच्याकडे याहुनही चांगला शब्द असू शकेल!] प्राण्याला जसे सोन्याच्या पिंज-यात ठेवले – माणसाळले – तरी, मोकळा सोड्ल्यावर तो उकिरंडेच शोधणार!

  आता सगळेच सारखे नसतात – नसतील, काही अपवाद नक्कीच असतील – असावेतच!

  • भुंगा
   बरेच दिवसानंतर तुमची कॉमेंट वाचली. बरं वाटलं.. भारतामधे रुळलात कां?

   • नमस्ते महेंद्रजी,
    अहो नाय रुळायला मी एन. आर. आय. थोडाच आहे? याच मातीतला आहे ..

    गेले ४-५ महीने ज़रा जास्तच कामात गेले.. असो, अशाही कामात तुमचे लेख मात्र वाचत होतोच… मात्र कमेंटस टाकायला ज़रा आळसच केला म्हणा ..

    गेला आठवडा मस्त तरकारली – सिंधुदुर्ग फिरून आलो.. मस्त वाटले… 😉 उन्हात ज़रा काळा झालोय मात्र तरीही काही तक्रार नाही!

    • 🙂 सिंधुदुर्ग?? अरे वा,, मस्त आहे. मी उद्या जातोय गोव्याला , काही कामासाठी. परवा परत येइन. कोंकण मस्तंच आहे! कुठल्याही ऋतु मधे जा. मस्त वाट्तं कोंकणात!

 4. संदीप सबनीस says:

  एकदम बरोबर…नुसते राजकारण करून सगळ्या गोष्टींचा चोथा करून टाकला आहे….अनाकरण जाती जाती तील तेढ वाढव्हायचे धंदे आहेत हे…लोकांनीच स्मजुन वागले पाहिजे

 5. rajesh says:

  politics hech important zaale aahe. Jivant manus staute chya karanastav ladhto ha virodhabhas aaply lokanchi mansikta dakhavato naahi ka?

  yaala samanjas maansaani aaplya parine rokhale paahije ase vaate.
  rajesh

 6. suma says:

  lekh aavadla dhitpanahi aavadla
  suma kukarni

 7. Pingback: सी लिंक « काय वाटेल ते….

 8. sunil shinde says:

  bhandarkar institute burning issue is fake

 9. sushma says:

  Dr.ambedkar,shivaji maharaj,mahatma phule…..yasarkhya mahapurushanchya wicharanche anukaran kele tar thya putulyala khari manvandana asel…………

  sagelech mahapurushanchya wicharane wagayla lagle tar putule ubha karaychi garj padnarch nahi karn pratekachya manat ek mahapurush asel…………

  sagal kahi publicity sathi aahe……….je rajkarni putale ubhe kartat thyana tari thya naetyanche wichar mahit aastata ka?……nehmichi 2/4 wakya boltat nete ani lok wichar n karta thya rajkarni lokanchi sath detat…………

 10. आजकाल ब्राह्मणद्वेषाची फॅशन आली आहे. ब्राह्मणांच्या पूर्वजांनी बाकी लोकांवर अत्याचार केले त्याचा बदला आता ब्राह्मणविरोधात गरळ ओकून घ्यायचा ही नवीन पद्धत आहे. जेवढे तुमचे ब्राह्मणविरोधातले बोल जहाल, तेवढा तुम्हाला मान जास्त. संभाजी ब्रिगेडबद्दल तर बोलायलाच नको. दादोजी कोंडदेवांना शिव्या घालणं, बाबासाहेब पुरंदर्‍यांचा ‘बाबा पुरंदरे’ असा एकेरी उल्लेख करणं, प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून त्यात ब्राह्मणी कावा (ब्रिगेडवाल्यांच्या भाषेत ‘बामणी कावा’) आहे अशी कावकाव करणं ही आणि यांसारखी इतर कामं करायला हे लोक पुढे असतात. त्यापेक्षा शिवाजीमहाराज, समर्थ रामदास यांची शिकवण त्यांनी आचरणात आणली तर भलं होईल. त्यांचंही आणि बाकीच्यांचंही!

 11. tumdya says:

  Sambhaji Brigade.
  Sambhaji Maharajancha 1 tari gun ghya.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s