कायदे??

… कायदे म्हंटलं  की काय-द्या(य) चं ते बोला? असा अनुभव बरेचदा आलेला असतो, मुख्यत्वेकरून रस्त्यावर .. ट्रॅफिक पोलिसांच्या बरोबरच्या  डिस्कशन्स मधे तर नेहेमीच..! आपल्या कडे असं आहे की तुम्ही एखाद्या राजकीय पार्टीचे मेंबर असले की मग तुम्ही कितीही कायदे मोडा, कोणीच तुम्हाला काहीही म्हणणार नाही. कार्स वर लावलेली  राजकीय पक्षाची चिन्हे बघूनच पोलीस अशा राजकीय हेवी वेट  लोकांना  अडवायचे धाडस करित नाहीत, कारण त्यांना माहिती असते की जर या गाडीला अडवलं तर लगेच वरून फोनाफोनी सुरु होईल आणि उगाच माफी मागायची वेळ येइल.

मुंबईमधे तर कोणाचे हात किती वर पर्यंत पोहोचले आहेत तेच समजत नाही.पोलीस पण, मग अशा मोठ्ठी कार असलेल्या लोकांनी नियम मोडले तरीही त्यांना थांबवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा , तुमच्या माझ्या सारखा एखादा मध्यम वर्गीय माणुस ( सॅंट्रो, वॅगन आर सारखी लहान कार असलेला बकरा) शोधतात.

म्हणजे काय काहीच भिती पण नसते आणि चिरीमीरी पण सुटायची शक्यता असते. तसेच या अगदी वर्गातल्या लोकांना  एक प्रकारचा मानसिक समाधान  पण मिळते, की  आपल्या पुढे कोणीतरी पैसे घ्या हो… आणि मला सोडा हो..   असं म्हणत मागे लागतोय- आणि  पैसे घ्या पण कायद्याप्रमाणे पावती फाडु नका म्हणतोय.., आणि मग आपण  उपकार करतोय बरं  का तुमच्यावर पैसे घेउन – अशी बॉडी लँगवेज असते समोरच्या माणसाला ( आम्हाला ) काही पैसे घेउन सोडताना..

हे असं क होतं? कारण तुम्हाला आधी तो सांगतो की तुमच्यावर किती कलमं लागू शकतात- आणि तुम्हाला किती फाीन होऊ शकतो ते. आणि जरी पावती फाडली, तरीही लायसन्स जमा करावेच लागते, आणि पुन्हा कोर्टातली  एक चक्कर आहेच.. म्हणजे पुन्हा वैताग नुसता. याच सगळ्या गोष्टींच्या मुळे आपण त्यांची मनधरणी करतो.. कसंही कर.. आणि सोड रे बाबा….

आर टी ओ च्या नियमा प्रमाणे गाडीची नंबर प्लेट ही रोमन इंग्लिश मधे लिहिलेली असावी असा कायदा आहे. तसेच त्या नंबर प्लेटवर नंबर व्यतिरिक्त काहीच  लिहू नये असाही नियम  आहे.पोलिसांच्या पर्सनल बाइक्स वर पण पोलीस चं स्टीकर लावलेलं दिसतं,( जे कायदेशीर दृष्ट्या चुकीचे आहे) म्हणजे नो पार्किंग मधे उभी केली तरीही गाडी उचलून नेली जात नाही .

pawan 1परवा पुण्याहून परत येतांना एक कार समोर समोर चालत होती. त्या कारच्या नंबरप्लेटवर लिहिलं होतं ’पवन’ त्याचा फोटो इथे पोस्ट करतोय, तुम्ही ओळखता येतो का बघा तो नंबर! अशा तर्हेने नंबर लिहिणे हे मान्य नसले तरीही ही कार (अशा अनेक कार्स)  मूंबईच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरते आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून!

एक दिवस ऑफिस मधून घरी जातांना एक कार दिसली, त्या कारच्या नंबरप्लेटवर लिहिलेलं होतं ..”दादा” .. तिचा पण फोटो सोबत पेस्ट करतोय. तुमच्या आमच्या कारची काचेवर लावलेली फिल्म थोडी जरि डार्क असली तरीही तुम्हा आम्हाला त्रास देणारे पोलीस जेंव्हा अशा कार्स रस्त्यावर चालतात तेंव्हा कुठे गेले असतात कोणास ठाऊक..

dada

तुम्हीच  सांगा अशी कार मुंबईच्या रस्त्यावर राजरोस पणे फिरते आणि त्यावर काहीही ऍक्शन घेतली जात नाही. याचाच अर्थ असा पण होतो, की जे कांही नियम आहेत ते केवळ लॉ अबाइडींग सिटीझन्स साठीच आहेत.प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि त्यांची मुलं,  राजकीय नेत्यांच्या साठी, किंवा त्यांच्या चमच्यसाठी नाहीत.

जर तुमचे कोणी वर नमूद केलेल्या लोकांशी संबंध नसतील तर   जरा सांभाळूनच कार चालवा.. !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged . Bookmark the permalink.

11 Responses to कायदे??

 1. कदाचित अशा गाड्यांचे फोटो – अशा [ तुमच्यासारख्या ] जळजळीत लिखाणासहित प्रकाशित केले तर “त्या सर्वांनाच” थोड़ी तरी शरम [असेल तर!] येईल..

  नाहीतर .. गाढवासमोर वाचली गीता अन् कालचा गोंधळ बरा होता असं व्हायचे!

  • मला वाटत नाही काहि फरक पडेल त्यांना. मनात एक विचार आला होता, की जर एखाद्या ऍंटी सोशल ऍक्टीव्हिटी मधे अशी एखादी कार दिसली,( किंवा एखाद्या साध्या हिट ऍंड रन मधे) तरिही तिचा नंबर लिहुन घेता येणार नाही कोणालाच..

  • vind says:

   गाढवासमोर वाचली गीता अन् वाचणारा गाढव होता

 2. ajayshripad says:

  फार छानं वाटलं वाचुन….! खरचं कुनितरी मिळालं यवर बोलणारं….! बर्याच दिवसांचा डोक्याला चावतोय हा विषय..!

  • अजय
   प्रतिक्रियेकरता आभार. मला पण बरेच दिवसांपासुन छळंत होता हा विषय, कधी तरी गम्मत म्हणुन काढलेले फोटॊ हे असे उपयोगी पडतिल असे वाटले नव्हते. अहो, हे तर कांहिच नाही.. एम पी आणि छत्तिसगढ मधे तर गाड्यांवर नंबरंच नसतांत.. आणि ती फॅशन आहे म्हणे.. अहो त्याशिवाय लोकांना कार नविन आहे कसं कळणार?

 3. ajayshripad says:

  हा सर पण आज काल पुण्या-मुंबइ च काय पण माहाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्याची हीचआ अवस्था आहे..
  आणी आता तर जवळपास प्रत्येक जन आपल्या गडिवर आशा प्रकरे नवं लिहायला लागले आहेत.. हा विषय फार चिंताजनक आहे.. आणी RTO कडुन मीळालेले सरासरी आकडेही थक्क करणारे आहेत…!

 4. Aparna says:

  अमेरिकेत अशा प्रकारची नंबरप्लेट बनवून घेता येते फ़क्त रजिस्ट्रेशन चार्जेस जास्त आहेत. आपल्याकडे सुरु करावी का ही पद्धत?

  • अहो आज एकानी मराठीत दादा लिहिलंय, उद्या एखाद्याने अरेबिक मधे लिहिलं तर कोणाला समजणार आहे? म्हणुन मला वाटतं सध्याचा कायदाच योग्य आहे.
   अमेरिकेत नंबर प्लेट्ची भाषातर इंग्रजीच रहात असेल नां?

 5. bhaanasa says:

  बरोबर, भाषा इंग्रजीच असते. इथे बहुतांशी लोक आपल्याला आवडेल तशी नंबर प्लेट करून घेतात. मात्र तुम्ही म्हणता त्याशी मीही सहमत आहे. कायदा धाब्यावर बसवणे, हवा तसा वापरणे हे आजकाल आपल्याकडे भूषण समजले जाते. जोवर ह्यात बदल होत नाही तोवर उद्य अरेबिक नंबर प्लेट पाहायला मिळाली तरी धक्का बसू नये.

 6. काय हो काका, स्वतःला भारताचे नागरिक म्हणता आणि एवढी साधी गोष्ट माहित नाही तुम्हाला? अहो, भारतात सामान्य माणसांचे कायदे वेगळे आणि राजकारणी, सिनेस्टार आणि इतर सेलेब्रिटी लोकांसाठीचे कायदे वेगळे असतात. एवढंही माहित नाही तुम्हाला? श्या! आता बघा, मी एखाद्या माणसाचा खून केला तर मला फाशीची शिक्षा होईल की नाही? पण सलमान खानने दोन कामगारांच्या अंगावरून गाडी नेली आणि त्यांचा जीव घेतला. झाली का त्याला शिक्षा? अहो, सिनेस्टार मंडळींना प्रत्येकी तीन खून करायला परवानगी आहे. सलमानने तर फक्त दोनच खून केले आहेत! आणि लोक उगाचच त्याच्या विरोधात बोलतात! तसंच आहे या वरच्या लोकांचं. त्यांना नंबर नसलेली गाडीसुद्धा चालवण्याची परवानगी आहे आणि तुमचा असा उगाचच गैरसमज झाला की त्या लोकांनी कायदे मोडले…. 😉

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s