वॉल आर्ट..

अहमदाबादला गेलो की नेहेमीच एक गोष्ट मला फॅसिनेट करते. ती म्हणजे वॉल आर्ट.. किंवा त्याला  एक प्रकारची ग्राफिटी  पण म्हणता येइल.  ग्राफिटी हा विद्रोही आर्टचा प्रकार. पण इथे विद्रोही आर्ट नाही, पण केवळ भिंती चित्रे आहेत म्हणून ग्राफिटी म्हणतोय मी त्याला.

gandhiतुम्ही एअरपोर्ट वरून  आश्रम रोडकडे जायला निघालात की एक सबवे लागतो. त्याचं नांव काय हे मला माहिती नाही. पण ह्या संपुर्ण सबवे मधे महात्मा गांधींचं लाइफ साइझ पोर्ट्रेट बनवलं आहे. अगदी ६०-७० फुट लांबीचं  किंबहुना त्यापेक्षाही जास्त लांबीचं असेल. जवळपास संपुर्ण सबवेच्या भिंतीवर  हे चित्र बनवलेले आहे.

हे बनवायला फक्त लहान लहान टाइल्स चे रंगीत तुकडे वापरण्यात आलेले आहेत. थोड्या अंतरावरून पाहिलं तर एकदम सुंदर चित्र दिसतं.. यात, महात्मा गांघींची वेगवेगळी रुपं आहेत, मग गांधीजी अगदी कचरा उचलतांना पण आहेत. या सबवे मधे इतका ट्रॅफिक असतो, की फोटो काढणं पण कठिण होतं. सारखी वाहनं समोरुन जात असतात. त्यामुळे ओपन व्ह्यु मिळत नाही चित्रांचा. बरं.. थांबावं म्हंटलं तर ताबडतोब मागे हॉंकिंग सुरु होतं. त्या मुळे थांबता पण येत नाही. माझी इथे अहमदाबादकर वाचकांना विनंती आहे, जर ह्या भिंतीचे संपुर्ण फोटो तुमच्या कडे असतील तर कृपया मला इ मेल ने पाठवा. नाहितर मी अगदी पक्कं ठरवलं आहे की पुढच्या अहमदाबाद टुरला मी नक्कीच फोटो काढणार गाडीतून उतरुन.. 🙂gandhi2

एक फोटॊ मी कार मधुन डाव्या बाजुच्या भिंतीचा पण काढला आहे, तो केवळ टाइल्स च्या वापराचा अंदाज यावा म्हणुन.. अतिशय सुंदर चित्र आहे हे.. अप्रतिम..तो गांधीजींचा जमिनिवरचा कचरा उचलतांनाचा पण फोटॊ काढला आहे पण , मधे कारचं हॅंगिंग आल्यामुळे जरा बिघडलाय..तरीही इथे पोस्ट करतोय.

आज अगदी सहज मोबाइलमधली चित्र पहात होतो, तर हे दोन फोटो दिसले म्हणुन हे पोस्ट लिहायला घेतलं. या व्यतिरिक्त अजुन एक गोष्ट आहे अहमदाबादमधली ! लॉ कॉलेज चौकातला नळ.. ह्या नळाला कुठेच सपोर्ट दिलेला दिसत नाही पण नळामधुन पाणि नेहेमीच वहात असतं. पहिल्या वेळेस तर मी तिथे थांबुन निट पाहिलं की कुठे सपोर्ट आहे कां.. त्या नळाला. बराच वेळ बघितल्यावर लक्षात आलं की त्या पाण्याच्या धारेमधे एक पाइप आहे जो पाणि वर नेतो . अहमदाबादच्या रखरखित उन्हाळ्यामधे ह्या नळामधुन धो धो वहाणारं पाणी खरंच नजरेला किती सुख आणि थंडावा देतं ते स्वतः अनुभवल्या शिवाय समजणार नाही.

tapया शिवाय पण बरंच आहे अहमदाबादमधे.. मला माहिती आहे माझं पोस्ट खाण्याच्या जागांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. पण आज जस्ट फॉर अ चेंज काहीच लिहित नाही खाण्याबद्दल… 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , . Bookmark the permalink.

6 Responses to वॉल आर्ट..

 1. bhagyashree says:

  asa mala badodyatla shankaracha putla hi far awdto!
  sahi chitre..

  • हो, बडोद्याचा पुतळा, तसेच पुण्याचा सोमटणे जवळचा मोठा गणपती तो पण फारच सुंदर दिसतो. त्या मुर्तीचा पण फोटो सुंदर येतो..
   धन्यवाद..

 2. sahajach says:

  यावेळेस अहमदाबादला जायचा विचार आहे….पुढची पोस्ट लवकर टाका…..
  ही चित्रे तर नक्की पहाणार….
  मस्कतमधे पण असे बरेच काही आहे….प्रयत्न करते ते टाकण्याचा….

  • तन्वी,
   अवश्य … मला वाटतं ही एक मुघल आर्ट आहे. इस्तंबुल मधे एक मस्जिद आहे ती संपुर्ण मस्जिद अशाच प्रकारे सजवलेली आहे. फक्त रस्त्यावर अशी आर्ट म्हणुन जरा वेगळं वाटलं.. धन्यवाद…

 3. graffiti ह्या विषयावर फार पूर्वी एक उपरोधिक ब्लॉग लिहिला होता (लिहिला म्हणण्या पेक्षा, फक्त काही फोटो कॉपी पेस्ट केले होते.) http://zmanoj.wordpress.com/2011/03/09/grafitti/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s